Monday, November 20, 2017

शेंडी (भंडारदरा )चे भांगरे घराणे म्हणजे तालुक्यातील अनेकांचे हक्काचे घर परिसरातील आदिवासी बरोबरच सर्व साधारण माणसांबरोबरच सामाजिक शैक्षणिक
राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा हा हक्काचा निवारा. गेली ३ पिढ्यांपासून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या या घराण्याने अतिथी देवो भव 
हा मंत्र मनापासून जपला आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसांपासून उच्च पदास्थानपर्यंत कुणाचेही येथे हसत मुखाने स्वागत होते. हा मंत्र आता तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे येऊ घातला असून अमित अशोक भांगरे या सुशिक्षित व सुसंस्कारित तरुणाने समाजकारणातून उद्योग उभारणी साठी  आगेकूच केली आहे . त्यामुळे  घराण्याण्यातील पुढची पिढी शिकली. अशोक भांगरे यांचा मुलगा अमित नेदरलंडस येथे कृषी
व्यवस्थापन शाखेत उच्च शिक्षण  अभ्यास पूर्ण करून त्याने एमबीए प्रवेश घेतला आहे . तर आपल्या
घराण्याच्या स्वभावाशी सुसंगत 
असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या स्वभावाला अनुकूल असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या म्हणजे हॉटेल व्यवसायात या घराण्याने आता आपले बस्तान बसविले आहे.
शेती आणि पशुपालन हा मूळ व्यवसाय असणाऱ्या भांगरे घराण्याची पुढील पिढी परदेशात उच्च शिक्षण घेण्याइतपत प्रगती  झाली आहे. मागील शतकात अनेक
वर्ष आमदारकी उपभोगणाऱ्या या घराण्याला अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्रात लक्षणीय आमदारकी पुन्हा मिळविता आली नसली तरी तालुक्यातील जनतेच्या
हृदयातील त्यांचे स्थान आजही आढळ आहे. भांगरे मुळचे तालुक्यातील एकदरा या आदिवाशी खेड्यातले बऱ्याच  वर्षापूर्वी हे घराणे भंडारदरा काठच्या शेंडीला येऊन
स्थिरावले. दिवंगत गोपाळराव भांगरे हे तालुक्याचे पहिले आमदार त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुतणे कै.यशवंतराव भांगरे अकोल्याचे ३ वेळा आमदार होते.
आदिवासी समाजातील ज्या घराण्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले त्यात भांगरे घराणे अग्रेसर होते. कै. गोपाळरावाणा  ३ भाऊ त्यातील २ जन शिक्षक होते. शिक्षकी पेशात
असल्यामुळे कै गोपाळ रावांना १९५२ मध्ये आमदारकीची संधी मिळाली. शेती बरोबरच पशु पालन या घराण्याचा मूळ व्यवसाय, काही वर्षापूर्वी शंभर सव्वाशे गायांचा कळप त्यांच्या घरी नांदायचा.
नवीन पिढीने शेतीतील प्रगती बरोबर व्यवसायाची कास धरली. ६० वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे  उपहार गृह त्यांनी चालविण्यास घेतले होते. तसेच शेंडीला हॉटेलही सुरु केले.
शेंडी मधील पहिली पीठ गिरणी आणि भात गिरणी त्यांनी सुरु केली. आता भांगरे घराणे हॉटेल व्यासायात चांगले स्थिरावले आहे. भंडारदरा येथे त्यांची वेगवेगळ्या
दर्जाची ६ हॉटेल्स आहे. तसेच पालघर जिल्ह्यातही पेट्रोलपंप  व हॉटेल आहे.  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सुमारे २५० ते ३०० लोकांना या हॉटेल व्यासायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. २ चुलते
आणि १३ चुलत भावंडाचे हे कुटुंब. आज यातील काही जन नोकरी करतात. हॉटेल व्यासायाचा विस्तार करण्याबरोबरच भंडारदरा जलाशय परिसरात एक आयुर्वेदिक योग
उपचार केंद्र सुरु करण्याचा त्यांचा मनोदय आहे. आतिथ्य शीलता हा गुणधर्म ह्या घराण्याने ३ पिढ्यांपासून जपला आहे. घरी आलेल्या पाहुण्याचे नेहमी स्वागत केले जाते.
सर्वच पक्षांच्या तालुक्यातील छोटया मोठ्या कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी, विवीध अधिकार्यांनी याचा अनुभव घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पासून आजच्या
पिढीतील तेजस ठाकरेपर्यंत अनेकांचे आदरतिथ्य भांगरे कुटुंबांनी केले आहे. या घराण्याचा आदर तिथ्याचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. कै. यशवंतराव भांगरे 
आमदारकीच्या निवडणुकीला उभे होते. आजच्या सारखी साधने नसल्यामुळे विरोधी कार्यकर्ते सायकलवरून गावगावीप्रचार करत. शेंडी परिसरात विरोधी कार्यकर्त्यांचा 
प्रचार करणारा असाच एक जत्था  यशवंतराव भांगरे यांना भेटला. या विरोधी कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. व रात्री त्यांच्या जेवण्याची सोय स्वतःच्या घरी केली. 
हि परंपरा आजही कायम आहे. यामुळे भंडारदराला येणारे विर्रोधी पक्षांचे लहानमोठे कार्यकर्ते हक्काने भांगरे यांच्या घरी येतात. भंडारदरयात आत्ता आनंदवन, यश,रिसोर्ट
सारखी भांगरे यांच्या मालकीची हॉटेल्स आहेत. मात्र तेथे उतरणारी विवीध शासकीय अधिकारी, आमदार ,मंत्री, हे बऱ्याच वेळा भांगरे यांच्या घराच्या जेवणाचा आस्वाद
घेण्यास पसंत करतात. सध्याच्या पिढीतील अशोकराव भांगरे जि.प.चे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे ह्या विद्यमान जिप सदस्य आहे. त्यांचा
भाऊ दिलीप भांगरे पंचायत समिती सदस्य आहे. या आदिवासी भागातील विविध सामाजिक, संस्कुतिक, शैक्षणिक तसेच कौटुंबिक अडचणी सोडवण्यास सक्रीय पुढे असतो.
राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे. त्यामुळे ३ पिढ्यांपासून अनेकांना भांगरे यांचे घर हे आपले घर वाटत आहे. अशोक भांगरे यांचे चुलते पांडुरंग बाबा हेच कुटुंबातील सर्व निर्णय घेतात त्यांचे कुटुंबात सुमारे ५०० माणसे जोडली असून.दोन चुलते ,सहा चुलत्या ,तेरा चुलत भावंडे ,२३ चुलत बहिणी या शिवाय आते मामे भावंडे असा हा मोठा गोतावळा . ठिकठिकाणी सध्या विखुरलेले असले तरी दिवाळी सारख्या सणांच्या निमित्ताने हि सर्व भावंडे आवर्जून एकत्र येतात . घराचे गोकुळ बनून जाते. वर्षा दोन वर्षातून तीन चार जणांचे विवाह असतात त्यामुळे भंडारदऱ्याच्या   गार्डन मध्ये साजरा होणारा भांगरे घराण्यातील विवाह सोहळा हा एक प्रकारे सामुदायिक विवाह सोहळाच असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक जमा होतात त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधांना उजाळा मिळतो. नवीन बदलांना सामोरे जात असतांना आधुनिकतेची कास धरतांना या घराण्याने आपल्या सांस्कृतिक प्रथा परंपरा हि आत्मीयतेने जपल्या आहेत. दिवाळी , सण  वार , लग्न समारंभ यावेळी सर्वजण एकत्र येतात तेव्हा त्यांचे घर गोकुळासारखे वाटते . अशोक भांगरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , समाज कल्याण सभापती व ६ वेळा आमदारकीला उभे राहून पराभूत होऊनही आजही हा राग कुणावरही न काढता आपले काही चुकले असेल या भावनेतून आजही समाज प्रवाहात टिकून आहे . राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे त्यामुळे तीन पिढ्यांपासून अनेकांना भांगरे आपल्या घरातील वाटत आहे गावागावात आजही त्यांचा कार्यकर्ता त्यांची वाट पाहत असतो - त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत व संस्काराचा वारसा संवर्धन करीत अमित यानेही समाजिक बांधिलकी जपली आहेसमाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी आजच्या आधुनिक युगात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समीकरणे बदलले आहेत. पुरोगामीची जागा आधुनिकीकरणाने काबीज केली आहे. सामाजिक व राजकीय नेत्यांनी आणि कार्यकत्र्यांनी पूरोगामी विचारांची नाळ सोडून आधूनिकीकरणाशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे समाजकारणा पासून आपले बहुसंख्ये नेते दुरावले आणि राजकारणाशी जोडले गेले परिणामी राजकारण्यांवरिल सामाजिक विश्वास ढळू लागला आहे. हे लक्षात घेवून समाजकारण आणि राजकारण यांचा समन्वय साधून भा.ज.पा. चे जेष्ट नेते अशोक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत समाजमनाच्या -हदयात प्रेमाची इमारत उभा करण्याचे निखळ काम अमित अशोकराव भांगरे हे उमदे युवा नेतृत्व करत आहेत या कार्यशैलीमुळेच आपली समाजकारणात आणि राजकारणात यशाचे एक पाऊल पुढे टाकत दमदार वाटचाल करित आहेत. सोबत फोटो

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...