Friday, April 20, 2018

श्रीमती कांताबाई सातारकर परिचय

श्रीमती कांताबाई सातारकर परिचय
नाव – श्रीमती कांताबाई सातारकर ( कांताबाई तुकाराम खेडकर )
जन्म – १५ ऑक्टोबर १९३९ ( टिंबा, जिल्हा – बडोदा, गुजरात )
मुळगाव – सातारा
कलाक्षेत्रातील पदार्पण – नवझंकार मेळा, सातारा यांच्या माध्यमातून सातारा शहरातील गणेशोत्सवात
वयाच्या नवव्या वर्षी सर्वप्रथम मेळ्यात नृत्य केले.
तमाशा क्षेत्रात पदार्पण – वयाच्या अकराव्या वर्षी अहिरवाडीकर यांच्या तमाशाच्या माध्यमातून तमाशा
रंगभूमीवर पदार्पण, यानंतर वगसम्राट बाबुराव पुणेकर यांच्या तमाशात काम करीत या क्षेत्रातील असंख्य
बारकावे अभ्यासले. पण आयुष्यात जे काही करायचे ते भव्यदिव्य करायचे हे स्वप्न घेऊन १९५३ च्या
सुमारास एकटीने मुंबई गाठली.
मुंबईतील पदार्पण – फक्त एक दिवस दादू इंदुरीकर यांच्या तमाशात काम करून नंतर दुसऱ्याच दिवशी
तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या कलाजीवनाला कलाटणी
मिळाली.
तमाशा क्षेत्रातील वेगळेपण – जिवंत अभिनय आणि अतिशय शुद्ध वाणी असलेल्या कलाकार म्हणून
कांताबाई सातारकर यांना तमाशा क्षेत्रात ओळखले जाते.
मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्री भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत पण स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची
उदाहरणे अपवादानेच आढळतात, कांताबाई सातारकर यांनी तमाशातील वगात शिवाजी महाराज,
संभाजी महाराज अशा भूमिका करताना आपल्या नेत्रोद्दीपक तलवारबाजीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
नंतर तर शिवाजी किंवा संभाजी करावा तो कांताबाई सातारकर यांनीच अशी तमाशा रसिकांची धारणा
झाली.
उल्लेखनीय वगनाट्ये –
पौराणिक वगनाट्ये - महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती,
रजवाडी वगनाट्य - जय विजय
ऐतिहासिक वगनाट्ये - पाच तोफांची सलामी, रायगडची राणी, कोंढाण्यावर स्वारी, चित्तोडगडचा
रणसंग्राम, विशालगडची राणी,
सामजिक वगनाट्ये- कोर्टादारी फुटला चुडा, तडा गेलेला घडा, असे पुढारी आमचे वैरी, कलंकीता मी धन्य
झाले, अधुरे माझे स्वप्न राहिले, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ –बहिणीचा पक्का वैरी.
या आणि अशा सुमारे शंभरहून अधिक वगनाट्यात प्रमुख भूमिका केल्या आहेत. यातील बहुसंख्य
वगनाट्यांचे दिग्दर्शनही केले.

तमाशा क्षेत्रातील योगदान – पती तुकाराम खेडकर यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर तमाशा हेच
सर्वस्व मानून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवळ एक रुपयाही नसताना स्वतःचा तमाशा फड उभी
करणारी पहिली स्त्री तमाशा कलाकार म्हणून म्हणून कांताबाई यांचा नामोल्लेख केला जातो.
तमाशातील पहिली स्त्री सरदार – तमाशात सरदार या संकल्पनेला खूप महत्व आहे. ज्याला तमाशात नृत्य
गायनाबरोबर दिग्दर्शन, व्यवस्थापन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लेक्चर पोवाडा करता येतो अशा
व्यक्तीला सरदार संबोधले जाते. कांताबाई यांना हा मान दिला जातो.
सामाजिक भान – सन १९६८ -६९ मध्ये परिस्थितीशी झगडून स्वतःचा तमाशा उभा केल्यावर कांताबाई
सातारकर यांनी आपले सामाजिक भान जाणीवपूर्वक जपले, असंख्य गरजू रुग्ण, मंदिरे, शाळा खोल्या,
वाचनालये, सामजिक संस्था यांच्यासाठी मोफत कार्यक्रम करून त्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक
रक्कम देणगीरूपाने वाटले आहेत.
मानसन्मान – तमाशा क्षेत्रातला महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवनगौरव पुरस्कार सन २००६ मध्ये
कांताबाई सातारकर यांना तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आला.
 एबीपी माझा वाहिनीच्या वतीने सन २०१७ चा माझा सन्मान कृतज्ञता पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री.
नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आणि श्री. शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदान.
 झी वाहिनीच्या वतीने झी कॉमेडी अवार्ड सोहळ्यात देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार.
 दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान दिल्लीतील रवींद्र भवन येथे तमाशा सादर
करण्याचा बहुमान.
 संगीत नाटक अकादमीच्या वतीने चंडीगड येथे सलग दोन दिवस तमाशा सादर करण्याचा
बहुमान.
 मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या वतीने विद्यापीठाच्या आवारात तंबू लावून तमाशा
सादर करण्याचा बहुमान.
 कांताबाई सातारकर यांच्या जीवनावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या
‘वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर’ या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित. यातील तिसऱ्या
आवृत्तीचे प्रकाशन सिंगापूर येथे झाले. जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या वाशिंग्टन स्थित
‘लायब्ररी ऑफ कॉंग्रेस’ मध्येही हे पुस्तक ठेवले गेले आहे.
 ढोलकी फडाच्या तमाशाच्या इतिहासात फक्त महिलांसाठी अनेकदा तमाशाचा कार्यक्रम सादर
करणारा आजवरचा एकमेव तमाशा म्हणून कांताबाई सातारकर यांच्या तमाशाचा उल्लेख केला
जातो.

मागील सुमारे सात दशकापासून तमाशा हाच श्वास मानून या क्षेत्राला एक वेगळी उंची देणाऱ्या आणि
इतका प्रदीर्घ काल या क्षेत्राची सेवा करणाऱ्या सध्याच्या एकमेव कलाकार म्हणून कांताबाई सातारकर
यांचा उल्लेख करावा लागेल. सध्या या क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ कलाकार म्हणूनही त्यांचा उल्लेख करावा
लागेल.

कांताबाई सातारकर संपर्क
श्रीमती कांताबाई सातारकर
द्वारा- डॉ. संतोष खेडलेकर
संवाद, कॉलोनी नं. १४, गणेशनगर , मु.पो. संगमनेर – ४२२ ६०५
जिल्हा – अहमदनगर ( महाराष्ट्र )
मोबाईल – ९८२२० ९७८८०९
email – skhedlekar15@yahoo.co.in

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...