Monday, April 23, 2018
म . टा . वृत्तसेवा , अकोले : -हरिशचंद्र गड -कळसुबाई अभयारण्यात गतवर्षीपेक्षा पाचपट म्हणजे १५६शेकरू वाढल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगनति नुसार स्पष्ट झाले आहे . वन्य जीव विभागाच्या माहितीनुर या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची घरटी ५९९आढळले आहेत मात्र त्यांची संख्या १५६ असून हि संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे मात्र त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यकता असून तसे प्रयत्न वनविभागाकडून होणे गरजेचे आहे .पावसाळा सुरु होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात यामुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते . पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली असून हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत सुरु असते त्यामुळे अंतिम आकडा हा जून ला मिळेल असे वनविभागाचे मत आहे . हि गणना "जीपीएस "(ग्लोबल पोझिशनींग )या तंत्राद्वारे केली जाते यंदा त्या पद्धतीने केलेल्या गणनेत शेकरूंची आकडा वाढू शकतो अशी आशा उपवनसरंक्षक एम . के . अर्नाळकर यांनी व्यक्त केली आहे . अभयारण्यातील इतरत्र त्यांचा अधिवास आहे का , याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल आडे यांनी सांगितले . अकोले तालुक्यात शेकरूंची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले असून हरीश्चन्द्र गड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ५९९ घरटी आढळली असून एकूण १३९ शेकरू या परिसरात असून कळसुबाई घाटघर परिसरात १७ शेकरू असून तिथेही ४३ घरटी आढळली आहे तर गतवर्षी प्राणी पक्षासह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळले असल्याची माहिती वनाधिकारी आडे . यांनी दिली आहे . चौकट -- शेकरू ...... वजन दोन ते अडीच किलो , लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजी सारखे लाल असतात त्याला मिशा , अंगभर तपकिरी तलम कोट आणि गेल्यावर , पोटावर पिवळसर पट्टा , झुबकेदार लांब शेपूट असते , शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर - जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते . एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते ते १५ ते २० फुटाची लांब उडी मारू शकते . विविध फळे व फुलातील मध हे त्याचे खाद्य असते . महाराष्ट्रात भीमशनकर , कळसुबाई हरीशचंद्रगड अभयारण्य , आजोबा डोंगररांगांमध्ये , माहुली , वासोटा , मेळघाट , ताडोबात हे शेकरू आढळतात शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्या सहज वस्त्यांलगत त्याचे ..वास्तव्य सोबत फोटो . 2 Attachments
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
nice info
ReplyDelete