Sunday, April 15, 2018

खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा हुशार,

राजूर  ,ता.६: --खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा हुशार, होतकरु मुलगा. पाचवीच्या  परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणार हि जिद्द मनाशी बाळगून उत्तीर्ण झाल्यावर भविष्याची स्वप्न रंगवत पुढच्या शिक्षणासाठी प्रवास करणारा किरण भाऊसाहेब शेळके या विधार्थ्याची  अचानक दृष्टी  गेली यापूर्वी त्याला ऐकू येत नव्हते त्याचे वडील भाऊसाहेब शेळके यांनी मजुरी करून पुणे येथे जाऊन त्याच्यावर औषोधोपचार केले मात्र ऐकायला थोडे येऊ लागताच त्याची दृष्टी गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे . दिसत नसल्याने त्याने शाळेत  येणेही बंद केले आहे .
याबाबत समजते कि , अकोले तालुक्यातील भोजदरी येथील भाऊसाहेब कृष्ण शेळके हे शेतकरी आपल्या तीन मुली पत्नी , वडील व एकुलता एक मुलगा किरण शेळके याचे समवेत राहतात चौथी इयत्तेत शिकत असताना किरणला बहिरेपणा आला त्यामुळे हे कुटुंब दुखी झाले . भाऊसाहेबाने त्याच्या औषोधोपचारासाठी मजुरी करून ५ हजार जमविले व पुणे येथील भारती हॉस्पिटल मध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले त्याला त्यामुळे थोडे ऐकू येऊ लागले . मग राजूर येथे त्याला समर्थ माध्यमिक विधालयात ५वित टाकून त्याचा अभ्यास सुरु झाला . त्याला शाळेने श्रवण यंत्रही दिले मात्र .हुशार व चुणचुणीत हा विधार्थी परीक्षा सुरु झाली नि त्याला अंधत्व आले . शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक यांनी त्याच्या या संकटावर मात  करण्यासाठी किरण त्याच्या वडिलांना धीर दिला आहे . लवकरच मोठ्या दवाखान्यात त्याला न्यावे लागणार याबाबत नगर येथील डॉ . सौ . सुधा  कांकरिया व डॉ तात्याराव लहाने याना भेटून मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतला जाईल मात्र किरण ला सहानुभूतीची नाही तर प्रेमाची, आपुलकीची गरज आहे . दानशूरांनी या कामासाठी उपचारासाठी मदत करावी असे आव्हानही करण्यात आले आहे . कोट - भाऊसाहेब शेळके (वडील ) मला तीन मुली व एकुलता एक मुलगा आहे तो फार हुशार आहे अगोदर त्याला बहिरेपणा आला मी मजुरी करून त्याच्यावर उपचार केले त्याला दिसावे म्हणून मी माझी शेती विकण्यास तयार आहे मात्र त्याला योग्य उपचार होऊन त्याला पूर्ववत दिसावे हि परमेशवरी प्रार्थना .. असे म्हणत ते भावनिक झाले त्यांना अश्रूही आवरता आले नाही . सोबत फोटो  किरण व त्याचे वडील भाऊसाहेब शेळके  

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...