Saturday, June 16, 2018

भूमातेचे आरोग्य जपले तरच जमीन आपले आरोग्य अबादीत ठेवील. 
                      डॉ. अनील दुरगुडे. 
अकोले     प्रतिनिधी. 
भूमाता मानवालाच नव्हे तर ९५ टक्के जीवांना अन्न पुरविण्याचे महान काम करते पण ,जमिनीचे आरोग्य आपण अति रासायनिक खते व विषयी औषधे वापरून खराब केले आहे.  तिच्या पासून मिळणारे अन्नधान्य घातक तयार होऊन ,आज जीवांचे आरोग्य धोकादायक बणले आहे. तेव्हा वेळीच जागे होऊन ,.प्रथम भूमातेचे आरोग्य जपा तरच जमीन आपले आरोग्य अबादीत ठेवील. निसर्गाच्या विरोधात जाऊ नका .आरोग्यवर्धक शेती  करण्यासाठी ,जशी पंढरीच्या पांडुरंगची वारी करता तशी कृषि विद्यापीठाची वारी सदैव करा असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृदशास्रज्ञ डॉ. अनील दुरगुडे यांनी ,अकोले येथील ,जमीन सुपीकता व खत साक्षरता मार्गदर्शन शिबिरात शेतकऱ्यांना केले. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा आत्मा संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे होते. 
व्यासपीठावर डॉ. दशरथ बंगाळ ,तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी,कृषि मंडळ अधिकारी विठ्ठल बांबळे ,आत्मा तंत्रज्ञ बाळनाथ सोनवणे, सेंद्रिय गट अध्यक्ष संपतराव वाकचौरे, सचिव बबनराव शेटे , अगस्ती साखर कारखाना माजी संचालक  भाऊराव खरात आत्मा संचालक सुभाष वाकचौरे .व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, अकोले तालुका कृषि विभाग व अगस्ती परिसर सेंद्रिय शेती माल उत्पादक गट अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. 
                  डॉ. दुरगुडे पुढे म्हणाले की, जमिनीची सुपिकता वाढविण्याकामी जीवाणुंचे काम खुप महत्त्वपूर्ण आहे. एक ग्राम वजणाच्या मातीत कोट्यावधी जीवांणू असतात. ते खतांचे रुपांत्तर अन्नरसात करुन पिकांना अन्न पुरवितात .पिक डायरेक खत खात नाही .तेव्हा जीवांणू  संपले तर खते निरुपयोगी ठरतात. रासायनिक खते व विषारी किटक नाशके जीवांणू मारण्याचेच काम करतात परिणामी भूमाता मृत ह़ोऊन ,पिक उत्पन्न घटते आणि खर्च वाढला आहे. .भूमातेची सुपिकता नष्ट करुन ,आपणच नाना आजार वोढवून घेतले आहे. 
या समश्येची जाणीव जानकारांना झाल्यामुळे सेंदिय शेती चळवळ उभी राहिली आहे. आपण याचा वेळीच विचार करुन शास्रीय पद्धतीने शेती करा तरच तराल इशारा दिला. 
हे अधिक पटवून देण्यासाठी सांगितले की ,मानसाचे शरीर वात, कप, व पित्त या तीन वृत्तीचे असते तसेच जमीन सामू, क्षार, व चुनखडी या तीन वृत्तीची असते . तेव्हा पत्येक जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून त्या प्रमाणे संतूलीत खत, पाणी व औषधोपचार करून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवा. असा मुलमंत्र सांगितला , जमीन आरोग्य, खत ,पाणी व अन्य व्यवस्थापणाचे सखोल मार्गदर्शन करुन ,शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली.  अध्यक्षीय भाषणात श्री ब-हाटे म्हणाले की प्रत्येक शेतक-यांनी शेतीचे आरोग्य सुधारण्याचे काम करावे .भविष्यात नोकरी नाही शेतीच करावी लागणार असल्याने ,कमी खर्च करुन जास्त उत्पादन घेतल्याशिवाय पर्याय नाही. सेंदिय शेती करा विष मुक्त.अन्न घाऊन आरोग्य संपन्न बणा असे आवाहन करुन शेतक-यांशी  प्रश्नोत्तर करुन चर्चेतून सुसंवाद साधून सविस्तर मार्गदर्शन केले. 
तसेच डॉ. दशरथ बंगाळ यांनीही मार्गदर्शन केले. 
  या कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक अशोक धुमाळ, बी. एन. वाकचौरे, कृषि सहाय्यक स्वप्नील बुळे, शेतकरी मित्र विकास आरोटे, सुनील वाकचौरे, रोहिदास ढगे,बाळू वाजे, गंगाराम धिदंळे, शेतकरी सखाराम पोखरकर, रामनाथ आवारी ,दत्तू वाकचौरे, रामलाल हासे, बाळासाहेब देशमुख, पुंजीराम वाकचौरे, भागवत वाकचौरे, बादशाह नवले, छायाताई कोटकर, महेश वाकचौरे, शिवाजी आवारी, भरत बंगाळ, धोंडीबा वाकचौरे, असे तालुक्यातील बहसंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक संपतराव वाकचौरे यांनी केले , सुत्रसंचालन बाळनाथ सोनवणे यांनी केले व शेवटी आभार भाऊ खरात यांनी माणले. 
 सोबत छायाचित्रे पाठवले आहे. 

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...