Monday, May 14, 2018

bhandardara vasant sut kendr "वसंतसेतू "हे काव्यात्मक

अकोले -भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोटाने गेलेली काळीशार सडक  भंडारदऱ्या पासून एक ते दिड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीने "वसंतसेतू "हे काव्यात्मक नाव धारण करणारे केशव खाडे यांचे कौलारू व पत्र्याचे घर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे .औरंगाबाद , नाशिक ,पुणे , मुंबई , गोवा , गुजराथ , कर्नाटक कुठून कुठून लोक इथे येऊन राहतात . केशवच्या आईच्या हातच्या गरमागरम भाकरी , गावठी कोंबडी , मासे  खाऊनत्यांच्या रसना तृप्त होतात , इथे होणार्या  ग्रामीण आदरतिथ्याने आलेल्या अभ्यागत खुश होऊन जातात . केशव त्याची आई , आजी , पत्नी , भाऊ भावजयीहे सर्वच जन येणाऱ्या पर्यटकाच्या समाधानासाठी तत्पर असतात खाडे यांचे संपूर्ण कुटुंबच जणू या पर्यटनव्यवसायात रमून गेले आहे . नाशिक – नगरच्या सीमेवरील तसेच मुंबईकरांच्या आवडीचे व हवेहवेसे वाटणाऱ्या भंडारदरा परिसरात डोंगराच्या कुशीत संपूर्णपणे शेतीमध्ये उभारण्यात आलेल्या घरगुती “वसंत सुत “हे कृषी पर्यटन केंद्र निसर्गरम्य पर्यटनासाठी उत्तम निवास – न्याहारीसह परिसरातील गड किल्ल्यांचे ट्रेकिंग , कम्पेनिगसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे .पर्यटनाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे आणि भंडारदरा परिसरातील वास्तव्य व आजूबाजूचे गड- किल्ले नेहमी खुणावत राहिल्याने निसर्गप्रेमी केशव खाडे यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्याला डीएड व्हायचे होते पण पैसे अभावी तो विचार सोडून द्यावा लागला , केशवाला तशी लहानपणापासूनच व्यवसायाची आवड दहा वर्षापासूनचा असल्यापासूनच तो भंडारदरा येथे चणे फुटाणे विकायचा रुपयाची पुदी विकून दोन रुपये मिळत त्यामुळे व्यवसायात चांगली आर्थिक प्रगती होते हे तेव्हा त्याला कळले तर वाणिज्य शाखेतील शिक्षणामुळे व्यवसायाबतचा आर्थिक दृष्टिकोन अधिक व्यापक झाला . राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने "गाईड प्रशिक्षण कार्यक्रम "आयोजित केला होता त्यात ५० युवकांसोबत केशव हि सहभागी झाला होता. योगेश कर्डीले या उत्साही मार्गदर्शकाने पर्यटकांसोबत कसे वागायचे , त्यांची निवास व्यवस्था , भोजन व्यवस्था याबरोबरच भंडारदरा परिसरातील सह्यगिरी पर्वत ,गड किल्ले , नद्या , जलाशये , देवराई , मंदिरे , आदिवासी संस्कृती, प[परिसरातील जैविविधतेची माहिती सखोलपणे सांगितली त्यामुळे सभोवतालच्या परिसराचे या तरुणांना वेगळीच ओळख निर्माण झाली या प्रशिक्षण कार्यक्रमातून प्रकल्प कार्यालयामार्फत केशवाला निवासासाठीचे ४ तंबू हि उपलब्ध झाले या प्रशिक्षणाने केशव आणि त्याच्या शेतकरी कुटुंबाच्या जीवनाला वेगळीच दिशा मिळाली . भंडारदरा जलाशयाच्या काठी केशवने लावलेल्या ४ तंबूत निवासाला आलेले पहिले पर्यटक होते केरळचे त्यांना तंबूतील निवास आणि केशवने घरून बनवून आणलेले भात  , भाकरी , गावठी कोंबडी हे जेवण खूपच आवडले आणि केशवच्या प्रयत्न व्यवसायचा श्रीगणेशा झाला . गेल्या दहा वर्षात खडे कुटुंबाचा हा प्रयत्न व्यवसाय दिवेसंदिवस वाढत चाललेला आहे . केशवकडे आता ४ तंबूचे १०० निवासी तंबू उपलब्ध झाले आहेत आपल्या बरोबरच त्याने आपल्या कुटुंबाला , मित्रांनाही या व्यवसायात सहभागी करून घेतले आहे . खाडे या शेतकरी कुटुंबात होणारा पाहुणचार हा अनेकांच्या आनंदाचा विषय ठरला आहे . कुठून कुठून लोक इथे राहायला येतात केवळ भारतातूनच नव्हे तर , स्कॉटलँड , ऑस्ट्रेलिया , नेदरलँड , व्हेनिस , अमेरिका , इंग्लड , चीन , नेपाळ आदी देशातूनही पर्यटक इथे येऊन गेले आहेत . व्यवसायाची गरज म्हणून केशवने पर्यटकांच्या सुविधा वाढविल्या आहेत राहण्यासाठी ४ खोल्या बांधल्या आहेत तंबूची संख्या वाढवली आहे घरातील लोकांबरोबरच परिसरातील तरुण तसेच महिलांनाही व्यवसायात सहभागी करून घेतले आहे . भांडारदऱ्याचे बॅकवॉटर काठी नदी किनारी पर्यटकांना राहण्यासाठी टेंथ लावतोच त्याबरोबरच रतनगड , कळसुबाई , अलन्ग , कुलंग या गड किल्ल्यावरही त्यांनी तंबू लावून पर्यटकांना सुविधा पुरविल्या आहेत या व्यवसायात घरातील कुटुंबीयांची मदत झाल्याची केशव सांगतो त्याची आजी , आई च्या हातच्या बाजरी , तांदुळाच्या भाकरी गावठी चवदार  कोंबडी , पाट्यावरची मिरची ,जलाशयातील चवदार मासे , पर्यटकांना आवडतात पत्नी तसेच भावजयी स्वयंपाकात मदत करतात एक भाऊ भंडारदरा जलाशयात होडी चालवतो तर कुणी गाईड म्हणून काम करतात स्वतः केशव आजही पर्यटकांना बरोबर गाईड म्हणून जे काही आवश्यक आहे ते त्यांनी आत्मसात केले याबरोबरच उत्तम छायाचित्रणाची कलाही अवगत करून घेतली, हळूहळू त्यांनी पर्यटकांना सर्व सुविधा पुरविल्या असून बैलगाडीतून शिवार फेरी , जंगल भ्रमंती व्हॅली कॅम्प आयोजन तो करतो महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या "निवास - न्याहारी "योजनेअंतर्गत "वसंत सूट "ची नोंदणी करण्यात आली आहे . केशवच्या घरी मिळणाऱ्या भोजनाचे वैशिष्ट्ये म्हणजे परिसरातील ग्रामीण पदार्थच इथे मिळतात स्वयंपाकासाठी लागणार तांदूळ , गहू , बाजरी , कांडा , बटाटा , लसूण , मिरची तो स्वतःच्या शेतात निर्माण होणारे व सेंद्रिय वापरले जाते . बराचसा स्वयंपाक चुलीवरच केला जातो त्यामुळेच लोकांना इथला पाहुणचार आवडतो , डॉकटर , वकील , अभियंते , आर्किटेकट , छायाचित्रकार , शिक्षक , पत्रकार प्राध्यापक , लेखक असे विविध प्रकारचे लोक इथे आवर्जून येतात काही काही परत परत येतात. केशवने अमेझिंग भंडारदरा नावाची वेबसाईट सुरु केली असली तरी येणाऱ्या पर्यटकांकडून होणारी प्रसिद्धी नवीन पर्यटकांना इथे घेऊन येते . पावसाळ्यात सभोवतालच्या निसर्गानेकात टाकली कि , पर्यटकांची संख्या वाढते तर हिवाळ्यात पर्यटक धरणाकाठच्या अथवा गड  किल्ल्यातील तंबू निवासात प्राधान्य देतात पावसाळ्याच्या तोंडावर रखरखीत उन्हाळ्यातही या परिसरात अवतरणार काजव्यांची मोहमयी दुनिया पाहण्यासाठी आता मोठ्या संख्येने पर्यटक येऊ लागले आहे . त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा त्यांच्याकडे राबता असतो या व्यवसायामुळे कुटुंबातील सर्वानाच रोजगार उपलब्ध झाला आहे . त्याबरोबरच त्याचा मित्र परिवार शेजारी यांनाही रोजगार मिळू लागला आहे त्यातील कुणी गाईड , कुणी तंबू लावण्यासाठी मदत करतात कुणी घराच्या सफाईसाठी काम करतात महिला स्वयंपाकाला , भाकरी करायला मदत करतात २० - २५ जणांना किमान ४०० रुपये रोजाने काम मिळते , खाडे कुटुंब आज रोजगारउपलब्ध करून देत आहे . केशवच्या पर्यटन व्यवसायातील यश पाहून त्याच्यापासून प्रेरणा घेत आज शिवराम , सकृ , सुदाम , लक्ष्मण , शिवाजी आदी त्याच्या मित्रांनी तंबू लावायला सुरुवात केली आहे . केशवने शून्यातून व्यवसाय उभा केला १० वर्षांपूर्वी लोकांच्या गाड्या साफ करणे चणे फुटाणे विकायचा येणाऱ्या पर्यटकांना रतनगड , रंधा फॉलला घेऊन जायचा आज त्याच्याकडे १०० तंबू आहेत पर्यटकांसाठी ४ सुसज्ज खोल्या उपलब्ध आहे १२५ लोकांची भोजन , निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकतो त्याचे वडील वसंतराव , आई सीताबाई पत्नी मनीषा भाऊ निवृत्ती , विजय , महेश आजी ... या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे तो सांगतो आपल्या वडिलोपार्जित मालकीच्या ५ एकर जागेत पर्यटकांसाठी निवास सुविधा वाढविण्याबरोबरचशेततळे  मच्छ बीज रोपण , मासे पालन एक हजार विविध प्रकारचे फळांच्या झाडांची लागवड तसेच गोशाळा लहान मुलांसाठी छोटेसे उद्यान व त्यात पारंपरिक केल्याची सुविधा आदी करण्याचा त्यांचा मानस  आहे , अभिनेता मकरंद अनासपुरे , सयाजी शिंदे त्यांच्या या वडिलोपार्जित घरात राहून गेले आहेत जमिनीवर घोंगडीवर बसून भोजनाचा त्यांनी आस्वाद घेतला आहे . आयुष्यातील शतक नुकतेच पूर्ण करणारे माजी मंत्री बी जे खताळ पाटील यांनीही आवर्जून इथे घरगुती भोजनाचा आस्वाद  घेतला आहे . याशिवाय अनेक राजकारणी  , अधिकारी, नोकरशहा इथे येऊन गेले आहेत . ट्रेकर्स चे अनेक ग्रुप , शाळांच्या सहली नेहमीच इथे येत असतात , भंडारदऱ्याच्या या परिसराला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे . शिखर स्वामींनी कळसुबाई , रतनगड , हरीशचंद्र गड ,आदी डझनभर गड किल्ले अभिजात शिल्प कलेचा नमुना असणारी रत्नेश्वर सारखी मंदिरे निसर्गाचा अनोखा चमत्कार साम्रद येथील सांदणदरी , शंभरीच्या उंबरठ्यावर उभे असलेले भंडारदरा धरण घाटघरचा कोकणकडा पावसाळ्यात काळ्या कातळावरून कोसळणारा पांढरा  शुभ्र धबधबा लहान मोठे  शेकडो धबधबे , ऑगष्ट - सप्टेंबर मध्ये डोंगर उतारावर फुलणारी विविधरंगी रानफुले , जूनच्या प्रारंभी इथली झाडांवर अवतरणारी लखलखणारी काजव्यांची मोहमयी दुनिया पाहण्यासारखे इथे खूप काही आहे त्यामुळे सर्व स्थरातील पर्यटकांची इथे वर्षभर राबता असतो प्रयत्न हाही पैसे मिळवून देणारा व्यवसाय होऊ शकतो याची या भागातील स्थानिक आदिवासींना जाणीव झाली आहे त्यामुळे आज अनेक शिक्षित तरुण या व्यवसायात उतरले आहे भंडारदरा जलाशयाच्या काठावर उडदवणे , पांजरे , मुरशेत , साम्रद , घाटघर , रतनवाडी , वाकी आदी ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी स्थानिक तरुण तंबू लावतात अशा तंबूची संख्या आता २००० पेक्षा जास्त झाली आहे पर्यटकांना घरगुती पद्धतीचे जेवण पुरविले जाते काही जण घरून जेवण करून आणतात काही जण इथेच शिजवतात. पावसाळ्याच्या दिवसात जलाशयाच्या भोवताली रिंगरोडवर ठिकठिकाणी लहान मोठी तात्पुरती उपहारगृहे उभी राहतात गरमागरम चहा  कॉपी , वडा , भजी , गवती चहा मिळते पर्यटकांना जलाशयात फेरफटका मारून आणण्याचे कामेही अनेक तरुण आपल्या होड्या मधून करीत असतात या सर्वांमधून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे . त्यामुळे या भागातून रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर काही प्रमाणात तरी निश्चितपणे थांबले आहे . आदिवासी भागात राहणारेतरून  आता राज्यातील विविध शहरामधून राहणाऱ्या पर्यटकांशी फेसबुक , व्हाट्सअप द्वारे संपर्क साधून सवांद करतात या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नाही हीच त्यांची प्रमुख अडचण आहे . केशव खाडे तंबू निवासासाठी प्रति व्यक्ती १२००-१४०० रुपये घेतो तंबूतील निवासाबरोबरच दोन वेळचा नास्ता , जेवण , परिसरात हिंडविण्यासाठी गाईड , जलाशयात बोटिंग , सुरक्षितता स सर्व सुविधा उपलब्ध करून देतो बीकॉम झाल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागत गावापासून काहीसा दूरवर असणाऱ्या आडवळणाच्या शेतातच व वसंतसूत  विश्व्  निर्माण करणारा केशव खाडे हा शेतकरी पुत्र अनेकांचा आदर्श ठरला आहे . स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाया साधन सामुग्रीचा व्यवसायासाठी उपयोग करता येतो हे त्याने दाखवून दिले आहे या भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी गरज आहे ती गावोगावी असे केशव निर्माण होण्याची ---चौकट ---देशी परदेशी पर्यटकांचे अनेक कडू गॉड अनुभव केशव कडे आहेत कडू कमी गोडच जास्ती .. परदेशातून येणारे पर्यटक भारतीयांच्या तुलनेत उंच पुरे असतात व त्यांचे चालणे आपल्या तुलनेत खुपच  झप झप असते . इंग्लड मधून आलेल्या एका पर्यटकाने एकाच दिवसात हरीशचंद्र गडावरील , तारामती , रोहिदास कोकणकडा तसेच कळसुबाई हि भंडारदऱ्याच्या विरुद्ध दिशेला असणारी तीन शिखरे पादांक्रात केली होती . तर २० -२२वयोगटातील चिनी तरुणी वेबसाइटवरून वसंत सुत चा पत्ता शोधत एस . टि . ने प्रवास करीत अली होती . केशव च्या घरात ती आर्किटेकट असणारी तरुणी तीन दिवस राहिली . केशवने परिसरातील स्थळांना दुचाकीवरून तिला नेऊन आणले ३ दिवस ती त्याच्या आजीच्या खोलीत राहिली घरात नेहमी शिजणारे अन्नच तिने ग्रहण केले आणि समाधानाने पार्ट मायदेशी गेली हा अनुभवही त्याला विशेष काही सांगून गेला . तर जून जुलै महिन्यात या परिसरात खेकडे मोठ्यासंख्येने सापडतात उत्साही पर्यटकांना केशव अथवा त्याचा भाऊ रात्रीच्या वेळी ठेंभ्याच्या उजेडात खेकडे पकडायला घेऊन जातो स्वतः पकडलेल्या खेकड्याचे कालवण सकाळी खाताना पर्यटकांना वेगळाच आनंद होत असल्याचे केशवने सांगितले .
अकोले --भारत, वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश. आजही या देशातील ७०% जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षीत राहिली. त्यामुळेच आज आपल्यासमोर शेतकरी आत्महत्येसारखी महाभयाण समस्या उभी ठाकली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहर आणि गाव यातील दरीही तेवढीच वाढली असल्यामुळे गाव, गावाकडची संस्कृती, शेती, शेतकर्‍यांची जीवनपद्धती अशा अनेक विषयांपासून शहरी लोक कोसो दूर राहिलेत. आज पुन्हा एकदा ‘गावाकडे चला’ असं म्हणण्याची वेळ आलीय. शहरी माणसाला या गावाकडच्या मातीची ओढ आहे तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टीची सांगड घालून ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना आजमितीस आपल्या मातीत रुजू लागलीय. १६ मे हा जागतिक ‘कृषी पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो. सध्या महाराष्ट्रात कृषी पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतकर्‍यांनी उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना शहरी पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा निसर्गाकडे ओढा वाढत आहे. निसर्गाची हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा आनंद देणारी कृषी पर्यटन केंद्रे हा सक्षम पर्याय शेतकर्‍यांना मिळाला आहे.
 कोट --डॉ . उल्हास कुलकर्णी (वैधकीय व्यवसायिक अकोला )भंडारदरा येथील केशव खाडे यांचे वसंत सुत हे कृषी पर्यटन केंद्र शहरी व ग्रामीण भागाचा समतोल राखणारे आहे . कोट - रुपाली सावंत (बोरीवली , मुंबई )भंडारदरा म्हटले कि , वसंत सुत मधील बाजरीची भाकरी , पिठले व ताजी मासळी आजही माझ्या जिभेवरील त्याची चव जात नाही जनाबाई आजीच्या हातचे ते जेवण माझे कुटुंब नेहमी आठवणीत ठेवतात . कोट - नितीन सोनवणे (९८२०३५०९५७)मुंबई छायाचित्रकार -केशव हा अतिशय प्रामाणिक व जिद्दी तरुण आमच्यासाठी एक कुटुंबातील घटक बनला आहे भंडारदरा परिसर त्याच्याशिवाय आम्ही पाहूच शकत नाही . असा तरुणांना सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे .कोट-  शिवाजी म्हस्के (नाशिक )-आमचे सर्व ग्रुप्स केशव खाडे यांच्या प्रेम , आपुलकी मुळे आम्ही आमच्या कुटुंबातच आलो आहोत असे समजून आम्ही सुट्टीचा व ट्रेकर्स चा आनंद घेतो .भाऊसाहेब चासकर (लेखक व शिक्षक , अकोले ) भंडारदरा येथील मित्र केशव खाडे याच्याकडे दुपारी घरगुती चवीचे म्हणजे पिठले, भाकरी, ठेचा... असा बेत. रात्री येताना मच्छी, गावठी कोंबडी, तांदळाची भाकर, लोकल भात...
व्वा, आजचा दिवस एकदम झकास गेला... सुख! हा आनंदयोग जुळून आला केशव तुझ्यामुळे
कोट ---जानकाबाई लक्ष्मण खाडे (केशवची आजी )गेली १५ वर्षांपासून मी चुलीवरचा स्वयंपाक करून येणाऱ्या पर्यटकांना मी त्याच्या आवडीनुसार करून घालते मला त्यात खुप समाधान मिळते जाताना ते मला भेटल्याशिवाय जात नाही मी करीत असलेले काम मला आनंद देऊन जाते . दिवाळीत येणारे पर्यटक माझ्या कुटुंबासारखी माझ्यासोबत राहतात . आजी तुमच्या हाताला खुप चव आहे असे सांगत मला बक्षीस देऊन जातात . माझा नातू करीत असलेला व्यवसाय खर्च माणसे जोडणारा आहे . कोट - सीताबाई  वसंत खाडे (केशवची आई )मी व माझी सासू रोज सकाळी ९ वाजेपासून चुलीवरचा स्वयंपाक करून येणाऱ्या पाहुण्यांना देतो . मुंबई चे पाहुणे आवडीने चुलीवरची जेवण ठेचा , पिठले , भात खाताना आई चॅन स्वयंपाक झाला म्हणतात तेव्हा आमच्या कष्टच चीज झाले असे आम्हाला वाटते . कृषी पर्यटनाच्या माध्यमातून नवयुवकांना रोजगाराच्या विविध संधी आणि फायदेही आहेत. त्यामध्ये शेती, शेतकरी आणि शिवार स्वछता राहते. कृषि संस्कृतीचे जतन व संवर्धन होते. ग्रामीण परिसरातील पर्यावरणनाचे जतन व सर्वधन होत आहे. ग्रामीण भागातील युवक, महिला तसेच महिला बचत गटातील महिलांनी बनवलेले पदार्थ यांना गावातच बाजारपेठ उपलब्ध होत आहे. नवीन पिढीतील युवकांना रोजगाराची मोठी संधी आपोआपच उपलब्ध होते. पारंपरिक शेतीबरोबरच पर्यटन केंद्र उभारून आर्थिक शाश्‍वत उत्पन्न मिळत आहे.
आजच्या नव्या पिढीला शेती, गोठे, चुलीवरचं जेवण, घर, गावाकडच्या प्रथा हे सारं माहीत नसतं. गंमत म्हणजे जर आजच्या मुलांना विचारलं भात कुठे पिकतो? तर मुलं सहज उत्तर देतात बिग बाजार किंवा सुपरमार्केट इ. यात त्यांचा दोष नाही कारण त्यांनी या सर्व गोष्टी कधी पाहिलेल्याच नाहीत आणि जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे? जे अन्न आपण खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आणि किती प्रकारच्या प्रक्रियेतून जाते याची कल्पनाच नसेल तर अन्न वाया घालवू नये याचे महत्त्व पटेलच कसे? शेतकर्‍यांची दु:खं समजण्याची त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नाशी आजची पिढी जोडली जाईलच कशी? म्हणूनच कांदा जमिनीवर उगवतो कि जमिनीखाली, शेतकरी आत्महत्या का करतात? अशा प्रश्‍नांची उत्तर मिळवायची असतील तर त्यासाठी कृषी पर्यटन हाच मार्ग आहे. हे आता शहरी जणांना मनोमन पटू लागलेय, त्यामुळे काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी आता जोमाने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला पाहिजे. अत्यंत उज्ज्वल असे भवितव्य अस
कोट - केशव खाडे (वसंत सुतकृषी पर्यटन चे चालक -
जमीन सपाटीकरण, ऍप्रोच रोड, तलाव, शेततळी उभारणी, पाणी टाकी, पाइपलाइन, कॉटेज, रूम बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडागाडी, पर्यटकांना फिरविण्यासाठी वाहनखरेदी, सौर ऊर्जा, गोबरगॅस, दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, मालतारण कर्ज. इ. एकूणच कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. तरच चांगल्याप्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. धकाधकीच्या जीवनात परस्परातील संवाद कमी होतोय त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदित होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिज फोटो --केशव खाडे , आजी -जानकाबाई खाडे , आई -सीताबाई खाडे , पत्नी मनीषा खाडे , भावजयी  प्रमिला खाडे , प्रिया खाडे
































No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...