Monday, September 10, 2018

अकोले -- निसर्गाचे चहुबाजूने लेणे लाभलेले व आशिया खंडात एकमेव सांधण दरीचे अतिदुर्गम गाव साम्रद , रोजगारासाठी इथला आदिवासी माणूस दही दिशा फिरत होता . मात्र त्यांची मुले शिकल्याने त्यांनी पर्यटनातून रोजगार शोधून वृद्धांचे गाव असा माथी लागलेला ठसा आपल्या कार्य कर्तृत्वाने पुसून काढला आहे . आज या गावातील ६० टक्के आदिवासींना बाराही महिने रोजगार उपलब्ध झाला आहे . त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती केलीच पण गावातील महिला तरुण यांनाही काम उपलब्ध करून रोजगार निर्मिती केली आहे रोज पाचशे हजार पर्यटक सांधण दरी म्हणजे साम्रद गावात येतात . येण्यापूर्वी दीपक बांडे , नितीन रगडे मच्छिन्द्र बांडे , ,तुषार भांगरे , लालू भांगरे यांच्याशी संपर्क साधून आपली राहण्याची , जेवणाची व परिसरात फिरण्यासाठी नियोजन करून व्यवस्था करतात . व त्यानंतर राज्यातून , नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येऊन इथली आदिवासी माणसांचा पाहुणचार घेतात त्यांच्या घरात व तंबूत राहून खरा खुरा निसर्गाचा आनंद लुटतात व जाताना पुन्हा येण्याचा मानस उरी बाळगून निरोप घेतात . आदिवासी बहुल अ स लेले साम्रद गाव सुमारे ८०० लोकवस्तीचे हे गाव चराची वाडी , गावठा , भिल्लवाडी या तीन वाड्यात विभागलेले या गावात पावसावर अवलंबुन शेती तीही चार महिने त्यामुळे शेतीची कामे आटोपली कि आदिवासी माणसे रोजगाराच्या शोधात नारायणगाव , जुन्नर , नाशिक , शहापूर , ठाणे या भागात जात असे तर वृद्ध पुरुष ,महिला गावात राहत त्यामुळे हे म्हताऱ्याचे गाव अशी ओळख साम्रद गावाची होती .चार महिने गावात व ८ महिने रोजगारासाठी बाहेर असे इथली आदिवासींचे जीवन होते या गावच्या मागे २ किलोमीटरवर सांदणदरी हि आशिया खंडातील एकमेव दरी काही निसर्गप्रेमी ना गुगलवर सापडली नि मग हे निसर्ग प्रेमी या गावाकडे येऊ लागले त्यामुळे आपल्या सोबत आणलेला तंबू , जेवणाचे साहित्य संपले कि ते साम्रद गावातील लोकांकडे येत व त्यांचे जेवण , राहण्याची व्यवस्था करून घेत त्या बदल्यात त्यांना पैसेही देत असे . त्यामुळे आदिवासींच्या हातालाही काम मिळू लागले त्यांना रोजगारासाठी जे बाहेर जावे लगे ते यामुळे थांबले . तर गाईड म्हणून या पर्यटकांसमवेत रतनगड , अलन्ग , कुलंग , मलंग , घाटघर , कोकणकडा , अमृतेशवर मंदिर दाखवून त्यांना गाईड म्हणून पैसे मिळू लागले . नि गावातील तरुण मुले हि कामे आवडीने करू लागली , महिला स्वादिष्ट जेवण , पुरुष राहण्याची व्यवस्था तर तरुण गाईड म्हणून काम करू लागली हळू हळू निसर्ग प्रेमी पर्यटक वाढू लागले व आदिवासी तरुणांनी तंबू विकत घेऊन पर्यटक सांगतील तिथे तंबू उभारून तिथेच जेवण देऊन त्यांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी प्रयत्न करू लागले पर्यटकही निसर्गात आल्यावर या गावातील आदिवासी मान्संशी एकरूप होऊ लागला नव्हे तर आपल्या कुटुंबातीलच लोक असल्यासारखे आदिवासी ग्रामस्थ त्यांची सेवा करून आपल्या रोजगाराचा प्रश्न मिटवू लागली आहेत आज साम्रद गावात ५०० पेक्षा अधिक तंबू आहेत एका व्यक्तीसाठी ५०० रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत त्यांना भाडे मिळते जेवणाचे वेगळे पैसे शाकाहारी , मांसाहारी जेवण , आपल्या शेतात पिकविलेला सेंद्रिय पद्धतीचा तांदूळ , भाजीपाला व घरात पाळलेल्या शेळ्या , कोंबड्या याचे चुलीवरील जेवण त्यामुळे पर्यटक जाम खुश आहे . तो गेल्यानंतर त्याचे मित्र , नातेवाईक यांनाही साम्रद गावाचा पत्ता देऊन त्यांनाही पाठवत असल्याने तसेच शाळेच्या सहली , सरकारी , खाजगी कंपन्या , गुजराथ , राजस्थान ,कर्नाटक ,केरळ , या राज्यातूनही मोठ्या संख्येने पर्यटक वर्षभर येतात . व साम्रद गावातच मुक्काम करतात मुक्कामात जेवण गाणी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन जातात साम्रद गाव हे वृद्ध म्हतारे यांचे गाव राहिले नसून पर्यटनाच्या माध्यमातून समृद्ध गाव बनू पाहत आहे . गावातील घरे बदलू लागली आहेत , सायकल नसलेल्या घरासमोर चार चाकी , दोन चाकी गाड्या दिसू लागल्या आहेत , शेळ्या , मेंढ्या , गाई , म्हशी , कोंबड्या बागडू लागल्या आहे गाव म्हातारी कात टाकून नवचैतन्याने बहरू लागले आहे .अभयारण्य असल्याने वनविभागहि या गावच्या विकासासाठी हातभार लावू लागले आहेत . गावातील तरुणाला गावातच काम मिळू लागले आहे . मुले शिक्षण घेऊन बीएस्सी ऍग्री होऊन कृषी पर्यटनाकडे वळू लागले आहेत . तर महिला वारली पेंटिंग , शेवया , पापड्या हे महिला उद्योग करून त्याची विक्रीही करीत आहे तर जंगलातील जांभळे , आंबे , करवंन्दे , आंबळे विकून त्यातूनही रोजगार मिळवू लागले आहेत तर शालेय विधार्थी शाळेतून आल्यावर रानफुले गोळा करून त्याचे गुच्छ बनवून त्यातून ५० ते १०० रुपये रोज कमवू लागली आहेत . २०० घरापैकी १२५ घर्नमध्ये तंबू आले आहेत गावातील गुलाबबाई नामदेव बांडे , काळाबाई मारुती मुठे व महिलांनी रुख्मिणी महिला बचत गटाची स्थापना करून त्या माध्यमातून सेंद्रिय शेती तुन भाजीपाला निर्मिती सुरु केली आहेनारायणगाव ला१५० रुपये मजुरी साठी जाणाऱ्या महिला गावात ५०० रुपये रोज कमवू लागल्या आहेत वृद्ध माणसेही कुटुंबातील माणसे जवळ असल्याने खुश आहेत . मुंबई येथील ट्रॅकर्स नंदू चव्हाण यांनी साम्रद गावातील १५ आदिवासी तरुणांना प्रशिक्षण दिले व त्यानंतर गुजराथ सरकारच्या सहकार्याने त्यांना राजस्थान मध्ये नेऊन १ महिन्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे राहता येईल असे प्रशिक्षण मिळाल्याने हि १५ तरुण आज ट्रेकिंगच्या माध्यमातून काम करून आपला रोजगार मिळवीत आहे . त्यात नितीन रगडे , ईशवर मुठे , दीपक बांडे , जगदीश बांडे , संपत बांडे , राजेंद्र भांगरे , ज्ञानेशवर बांडे , रमेश बांडे , आकाश बांडे , लहू मुठे , लहू भांगरे अडीच सहभाग होता पहिल्यांदा सांदण दरीत व त्यानंतर राजस्थान मध्ये त्यांना प्रशिक्षण दिल्याने आदिवासी तरुण संपूर्ण परिसर पाहण्यासाठी पर्यटकांसाठी मदत म्हणून काम करतात , प्रत्येकाकडे मोबाईल ,मोटरसायकल व ट्रेकींग साहित्य ,बॅटरी , तंबू आहेत त्यांच्या जोडीला प्रत्येकी तीन तरुण असल्याने ५० तरुणांचा एक समूह साम्रद गावात असून ऑन लाईन शोशल मीडियावर आहे साम्रद परिसरात आयडिया रेंज असल्याने पर्यटकांशी सहज संपर्क होतो . कोट -दीपक निवृत्ती बांडे (सांधण हॉटेल मालक -८६०५८८८१०९)-गेली ५ वर्षांपासून मी साम्रद गावात हॉटेल व्यवसाय व ट्रेकिंग चे काम करतो माझ्यावर घरातील १० माणसे आवलंबून आहेत . यापूर्वी घरातील सर्वच जण मंजुरीसाठी नारायणगाव जुन्नर येते जात होतो . चार महिने मजुरी करून घरी पैसे आणून त्यात पुढील चार महिने कुटुंब चालवायचो . माझेकडे साधी सायकल नव्हती परंतु सांदण दरी कडे येणाऱ्या पर्यटकांमुळे मला रोजगाराची संधी उपलब्ध झाली शिवाय त्यातूनच मी सांधण हॉटेलची निर्मिती केली व आज माझेकडे मोटरसायकल चारचाकी असून रोज माझा व्यवसाय होतो बाराही महिने माझा व्यवसाय चालत असून मी गावातील तरुणांना व महिलांना काम उपलब्ध करून देतो मला मुंबई , पुणे , नाशिक , नगर , ठाणे शहरातून फोन येत असतात तर राजस्थान व गुजराथ मध्येही माझे ग्राहक आहेत ग्रामीण जेवण चुलीवरची भाकर पर्यटकांना खुप आवडते तर रिव्हर्स फोल , सांधणदरी , काजवा महोत्सव ,रानफुले यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात पावसाळ्यात मी घरी राहण्याची व्यवस्था करतो तर उन्हाळा व हिवाळ्यात तंबू लावून पर्यटक राहतात व खुशीने पैसेही देतात एका व्यक्तीने १५०० रुपये दिले तर नाश्ता , , चहा , जेवण ,निवास व्यवस्था , गाईड व्यवस्था त्यातच करतो . दरवर्षी व्यवसाय अधिक गतीने होत आहे . महिला , मुले व वृद्धांनाही प्रयत्नातून रोजगार उपलब्ध होत आहे . -----नितीन दिलीप रगडे (बीएस्सी ऍग्री -९७६५००८९३१) - मी कृषी पदवीधर आदिवासी तरुण आहे . माझ्या शेतात कृषी पर्यटन करण्याचा माझा मानस आहे . बैलगाडीतून सफारी करणे , सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले धान्य , भाजीपाला उपलब्ध करून दिल्याने पर्यटक हौशीने येतात चंदर बांडे (आदिवासी शेतकरी साम्रद )- साम्रद गाव अतिदुर्गम असून या गावातील प्रत्येक माणूस रोजगारासाठी २०० किलोमीटरवर जातो पण अलीकडच्या काळात सांधण दरी मुळे गावाला चांगले दिवस आले आहेत . गावात पैसे आल्याने समृद्धी आली आहे गावातील माणसाला गावातच रोजगार मिळू लागला आहे . चंद्रकांत बांगर (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी )---अकोले तालुक्यात साम्रद गावाने पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती केली आहे त्यातून मुलं मुलींचे शिक्षण होत आहे आदिवासी तरुण पदवीधर होऊन नोकरीच्या मागे न लागत आपल्या शेतात कृषी पर्यटन कास धरून स्वतःच्या हिमतीवर आपला व्यवसाय पुढे नेट आहे रोज हजारो पर्यटक इथे येतात शनिवारी रविवारी येथे निसर्ग प्रेमींची यात्रा भरते . यावेळी गावातील प्रत्येक घरात स्वयंपाक होतो पर्यटक हा स्वयंपाक पैसे देऊन आवडीने खातात मुक्काम करतात त्यातून आर्थिक उत्पन्न वाढते . या भागात रस्त्याची दुरावस्था आहे ते नीट झाले तर अजूनही पर्यटकांची संख्या वाढेल वनविभागही याबाबत सतर्क आहे . -ईश्वर मुठे (बीकॉम -८९७५१६२९९१)- (उर्वरित बातमी ५ वाजता )- साम्रद रतनवाडी घाटघर येथील २०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असून २००० तंबू या परिसरात आहेत (उर्वरित बातमी ५ वाजता )

सांदण दरी 




























बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...