Sunday, April 7, 2024

गंगाराम धिंदळे

अकोले,ता.७: मूळा नदी वर केटी वेयर बंधारे,शेततळे झाल्याने शेतीला पाणी उपलब्ध असून शेतकरी आपल्या शेतात पारंपरिक पीक घेण्याऐवजी नवनवीन फळ लागवड करत आहेत.तर नव्याने तरुण शेतकरी शेती करण्यास सरसावले असून मेहनतीच्या जोरावर अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील धामणवण येथील आदिवासी शेतकरी शांताराम बारामते,व त्यांच्या पत्नी गिरजाबाई यांनी शेडनेट शेतीत शेततळ्यातील पाण्यावर कलिंगडाची बाग उभी केली आहे. तर शिरपुंजे येथील गंगाराम धिंदळे व त्यांची पत्नी पूजा गंगाराम धिंदळे यांनी पारंपारिक भात शेती बरोबरच स्ट्रॉबेरी ,फळलागवड,भाजी पाला सह मत्स्य शेती व पर्यटन शेती करून शेती विकासाची गुढी उभारली आहे . चार हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शांताराम बारामते यांनी सहा वर्षां पूर्वी शेतीची मशागत करत काही क्षेत्राचा अपवाद वगळता उरलेले क्षेत्र पिकाखाली आणले. त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेताच्या वरील बाजूला ६० बाय ३० मीटरचे सुमारे साडे चार लाख लिटर हून अधिक क्षमतेचे शेत तळे तयार केले. पावसाळ्यात आपल्या विहिरीं मधील पाण्यातून ते हे शेत तळे भरुन घेतात. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत त्यांनी बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर टाकून ड्रीपच्या साह्याने विविध भाजीपाल्याची पिके ते घेऊ लागले आहेत . चौकट: कृषी विभागाच्या माध्यमातून पारंपारिक शेतीला फाटा देत पिके घेवू लागले. रब्बी आणि उन्हाळी हंगामात भाजीपाल्याची पिके घेत असतो.कृषी विभागाने दिलेल्या अनुदानातून शेडनेट उभे केले आहे. यात पावसाळा संपला की कलिंगडाचे पीक घेत आहे.सरासरी १७ ते १८ टन उत्पन्न मिळते.या वर्षी साडे चार हजार रोपे लावली असून ती साठ दिवसांची झाली असून फळे लगडली आहेत.उद्यापासून कलिंगडाची विक्री सुरू होईल. यामध्ये किमान दोन लाखाचा फायदा होईल असे शांताराम बारामते यांचे म्हणणे आहे . कोट..शांताराम बारामते, ( शेतकरी)धामणवन आमचे गिऱ्हाईक थेट विक्री व रस्त्यावरच असते त्यामुळे ताजी कलिंगडे त्यांना दिली जातात. चाळीस रुपयां पासून शंभर रुपये भाव मिळतो . या वर्षीही दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न यातून मिळणार आहे.या बरोबरच इतर शेतात काकडी, ढोबळी मिरची व फरशी ची लागवड केली आहे.पत्नीची मोलाची साथ मिळते.उन्हाळयात जसजसे विहिरींचे पाणी कमी होत जाते तसतसे शेत तळ्यातील पाणी वापरत असतो. सर्व क्षेत्रात ड्रिप केल्यामुळे पाणी कमी पडत नाही. गांडुळ खत आणि जिवामृताचा वापर करत सेंद्रीय पध्दतीने शेती करत आहे. कोट.गिरजाबाई बारामते (शेतकरी महिला)आमच्या शेतात दिवसरात्र कष्ट करून आम्ही शेतीचा पोत सुधारवला आहे.. शेत तळे झाल्याने पिकांना पाणी मुबलक मिळते त्यामुळे आम्ही कलिंगड लागवड केली असून या फळ लागवडीतून आमचे आर्थिक उत्पन्न सुधारले आहे .कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे पिकांची वाढ होण्यासाठी आम्ही विविध प्रयोग केले त्यातून आमच्या शेतीत भात पीकसोबतच भाजीपाला ,फळ लागवड यशस्वी झाल्याने आमचे आर्थिक उत्पन्न सुधारले.. कोट: आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नविन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि भरघोस उत्पन्न मिळवावे या साठी आम्ही नेहमीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. शांताराम बारामते,गंगाराम धिंदळे यांनी सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करत आपली शेती उभी केली आहे.कृषी विभागाच्या बहुतांशी योजनांचा लाभ त्यांना दिला आहे. ते आपल्या शेतात राबवत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा आदर्श घेवून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिके घ्यावीत.बारामते यांच्या कार्याची दखल घेत त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे.तर गंगाराम धिंदळे यांना देखील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त आहे. अशोक साळी, अकोले तालुका कृषी अधिकारी - –---------------–----------------†****** स्वतःच्या शेतातून स्वतःच बनला उद्योजक... शेतकरी गंगाराम धिंदळे यांना शिरपुंजे गावात वडिलोपार्जित १८एकर शेती मात्र सर्व खडकाळ शिक्षण बी.कॉम .बीएड नोकरी लागली मात्र त्यांचे मन नोकरीत रमले नाही.त्यांनी आपल्या पत्नी पूजा यांना सोबत घेऊन आपली पारंपारिक शेतीत लक्ष्य घातले शेती खडकाळ माळरान,कोरडवाहू कुसळे सोडून तिथे काही पिकत नव्हते.आदिवासी विकास विभागाकडून त्यांना ऑइल इंजिन मिळाले त्यांनी आपल्या जमिनीचा पोत सुधारवला रात्रंदिवस पती पत्नी यांनी शेतीत वर्षभर राबून प्रथम बटाट्याचे उत्पादन घेणारा शिरपुंजे गावातील पहिला शेतकरी म्हणून ओळख निर्माण केलीनंतर भात शेतीत चारसूत्री भात लागवड ,एस.आर.टी पद्धत,श्री( स्त्री)पद्धत भात लागवड,मल्चिंग पद्धतीने टोकन करून भात लागवडकरून भात क्षेत्रात दीड पट उत्पादन घेऊनबाजारपेठेत स्वतः विक्री शेतकरी ते ग्राहक विक्री करून बाजारपेठ निर्माण केली परदेशात देखील त्यांचा तांदूळ विकला जात आहे. पाण्याची उपलबद्धता ..देव हंडी जलाशयातून पाईपलाईन द्वारे पाणी उचलून आपल्या शेततळ्यात आणून तसेच विहीर खोदून त्या पाण्याचा नियोजनबद्ध ठिबक सिंचन द्वारे शेतीला पाणी देऊन आठ माही पिके घेण्यात गंगाराम धिंदळे यशस्वी ठरले जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून घेतली त्यानुसार बागायती शेतीस सुरुवात केली.बांधावर गिरीपुष्पाची लागवड करून सेंद्रिय कब्र वाढवणे सोबत सेंद्रिय उत्पादने खते स्वतः निर्माण केली आहेत. गांडूळ खत,जीवामृत,दशपर्णी अर्क,गांडूळ पाणी,लसूण अर्क,मिर्ची अर्क,स्वतः निर्माण करून स्वतः वापर करतात व त्यानुसार शेतीत वेगवेगळी उत्पादणे घेत आहे.२०११ला शेततळे निर्माण केले त्यासाठी कृषिविभाग राष्ट्रीयफळ उद्यान अभियांनातर्गत ३४बाय ३४मिटरचे सामुदायिक शेततळे त्यांना मिळाले त्यानुसार शेततळ्यात मच्छी उत्पादन घेतल्याने त्यांचा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला.२हजार मच्छ बीज सोडून१लाख ५०हजार उत्पादन मिळाले २०१३- १४ मध्ये शेडनेट हाऊस निर्माण केले त्यामध्ये काकडी,ढोबळी मिरचीची लागवड करून शाश्वत शेती या योजनेचे मार्गदर्शन मिळाले त्याच बरोबर शेंद्रिय शेती बचत गटाची निर्मिती ५०शेतकरी एकत्र करून सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करून इतर शेतकरी स्वावलंबी करून उत्पादन ते विक्री पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना देऊन स्वतःचे उत्पादन वाढीवले सोबत इतर शेतकऱ्यांचा माल एकत्र करून धान्य बाजार,प्रदर्शन,कृषिविभाग,आकाशवाणी,दूरदर्शन यांच्या माध्यमातून बाजारपेठ तयार केली.सेंद्रिय उत्पादन बयोसट कंपनीचे पी.जी.एस.सर्टिफिकेशन त्यांना मिळाले त्यानुसार सेंद्रिय पद्धतीने तांदूळ,नाचणी, खुरासनी,बरोबरच अधिक उत्पन्न देणारे स्ट्रॉबेरी,काकडी,कलिंगड,अशी उत्पादने शेतकरी गंगाराम धिंदळे घेत आहेत.महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सर्वच प्रकारच्या सेंद्रिय उत्पादने पोहचविण्याचे काम करत आहेत. आर्थिक उत्पन्न शेतीतून पूर्वी जेमतेम लाखभर रुपये मिळत असे मात्र गतवर्षी दहा लाख रुपयांचा तांदूळ विकला त्यातून निव्वळ नफा अडीच लाख रुपये मिळाले,स्ट्रॉबेरी मधून एक लाख तर काकडीतून ७५हजार,परदेशात दोन हजार किलो तांदूळ गेला त्यातून दीड लाख मिळाले असे किमान सात लाख रुपये खर्च जाऊन मिळत असल्याचे गंगाराम धिंदळे यांनी सांगितले २०२२मध्ये यु ट्यूब व फेसबुकवरून इंदापूर पुणे येथील मार्केटिंग कंपनी टू ब्रदर्स यांनी या शेतकऱ्याचा शोध घेतलाव शेतावर येऊ न भेट दिली. वर्षभरात जी सेंद्रीय उत्पादने घेतली जातात त्यांची माहिती घेऊन नाचणी,तांदूळ,हातसडीचा इंद्रायणी तांदूळ,काळभात, खडक्या,सह्याद्री स्पेशल,खुरासनी खरेदी करू लागले अगोदर आठ दिवस पैसे पाठवून शेतकऱ्याचा माल खरेदी केला जातो.त्यामुळे प्रत्येक महिन्याला आदिवासी भागातून १५००ते२०००किलो माल हा परदेशात जातो.अमेरिकेतील दोन महिला शेतकरी गंगाराम धिंदळे यांच्या शेतीवर येऊन मालाची प्रतवारी तपासली गंगाराम धिंदळे (शेतकरी,शिरपुंजे)गेली १२वर्षे म्हणजे एक तपापासून मी शेती व्यवसाय करतो खडकाळ ,कोरड वाहू जमिनीचा पोत सुधारून पाण्याची उपलब्धता करून सेंद्रिय शेतीची कास धरून भात शेती,भाजीपाला,फळ लागवड,मच्छ बीज,स्ट्रॉबेरी ,कलिंगड लागवड करून माझे आर्थिक उत्पन्न मी वाढवले आहे .माझेकडे ट्रेकटर,गाडी,चांगले घर,व साठवणुकीसाठी गोडाऊन आहे .शेतीकांमासाठी माझे आई वडील भाऊ ,पत्नी पूजा,मुले मला मदत करतात २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला .माझे शेतीचे क्षेत्र वाढले असून दरवर्षी उत्पन्नात वाढ होते. पूजा धिंदळे (शेतकरी)आमची शेती म्हणजे खडकाळ होती मात्र माझे पती गंगाराम यांनी जिद्द व चिकाटीने या शेतीचा चेहरा मोहरा बदलविला आहे आज आमची शेती म्हणजे कृषी नंदनवन बनले आहे .आमच्या शेतात जसे खरेदीदार येतात तसेच शेती पाहण्यासाठी पर्यटक येतात त्यांची निवासाची जेवणाची सोय फिरण्यासाठी बैलगाडीची सोय आम्ही करतो त्यातून आम्हाला आर्थिक उत्पन्न मिळते १८एकर क्षेत्र २०एकर झाल्याचे आम्हाला समाधान आहे .झोपडीवजा घर होते त्याचे रूपांतर बंगल्यात झाले आहे तर जाण्या येण्यासाठी मोटरसायकल आहे .शेतीसाठी ट्रेकटर यांत्रिकी साहित्य आहे . फोटो

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...