Sunday, April 15, 2018

डॉ दिपाली बी

डॉ दिपाली बी . लहामटे एक गोड, सालस आणि हसरं व्यक्तिमत्व. नुकतीच BDS संपवून आमच्या सोबत नायर हॉस्पिटलला इंटर्नशिप करीत होती.
आमची सर्वांची लाडकी, मनमिळावू मैत्रीण दिपाली, त्या दिवशी जरा खुशीतच होती. कारणही तसच होतं. नुकताच MBBS झालेल्या तिच्या डॉक्टर भावाच्या दीक्षांत समारंभासाठी तिला JJ जिमखान्याला जायचं होतं. २४ मार्चच्या दुर्दैवी दुपारी ती निघाली. कोण जाणे पुढच्या तासाभरात नियतीने तिच्यासाठी काय मांडून ठेवलं होतं.
मरीन ड्राईव्हचा तारापोरवाला सिग्नल ओलांडत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या होंडा सिटी कारने तिला उडवले. ती कार *शिखा झवेरी* नावाची महिला चालवत होती. त्या महिले सोबत तिची मुलगीही होती. अपघात झाल्यानंतर, दिपालीची चौकशी करून वैद्यकीय मदत करायची सोडून श्रीमती शिखा झवेरी गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्नात होती. असे करताना एका इसमाने (नाव उघड करत नाही) तिचा पाठलाग करून तिला पकडले. या दरम्यान रस्त्यावरील इतर प्रवाशांनी दिपालीला जवळच्या भाटिया रुग्णालयात हलविले.
सध्या दिपालीला JJ इस्पितळात हलवले असून ती कोमा मधे आहे. तिची परिस्थिती खूप नाजूक आहे. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, पण कुठलीही खात्री देण्यास ते तयार नाहीत. खूप अडचणी सहन करून शिकवलेल्या मुलीला अशा अवस्थेत बघणे आई वडिलांना आणि नातेवाईकांना खूप अवघड आहे.
या दरम्यान गुन्हेगार महिलेच्या घरच्यांनी आर्थिक मदत देऊ करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केलाय. पण आता तिच्या नातेवाईकांना आणि आम्हा मित्र मैत्रिणींना *दिपालीसाठी न्याय* हवाय. पैशाच्या जोरावर अशी गैर प्रकरणे दाबू पाहणाऱ्या मानसिकते विरुद्ध उभे राहण्यासाठी आणि दिपालीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. कोणीही प्रत्यक्षदर्शी आम्हाला पुराव्या संदर्भात मदत करू इच्छित असेल त्याने आमच्याशी संपर्क करावा.
मित्रांनो रस्त्यावर अपघात होतात हे जरी सत्य असले तरी *पैशाच्या जोरावर कायदा आणि न्याय विकत घेतला जाऊ शकतो* ही पैशाचा माज असणाऱ्या समाजाची मानसिकता मोडीत काढण्याची गरज आहे. आपणा सर्वांना दिपालीला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी शक्य असेल त्याने पुढे येऊन मदत करावी. नावाची गुप्तता पाळण्यात येईल.
🙏🏼🙏🏼

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...