Sunday, April 15, 2018

निसर्गाच्या शाळेत रमताना मुलांचा सर्वांगिण विकास होतो .📝 '.डॉ . ललिता ताई गुप्ते

निसर्गाच्या शाळेत रमताना मुलांचा सर्वांगिण विकास होतो .📝 '.डॉ . ललिता ताई गुप्ते
                          आदिवासी अतिदुर्गम भागातील जि.प. प्रा . शाळा भोजदरावाडी शाळेत डॉ . ललिताताई गुप्ते ( संचालिका आपुलकी , पुणे ) यांनी निवासी सात दिवस आदिवासी मुलांसमवेत राहुन बालसंस्काराला कृति शिलतेची जोड दिली . राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या डॉ . ललिताताई गुप्ते भोज दरवाडी शाळेत पाच वर्षांपासून येतात .आपुलकी ही पुणेस्थित संस्था असून संस्थेच्या मार्फत ताई या शाळेला आपली शाळा मानुन आर्थिक व वस्तु रुपाने सदभाव देणगी देत असतात .आपुलकी संस्थेने 'आपुलकी ' जपत विदयार्थि व ग्रामस्थांना आपलेसे केले. मागिल वर्षी गुप्ते परिवाराकडून नानासाहेब गुप्ते पुण्यस्मरणा निमित्त प्रोजेक्टर भेट दिला होता याही वर्षी त्यांनी शाळेत वीजेची गरज लक्षात घेऊन शाळेस इन्व्हर्टर भेट दिला . सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने गरजु महिलांना साडयांचे वाटप केले .
सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने दररोज एक दिनविशेष साजरा केला . मुलांना उपयोगी पडणारे शाब्दिक खेळ , चित्र रंगवणे गाण्यांच्या भेंडया , महापुरुषांच्या गोष्टी', प्रेरणा गीत, कवायत प्रकार , मैदानी खेळ , मुलांच्या घरी गृहभेटी दिल्या . शेवटचा दिवस मुलाखतींनी गाजला , मुलांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले 
समारोप कार्यक्रमाच्या वेळी बोलताना डॉ. ललिताताई गुप्तेताई म्हणाल्या की " निसर्गाच्या शाळेत रमताना मुलांनी शिकयला हवं ,शाळेत बागेत फुलणाऱ्या पाकळीकडून बोध घ्यायला हवा व दरवळणारा परिमल घेताना स्वच्छंद आनंद अनुभवावा . या स्पर्धेच्या युगात संस्कारक्षम पिढी निर्माण होणे गरजेचे आहे.बालवयात व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा विकास होत असतो याच गोष्टीचा उपयोग करुन मुलांना आपण आकार देऊ शकतो . मुलांच्या या विकासाच्या अवस्थेमध्ये पालक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असते. अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख श्री .मोरे साहेब होते .या कार्यक्रमास राज्य आदर्श शिक्षक अंकुश भांगरे , विस्तार अधिकारी सोमनाथ सुकटे उपक्रम शिल शिक्षक निवृत्ती चौधरी, शिवाजी आवारी, भिमा कोंडार, पांडूरंग भांगरे आदि उपस्थित होते . सुत्रसंचालन मुख्याध्यापक मच्छिंद्र भाईक यांनी केले आभार लक्ष्मण आंबेकर यांनी मानले
Attachments area

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...