Wednesday, May 9, 2018

​अकोले , ता . ८:गाव शिवार -पांजरे (धार वाडी रोजगारातून समृद्धीकडे वाटचाल   ..... शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अशा या बिकट परिस्थितीला तोंड न देता शेतीच सोडून देणारेही अनेक जण आहेत; परंतु पिढय़ान्पिढय़ा पोसलेल्या शेतीला सोडून न देता या परिस्थितीतून वाट काढणारेही काही जण आहेत. त्यातही नवीन पिढी शेतीकडे फिरकत नसल्याचे म्हटले जात असताना धारवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी मजुरीचा नाद सोडून आपली शेती विकसित केली आहे
भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील ६वाड्या मिळून झालेले पांजरे गांव . रोजगारासाठी इथली बाया बापुडे सुमारे दीडशे किलोमीटरवर जाऊन २५० रुपये  रोजाने काम करीत असत . उपलब्ध असणारी शेती तुकड्या तुकड्याची व डोंगर उताऱ्याची , भात , नागली पिके घेऊन इथली आदिवासी माणसे किड्या मुंगी सारखे जिने जगत होती स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यासाठी परवडीचे जिने आलेले .   आपल्या नशिबाला दोष  न  देता  धारवाडी ,मधील माणसे भाकरीच्या चंद्रासाठी सतत स्थलांतर करून आपल्या कुटुंबाला सांभाळत होती मात्र गावातील सुरेश हिंगे , पांडुरंग उघडे , यशवंत उघडे , प्रकाश उघडे हे तरुण एकत्र आली व रोंजदारीला जाण्यापेक्षा आपणच आपली जमीन दुरुस्त करून भंडारदरा जलाशयातून पाणी आणून इतर बागायतदारांसारखी शेती करू असा द्रुढ निश्चय मनासी बांधून आपली शेती सामुदायिक पद्धतीने सपाटीकरण करून पारंपरिक पद्धत मात्र त्याला आधुनिकतेची जोड देऊन शेती करण्याचा निश्चित संकल्प केला सर्वजण कामा ला लागले घरातील ५० माणसे दिवसं रात्र शेतीत काम करून शेती सुव्यवस्थित केली शेंडी येथील सेंट्रल बँकेतून कर्ज काढून दोन बंधारे बांधले व जलसंपदा विभागाकडून पाणी परवानगी आणून प्रयोगिक तत्वावर ८ शेतकरी एकत्र करून प्रवरा नदीवर १२. ५ ची मोटार बसवून वीज कंपनीकडे रीतसर वीज जोडणी करून शेतात पाणी आणले . तर नदीतील पाणी बंधाऱ्यात व बंधाऱ्यातील पाणी शेतात ठिबक सिंचन करून ग्रॅव्हीटीने पाणी शेतपिकाला आदिवासी शेतकरी देऊ लागले बघता बघता जिद्द व चिकाटीने टोमॅटो , भाजीपाला , गहू , ,बाजरी  वालवड , भुईमूग असे शेतकरी पिके घेऊ लागले . सुरेश हिंगे या तरुणाने प्रथम धारवाडी मध्ये शेतीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर खालची वाडी , गावठा , पाटीलवाडी , भोरु ची वाडी , गंगाड वाडी या वाड्यांमधील आदिवासी तरुण जागृत केले  त्यांनीही सामुदायिक शेतीचा अवलंब करीत भंडारदरा जलाशयातील पाणी आपल्या शेतात आणले . व रोजगारासाठी स्थलांतर करणारी आदिवासी माणसे आज आपल्याच शेतात राब राब राबून आपली शेती करीत आहे पांजरे गावातून दररोज ८ ते १० ट्रक टोमॅटो व भाजीपाला वाशी मुंबई येथे जातो आज जरी टोमॅटोला भाव नसला तरी उद्या तो मिळेल हि मनात अशा ठेवून इथली कष्टकरी आदिवासी माणूस आपली शेती प्रामाणिकपणे करीत आहे . शेतीच्या माध्यमातून गावात एकोपा निर्माण झाला आहे . सुरेश हिंगे हे जलसंपदा विभागात काम करतात नोकरीनिमित्त ते तळेगाव , निळवंडे , चितळवेढा या बागायत व जिरायत भागात काम करताना त्यांना पाण्याचे महत्व कळले व आपल्या शेतीबरोबरच आपल्या गावातील शेती फुलावी हि संकल्पना हिवरेबाजार मध्ये राबवली त्याचे अनुकरण करीत त्याने आदिवासी तरुणांना एकत्र करून तुंहा २०० - २५० रुपयांसाठी इतर भागात मजुरीसाठी जातात मात्र आपल्या भागात असलेल्या निसर्ग संपत्तीचा वापर करून आपले शेती आपणच प्रमाणकपणे केली तर चांगले उत्पन्न मिळेल शिवाय दुसऱ्याकडे मोल मजुरी करण्याची गरज पडणार नाही . पहिल्यांदा मी पैसे खर्च करतो आपण सामुदायिक शेती करू व तुम्हाला जसे उत्पन्न मिळेल तसे तुम्ही बँकेत पैसे भरा  असे सांगत तरुण आदिवासी शेतकऱ्यांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला . मग सुरेश हिंगे , पांडुरं उघडे , सरपंच यशवंत उघडे यांनी शासनाची कोणतीही मदत न घेता शेंडी येथील सेंट्रल बँकेत जाऊन बंधारा बांधणे  व पाईप व इंजिन घेण्यासाठी कर्ज काढले बँकेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून कर्ज दिले . सरकारी रेट प्रमाणे दहा    बंधारा स्वतः मजुरी करून या तरुणांनी व ग्रामस्थांनी केवळ डिड लाखात पूर्ण केला ५ लाख लिटर पाणी या बंधाऱ्यात साठवले जाते व नदीतील पाणी बंधाऱ्यात व बंधाऱ्यातील पाणी ठिबकने शेतात शेतकरी वापरून आपली जिरायती शेती बागायती करून इतरांना आदर्श देत आहेत . राहता येथे जाऊन मोटार , पाईप खरेदी करून पाईप बसविणे ते मोटार बसविण्याचे काम देखील तरुण शेतकऱ्यांनी केले त्यांना ग्रामस्थांनी मोठी साथ दिली . व स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आपल्या शेतात पाणी आणले ना पुढार्यांची मदत ना सरकारची . सह्यद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव आज आधुनिक शेतीचे स्वप्न घेऊन आपला रोजगार आपणच निर्माण करून गावातील ४०० माणसांना रोजगार उपलब्ध करून देत आहे . तर शेतीबरोबरच आपल्या मुलांना शेती शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवत आहे . श्रुतिका उघडे , प्रसाद उघडे , संदीप उघडे , सचिन उघडे , सुप्रिया उघडे हि मुले बीएस्सी मध्ये संगमनेरला शिकत आहे तर मुऱ्हाबाई गंगाराम उघडे हि मुलगी बीएस्सी ऍग्री होऊन एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे . एकीकडे शेती फुलविण्याचे काम करतानाच शिक्षणाच्या प्रवाहात आपल्या ममूलन आणून हे अशिक्षित पालक लक्ष्मी व सरस्वतीची एकत्रच आराधना करताना दिसत आहे . शेतीला जोडधंदा म्हणून डांगी जनावरे , शेळ्या मेंढ्या , कोंबड्या पाळून आपल्या आर्थिक स्थर उंचविण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे . धारवाडी मध्ये तीन बंधारे स्वखर्चातून तयार झाले असून त्यात मच्छ बिझी टाकण्यात आले आहे . त्यामुळे मच्छव्यवसायही बळकटी धरू लागला आहे . तर टोमॅटो साठी कारवी आवश्यक आहे मात्र सध्या जंगलात कारवी नसल्याने धारवाडी ग्रामस्थांनी कारवी बी आणून कारवी देखील लागवड करून तिचा उपयोग टोमॅटो लागवडी साठी करू लागले आहे .भाऊराव उघडे , बारकू उघडे , गोविंद उघडे , संजय उघडे , नवसू उघडे , सखाराम उघडे , मारुती उघडे , सुनीता उघडे , लक्ष्मी हंबीर , गंगुबाई उघडे आदी मजुरीसाठी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन जिद्द व चिकाटी अथक परिश्रमातून ओलिताखाली अली आहे त्यांचा आदर्श इतर खेड्यांची घेण्याचे ठरविले आहे . १० लाख रुपये खारकच करून होणार नाही असे दोन बंधारे केवळ दोन लाखात करून मोठ्या प्रमाणात व मुबलक पाणी साठवून शेतीला पाणी देऊन बागायती गाव होण्याचा मान धारवाडी श इतर ५ वाद्यांनी मिळविला आहे . सोबत फोटो
कोट -यशवंत उघडे (सरपंच पांजरे )इथली ६ वाड्या   मिळून पांजरे गाव आहे गावातील १०० माणसे रोजगारासाठी भटकंती करीत होते मात्र आम्ही गावातील काही तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची शेती करून रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविले आहे आमचे सर्व गाव ८० टक्के बागायती झाले आहे त्यासाठी आम्हाला कुणाचीही मदत व सरकारी मदत मिळालेली नाही . मात्र गावाने एकजूट करून हा  यशस्वी प्रयोग करून आदर्श निर्माण केला आहे मुंबई मार्केट मध्ये रोज ८ ट्रक भाजीपाला माल पाठवतो ,कोट - सुरेश हंबीर (ग्रामस्थ ,धारवाडी )-मी नोकरीनिमित्त तळेगाव , निळवंडे , चितळवेढा येथे होतो तेथील शेतकरी मी शेती करताना जवळून पहिले आपणही आपल्या गावात एकत्र येऊन सामुदायिक शेती करून पाणी उचलून शेती केल्यास गावातील लोक मजुरीसाठी बाहेर ठिकाणी जाणार नाही म्हणून मी गावातील तरुण शेतकऱ्यांना एकत्र करून पाण्याचे महत्व पटवून दिले व सामुदायिक शेती करण्याचा निर्णय घेतला प्रथम शेती विकसित केली तुकड्या तुकड्याची शेती मोठे क्षेत्र करून पाणी परवानगी घेतली बँकेतून कर्ज काढून दोन बंधारे बांधले , दोन विहीर खोदल्या व ठिबकने पाणी देऊन शेती केली आज माझे सर्व आदिवासी शेतकरी शेती करून आदर्श निर्माण करीत आहे . आज टोमॅटोला भाव नसला तरी तो आज ना उद्या मिळेल . आमच्या गावासोबतच , शिंगणवाडी , उडदावणे  या गावठी शेतीचा विकास करण्याचा मांन स आहे . कोट - कुमारी मुऱ्हाबाई उघडे (बीएस्सी ऍग्री )मी शेती विषयात पदवी प्राप्त केली असून एमपीएससी परीक्षा देऊन शेतकी अधिकारी होण्याचा मानस आहे मी सुट्टीत शेतीवर काम करते आमचा सर्व गाव शेतीसाठी रात्रन दिवस काम करतो आमचे गाव जिरायती नसून बागायती आहे याचा आम्हाला अभिमान आहे . कोट गिरिजाबाई उघडे -(आदिवासी महिला शेतकरी )आमच्या गावात सामुदायिक शेतीतून गावाचा खऱ्या अर्थाने विकास झाला . कोट - श्रुतिका उघडे (विधार्थिनी ) शेतीला लाभदायक होण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याची जाणीव होऊन आधुनिक चौकट आखणाऱ्यांचे हे युग आहे. असे काही केले तरच शेती परवडू शकते. शिवाय निव्वळ शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतीपूरक अनेक व्यवसायांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.


चौकट - प्रकल्प बाधित आदिवासी कुटुंबांना रोजगाराचे हक्काचे साधन मिळावे यासाठी महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागाने एक ठोस कार्यक्रम निश्चित केला.  प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या जलसाठ्यांमध्ये माशांची शेती करण्यात येत आहे. प्रकल्पातील ७३ किमी जलक्षेत्र महाराष्ट्रा आहे. येथे मत्स्य व्यवसाय बहरला हवा होता कटला , रावस , वांब ,रघुकोटला, , पंकज, मृगल हे मासे पाळले जातात. हा हक्काचा रोजगार आहे.  माशांच्या विक्रीतून भरघोस, उत्पन्न आदिवासींना मिळणे  आवश्यक आहे. मात्र मासाचे ठेके पुढारीच घेत असल्याने गरीब आदिवासींना त्याचा फायदा होत नाही त्यामुळे महाराष्ट्राचे हे प्रयत्न आणि यश देशाला मार्ग दाखविणारा असला तरी खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिल्ने अपेक्षित आहे . .तर तालुक्यात दूध धंदा मोडकळीस आला असून आदिवासींना जनावरे देऊन आदिवासी विकास विभागाने दूध व्यवसायासाठी मदत करणे आवश्यक आहे .

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...