Monday, November 20, 2017

सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.

लेख
म . टा . वृत्तसेवा , संगमनेर--
सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्रगती झालेली आहे त्यामध्ये सहकारी चळवळीच्या योगदानाचा मोठा वाटा आहे.अ.नगर जिल्ह्याच्या सहकारी चळवळीत अनेक धुरीनांनी  नेतृत्व केले आहे.प्रत्येक तालुक्यात सहकाराच्या क्षेत्रात समर्पण भावनेने काम करणारी एक आदर्शवादी पिढी स्वातंत्र्योत्तर काळात मोठया जोमाने कार्यरत होती.त्या पिढीच्या धुरीनांनी सहकार चळवळीचा माध्यमातून परिवर्तन  आणि प्रगतीला जी दिशा दिली.तीचाच आदर्श आज सहकार चळवळीत कार्य करणारे लहान थोर नेते व कार्यकर्ते यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे.
संगमनेर तालुक्याच्या सहकार चळवळीला देखील खुप मोठा संपन्न वारसा लाभलेला आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढयात सर्वस्व झोकून देऊन कार्य करणार्‍या अनेक धुरिनांनी स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराच्या विकासासाठी जे प्रयत्न केले त्याचीच फलभु्रती म्हणजे सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याचा झालेला नेत्रदिपक असा सर्वांगीण विकास होय . या विकासाच्या चळवळीत अनेक कार्यकर्ते यांनी येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबध्द रितीने व पूर्ण समर्पित भावनेने काम करुन या तालुक्याच्या सहकाराची ओळख रायात आणि राष्ट्रीय पातळीवर वेगळया अर्थाने करुन दिली आहे.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुळातच डाव्या विचार सरणीने प्रेरीत झालेल्या भाऊसाहेबांनी स्व.डॉ.अण्णासाहेब शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी,शेतमजूर,विडी कामगार इ.न्याय हक्कांना वाचा फोडण्यासाठी संघटनात्मक चळवळ उभारली. शेतकरी शेतमजुर व विडी कामगारांच्या युनियनच्या माध्यमातून लोकजागृती करुन या वंचीत घटकाला शासनाच्या पातळीवर न्याय देण्यासाठी लढे दिले.कालांतराने 1952 साली भाऊसाहेबांना हे तिव्रतेने जाणवले कि समाजातील तळागाळातील सर्व घटकांची सर्वांगीण प्रगती करावयाची असेल तर केवळ संघर्षाची भूमिका घेऊन उपयोग नाही तर त्याला सहकाराची जोड द्यावी लागेल.हा विचार मनाशी पक्का झाल्यानंतर दादांनी स्व:त ही सहकारी चळवळीला वाहून घेतले.तो आयुष्याच्या अंतीम श्‍वासापर्यंत
तसे पाहता संगमनेर तालुका हा अवर्षणप्रवण विभागात येणारा आणि दुष्काळ नेहमी पाचवीला पुजलेला असा तालुका. या तालुक्याचा विकास करावयाचा तर नेमका कोणत्या मार्गाने करावा हा मोठा प्रश्‍न होता.दादांनी त्याच्या सहकार्‍यांसमवेत केलेल्या विचार मंथनातून एक दिशादर्शक चित्र निर्माण झाले.1956 साली तालुक्यात सुपरवायझिंग युनियन चे ते अध्यक्ष झाले. त्यांनी पुढाकार घेत तालुक्यात ग्रामपातळीवर अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली.या सुपरवायझिंग युनियनच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामसहकारी संस्थांच्या प्रत्येक सभासदाच्या शेती विकासाचा पंचवार्षिक कालबध्द नियोजनाचा प्रकल्प आराखडा त्यांनी तयार केला.अत्यंत दुरदृष्टीने असा आराखडा तयार करणारे भाऊसाहेब (दादा ) हे त्या काळातील सहकारातील पहिलेच अन् एकमेव नेते असावेत. त्या आराखडा नुसार विकास योजना राबविण्याच्या ठरल्या.यासाठी त्या काळात संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी जवळपास 4 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.रुपया गाडीच्या चाकाप्रमाणे मानला जाणार तो काळ त्या काळात ही 4 कोटी रक्कम म्हणजे कुणाचेही डोळे पांढरे व्हावेत इतकी मोठी रक्कम होती.त्या आराखडयाची अंमलबजावणी त्यावेळी तातडीने होऊ शकली नाही.तरी भविष्यकाळात जेव्हा अनुकुल परिस्थिती निर्माण झाली तेव्हा भाऊसाहेबांनी रेखाटलेले हे विकासाचे चित्र बर्‍याच अंशी साकार होऊन समृध्द होऊ शकले.
1958 साली संगमनेर तालुक्यात स्थापन झालेला शेतकरी सहकारी संघ हा विकासाच्या चळवळीतील मानांकित असा मैलाचा दगड ठरला. भाऊसाहेब शेतकी संघाचे चेअरमन झाले आणि शेतकी संघाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला आधिक गती देण्याचे काम त्यांनी ग्राम आणि तालुका पातळीवर सुरु केले.संगमनेर तालुक्याच्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी व्हावी ही या तालुक्यातील आम जनतेची खुप तीव्र इच्छा होती.परिस्थिती अनुकुल नसतांनाही भाऊसाहेबांची ग्रामीण जनतेच्या या भावनेला मुर्त स्वरुप देण्याचा निर्णय घेतला. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते कारखान्यासाठी भाग भांडवल उभारण्यास प्रारंभ केला.या कामात भाऊसाहेबांना अपेक्षा पेक्षा जास्त यश मिळाले.तालुक्याची एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली तर कारखान्याचे शेअर्स खरेदीसाठी लोकांकडे फारसा पैसा नव्हता.तथापि अगदी सर्व सामान्य शेतकर्‍यांनी अगदी गोठ्यातील जनावरे विकून,घरातील दाग दागिने गहान ठेवून  शेअर्स खरेदीला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.इतका प्रतिसाद की काही दिवसात अपेक्षीत  रकमेचा आकडा पूर्ण झाला. आणि शेअर्स विक्री बंद करावी लागली.साखर कारखान्यासाठी भाग भांडवल रक्कम  उभी झाली परंतू प्रत्यक्ष कारखाना उभा राहण्यामध्ये अनेक अडचणी होत्या.कारखाना परवाना देण्यासाठी अनेक समित्या व कमिशनने भेटी दिल्या.सर्वांनी येथील प्रतीकूल परिस्थीती पाहून कारखाना उभारणीस नकार दिला.तथापि भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यकर्ते ठाम राहिले.
1960 साली भाऊसाहेबांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाली.जिल्हा पातळीवरील या वित्तीय संस्थेतील दादांचा प्रवेश हा संगमनेर तालुक्याचा आणि एकूणच अ.नगर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती व नवी दिशा देणारा ठरला.1960 सालापासून पुढील सलग 48 वर्ष दादा या बँकेच्या संचालक मंडळावर होते.त्यात जवळपास दादांनी 15 वर्ष चेअरमन पद भूषविले.14 जानेवारी 1962 साली महाराष्ट्र रायाचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण हे संगमनेरात आले व त्यांच्या उपस्थिीत दादांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सहकाराला सरकारचे बळ लाभल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला नवी ऊर्जा मिळाली.त्यातच 1965 साली दादा महाराष्ट्र राय बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आले. या शिखर बँकेच्या संचालक मंडळावरही दादा 34 वर्ष होते.त्यांनी राय बँकेची व्हा.चेअरमन व चेअरमन ही पदे भूषविली. 
भाऊसाहेब (दादा ) व त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नाला डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या मुळे केंद्र शासनाच्या पातळीवर यश मिळाले.आणि 1966 साली 800 मे.टन क्षमता असलेला कारखान्याला परवानगी मिळाली.भाग भांडवल रक्कम आधीच जमा असल्याने सह.साखर कारखाना उभारणीस प्रारंभ झाला.आनि अत्यंत वेगाने काम पूर्ण करुन 28 मार्च 1968 रोजी संगमनेर भाग.सह.साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हण यांच्या हस्ते संपन्न केला.यामुळे दादांनी विकास चळवळीचा एक मोठा टप्पा गाठला होता .सहकारी साखर कारखाना.अ.जिल्हा सह.बँक आणि महाराष्ट्र राय सह.बँक अशा तीन महत्वाच्या संस्थांवर भाऊसाहेबांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्यांनी या तालुक्यातील गोर - गरिब जनतेच्या जिवनात मोठी आर्थिक समृद्धी आणण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही.पाणी आडवा व पाणी जिरवा या योजना ,केटिवेअर,नालाबडींग,दगडी बंधारे या माध्यमातून जलसंधारणाचा कार्यक्रम मोठ्या प्रामाणात राबविला.संगमनेर  साखर कारखान्यात विकास कक्षाची स्थापना करुन त्या कक्षामार्फत व जिल्हा आणि राय सहकारी बँक यांच्या आर्थिक पाठबळातून संगमनेर तालुक्यात वैयक्तीक सामूदायीक व सहकारी पातळीवर पाणी पुरवठा करणार्‍या संस्थाचे मोठे जाळे अत्यंत कष्ठ पूर्वक उभारुन दादांनी सिंचन क्षेत्र वाढविले.
तालुक्यात पुरेश्या ऊसाअभावी कारखाना उभाच राहू शकणार नाही असे अनेकांचे मत होते.त्याच तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याने दादांच्या मार्गदर्शनाखाली कठोर शिस्त,कार्यक्षम प्रशासक,पारदर्शक दृष्टीचे नियोजन,काटकसर आणि सहकारी संस्था चालवितांना घेतलेली प्रामाणीक विश्‍वस्ताची भूमिका या गुण समुच्चयामुळे केवळ राय पातळीवर नाही तर देशपातळीवर एक सर्वोत्कृष्ठ आणि आदर्श सहकारी साखर कारखाना असा नावलैकिक निर्माण केला.रायाचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांना सर्वाधीक भाव देण्याची ही परंपरा अखंडपणे  जोपासली.साखर निर्मीतीबरोबरच पूरक उत्पादनेही सुरु केले.तथापि दादा हे सच्चे गांधीवादी नेते असल्याने कोणत्याही परिस्थीत कारखान्यात देशी व विदेशी दारु बनवायची नाही या निर्णयावर दादा ठाम राहिले.तालुक्यात पुरेसा शास्वत ऊस निर्माण करण्यासाठी याप्राने पाणीपुरवठा संस्थांचे जाळे दादांनी  उभारले.त्याचप्रमाणे शेतीमध्ये अनेक उत्पादनासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणाला दादांनी प्राधान्य व बळ दिले. 


जिल्हा व राज्य य बँकेच्या माध्यमातून अर्थपुरवठा करुन शेतीच्या यांत्रिकीकरणाला मोठी गती दिली.संगमनेर तालुका हा मुळातच दुष्काळी असल्याने शेतीला शाश्‍वत जोडधंदा असेल तर शेतकरी वर्गाचा खर्‍या अर्थाने विकास होईल हे ओळखून दादांनी दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली.त्यासाठी संकरीत गाई निर्मीतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला.त्यांनी गावोगावी दुध संस्थांची स्थापना केली.दुध संस्थेबरोबर पतसंस्थेचेही मोठे जाळे निर्माण केले.पतसंस्थेने शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायासाठी कर्ज द्यायचे व शेतकर्‍यांनी दुधाच्या पगारातून त्या कर्जांची परतफेड करायची.यामुळे दुध संस्था व पतसंस्था दोन्हीही भरभराटीला आल्या.संगमनेर तालुक्यात दादांनी दूध संघाची स्थापना करुन शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ निर्माण करुन दिली.केवळ शेतकरी नाही तर,मागासवर्गीय व भूमीहिनांनाही त्यांनी या प्रक्रियेत सामावून घेतले.परिणामी दुघाचे उत्पादन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढले.शेतकर्‍यांसाठी शाश्‍वत असा जोडधंदा निर्माण झाला.तालुक्यात स्वयंरोजगार निर्माण होवून बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला.आज राजहंस दुध संघ हा रायात अग्रेसर असून येथे 20 प्रकारचे दूधाचे उप पदार्थ निर्माण केले जाातात.यावर्षी या संघाला 21 कोटींचा नफा झाला.त्यामुळे दुध उत्पादकांना रेबीट प्रतीलिटर 1.50 पैसे याप्रमाणे देण्यात आले दुध संघाच्या या आर्थिक उलाढालीतून तालुक्याची बाजारपेठ मोठी फुलली आहे.दुध व्यवसायाबरोबरच संगमनेर तालुक्यातील शेतकरी फळबाग व भाजीपाला पिकवण्याच्या बाबतीतही अत्यंत आग्रेसर आहे,डाळींब,कांदा,टोमॅटो यासारख्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असून या पिकांमधून कोटयावधी रुपयांची उलाढाल होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती व संगमनेर अ‍ॅग्री कल्चर प्रोड्युस ट्रान्सपोर्ट कंपनी या मार्फत शेतकर्‍यांना शेती माल विक्रीची सुविधा सहकारी तत्वावर करुन देण्यात आली आहे.


शेतकर्‍यांच्या घरात खर्‍या अर्थाने सुबत्ता येण्यासाठी शिक्षणा शिवाय पर्याय नाही यासाठी 1965 मध्ये सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेची स्थापना केली.आज या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागात मुले व विशेषत मुलींची शिक्षणाची मोठी सोय झाली आहे.पूर्वी शिक्षणापासून वंचित राहणारी मुले मुली शिक्षण प्रवाहात आली.आज 34 विद्यालये 11 कनिष्ठ महाविद्यालय व 3 वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत.उच्च शिक्षणाची संधी तालुक्यात उपलब्ध करुन देण्यासाठी 1983मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास या संस्थेची स्थापना केली.या संस्थेअंतर्गत अमृतवाहिनी इंजि.कॉलेज, तंत्रनिकेतन. एमबीए, फार्मसी,आयटीआय, मॉडेलस्कूल, इंटरनॅशनल स्कूल, यु.कॉलेज,एसएमबीटी दंत महाविद्यालय या संस्था आपल्या गुणवत्तेने रायात अग्रमानांकित ठरल्या आहे.आयएसओ मानाकन पुणे उत्कृष्ट महाविद्यालय असा गौरव झालेले अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी महाविद्यालयात मानांकन मिळविले आहे. या महाविद्यालयाने सलग तिन वेळेस एनबीएचे सर्व शाखांसाठी मानांकन मिळवून देशात अग्रक्रम मिळविला आहे.विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी अमृतवाहिनी मधून विविध उपक्रम राबविले जातात.उत्कृष्ट निकाल प्लेसमेंटची सुविधा यामुळे हे महाविद्यालये विद्यार्थ्यांची पहिली पसंती राहिली आहे.अमृतवाहिनीचे अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात विविध ठिकाणी मोठया पदावंर कार्यरत आहेत.अमेरिकेमध्ये अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठा अमृतगृप  स्थापन केला आहे.मधील मानांकन मिळाले आहे.
देशाला आदर्शवत असणार्‍या अमृत उद्योग समूहातील सहकारी साखर कारखाना,दुध संघ,शेतकी संघ, राजहंस अ‍ॅग्रो कंपनी,शॅम्प्रो,गरुड कुकुट्टपालन,संगमनेर अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्यूस कंपनी,अमृतवाहिनी बँक,बाजार समिती या आपल्या लौकिक पूर्ण कामकाज पध्दतीने देशात सहकाराचे मॉडेल ठरले आहेत. अशा विविध शिखर संस्थासह तालुक्यात सेवा सोसायट्या,पतसंस्था व दुधसंस्थांची मोठे जाळे निर्माण झाले.


सहकार हा ग्रामीण विकासाचा राजपथ मानून काम करणार्‍या दादांनी उभा केलेला सहकार हा सहकाराची पंढरी ठरतांना विकासाचे मॉडेल  ही ठरले आहे.याचे कारण दादांच्या आदर्शवत मार्गदर्शनाखाली व रायाचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या दुरदृष्टी  व समृध्द नेतृत्वातून इथला सहकार खर्‍या अर्थाने ग्रामीण विकासाचा महामेरु ठरला आहे.
8 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...