Sunday, April 22, 2018

डोक्यावर पेटलेले कठे, त्यातून उसळणार्‍या तप्त ज्वाला, शरीरावर ओघळणारे तेल मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद, दैवतांच्या नावाचा जयघोष संबळ, धोंदाना- पिपाणी, डफ, ताशा आदि पारंपारिक वादयाच्या सुरु असलेला निनाद ,गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने हाईईईई हाईईईई असा लयबद्ध चित्कार करत लोक बिरोबाचा गजर करत . अक्षयतृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे बिरोबाची यात्रा शुभारंभ झाला लाखो भाविकांनी उपस्थिती दाखवत १०० कठे पेटवून रात्र जागविण्यात आली डोक्यावर पेटलेले कठे .... त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला ... शरीरावर ओघळणारे उकळते तेल ... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद ... बिरोबा दैवताचा नावाचा जयघोष ... संबळ , धोदाना -पिपाणी , डफ , ताशा अशा पारंपारिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने "हाई ,ह्हाई ,असे लयबद्ध चित्कार करत भाविक लोक बिरोबाचा गजर करतात , अक्षय त्रितीयेनंतर पहिल्या रविवारी गेली १०० वर्षांपासून बिरोबाची मोठी यात्रा भरते , त्यातून निसर्ग , परंपरा , संस्कृती असा त्रिवेणी संगम उपस्थितांना पाहायला मिळतो . खोल दरीत अतिदुर्गम असणारे आदिवासी कौठवाडी एक खेडे अनेक वर्षांची परंपरा जपत शिस्त बद्ध पद्धतीने बिरोबा देवाची यात्रा भरवते श्रद्धेने लाखो भाविक या यात्रेसाठी येतात ,महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्राउत्सव बिरोबाच्या देवस्थानाची आख्यायिका मोठी मजेशीर आहे आद्य पुजाऱ्याचे नाव भोईर त्यामुळे पूजेचा पहिला मन भिरणं मिळतो तर साकीरवाडी ग्रामस्थांना काठीचा मान असतो . पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते मात्र ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व स्थानिक विकास निधीतून येथे टुमदार मंदिर व सभामंडप बांधला आहे चहुबाजूने सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोहळा दरीत हे बिरोबा मंदिर देवस्थान आहे बिरोबा देवाला केलेला नवस फेडण्यासाठी राज्यातून लोक येतात येथील यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे पेटलेले कठे डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या चौथऱ्या भोवती फेऱ्या मारतात . प्रत्येक फेऱ्यागणिक डोक्यावर घेतलेल्या मडक्यात (कठे )किलोकिलोने तेल ओततात व ते गरम तेल भाविकांच्या उघड्या अंगावर ओघळत येते निखाऱ्याने व तप्त तेलाने भाविकांना खाचीही दुखापत होत नाही असा समज परंपरेने चालत आला आहे . यावर्षी









No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...