Sunday, April 15, 2018

आदिवासी समाज' हा 'आदर्श' समाज आहे

*'आदिवासी समाज' हा 'आदर्श' समाज आहे तरीही; आदिवासींना आपल्या संस्कृती बद्दल न्यूनगंड का?*
---------------------------------------------------
*आदिवासी समाजाचा नेहमीच 'मागासलेला' समाज असा उल्लेख करून आदीवासींमध्ये हेतुपुरस्पर न्यूनगंड निर्माण करण्यात आलेला आहे. आदिवासींसाठी 'मागासलेले' हा शब्द कोणत्या निकषांवर लागू केला? मागासलेपणाची व्याख्या काय? व्याख्या कोणी आणि कशावरून ठरवायची? ती कोणाला आणि कोणत्या निकषांवर लागू करायची? या प्रश्नांची उत्तरे काय?*
 *कारण सर्वप्रथम 'मागासलेपणा' ही सापेक्ष संकल्पना आहे. त्यामुळे हा शब्दप्रयोगच मुळी चुकीचा आहे. ह्या शब्दामुळे जो तो उठतो आणि आदिवासी समाजाला संस्कृती नसलेला,रानटी,जंगली समाज समजून आदिवासींना अक्कल देण्याचे निमित्त करून उपकार करण्याच्या अविर्भावात त्यांची शोषणावर आधारीत  बिगरआदिवासी संस्कृती आदिवासींवर लादण्याचा प्रयत्न करतो!*

*अलीकडे आदिवासीवर प्रभाव टाकणारे काही धर्म,पंथ व बिगरआदिवासी राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटना पुढे येत आहेत.  प्रत्येकाला आपआपल्या धर्माचा प्रसार व धर्मधारीत राजकीय पक्षाचा प्रसार आदिवासींवर ठसवायचा आहे.*
 *जो तो आदिवासींनाच टार्गेट करित सुटला आहे. प्रत्यक्षात मात्र आदिवासी संस्कृतीच फक्त सांस्कृतिक श्रेष्ठत्वाच्या कसोटीवर उतरते. म्हणून आदिवासी समाज मागास म्हणून कोणत्या निकषांवर आणि कोणी ठरवला? हा प्रश्न आहे.*
*आदिवासींची फसवणूक पिळवणूक शोषण केले जात आहे. त्यांची संसाधने हिसकावून घेतली जात आहेत. म्हणून ते आर्थिक दृष्टीने हलाखीच्या परिस्थितीत आहेत. म्हणून त्यांची संसाधने हिसकावून घेतली आणि त्यांचे शोषण करण्यात आले हे मुद्द्याचं बोला ना स्पष्टपणे!*

 *सामाजिक दृष्टीने मात्र आदिवासी समाज हा 'मागासलेला समाज' नसून 'आदर्श समाज' आहे.*

*तसं पाहता;सामाजिक,कौटुम्बिक विक्रुतिने बरबटलेले व निसर्गाला ओरबाडण्याच्या अधाशी विकृतीने ग्रस्त असलेल्या काही बिगरआदिवासींना आदिवासी संस्कृतीच्या मानवतावादी मूल्यांचे व त्याचबरोबर पर्यावरण संवर्धक जीवनपद्धतीचे संस्कार स्वीकारण्याची जास्तच गरज आहे.*

*परन्तु त्याहीआधी आदिवासी संस्कृतीचे महत्व खुद्द आदिवासींना समजणं गरजेचं आहे.आपले अशिक्षित बांधव आपली सांस्कृतिक मूल्ये जपत आहेच.*
 *परंतु काही सुशिक्षित आदीवासी मात्र बिगरआदिवासीची संस्कृती स्वीकारताना दिसतात,त्यांचं ते परसंस्कृती स्वीकारणं पाहून आपल्या अशिक्षित बांधवाला वाटते की, 'हा शिकलेला आहे म्हणजे ह्याला नक्कीच जास्त अक्कल असेल' म्हणून तो त्यांचे अनुकरण करू पाहतो. तसे अनुकरण करण्यात त्याला प्रतिष्ठा वाटते. त्याचबरोबर सुशिक्षित आदिवासीच्या बरोबरीत पोहोचल्याची धन्यता वाटते.*
*म्हणूनच आदीवासीच्या निसर्ग पुजेच्या अस्सल विधींसाठी कमरेला लंगोटी लावलेला जख्खड म्हातारा भगत, बुडवा, बोडवा,भूमका देखिल ज्वारीचे दाणे,भात,महू,औत, दोरखंड,महुची दारू व बकरे,कोम्बडे इत्यादि सारख्या पारंपारिक वस्तूंबरोबर गुलाल,शेंदूर,अगरबत्ती,कुंकू,कापूर,दिवा,पणती,समई अश्या फ्याक्टरी मेड वस्तु आणि मंदिर, मूर्ती व फोटो अश्या बिगरआदिवासी,अप्राकृतिक व कारखान्यात तयार झालेल्या हिन्दू पूजाअर्चा पद्धतिच्या फॅक्टरीमेड वस्तूंचीही 'ऑर्डर' देतो तो ह्यामुळेच!.*

 *ही वाटचाल कोणत्या संस्कृतीच्या दिशेने आहे? आदिवासी संस्कृतीवर् होणाऱ्या आक्रमणाचा विरोध केलाच पाहिजे. परंतु त्यांचीच संस्कृती अजाणतेपणाने आपण कॉपी करीत तर नाहि ना ?*
*जर आपल्या घरात व सार्वजनिक उत्सवात आपण हिंदु पद्धतीने पूजाअर्चा,कर्मकांड,सण,रुढी साजरे करत असू, तसेच 'हिंदू पद्धतीची नावे" धारण करून असू!*
*त्याचबरोबर जातीच्या दाखल्यावरील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न करीत नसु तर या विरोधाला काय अर्थ उरतो?*

*आदिवासी हा ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य व क्षुद्र यांपैकी नाहि, आणि वनवासीही नाहि.*
*आदिवासी हा 'आदिवासीच'आहे.*
*कोणी वनवासी म्हणून त्याची आदिवासी ही ओळख मिटवू पाहत आहे तर कोणी ब्राह्मण वर्णशी त्यांच्या आपसातिल वर्णभेदापोटी असलेल्या मतभेदांमुळे ब्राह्मण समाजाला विदेशी म्हणून हिणवण्यसाठी 85%लोकसंखेस मूळनिवासी हा शब्दच वापरू पाहत आहेत.*
 *त्याचाच अर्थ 85%लोकसंखेसह सर्वांना आदिवासी ठरवून धनगर घुसखोरीला, सुमारे 55 जाती जमातींची s t मध्ये समावेशाच्या मागणीला आणि  5 लाखच्यावर बोगसआदिवासीच्या s t मध्ये घुसखोरीला ते पाठीम्बा देत आहेत.*

*ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व क्षुद्र हे चारही वर्ण आर्यांच्या वेदिक म्हणजे हिंदू धर्मातील आहेत. म्हणजेच आर्य म्हणजेच हे चारही वर्ण.*
 *सुमारे 15%लोकसंख्या असलेला आदिवासी समाज हाच फ़क्त या देशाचा मालक आहे. परंतु संविधानानुसार नागरिकत्वचे जे नियम आहेत ते सर्वांना बंधनकारक आहेत मान्य आहेत.*
 *त्यामुळे आदिवासीला विदेशी व देशी हे मुद्दे मांडायचेच नाही.सध्या ते गैरलागू आहेत.*

*'आदिवासी'म्हणजे या भूमीवर आर्य लोकं येण्यपुर्वी पासूनचे या भुमीचे मूळ रहिवासी (aboriginal, आदिवासी) होय.*

*आपले आचरण व विचार 'धर्मविरहित' असल्याशिवाय आपल्याला धार्मिक आक्रमक व परसंस्कृतीच्या आक्रमणास तोंड देता येणार नाही आणि आपल्याला तसे नैतिक बळ व सामाजिक पाठबळ देखील मिळणार नाहि.*
 *आदिवासी संस्कृतीचे पालन केले तरच आदिवासी संस्कृतिचा प्रसार करता येइल..*

*'विशिष्ट राजकिय पक्षाच्या व राजकीय नेत्याच्या राजकीय सोयीनुसार होळी या पवित्र सणात नवसापोटी होणारे नृत्य कुठेही केव्हाही करवुन दाखवून काही लोकांनी संस्कृती रक्षणाच्या नावाखाली आपल्या दैवी श्रद्धेचा कित्येक वर्ष राजकीय 'धंदा' केला.*

*'संस्कृती' म्हणजे काय ते समजून घेऊन आपल्या संस्कृतीक मूल्यांचे श्रेष्ठत्व इतर संस्कृतीच्या सांस्कृतिक मूल्यांशी तुलना करून जगासमोर मांडण्याची गरज आहे. सान्स्क्रुतिक आक्रमणास विरोध करण्याबरोबर आदिवासी भागातील भ्रष्टाचार,पीळवनुक,आश्रमशाळा मधिल बलात्कार अश्या मुद्द्यांवरही आवाज उठविणे तितकेच जरुरी आहे. कारण वरील प्रकारचे कुकर्म हे बऱ्याचदा एखादयाच्या संस्कृतिला हीन व कस्पटासमान दाखविण्यासाठी केल्या जाणारया प्रतीकात्मक क्रुती म्हणून केल्या जातात हे या ठिकाणी लक्षात घ्यावे.*

*आपले अशिक्षित गरीब लोक आपली आदिवासी संस्कृती सालाबादाप्रमाने सण उत्सव रूढी परम्परा नुसार नेहमीप्रमाणेच जतन करीत आहेत. ते त्यासाठी होळी सणा प्रसंगी नवसाला केल्या जाणाऱ्या नृत्याचा धंदा करीत नाहीत! शहरात स्थायिक काही आदिवासीनी काही राजकीय नेत्यांच्या सोयिसाठी आपल्या संस्कृतीचे धंदे करीत आलेले आहेत.*
*खरा संस्कृती रक्षक हा दुर्गम खेड्यातील आपला गरीब बांधव आहे,तोच खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात संस्कृती संवर्धन करतो आहे.*
 *शेवटी प्रत्येक सुशिक्षित आदिवासीने आपल्या संस्कृतीचा मानसन्मान वाढेल,तिचे पावित्र्य जपले जाईल,अभिमान वाटेल पध्दतीने आपली आदर्श संस्कृती जगासमोर मांडली पाहिजे.*

*"जोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व बिगरआदिवासी समाजात जाऊन 'श्रेष्ठत्वाच्या' भावनेतुन 'अभिमानाने' मांडत नाही तोपर्यंत 'मागासलेली' संस्कृती असे समजून संस्कृतीक आक्रमणाच्या माध्यमातून आदिवासींच्या संस्कृतिचे विक्रुतीकरण थाम्बणार नाही".*
*🌍जय भिलिस्थान* 
*🏹बिरसा मुंडा की जय*
*🏹खाज्या नाईक की जय*
*🏹राणा पुन्जा की जय*
*🏹तंट्या मामा की जय*
*📚जयपालसिंह मुंडा की जय*
*🐅आदिवासियों का मसीहा छोटू बाबा की जय*
*✍🏻अजय गावित*
*भिलिस्थान टाइगर सेना प्रवक्ता महाराष्ट्र राज्य व युवा विध्यार्थी जिल्हाअध्यक्ष नंदुरबार*
*धन्यवाद! 🙏कृपया फॉरवर्ड करा!*

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...