Friday, February 24, 2017

राजूर , ता . २४: अकोले तालुक्यामध्ये रतनवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अम्रुतेश्वर या शिवलिंगाची यात्रा सपन्न झाली . अकोले तालुक्यातील जवळजवळ विस हजार भाविकांनी शिवरात्रीच्या मुहुर्तावर दर्शनाचा लाभ घेतला .तर हरीशचंद्र गडावर सुमारे १० हजार भाविकांना संगमनेर येथील श्री शिवशम्भो सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी फराळाचे वाटप केले आज ही रतनवाडी येथे महाशिवरात्रीनिमित्त रतनवाडी येथेसकाळी भाजपचे जेष्ठ नेते अशोक भांगरे व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ . सुनीता भांगरे यांनी अभिषेक करून पूजन केले यावेळी भाविकांचा महापुर लोटला होता . या यात्रेसाठी रतनवाडी येथे जाण्यासाठी तरुणवर्गाचे मोटारसायकलचेच प्रमाण अधिक जाणवले . ही यात्रा आदिवासी भागातील सर्वात मोठी यात्रा असल्या कारणाने आदिवासी बांधवांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती . लहान बालकासांठी खेळणीची दुकाने व मिठाईवाल्यांची दुकाने ही सजलेली आढळुन आली . या शिवालयावर भाविकांची श्रद्धा असल्यामुळे शाबुदाना , बटाटा , खजुर अशा पद्धतीचे गुप्त दान हे दरवर्षी भाविक देत असतात . त्यामुळे यात्रा कमिटीने भक्तासाठी उपवासाच्या प्रसादाचे आयोजन केलेले होते . यात्रेनिमित्त सासुरवासिन असलेल्या स्रियांचा बांगड्या भरण्यावर भर होता . . रतनवाडी या ठिकाणी यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी हंगामा आयोजित करण्यात आला होता . नामवंत पैलवानांची उपस्थिती हे या फडाचे वैशिष्ट ठरले . या यात्रेसाठी राजुर पोलिसस्टेशनचे अधिकारी भरत जाधव यांच्या अधिकाराखाली सहाय्यक फौजदार परदेशी व होमगार्ड यांनी सुरक्षेयंत्रणेत कोणतीही चुक होणार नाही याची अतिशय चांगली काळजी घेतली . हि यात्रा पार पाडण्यासाठी रतनवाडी येथील सरपंच , उपसरपंच व गावकर्यांनी फार महत्वाची भुमिका बजावली .हारिसचंद्र गडावर हजारो भाविक उपस्थित होते यावेळी तारूंची संख्या अधिक होती चौकट -- गेली अठरा वर्षांपासून संगमनेर येथील शिवशंभो सेवा भावी संस्था अंतर्गत सह्याद्री ट्रेकर्स या कार्यकर्त्यांनी महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी व केळी वाटप कार्यक्रम आयोजित केला होता हे त्यांचे १८ वर्ष असून अन्नदानाचे पवित्र काम ते अविरतपणे करीत आहेत . दानशूर व्यक्तीच्या मदतीने महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून साबुदाणा , बटाटा , शेंगदाणे व केळी असे प्रत्येकी दहा पोटी गडावर नेऊन गडावर पहाटे पासून आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते . यावेळी गडावर जाणारे कोथळे व पाचनई रस्ते गर्दीने फुलून गेले होते . संगमनेर येथील आचारी लक्ष्मण बर्गे हे विनामूल्य शेंगदाणे भाजून व खिचडी बनवून देतात गेली १८ वर्षांपासून ते गडावर येतात तसेच शाम तिवारी , राजा वरात , श्रीकांत कासट , , सुनील मदास , अध्यक्ष सत्यविजय आदभाई , महेश मुळे ,सुनील ,पुंड नंदकिशोर कान काटे ,जालिंदर पानसरे आदींनी विशेष परिश्रम घेतले ) सोबत फोटो rju 24p,5,6,7रतनवाडी येथे नवसाला पावणारा दगड काढताना भाविक तर मंदिरात दर्शनासाठी व सणांसाठी जमलेली गर्दी




No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...