Wednesday, April 25, 2018

म . टा . वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर


म . टा .  वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल , अशी जोरदार आरोळी ठोकत आदिवासी भागातील वाडी वस्तीवरील शाळेतील पोरं  बांबूच्या व प्लॅस्टीकच्या  टोकरीत काळे करवंन्दे घेऊन पर्यटकांना आर्जवी करीत असताना दिसू लागली आहे तर पर्यटकही मोहित होऊन हि करवंदे घेण्यासाठी आपल्या वातानुकूलित गाड्या  रस्त्याच्या कडेला उभ्या करून या मुलांकडून डोंगरची काळी मैना घेताना दिसत आहे . आदिवासी भागाला निसर्गाचे वरदान लाभल्याने कळसुबाई - हरीशचंद्र गड परिसरात आंबळे , करवंदे , जांभळे , मोहाची फुले , आळवे हि फळे व काही ठिकाणी रानफुलेही चमकू लागल्याने या निसर्गातून परिसरातील  आदिवासी छोट्या मुलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे . तर या मिळालेल्या पैशातून हे विधार्थी शाळेतील सहल व शालेय साहित्य घेण्यासाठी वापर करतात असे सोमा प थवे  हा विधार्थी म्हणाला
आदिवासींचा रानमेवा डोंगरची काळीमैना नावाने ओळख असणार्‍याआंबट गोड चवीचे काळेभोर "करवंद" नावाचे फळ पिकु लागल्याने व शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने चिमुकल्यांना रोजगार मिळवून देवु लागला असुन चिमुकले शालेय विद्यार्थी बाजारपेठेमध्ये विक्री करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
        अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील भंडारदरा परिसरात मुरशेत,पांजरे,रतनवाडी,घाटघर,वा
की,मुतखेल आदी ठिकाणी असणाऱ्या जंगलात करवंदाच्या काटेरी जाळ्या भरपूर प्रमाणात असुन साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस या काटेरी जाळ्यांना आंबटगोड चवीचे काळेभोर गोल आकाराचे फळ पिकण्यास सुरुवात होते.त्यालाच आदिवासी ग्रामीण भागात रानमेवा म्हणुन संबोधले जाते.एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की दररोज पहाटे लवकर उठायचे हातात पाटी एवजी डोक्यावर पाटी (टोपली)घ्यायची व जंगलचा रस्ता धरायचा जंगलातील काटेरी जाळ्यांना पिकलेली करवंदे तोडुन जमा करायची व पिंपळाच्या,वडाच्या झाडांच्या पानांची डोमे (द्रोण)तयार करून त्यामध्ये वाटे तयार करून सकाळी भंडारदरा बाजारपेठेत,बगीचा,पर्यटन निवास महामंडळ परिसर,महामंडळाच्या बसेस मध्ये करवंदे घ्या करंवदे आवाज देत विक्री करत रोजगार मिळवायचा.विशेष बाब म्हणजे विक्री करणारे सर्व 10 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थी असून 50 ते 100 रुपये विक्री करतात.साधारण महिनाभर चालणाऱ्या या व्यवसायातातुन मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग शालेय उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी होत असल्याची माहिती शेंडी गावठा येथील ईयत्ता चौथीत शिकणाऱ्या राहुल बोऱ्हाडे या चिमुकल्याने सांगितले.आदिवासी ग्रामीण भागातील डोंगराच्या काळ्या मैनेला गावात जरी योग्य भाव मिळत नसलातरी शहरी भागात 80ते100 रुपये किलो भाव मिळतो मात्र शहरी भागातील बाजारपेठेत जाण्यासाठी वाहतूक खर्च परवडत नसल्याचे देखील यांनी सांगितले. चौकट -
हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
कोट ---सौ . राहीबाई पोपेरे --सेंद्रिय शेती  आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळाला आहे तर करवंन्दे व जंगली फळे आमच्या छोटया मुलांना रोजगार मिळवून देत आहे .  तोंडातून काही काव्यही बाहेर आले हिरव्या पानामंधी करवंद
जिभेवर लाळ घोळवती
उघडा-नागडा आदिवासी
परी संस्कृती सदा जपती

काळ्या मैनेचे हे प्रेम
चाखली हजारोंनी माया
कातळ-कपारितला गोडवा
नांगरताना गायी आभाळमाया

काटयांचे असणे कधी
करवंदाला टोचत नाही
संकटांचे जगणे बाई
सरकारला बोचत नाही

हिरवाईचा शालू बघा कसा
करवंद जपतो आहे
फाटलेली मने विकासाची
आदिवासी शिवतो आहे

उघड्या माळरानावर सदा
जाळी करवंदाची रूपवती
योजनांचा वंचित राजा
सह्याद्री संस्कृती पेरती

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...