Friday, April 20, 2018

देशातल्या प्रत्येक राज्याला काही लोककला लाभल्या आहेत. या प्रत्येक लोककलेला कमीअधिक प्रमाणात लोकाश्रय मिळाला
आहे. महाराष्ट्र मात्र याबाबतीत इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक समृद्ध आहे. इथे कितीतरी लोककला बहरल्या आहेत. यापैकी
सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला लोककलाप्रकार म्हणजे तमाशा. मराठी लोकरंगभूमीवर ज्या ज्या कलाकारांनी आपल्या
कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे त्यातील खूप वरचे नाव म्हणजे कांताबाई सातारकर.
गुजरातमधील बडोदा जिल्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या
पोटी जन्मलेया कांताबाईना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे
कांताबाई कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी
मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला. छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन
पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून करता करता त्यांच्यातील अस्सल
कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक
झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात
पोहचली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जाऊ लागला.
१९६४ मध्ये अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले. आणि शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या
आयुष्यात आली. पण तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच
धाडशी होत्या. कधीकाळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडत काम करणे
रुचत नव्हते. त्यांनी जिद्दीने पै-पै जमवून स्वतःचा तमाशा फड उभा केला. एका स्त्रीने परंपरेने वाट्याला आलेला सुतळीचा
तोडाही न घेता स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आणि पुढे अमाप लोकप्रियता मिळून आजही तेव्हढ्याच दिमाखात उभा
असलेला एकमेव तमाशा फड हा कांताबाईंचाच.
एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना
कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली
अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम
असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या
आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव
पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना
तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी
तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान
कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटतो.पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्याने आकाशच कोसळलं. घरचा धनी, फडाचा मालक असा अचानक गेला... पैशांची तरतूद नव्हती. चरितार्थाचा प्रश्न होता. फडही विस्कळीत झाला. पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली. पुन्हा फड उभा राहिला. मराठी मुलखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारो लोकांच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वर्षाकाठी दोनशे सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आजही आपल्याच मस्तीत दंग आहेत. फडाच्या रूपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं. मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं. कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लडिवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची!

कांताबाई सातारकर...

संगमनेरचे लेखक संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकरांच्या आयुष्याची चित्तरकथा कॅनव्हासवर पुस्तकरूपाने रेखाटली आहे. कांताबाईंच्या तमाशा संचासह गावोगावी फिरून संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या आणि वैष्णवी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या "कांताबाई सातारकर' या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या आतापर्यंत संपल्यादेखील.

kantabai

तसे पाहिल्यास प्रत्येक तमाशा कलावती ही विठाबाईचेच जीवन जगत असते. संघर्ष, गरिबी, पुरुषी वर्चस्व, निरक्षरता, आपल्या गणगोतांकडून होणारी फसवणूक, प्रकृती या साऱ्या समस्यांचा सामना विठाबाईप्रमाणे आजपर्यंत प्रत्येक तमाशा कलावतीने केलेला आहे. कांताबाई सातारकरही त्याला अपवाद नाही. मग कांताबाई सातारकरांचे वेगळेपण कशात आहे? कांताबाई आणि विठाबाई या दोन्ही कलावतींमध्ये बरेच साम्य आहे. विठाबाई तोंडाने फटकळ तर कांताबाईही स्पष्टवक्त्या व परखड. विठाबाई नृत्य-गायन व अदाकारीत वाकबगार तर कांताबाईही नृत्य-गायन व अदाकारीत उजव्या. विठाबाईप्रमाणे त्यांनीही काही वगात पुरुष भूमिका केल्या. "रायगडची राणी'मधील सोयराबाई, "डोम्या नाग'मधील बायजा, "असे पुढारी आमचे वैरी'मधील आवडा, "पाच तोफांची सलामी'मधील गजरा, "कोर्टादारी फुटला चुडा'मधील सगुणा, "हरिश्चंद्र'मधील तारामती अशा अनेक भूमिका कांताबाईंनी आपल्या कसदार अभिनयाने गाजवल्या. त्यांची परंपरा पुढे मुलगा रघुवीर खेडकर आणि मुलगी मंदाराणी यांनी सुरू ठेवली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशा संचात दादोबांबरोबर काम करण्याची संधी कांताबाईंना लाभली. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत कांताबाईंनी अनेक वगात पोवाडेदेखील गायले आहेत. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही कांताबाईंनी मिळवलेले हे यश खरोखरच उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळण्यापूर्वीही कांताबाईंनी तमाशा कलावंतांचे प्रश्न पोटतिडकीने आणि तितक्याच परखडपणे अनेक वेळा मांडले आणि आजही ते प्रश्न सोडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न त्या करीत आहेत.

एका गरीब कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी स्वयंप्रेरणेने तमाशात नाचायला उभी राहते, यात स्वत:चा स्वार्थ किंवा आनंदापेक्षा घरच्यांची काळजी महत्त्वाची मानणारी छोटीशी कांता... पतीच्या निधनानंतर अनेक संकटांचा सामना करीत स्वत:चा फड उभा करणारी कांता... तमाशा सुरू असताना झालेल्या अपघातात एक जुना सहकारी गमावल्यानंतरही तमाशा चालूच ठेवण्याचा आदेश देऊन जखमी नातवाला मांडीवर घेऊन दवाखान्यात घेऊन जाणारी कांता... सुनेच्या निधनानंतर सहाव्या दिवशी मुलांना धीर देऊन तमाशाच्या बोर्डावर उभी करणारी कांता... कलावती, पत्नी, आई, आजी अशा अनेक रूपांतली कांता निश्चितच प्रेरणा देणारी आहे. पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडून आपल्याच नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात करवलीसारखी मिरवणारी आणि नंतर मनातला उद्रेक शरीरावर ओसंडून स्वरूपाला निरोप देणारी कांताबाईची अनेक रूपे मनाला व्याकूळ करतात आणि उभारीही देतात. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे चित्रपटासाठी अभिनय करण्याचे, सोन्याच्या ताटाचे निमंत्रण कांताबाईच्या नकळत नवरा नाकारतो तेव्हा नवऱ्याचा नाइलाज समजून घेऊनही कांताबाई हुरहुरतातही आणि मुलगा रघुवीर समर्थपणे फड चालविताना पाहून खुलतातही.

साहेबराव आणि चंद्राबाई या साताऱ्यातील एका गरीब कुटुंबात कांता जन्माला आली. मात्र तिचे पूर्वीचे नाव होते मदिना. कामधंद्याच्या निमित्ताने फिरत फिरत साहेबराव बडोद्याला आले आणि तेथील एका मुस्लिम वस्तीत राहू लागले. दगड, खाणी आणि सुरुंगाशी साहेबरान यांनी नाते जोडले. चंद्राबाईने एका मुलीला जन्म दिल्यानंतर शेजाऱ्यांच्या आग्रहाखातर मदिना असे नाव ठेवण्यात आले. आता मदिनाच घरातली सगळी कामे बघायची. स्वयंपाक-पाणी, धुणंभांडी, भावंडांच्या आंघोळी, घरातले सामान आणण्याचे काम हे सगळं तीच करायची. वाण्याकडे सामान आणायला जाताना रस्त्याने दिसणारी सिनेमाची पोस्टर्स बघायला मदिनाला आवडायचे. या सिनेमाच्या वेडातून मदिना हळूहळू सामानाची खरेदी करताना आणा-अर्धा आणा वाचवू लागली. पुरेसे पैसे जमा केल्यावर मदिना एकेदिवशी सिनेमा पाहायला गेली व पुढे तिचा सिनेमाचा शौक वाढतच गेला. शेजारच्या मुलींना एकत्र बोलवून त्यांच्यासमोर सिनेमातल्या नायक-नायिका आणि खलनायकांचे संवाद म्हणून दाखव, गाणी गाऊन दाखव... यामुळे मदिनाचा भाव वधारू लागला.

साताऱ्यात बागवानांचा नवझंकार मेळा प्रसिद्ध होता. त्यांना अशाच नऊ-दहा वर्षाच्या नाचणाऱ्या मुलींची आवश्यकता होती. कोणीतरी त्यांना मदिनाबद्दल सांगितले. मदिना त्यांना भेटली, तालमी झाल्या, गाणी बसवली गेली आणि मदिना खरेखुरे चाळ पायात बांधून स्टेजवर आली. बेधुंद नाचली... प्रेक्षकांनी मदिनाला जोरदार दाद दिली. नवझंकार मेळ्याचे दहाएक प्रयोग केल्यावर त्यांनी आपला गाशा गुंडाळला. इकडे साहेबरावांना कामदेखील मिळेनासे झाले. दोनवेळच्या अन्नाला ते मोताद होऊ लागले. त्याचकाळात चंद्राबाईची बालमैत्रिण मंजुळा माहेरी राहायला आली होती.  मंजुळाच्या भावाचा सर्जेराव-बाबुराव अहिरवाडीकर हा तमाशाचा संच होता. मंजुळाला मदिनाच्या नृत्यकौशल्याची चांगली जाण होती. चार पैसे सुटावेत म्हणून मंजुळाने चंद्राबाईचे मन वळवून मदिनाला तमाशात काम करण्याचा निर्णय ठेवला आणि निव्वळ पोटासाठी वयाच्या नवव्या वर्षी मदिनाने तमाशा बोर्डावर एन्ट्री घेतली.

अल्पावधीतच मदिनाची ख्याती आजूबाजूच्या गावात पसरू लागली. तिची लावणी पाहायला लोकं लांबून येऊ लागले. पण सगळ्यांना एकच खटकायचे ते म्हणजे या मुलीचे नाव मदिना कसे काय? ही गोष्ट अहिरवाडीकरांच्या कानावर गेली आणि एका निवांत क्षणी सगळ्या कलाकारांना व मदिनाला समोर बसवून या नावाची अडचण समजावून सांगितली. अहिरवाडीकरांच्या तमाशात सगनभाऊंची एक लावणी नेहमी गायली जायची.

लक्ष लावूनी बसा... सख्या मी आहे तुमची कांता...

कांता या शब्दातून एक लावण्यवतीचे चित्र सर्जेराव अहिरवाडीकरांच्या डोळ्यासमोर उभे राहायचे.  लावणीतल्या वर्णनाप्रमाणेच मदिना भासत असल्याने त्यांनी त्याचवेळी मदिनाचे कांता असे नामकरण केले. पुढे याच नावाने तमाशा क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला. अहिरवाडीकरांच्या तमाशाने कांताला आर्थिक स्थैर्य, रसिकमान्यता आणि महत्त्वाचे म्हणजे रसिकांच्या ओठांवर रुळणारे कांता हे नाव दिले होते. अहिरवाडीकरांसोबतचा सहा महिन्यांच कांताचा करार संपला आणि मग कांताने सातारा जिल्ह्यातील शिवा-भावा यांच्या तमाशात काम करण्यास सुरूवात केली. कांताचा अभिनय हा सगळीकडे चर्चेचा विषय झला होता.

आजूबाजूच्या जत्रेत तिच्या तमाशाची मागणी वाढू लागली. आता कांता आपल्या मर्जीनुसार कुठे काम करायचे, कुठे नाही हे ठरवू लागली. कांताचे देखणे रुप बघून अनेकजण ही कुणी वरच्या जातीची, चांगल्या घरातली मलगी असावी असे समजायचे. अनेकजण तर तिला तमासगिरांनी पळवून आणले असेल असेही समजायचे. कांता अकरा-बारा वर्षांची असताना अनेकदा तमाशाच्या दौऱ्यावर एखाद्या गावात मनाजोगी कमाई होत नसे. अशावेळी तमाशा संपल्यावर दुसऱ्या दिवशी कलाकारांच्या खाण्याची पंचाईत असायची. अशावेळी फडमालक कांताच्या अभिनयाचा उपयोग करून एकवेळच्या भाकरीसाठी करायचा. कांता गावातून रस्त्याने अतिशय केविलवाण्या चेहऱ्याने रडत निघायची. एकेका घरासमोर उभे राहून काहीतरी वाढा हो अशी याचना करायची आणि लोकंही तिचा केविलवाणा चेहरा बघून भाकरी द्यायचे.

तमाशा हेच जीवनाचे सर्वस्व आहे हे १४-१५ वर्षाच्या कांताने ओळखले होते. आयुष्यभर गरिबीचे चटके सहन केलेल्या साहेबराव आणि चंद्राबाई यांनीही परिस्थितीचा स्वीकार केला होता. माणसाला आवश्यक असलेल्या अन्न-वस्त्र-निवारा या तिन्ही गोष्टी विनासायास मिळवून देणाऱ्या तमाशाकलेबरोबरच मुलीची जुळलेली नाळ त्यांनाही सुखावणारी होती.

पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्याने आकाशच कोसळलं. घरचा धनी, फडाचा मालक असा अचानक गेला... पैशांची तरतूद नव्हती. चरितार्थाचा प्रश्न होता. फडही विस्कळीत झाला. पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली. पुन्हा फड उभा राहिला. मराठी मुलखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारो लोकांच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वर्षाकाठी दोनशे सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आज वयाच्या ६६व्या वर्षी आपल्याच मस्तीत दंग आहेत. फडाच्या रूपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं. मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं. कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लडिवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची!

कांताबाई सातारकर... नुकतेच त्यांना महाराष्ट्र शासनाने तमाशा सम्राजी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. पहिल्यांदाच विठाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी कांताबाई सातारकरशिवाय अन्य दुसऱ्या नावाचा विचारच होऊ शकला नसता आणि त्यासाठी कांताबाईचा यथोचित सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे, सांस्कृतिक कला संचालनालयाचे आणि प्रकाश खांडगे, उषा चव्हाण, शाहीर विठ्ठल उमप आणि शेख जैनू चाँद या पुरस्कार निवड समितीचे खास अभिनंदन करायला हवे.

कौतुकांच्या या यादीत आणखी एका नावाचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे, संगमनेरचे लेखक संतोष खेडलेकर यांचा. संतोष खेडलेकर यांनी कांताबाई सातारकरांच्या आयुष्याची चित्तरकथा कॅनव्हासवर पुस्तकरूपाने रेखाटली आहे. कांताबाईंच्या तमाशा संचासह गावोगावी फिरून संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या आणि वैष्णवी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या "कांताबाई सातारकर' या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या आतापर्यंत संपल्यादेखील.

तसे पाहिल्यास प्रत्येक तमाशा कलावती ही विठाबाईचेच जीवन जगत असते. संघर्ष, गरिबी, पुरुषी वर्चस्व, निरक्षरता, आपल्या गणगोतांकडून होणारी फसवणूक, प्रकृती या साऱ्या समस्यांचा सामना विठाबाईप्रमाणे आजपर्यंत प्रत्येक तमाशा कलावतीने केलेला आहे. कांताबाई सातारकरही त्याला अपवाद नाही. मग कांताबाई सातारकरांचे वेगळेपण कशात आहे? कांताबाई आणि विठाबाई या दोन्ही कलावतींमध्ये बरेच साम्य आहे. विठाबाई तोंडाने फटकळ तर कांताबाईही स्पष्टवक्त्या व परखड. विठाबाई नृत्य-गायन व अदाकारीत वाकबगार तर कांताबाईही नृत्य-गायन व अदाकारीत उजव्या. विठाबाईप्रमाणे त्यांनीही काही वगात पुरुष भूमिका केल्या. "रायगडची राणी'मधील सोयराबाई, "डोम्या नाग'मधील बायजा, "असे पुढारी आमचे वैरी'मधील आवडा, "पाच तोफांची सलामी'मधील गजरा, "कोर्टादारी फुटला चुडा'मधील सगुणा, "हरिश्चंद्र'मधील तारामती अशा अनेक भूमिका कांताबाईंनी आपल्या कसदार अभिनयाने गाजवल्या. त्यांची परंपरा पुढे मुलगा रघुवीर खेडकर आणि मुलगी मंदाराणी यांनी सुरू ठेवली होती. वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या तमाशा संचात दादोबांबरोबर काम करण्याची संधी कांताबाईंना लाभली. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत कांताबाईंनी अनेक वगात पोवाडेदेखील गायले आहेत. पारंपरिक तमाशाची पार्श्वभूमी नसतानाही कांताबाईंनी मिळवलेले हे यश खरोखरच उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळण्यापूर्वीही कांताबाईंनी तमाशा कलावंतांचे प्रश्न पोटतिडकीने आणि तितक्याच परखडपणे अनेक वेळा मांडले आणि आजही ते प्रश्न सोडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न त्या करीत आहेत.

एका गरीब कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी स्वयंप्रेरणेने तमाशात नाचायला उभी राहते, यात स्वत:चा स्वार्थ किंवा आनंदापेक्षा घरच्यांची काळजी महत्त्वाची मानणारी छोटीशी कांता... पतीच्या निधनानंतर अनेक संकटांचा सामना करीत स्वत:चा फड उभा करणारी कांता... तमाशा सुरू असताना झालेल्या अपघातात एक जुना सहकारी गमावल्यानंतरही तमाशा चालूच ठेवण्याचा आदेश देऊन जखमी नातवाला मांडीवर घेऊन दवाखान्यात घेऊन जाणारी कांता... सुनेच्या निधनानंतर सहाव्या दिवशी मुलांना धीर देऊन तमाशाच्या बोर्डावर उभी करणारी कांता... कलावती, पत्नी, आई, आजी अशा अनेक रूपांतली कांता निश्चितच प्रेरणा देणारी आहे. पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडून आपल्याच नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नात करवलीसारखी मिरवणारी आणि नंतर मनातला उद्रेक शरीरावर ओसंडून स्वरूपाला निरोप देणारी कांताबाईची अनेक रूपे मनाला व्याकूळ करतात आणि उभारीही देतात. चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांचे चित्रपटासाठी अभिनय करण्याचे, सोन्याच्या ताटाचे निमंत्रण कांताबाईच्या नकळत नवरा नाकारतो तेव्हा नवऱ्याचा नाइलाज समजून घेऊनही कांताबाई हुरहुरतातही आणि मुलगा रघुवीर समर्थपणे फड चालविताना पाहून खुलतातही.

साहेबराव आणि चंद्राबाई या साताऱ्यातील एका गरीब कुटुंबात कांता जन्माला आली. मात्र तिचे पूर्वीचे नाव होते मदिना. कामधंद्याच्या निमित्ताने फिरत फिरत साहेबराव बडोद्याला आले आणि तेथील एका मुस्लिम वस्तीत राहू लागले. दगड, खाणी आणि सुरुंगाशी साहेबराव यांनी नाते जोडले. चंद्राबाईने एका मुलीला जन्म दिल्यानंतर शेजाऱ्यांच्या आग्रहाखातर मदिना असे नाव ठेवण्यात आले. आता मदिनाच घरातली सगळी कामे बघायची. स्वयंपाक-पाणी, धुणंभांडी, भावंडांच्या अंघोळी, घरातले सामान आणण्याचे काम हे सगळं तीच करायची. वाण्याकडे सामान आणायला जाताना रस्त्याने दिसणारी सिनेमाची पोस्टर्स बघायला मदिनाला आवडायचे. या सिनेमाच्या वेडातून मदिना हळूहळू सामानाची खरेदी करताना आणा-अर्धा आणा वाचवू लागली. पुरेसे पैसे जमा केल्यावर मदिना एके दिवशी सिनेमा पाहायला गेली व पुढे तिचा सिनेमाचा शौक वाढतच गेला. शेजारच्या मुलींना एकत्र बोलवून त्यांच्यासमोर सिनेमातल्या नायक-नायिका आणि खलनायकांचे संवाद म्हणून दाखव, गाणी गाऊन दाखव... यामुळे मदिनाचा भाव वधारू लागला.

साताऱ्यात बागवानांचा नवझंकार मेळा प्रसिद्ध होता. त्यांना अशाच नऊ-दहा वर्षाच्या नाचणाऱ्या मुलींची आवश्यकता होती. कोणीतरी त्यांना मदिनाबद्दल सांगितले. मदिना त्यांना भेटली, तालमी झाल्या, गाणी बसवली गेली आणि मदिना खरेखुरे चाळ पायात बांधून स्टेजवर आली. बेधुंद नाचली... प्रेक्षकांनी मदिनाला जोरदार दाद दिली. नवझंकार मेळ्याचे दहाएक प्रयोग केल्यावर त्यांनी आपला गाशा गुंडाळला. इकडे साहेबरावांना कामदेखील मिळेनासे झाले. दोनवेळच्या अन्नाला ते मोताद होऊ लागले. त्याच काळात चंद्राबाईची बालमैत्रीण मंजुळा माहेरी राहायला आली होती. मंजुळाच्या भावाचा सर्जेराव-बाबुराव अहिरवाडीकर हा तमाशाचा संच होता. मंजुळाला मदिनाच्या नृत्यकौशल्याची चांगली जाण होती. चार पैसे सुटावेत, म्हणून मंजुळाने चंद्राबाईचे मन वळवून मदिनाला तमाशात काम करण्याचा निर्णय ठेवला आणि निव्वळ पोटासाठी वयाच्या नवव्या वर्षी मदिनाने तमाशा बोर्डावर एन्ट्री घेतली.

अल्पावधीतच मदिनाची ख्याती आजूबाजूच्या गावात पसरू लागली. तिची लावणी पाहायला लोकं लांबून येऊ लागले. पण सगळ्यांना एकच खटकायचे ते म्हणजे या मुलीचे नाव मदिना कसे काय? ही गोष्ट अहिरवाडीकरांच्या कानावर गेली आणि एका निवांत क्षणी सगळ्या कलाकारांना व मदिनाला समोर बसवून या नावाची अडचण समजावून सांगितली. अहिरवाडीकरांच्या तमाशात सगनभाऊंची एक लावणी नेहमी गायली जायची.

लक्ष लावूनी बसा... सख्या मी आहे तुमची कांता...

कांता या शब्दातून एक लावण्यवतीचे चित्र सर्जेराव अहिरवाडीकरांच्या डोळ्यासमोर उभे राहायचे.  लावणीतल्या वर्णनाप्रमाणेच मदिना भासत असल्याने त्यांनी त्याचवेळी मदिनाचे कांता असे नामकरण केले. पुढे याच नावाने तमाशा क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला. अहिरवाडीकरांच्या तमाशाने कांताला आर्थिक स्थैर्य, रसिकमान्यता आणि महत्त्वाचे म्हणजे रसिकांच्या ओठांवर रुळणारे कांता हे नाव दिले होते. अहिरवाडीकरांसोबतचा सहा महिन्यांचा कांताचा करार संपला आणि मग कांताने सातारा जिल्ह्यातील शिवा-भावा यांच्या तमाशात काम करण्यास सुरुवात केली. कांताचा अभिनय हा सगळीकडे चर्चेचा विषय झाला होता.

आजूबाजूच्या जत्रेत तिच्या तमाशाची मागणी वाढू लागली. आता कांता आपल्या मर्जीनुसार कुठे काम करायचे, कुठे नाही हे ठरवू लागली. कांताचे देखणे रूप बघून अनेक जण ही कुणी वरच्या जातीची, चांगल्या घरातली मुलगी असावी, असे समजायचे. अनेक जण तर तिला तमासगिरांनी पळवून आणले, असेल असेही समजायचे. कांता अकरा-बारा वर्षांची असताना अनेकदा तमाशाच्या दौऱ्यावर एखाद्या गावात मनाजोगी कमाई होत नसे. तमाशा संपल्यावर दुसऱ्या दिवशी कलाकारांच्या खाण्याची पंचाईत असायची. अशा वेळी फडमालक कांताच्या अभिनयाचा उपयोग करून एकवेळच्या भाकरीसाठी करायचा. कांता गावातून रस्त्याने अतिशय केविलवाण्या चेहऱ्याने रडत निघायची. एकेका घरासमोर उभे राहून काहीतरी वाढा हो, अशी याचना करायची आणि लोकंही तिचा केविलवाणा चेहरा बघून भाकरी द्यायचे.

तमाशा हेच जीवनाचे सर्वस्व आहे, हे १४-१५ वर्षाच्या कांताने ओळखले होते. आयुष्यभर गरिबीचे चटके सहन केलेल्या साहेबराव आणि चंद्राबाई यांनीही परिस्थितीचा स्वीकार केला होता. माणसाला आवश्यक असलेल्या अन्न-वस्त्र-निवारा या तिन्ही गोष्टी विनासायास मिळवून देणाऱ्या तमाशा कलेबरोबरच मुलीची जुळलेली नाळ त्यांनाही सुखावणारी होती.

मुंबईत तमाशा कलाकारांना मोठी संधी असते. तिथले तमाशा कलाकारांना मोठी संधी असते. तिथले तमाशा रसिक चांगल्या कलाकाराला लगेच डोक्यावर घेतात. मुंबईत नावाबरोबर पैसाही चांगला मिळतो हे सगळं कांताला ठाऊक होतं. पावसाळ्यात मुंबईत पिला हाउस, लालबागचे हनुमान थिएटर अशा ठिकाणी नावाजलेल्या तमासगीरांचे फड असतात, हे ती ऐकून होती. घरातदेखील कटकटी वाढू लागल्याने कांताने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि कोणाचीही ओळखपाळख नसताना तिने मुंबईचे थेट न्यू हनुमान थिएटर गाठले. तिथे विख्यात वगसम्राट दादू इंदुरीकरांचा तमाशा सुरू होता. दादोबांनी लगेच कांताला आपल्या तमाशात ठेवून घेतले. दादोबांबरोबर काही कार्यक्रम केल्यानंतर स्वाभिमानी कांताला दादोबांच्या द्विअर्थी विनोदाचा तिटकारा येऊ लागला. तिला तो प्रकार आवडत नव्हता. काही दिवसांतच कांताने दादू इंदुरीकरांच्या तमाशाला सोडचिठ्ठी दिली आणि तितक्याच ताकदीच्या तुकाराम खेडकर यांच्या तमाशात ती दाखल झाली. कांताबाईच्या कलेचे आणि आयुष्याचेही खऱ्या अर्थाने चीज झाले ते तुकाराम खेडकर यांच्यात तमाशात. तुकाराम खेडकर यांनी कांताशी लग्न केले आणि ती सौ. कांताबाई तुकाराम खेडकर झाली. लग्नानंतर या जोडगोळीने महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचे अनेक वग गाजले. पुढे कॉलरामुळे तुकाराम खेडकर यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्येक फडात होतात तशी भांडणे सुरू झाली. खेडकरांनंतर फडाची सूत्रे कांताबाईच्या हाती येऊ नयेत, यासाठी सारे जण एकत्र झाले. कांताबाईच्या आयुष्याची परवड सुरू झाली. एकेकाळची तमाशाची मालकीण आता उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या तमाशात काम करू लागली. तमाशाच्या व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या पांडुरंग तात्या कासार यांच्याशी कांताबाईंनी दुसरा विवाह केला. पैशांची जुळवाजुळव केली आणि तमाशाचा संच उभा केला. मात्र तुकाराम खेडकरांचे नाव वापरू नये, अशी अट घातली गेल्यामुळे "कांताबाई सातारकरसह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ' हा नवा संच कांताबाईने बोर्डावर उतरवला. वर्षभरातच कांताबाईंना दुसऱ्यांदा वैधव्य आले.

आज कांताबाई जरी काम करीत नसल्या तरी आपल्या मुलाच्या तमाशा संचातील कारभारावर त्या जातीने लक्ष ठेवून असतात. रघुवीर खेडकर हा आजच्या घडीचा महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ सोंगाड्या म्हणून ओळखला जातो. मंदाराणीने आपल्या नृत्यकौशल्याने रसिकांना घायाळ केले आहे. कांताबाई आज समाधानी आहेत. त्यांची परंपरा पुढे जाेमाने सुरू आहे.

ढोलकीच्या तोड्याला आपण कडाडून दाद देतो. घुंगरांच्या अदाकारीला, कलावतीच्या नवऱ्याला आपण साद देतो. पण नंतर काय? आनंद घेताना आपली वाटणारी ही कला, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा देताना दूर का जाते? उच्चभ्रू मध्यमवर्गाच्या दुटप्पीपणाशी मुकाबला करण्याइतकी कणखर ही मंडळी नाहीत. ही आहेत कष्टाळू भाबडी माणसं. उपेक्षेच्या तंबूत गोठून गेलेली.

त्यातल्या एका ज्येष्ठ कलावतीला पुन्हा एकदा समाजापुढे आदरपूर्वक आणून संतोष खेडलेकर या गुणी लेखकाने वाङ‌‌मयीन नव्हे तर सामाजिकही काम केले आहे. म्हणून एकाच वेळी या दोघांना मानाचा मुजरा...!

 
तसे पाहिल्यास प्रत्येक तमाशा कलावती ही विठाबाईचेच जीवन जगत असते. संघर्ष, गरिबी, पुरुषी वर्चस्व, निरक्षरता, आपल्या गणगोतांकडून होणारी फसवणूक, प्रकृती या साऱ्या समस्यांचा सामना     पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्याने आकाशच कोसळलं. घरचा धनी, फडाचा मालक असा अचानक गेला... पैशांची तरतूद नव्हती. चरितार्थाचा प्रश्न होता. फडही विस्कळीत झाला. पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली. पुन्हा फड उभा राहिला. मराठी मुलखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारो लोकांच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वर्षाकाठी दोनशे सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आजही आपल्याच मस्तीत दंग आहेत. फडाच्या रूपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं. मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं. कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लडिवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची!

कांताबाई सातारकर...
...

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...