Monday, November 20, 2017

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (

म.टा.वृत्तसेवा अकोले - -सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (१६४६मि. )सह लहान मोठे पर्वतशिखरे डोंगर सुळके उरात धडकी निर्माण करणाऱ्या  येथील खोल दऱ्या हरिचंद्र गडाच्या कोकण कडयासह लहान मोठे कडे वैभवशाली इतिहास आणि संस्कृतीची साथ देणारे हरिचंद्र गड, रतन गडासह लहान मोठे डझन दिड डझन गड किल्ले  दंडकारण्यातील वनाचे अजूनही बर्यापैकी टिकून असणारे जंगल त्यातील जैव विविधता यांचा हा प्रदेश तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात तीन ते पाच हजर मि मि पाऊस  पडतो, मुळा , प्रवरा,आढळा , म्हाळुंगी, कृष्णावंती या नद्या याच परिसरात उगम पावतात जिल्ह्याच्या मोठ्या भागाची तहान या नद्या भागवतात. मात्र येथील निसर्गाची भूभागाची हवामानाची ती विविधता एकेकाळी या भागाच्या विकासातील अडसर ठरली तालुक्यातील अनेक लहान मोठी खेडी, दुर्गम होती. चार महिने तालुक्याच्या मोठ्या भागाचा  संपर्क पावसाळ्यात अन्य भागाशी तुटायचा या निसर्गानेच मागासलेपणाचा शिक्का तालुक्याच्या माथी मारला होता.  मात्र हळूहळू हे चित्र बदलत आहे जल, जंगल, जमीन या नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य पद्धतीने वापर होऊ लागल्यामुळे तालुक्याचे चित्र काही वर्षात बदलले आहे.
विकासाच्या वाटेवरील     प्रगतीतील तालुका     अशी तालुकयाची नवी ओळख होऊ लागली आहे. या परिसरात बांधली गेलेली लहान मोठी धरणे   समृद्ध वनसंपदा डोंगर पठारावरून वाहणारा भन्नाट वारा  यांच्या जोडीला स  कष्टाळू माणसाचे अविरत प्रयत्न, संस्था, व्यक्ती यांचे  कमी अधिक योगदान विकास प्रक्रियेत आहे.
१९२६ साली बांधून पूर्ण झालेले ११ टी एम सीचे भंडारदरा धरण हा तालुक्याबरोबर जिल्हातील मोठा सिंचन प्रकल्प, सह्याद्रीच्या डोंगर रांगा  धो धो कोसळणारे पावसाचे पाणी २७० फुट उंचीच्या दगडी भिंतीने आडविले. आडवीलेले हे पाणी  नदीतून पाटात, पाटातून शेतात फिरू लागले. आणि उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचे चित्र बदलले ओसाड माळ रानावर ऊस मळे उभे राहिले  साखर कारखाने निर्माण झाले पहिल्या सहकारी साखर कारखान्या च्या रूपाने सहकाराच्या नवीन  अध्यायाचा श्रीगणेशा झाला  अर्थात दुष्काळी    भागाचे रूप भंडारदरा   धरणा मुळे पालटले असले तरी अकोले तालुक्याला  मात्र आता पर्यंत त्याचा  फायदा झाला नव्हता कारण भंडारदरा धरणाचे कालवे धरणाच्या भिंतीपासून ८५ किलोमीटर वर सुरु होतात . पावसाळ्याबरोबरच आता १२ हि महिने   वाहत जाणारे प्रवरेच्या पाणी पाहात राहणे तालुक्याच्या नशिबी होते मात्र मागील शतकात ७० च्या दशकात अकोले तालुक्यात वीज येऊन पोहचली नदीवरून पाणी उपसा करण्यासाठी उपसासिंचन योजनेना चे तंत्र विकसित होत गेले आणि प्रवरेच्या पाण्याचा हळूहळू वापर  प्रवरा नदीकाठच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी  सुरु केला . मात्र भंडारदरायचा पाण्याचा वर्षानुवर्षे वापर करीत असलेल्या प्रस्थापितांना हे पाहावले नाही . आपल्या हक्काचे पाणी उचलणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी चोर ठरविले गेले . त्यातूनच हक्कच्या पाण्यासाठी मोठी चळवळ अकोले तालुक्यात उभी राहिली १९८८  साली  जनरेट्यामुळे भंडारदरा  धरणाच्या पाण्याचे फेर वाटप करावे लागले तालुक्याला १२ टक्के हक्काचे पाणी मिळाले लहान मोठ्या उपसासिंचन योजना प्रवरा खोऱ्यात उभ्या राहिल्या या पाण्यामुळे इथली शेतीचे स्वरूप पालटले उसा  बरोबरच टोमॅटो आणि अन्य  भाजीपाला पिके शेतकरी घेऊ लागला त्यामुळे प्रवरा खोऱ्याचा अर्थकारणाला गती मिळाली प्रवरा खोऱ्याचा हा भाग शेतीच्या दृष्टीने अतिशय प्रगत समजला जातो प्रवरेच्या पाण्यावर पिकणाऱ्या या उसामुळे अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्मिती झाली विकासाचे एक नवीन केंद्र तालुक्यात उदयाला आले . आज अकोले तालुक्याच्या कृषी अ र्थ  कारणात भंडारदरा व अगस्ती  कारखान्याचा मोठा वाटा आहे .
 तालुक्याच्या उत्तर भागातील देवठाण येथे १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणामुळे आढळा खोऱ्यातही मोठी क्रांती झाली असून ८ माही पद्धतीचे राज्यातील हे पहिले धरण आहे . आज आढळा लाभ क्षेत्रातील हिवरगाव , वीरगाव , पिंपळगाव ,डोंगरगाव , गणोरे परिसरातील शेतकरी डाळिंब , कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत . गुणवत्तेमुळे इथली अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब निर्यात होतात तर कांदा पिकामुळे  काही कोटीची उलाढाल होते . नुकतेच बांधून पूर्ण झालेल्या निळवंडे धरणामुळे प्रवरा खोऱयातील भंडारदरा पाण्यापासून वंचित असलेल्या भागास शाश्वत पाणी मिळणार आहे . वेगवेगळ्या उंचीवर डावा  आणि उजवा असे चार कालवे असणारे निळवंडे हे अपवादात्मक धरण या मोठ्या आणि माध्यम प्रकल्पाबरोबरच गेल्या दोन तपाच्या कालावधीत तालुक्यात वाकी , सांगवी , पाडोशी , टिटवी , बलठन ,कोथळे , आंबित , घोटी शिळवंडी , शिरपुंजे , बोरी , पिंपळगाव खांड , येसर ठाव , असे सुमारे डझनभर कमी अधिक क्षमतेचे लघु पाटबंधारे तलाव निर्माण झाले या तलावामुळे त्या त्या परिसरातील शेतीचा विकास झाला पूर्वी पावसाच्या पाण्यावर फक्त बाजरी अथवा भात  पिकाचा विचार असे मात्र या परिसरातील शेतकरी टोमॅटो , कांदा , भाजीपाला सारखी नगदी पिके घेऊ लागला आहे .
मुळा नदीवरील लहान मोठ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साखळी त्यामुळे वाहत्या नदी काठच्या गावांना पाणी मिळू लागले आहे . तालुक्यात पावसाळ्यात ५० टि  एमसी पाणी पावसाळ्यामुळे पडते आजपर्यंत हे पाणी वाहून जात होते मात्र आता  किमान त्यातील १० ते १२ टक्के पाणी तालुक्यातील शेतकऱ्याला मिळू लागले आहे जिल्ह्याची तहान आणि विकासाची भूक भागविणारा इथील पाऊस इथली भूमिपुत्राला सुखाचे क्षण देऊ लागला आहे .
निळवंडे , भंडारदरा , हे बहू उद्देशीय प्रकल्प आहे नदीतून वाहणारे पाणी प्रवरेच्या पाणी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती साठी वापरले जाते भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणारा १२ मेगावॅट क्षमतेचा भ . ज. वि . प्रकल्प , रंधा धबधब्याजवळील ३४ मेगावॅट क्षमतेचा कोदणी जलविधुत प्रकल्प आणि निळवंडे धरणाच्या पायथ्याशी ७ मेगावॅट क्षमतेचा निळवंडे जलविधुत प्रकल्प असे ३ जलविधुत प्रकल्प भंडारदऱ्यातून सुटणाऱ्या पाण्यातून ५० ते ५५ मेगावॅट विजेची निर्मिती करतात विजेचा थेट लाभ तालुक्याला होत नसला तरी राज्याच्या विकासात योगदान देण्याचे काम हे प्रकल्प करीत आहे अशाच प्रकारचा २५० मेगावॅट क्षमतेचा घाटघर जलविधुत प्रकल्प अकोले (जिल्हा  नगर )शहापूर (जिल्हा ठाणे )तालुक्याच्या सीमारेषेवर उभा आहे . देशातील अशा प्रकारचा हा सर्वात मोठा प्रकल्प विजेची मागणी जास्त असताना च्या  काळात (पिकअप अवर )विजेची गरज काही प्रमाणात भागविण्याचे काम हा प्रकल्प करतो . वाहणाऱ्या पाण्याबरोबरच तालुक्याच्या डोंगर पठारावरून वाहणारा भन्नाट  वारा हि आता वीज निर्मिती करू लागला आहे . मुख्यतः तालुक्याच्या उत्तर भागातील विश्रामगड , बित्तम गड , डोंगर रंगावरील पठारावर वाऱ्याच्या प्रचंड झोतात भिडणाऱ्या वीजनिर्मिती करणाऱ्या पवन चक्क्या उभ्या राहिल्या आहेत तिरढे , पाच पट्टा ,पवन ऊर्जा प्रकल्प आणि कोंभाळणे खिरविरे पवन ऊर्जा प्रकल्पातून सुमारे १०० मेगावॅट क्षमतेच्या आसपास वीज निर्मिती होत आहे . या तालुक्याच्या नद्यांचे पाणी आणि वाहणारा वारा  वीज निर्मिती द्वारे राज्याच्या विकासाला हातभार लावत आहे . पावसाळ्यात इथे धो धो कोसळणाऱ्या पाऊसाचे आकर्षण असल्याने नाशिक , मुंबई , पुणे , नगर , औरंगाबाद व राज्याबाहेरील लोकांमध्ये वाढू लागल्याने त्यांचे पाय आपोआप घाटघर , भंडारदरा , हरीशचंद्रगड कडे वळतात  दरवर्षी हजारोच्या संख्येने येणाऱ्या या पर्यटकांमुळे पर्यटन  व्यवसायातून रोजगार निर्मिती वाढली आहे त्यामुळे स्थानिक आदिवासी जनतेला रोजगार उपलब्ध झाला आहे पूर्वी फक्त पावसाळ्यात  पर्यटक  येत असत आता या ना त्या कारणाने वर्षभर येत असतात मग कधी कळसुबाई हरीशचंद्रगड , रतनगड , घाटघर ,विश्रामगड , अलगं  , मलंग  , कुलंग गड सारख्या गड किल्ल्यावर भटकायला ट्रेकिंगला कधी कधी पावसाळ्याच्या उंबरठ्यावर काजवे पाहायला पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये फुलणाऱ्या रानफुलांच्या भेटीला तर कधी भक्तिभावाने अगस्ती आश्रमाच्या भेटीला  साम्रद गावाजवळ असणारी एकमेव अद्वितीय अशी सांदणदरी आता मोठी अकृष्ण ठरली आहे . पर्यटकांचे जत्त्येच्या जथे या दरीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात पर्यटकांमुळे भंडारदरा सोबतच धरणाकाठचे गावे हरीशचंद्रगड पायथ्याशी असणारे आंबित पाचनई या सारख्या लहान मोठ्या खेड्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे भंडारदरा शहरातील तारांकित , यश , आनंद अमित , तारांकित तोडीची हॉटेल उभी राहिली आहेत
तालुक्यातील पर्यटनाचे योग्य मार्केटिंग केल्यास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन हा शेती व्यवसाला पूरक जोडधंदा म्हणून रोजगार देणारा व्यवसाय ठरेल . ग्रामीण भागात अर्थकारणाला गती आल्यामुळे तालुक्यात अनेक लहान मोठ्या  पतसंस्था च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती तालुक्यात झाली आहे . विविध बँकाच्या शाखाबरोबरच या पतसंस्थांच्या तालुक्यातील अर्थ कारणात मोठा वाटा आहे . प्रवरा , मुळा , आढळा ,या तिन्ही खोऱयातील तालुक्यातील शेतकरी प्रगतिशील आहेत शेतीचे नवनवीन तंत्र आत्मसात करण्यात येथील शेतकरी आघाडीवर असतो शेती बरोबर शेतकऱ्यांची नवीन पिढी   कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळू लागली आहे आवळ्यावर प्रक्रिया करणारा व्ही पी फूडस असेल किंवा दूध प्रक्रया करून उपपदार्थ करणारा सावंत डेअरी उद्योग असेल अकोले राजूर रस्त्यावर सह्याद्री ओक्सीमोर सह बाटलीबंद पाण्याचे छोटे मोठे प्रकल्प उभे आहेत त्यांच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत खाजगी आणि सहकारी दूध प्रकल्पातुन तालुक्याच्या अर्थकारनातं  मोठा वाटा राहिला आहे . तर तालुक्याच्या पश्चिम भागात पशुपालन हा महत्वाचा शेती पूरक व्यवसाय ठरला आहे प्रगतिशील शेतीमुळे गावोगावी लहान मोठे खते बियाणांचे विक्री केंद्र उभी राहिली आहेत . त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण झाला आहे . शेतीमध्ये होत असणारा रासायनिक खतांचा वापर कीटक नाशके जंतू नासिके या सर्वांचा दुष्परिणाम येथील जाणकारांना जाणवू लागले आहे . त्यातूनच  सेंद्रिय शेतीची चळवळ तालुक्यात हळू हळू आकार घेऊ लागली आहे . यात बायफ या संस्थेचा मोठा वाटा आहे तालुक्यातील उत्तर भागातील खिरविरे , मान्हेरे ,लाडगाव  , परिसरात बायफ मार्फत आदिवासी विकासाचा  मोठा कार्यक्रम राबविला जातो आहे .बायफच्या माध्यमातून कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे या आदिवासी महिलेची बियाणे बँक अनेकांच्या आकर्षणाचा कुतूहलाचा विषय ठरला आहे . परिसरातील अनेक गावरान वांनाच्या संवर्धनाच्या प्रसाराचे कार्य राहीबाई करीत आहे बायफच्या माध्यमातून पारंपरिक भात बियांच्या संवर्धनाचा कार्यक्रम राबिविण्यात येत आहे . एकदरे मानेहेरे सह तीन ठिकाणी बायफने बँक स्थापन केल्या असून त्यातून या परिसरातील काळ भात , आंबे मोहर , रायभोग , जिरवेल , हाळी कोळपी , गरी कोळपी , यासारख्या १४ भात वाणाचे शुद्ध स्वरूपातील बियाणे शेतकऱ्यांना नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे बायफच्या परसबाग प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना पौष्टिक फळे भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे . कुपोषण रोखण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे . लोकपंचायत हि संस्था हि मुळा खोऱ्यात  काळ भात संवर्धनाचे तसेच गावरान बियांनाचे संवर्धनचे काम करीत आहे . या संस्थांच्या प्रयत्नामुळे या परिसरात पुन्हा पारंपरिक बियाणे रुजेल अशी चिन्ह दिसत आहे . शाश्वत शेती विकासाच्या या कार्यक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीवनात स्थायी स्वरूपाचे बदल होणार आहे . शेती , दूध धंदा त्याबरोबरच शिक्षणातही आमूलाग्र बदल झाले असून अकोले एज्युकेशन , अभिनव या शैक्षणिक संस्था त्यासाठी पुढे येत आहे मात्र ७५ वर्षे उलटूनही सत्यनिकेतन संस्था कात टाकत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे .अकोले तालुक्यात शेती विकासाबरोबरच येथील जनतेचा आर्थिक स्थर उंचाविण्यासाठी शासकीय स्थरावर प्रयत्न होत असून जलयुक्त शिवार अभियानातून कायम दुष्काळी भाग असलेल्या कुमशेत , शिरपुंजे , आंबित परिसरात येथील आदिवासी महिला शेतकरी बागायती शेती फुलवू लागल्या आहेत . (शांताराम काळे ) सोबत फोटो भंडारदरा , 
10 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...