Thursday, August 15, 2024
संदीप वाकचौरे
नमस्कार, आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार.. खरे तर वाढदिवस म्हणजे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस.. आजवरच्या झालेल्या प्रवासात आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा हिशोब करण्याचा दिवस.. आजवरच्या प्रवासात शब्द आणि विचार सोबतीला होतेच .त्यांनी कधी धोका दिला नाही आणि त्यांच्या सोबतीने जगताना कधी निराशाही आली नाही. कदाचित माणसे सोबतीला होती.. ती दूरही गेली असतील.. मात्र शब्द, विचारांची सतत सोबत राहिली. त्या शब्द, विचारांच्या सोबतीने जगताना अनेक चांगली माणसे मिळत गेली .ही माणसे जीवनाची कायमची ठेव बनली. या माणसांनीच जगण्याचा आधार दिला.. या माणसांनी प्रेम ,स्नेह असं सारं भरभरून दिले. तुम्ही माझ्या आयुष्याचा प्रवासातील शक्ती प्रदान करणारे सशक्त हात आहात याची मला पूर्णत: जाणीव आहे.त्यामुळे आजचा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या शुभेच्छामुळे माझा आनंद द्विगुणित करणारा झाला आहे.तुमच्या शुभेच्छांच्या बळामुळे उद्याच्या जगण्याची उमेद उंचावत जाणार आहे.तुमच्या स्नेह असाच वृद्धिंगत होवो..ही अपेक्षा.. आपले पुनश्च मनःपूर्वक आभार.
संदीप वाकचौरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
No comments:
Post a Comment