Saturday, April 14, 2018


महाराष्‍ट्राला संतांकडुन मिळालेला वैचारिक वारसा हा प्रबोधनाचा आहे. संत साहीत्‍यातुन मिळणा-या विचारांवर श्रध्‍दा जरुर असावी पण अंधश्रध्‍देपासून दुर राहण्‍याचा मार्गही संतांनीच आपल्‍याला दाखविला. चांगल्‍या विचारांचे आचारण केल्‍यास ख-या भक्‍तीचा आनंद मिळतो असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
       श्रीक्षेत्र गणोरे येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या अखंड हरिनाम सप्‍ताहाच्‍या सांगता समारंभात ना.शालिनीताई विखे पाटील यांनी उपस्थित महीलांना ज्ञान, विज्ञान, अधश्रध्‍दा यावर मार्गदर्शन करतानाच महीलांच्‍या उत्‍कर्षाकरीता जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून महीलांकरीता सुरु असलेल्‍या कामांची माहीती दिली. प्रारंभी ह.भ.प पांडुरंग महाराज गिरी यांचे काल्‍याचे किर्तन संपन्‍न झाले. माजी सभापती अंजनाताई बोंबले, पंचायत समितीचे सदस्‍य व सप्‍ताहाचे आयोजक‍ संत नामदेव आंबरे, सरपंच वंदनाताई दातीर, उपसरपंच संतोष आंबरे यांच्‍यास‍ह विविध संस्‍थांचे पदाधिकारी याप्रसंगी व्‍यासपीठावर उपस्थित होते.
       आपल्‍या भाषणात ना.सौ.विखे पाटील म्‍हणाल्‍या की, संत ज्ञानेश्‍वरांनी पसायदानातून विश्‍वाच्‍या कल्‍याणासाठी प्रार्थना केली. संत तुकारामांनी रंजल्‍या गांजल्‍यांची सेवा करण्‍याचे प्रबोधन आपल्‍या अभंगांमधुन केले. आज मानवी जिवनात मात्र उलट परिस्थिती निर्माण झाल्‍याचे स्‍पष्‍ट करुन त्‍या म्‍हणाल्‍या की, अध्‍यात्‍मावर असलेली श्रध्‍दा ही अंधश्रध्‍देपर्यंत पोहचली. बुवा-बाबांचे वाढते प्रस्‍थ समाजाला घातक आहेत. उपवास करणा-या महीलांना स्‍वत:च्‍या शरिरातील हीमोग्‍लोबीनची काळजी वाटत नाही. कोणत्‍याही देवाने शरिरावर परिणाम करुन, माझ्यावर भक्‍ती करा असे सांगितलेले  नाही. अध्‍यात्‍माचा खरा आनंद मिळवायचा असेल तर, भक्‍तीच्‍या मार्गाचे अनुकरण हे चांगल्‍या विचाराने झाले पाहीजे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
       आज महीलांना सर्वक्षत्रात मोठ्या संधी मिळत आहेत. गावपातळीपासुन ते देशात विविध ठिकाणी महीला करीत असलेले काम हे नावलौकीक प्राप्‍त करणारे आहे. मुलगा-मुलगी हा भेद कमी करा, मुलांप्रमाणे मुलींनाही संधी द्या. जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून महीला बचत गटांची मोठी चळवळ सुरु आहे. यातुन महीलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करण्‍याचे काम होत असून, शालेय विद्यार्थींनींना स्‍व-संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था जिल्‍हा परिषदेमार्फत केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
       जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातून या भागातील कोणत्‍याही प्रश्‍नाला आपण निधी कमी पडु देणार नाही अशी ग्‍वाही देतानाच अनेकांना पद मिळाल्‍यामुळे मोठे होण्‍याची घाई झाली आहे .पण लोकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी लोकांपर्यंत पोहचावे लागते. या भागातील प्रश्‍नांकरीता मी सदैव तुमच्‍या बरोबर आहे.  शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्‍यासंदर्भात‍ आपण केलेल्‍या मागणीचा सकारात्‍मक विचार करुन निर्णय करु अशी ग्‍वाही ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी याप्रसंगी दिली.
       गणोर ग्रामस्‍थ आणि सप्‍ताह कमिटीच्‍या वतीने ना.सौ.विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला. पंचायत समिती सदस्‍य संत आंबरे यांनी प्रास्‍ताविक केले. सप्‍ताह सांगता सोहळ्यास पंचक्रोशितील ग्रामस्‍थ, महीला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.
चौकट   

ह.भ.प पांडुरंग महाराज गिरी यांनी आपल्‍या किर्तनाची सांगता करतांना म्‍हणाले कि,स्‍व.परजणे आण्‍णांकडुन मिळालेला अध्‍यात्‍माचा वारसा ना.सौ.शालिनीताई जोपसत आहेत. अध्‍यात्‍माच्‍या कार्यात विखे पाटील परिवाराचे असलेले योगदान खुप मोठे आहे. याचा आवर्जुन उल्‍लेख करत काल्‍याच्‍या किर्तनाला वेळेआधी उपस्थित राहाणा-या सौ.शालिनीताई या पहील्‍या राजकारणी मी पाहील्‍या आहेत.
Attachments area




















No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...