Wednesday, April 11, 2018

सय्यदबाबा उरूसाच्या निमित्ताने संगमनेरात येण्याचे नाते पारंपरिक -- विखे






सय्यदबाबा  उरूसाच्या निमित्ताने
संगमनेरात येण्याचे नाते  पारंपरिक -- विखे
संगमनेर दि. ११  (प्रतिनिधी )
हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सय्यदबाबांच्या दर्ग्याचे   पवित्र स्थान हे उर्जा देणारे आहे. उरूसाच्या निमित्ताने येथे येण्यातून  निर्माण झालेले विखे  परिवाराचे नाते कोणीही तोडू शकणार नाही.  इथे नतमस्तक झाल्यानंतर  राज्यात काम करण्याची नवी प्रेरणा मिळते असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेरच्या ऐतिहासिक आशा सय्यदबाबांचा ऊरूस सध्या सुरू आहे. यानिमित्ताने विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी दर्ग्याचे दर्शन घेतले.या ठिकाणी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील हे आवर्जून येत होते. याची आठवण करून देत विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मागील काही  दिवसांपासून मलाही दर्शनाला येण्याचे भाग्य मिळत आहे.  हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या सय्यदबाबांच्या दर्ग्याचे हे पवित्र ठिकाण उर्जा देणारे आहे. या ऊरूसाची परंपरा हिंदू मुस्लीम कार्यकर्ते एकत्रित येऊन जोपासतात हे सामाजिक ऐकतेच्या दृष्टीने राज्यापुढे चांगले उदाहरण असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले. 
याठिकाणी आल्यानंतर मिळणारी ऊर्जा राज्यात काम करण्यास प्रेरणा देवून जाते असे सांगतानाच येथे येण्यामुळे निर्माण झालेल्या नात्याच्या पार्श्वभूमी विखे पाटील यांनी...
       रूह से  जुडे रिश्तों पर...फरिश्तों के पहरे होते है! 
 लाख कोशिश कर लो तोडने की.... ये और गहरे हो जाते है! 
हा शेर पेश करून उपस्थितांची दाद मिळवली. याप्रसंगी उरूस कमिटीच्या वतीने ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठनेते वसंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे, डॉ.सोमनाथ कानवडे,शौकत जहागीरदार,यांच्यासह  कार्यकर्ते  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...