Tuesday, October 4, 2022

गायकर, लहामटे,भांगरे यांची खोटी सहानु भूती.. संभुराजे नेहे..

गायकर साहेब आणि भांगरे साहेबांची आज अकोले तालुक्याची शिखर संस्था असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवड झाली .

या निवडीबद्दल पत्रकार मित्रांनी वरील दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली व त्यांनतर पिचड साहेबांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली का अशी विचारणा केली.. खरं तर प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे भांगरे साहेबांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतु ही सारवासारव करण्याच्या नादात इतके ज्येष्ठ नेते चक्क खोटे बोलतील अशी आजिबात अपेक्षा नव्हती... परंतु समोरून अनपेक्षित पने आलेल्या प्रश्नाला काहीतरी थातूरमातूर उत्तर देणे गरजेचे होते त्यामुळे भांगरे साहेबांनी ते नेहेंच्या संपर्कात असून पिचड साहेबांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत अशी लोनकढी थाप मारली.. होय थापच मारली...

भांगरे साहेबांनी इतर कोणाचे नाव घेतले असते तर मी कदाचित मान्यही केले असते परंतु पिचड साहेबांना मुंबईला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेबरोबर नेहे आडनाव असणारा मी एकमेव व्यक्ती होतो व मला भांगरे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही हे मी आदरणीय पिचड साहेबांचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून अतिशय जबाबदारीने सांगतो.. 

खर तर राजकारणात विचारसरणी वेगळी असली तरी वैयक्तिक आयुष्यात एकमेकाच्या दुःखात सहभागी होण्याची अकोले तालुक्याची राजकीय परंपरा राहिलेली आहे.. भांगरे साहेब कॅमेऱ्यासमोर खोटे बोललेच परंतु कालपासून आम्ही बघतोय की इतरही पिचड साहेबांच्या जीवावर मोठे झालेले अनेक लोक सत्तेच्या तसेच विजयाच्या उन्मादात आज पिचड साहेब आजारी असताना या वाईट काळात साधी त्यांची विचारपू्स करायला देखील तयार नाहीत.. 

असो निवडणुका येतील जातील.. जय पराजयाचा खेळ सुरू राहील... परंतु आज विजयाच्या उन्मादात असणाऱ्या प्रत्येकाने एक लक्षात ठेवावे की इतर कुठे नाही झाला तरी देवाच्या दरबारात सगळ्या प्रश्नांची उत्तर नक्की द्यावी लागणार आहेत.
  🙏शंभु गणपतराव नेहे 🙏

वन्यजीवांचीही आबाळ

Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...