राजूर
(वार्ताहर) अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचे व जमिन खचण्
याच्या घटना घडल्या,. त्या अनुषंगाने दरडी कोसळण्याची कारणे शोधून त्यावर
उपाय योजना सुचविणे, त्याचप्रमाणे आवश्यकता असल्यास तेथील लोकवस्तीच्या
पुनर्वसनाबाबत ठोस शिफारशी करणे गरजेचे असून तालुक्यातील पेठेवाडी , आंबित ,
रतनवाडी , पाचनई , फोफसंडी या ठिकाणी पावसाळ्यात सतत दरडी कोसळून त्या
ठिकाणी अनेक घरे उध्वस्त होतात मात्र दरवर्षी प्रशासन तात्पुरती मलमपट्टी
करून वेळ निभावून नेते .
गतवर्षी आंबित या ठिकाणी पाटीलवाडी येथे जमिनीला मोठ्या भेगा पडून तेथील जमीन सरकली पेठेवाडी येथील डोंगरच खाली घसरत येऊन घरावर कोसळले त्यामुळे ८ आदिवासी कुटुंबे बेघर झाली शासनाने त्यावर तातडीने उपाय म्हणून आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेट मधून ताडपत्र्या देऊन तसेच शिरपुंजे आश्रमशाळेत त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करून वेळ मारून नेली मात्र आजही हे आदिवासी कुटुंब आपल्या जुन्या जागेतच राहत आहेत . पेठेवाडी गावातील ८ कुटुंबाना संगमनेर , नगर येथील सामाजिक संघटना व संस्थेने निधी जमा करून त्यांना नवीन घरे बांधण्यासाठी मदत केली मात्र आजही हि माणसे त्याच डोंगराच्या खाली मुले बाळे व जनावरे घेऊन राहत आहेत . उद्या माळीणसारखी दुर्घटना होण्याचीही शक्यता मात्र प्रशासन याबाबीकडे गांभीर्याने नसल्याचे दिसून येत आहे . पालकमंत्री यांनी आंबित गावचे पुनर्वसन करू त्यांना पर्यायी जागा देऊन कायमस्वरूपी त्यांचा मार्गी लावू असे सांगतानाच भूगर्भ तज्ज्ञांचे पथक पाठवून त्यांचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले मात्र याबाबत तज्ज्ञांचा अहवाल या गरीब आदिवासी लोकांपर्यंत पोहचला नसल्याचे तेथील सरपंच साहेबराव भारमल यांनी सांगितले .
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेेक्षण विभागाच्या पथकाने दिलेल्या भेटीअंती सादर केलेल्या प्राथमिक निष्कर्ष अहवालात निसर्ग निर्मित कारणे मुख्यत्वे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने जवळपासच्या गावांचा सखोल अभ्यास करण्याची गरज अत्यावश्यक आहे. मात्र याबाबत प्रशासनाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही , अकोले तालुक्यातील फोफसंडी , पेठेवाडी , पाचनई , रतनवाडी डोंगराच्या पोटाशी अनेक वाद्या वस्त्या स्थिरावल्या असून डोंगरावरच तुकड्या तुकड्याची शेती करून त्या जमिनी सपाट करून आदिवासी राहतात या भागात १५ इंचापर्यंत पाऊस पडतो त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात डोंगरावरील झाडे , दगडे घरंगळत खाली येतात व त्यातून मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत . पाऊस इतका पडतो कि , माणसे घराबाहेरही पडू शकत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्सखलन झाल्यास माळीणसारखी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यासाठी प्रशासनाने या भागातील गावांचा वाड्या वस्त्यांचा सर्व्हे करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे . तर घटना घडल्यानंतर तलाठी , ग्रामसेवक , कृषीसहाय्क आपत्ती व्यवस्थापनच्या नावाखाली पंचनामे व मदत करण्यासाठी मदत करण्या ऐवजी अगोदरच या घरातील व्यक्तींना पर्यायी व्यवस्था करून दिल्यास येणाऱ्या दुर्घटनांवर कायमस्वरूपी मात करता येईल .
माळीण दुर्घटना झाल्यामुळे आदिवासी वाडी वस्तीतील लोक भयभीत असले तरी पर्याय नसल्याने व शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने आजही आदिवासी लोक डोंगराखाली असलेले आपली घरे दुरुस्तीच्या मागे लागली आहेत तर जनावरांसाठी पडव्या बांधून पावसाळ्याची सोया करताना दिसत आहे . मात्र
भूस्खलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी मानव निर्मित कारणांमुळे भूस्खलन होत राहते. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या संधी, भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. विशेषत: अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये, खडकातील संधी - भेगा - फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशाप्रकारच्या संधी - भेगा - फटी विस्तारित होवून खडकांचे तुकडे अलग होवू लागतात. अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जावून खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे असे म्हणतात.
भूशास्त्रीय दृष्टीकोनातून जांभा खडकाचे (लॅटराईट) व्याप्त प्रदेशात अतिवृष्टीमुळे, खडकांची झीज होवून तसेच विघटन प्रक्रियेमुळे तयार झालेली जांभा खडकाची माती चिगट होते. अशा प्रकारची माती चिगड व निसरडी असल्याने, उतारावरील घरांच्या बांधकामाच्या वजनाने खचते व घसरत राहते. त्यामुळे चिबड मातीने व्याप्त प्रदेशातील घरे, जमीन खचल्याने कोसळतात आणि म्हणूनच जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका राहतो. याशिवाय मानवनिर्मित कारणांमध्ये उतारी भूभागाचे शेतीसाठी सपाटीकरण करणे, तसेच रस्ते बांधणे व त्यांचे रूंदीकरण करणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामुळे अतिपर्जन्यमानाचे कालावधीत उतारी प्रदेशावरून वाहून जाणारे पाणी सपाटीकरण केलेल्या भागात स्थिरावते आणि मुरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात होते. यामुळे जांभा खडकांमध्ये विघटन प्रक्रिया गतिमान होते आणि चिबड भूसभूशीत प्रस्तर ढासळतात. त्यामुळे जमिनीवरील पिक रचनासुध्दा नष्ट होते अथवा जमिनीबरोबर पुढे सरकली जाते.
भूस्खलनाच्या नैसर्गिक कारणांमध्ये गाव भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यास कमी अधिक क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्यांचाही समावेश होतो.
अशा दुर्घटनामागे निसर्ग निर्मित कारणांबरोबर मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याचे दिसते . सोबत फोटो

आपत्तीपूर्व नियोजन
१. आपआपल्या विभागावर आपत्ती व्यवस्थापन समित्यांची बैठक घेऊन आपत्ती निवारणासाठी नियोजन करणे.
२.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा / तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा / गाव
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे. या आरखडयाचे दोनदा अद्यावतीकरण करणे.
३. आपल्या विभागातील संपर्क यंत्रणा सज्ज ठेवणे. असेच आपली संपर्क यंत्रणा बिघडल्यास त्यास पर्यायी यंत्रणा तयार ठेवणे.
४. आपआपल्या क्षेत्रात आपत्तीच्या काळात लोकांना हलवण्यासाठी सुरक्षित निवा-यांची व्यवस्था करून ठेवावी.
भूस्खलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया जरी असली तरी मानव निर्मित कारणांमुळे भूस्खलन होत राहते. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या संधी, भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. विशेषत: अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये, खडकातील संधी - भेगा - फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते, वजन वाढते आणि अशाप्रकारच्या संधी - भेगा - फटी विस्तारित होवून खडकांचे तुकडे अलग होवू लागतात. अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जावून खालील बाजूस स्थिरावतात. यालाच दरड कोसळणे असे म्हणतात.
भूशास्त्रीय दृष्टीकोनातून जांभा खडकाचे (लॅटराईट) व्याप्त प्रदेशात अतिवृष्टीमुळे, खडकांची झीज होवून तसेच विघटन प्रक्रियेमुळे तयार झालेली जांभा खडकाची माती चिगट होते. अशा प्रकारची माती चिगड व निसरडी असल्याने, उतारावरील घरांच्या बांधकामाच्या वजनाने खचते व घसरत राहते. त्यामुळे चिबड मातीने व्याप्त प्रदेशातील घरे, जमीन खचल्याने कोसळतात आणि म्हणूनच जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका राहतो. याशिवाय मानवनिर्मित कारणांमध्ये उतारी भूभागाचे शेतीसाठी सपाटीकरण करणे, तसेच रस्ते बांधणे व त्यांचे रूंदीकरण करणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामुळे अतिपर्जन्यमानाचे कालावधीत उतारी प्रदेशावरून वाहून जाणारे पाणी सपाटीकरण केलेल्या भागात स्थिरावते आणि मुरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात होते. यामुळे जांभा खडकांमध्ये विघटन प्रक्रिया गतिमान होते आणि चिबड भूसभूशीत प्रस्तर ढासळतात. त्यामुळे जमिनीवरील पिक रचनासुध्दा नष्ट होते अथवा जमिनीबरोबर पुढे सरकली जाते.
भूस्खलनाच्या नैसर्गिक कारणांमध्ये गाव भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यास कमी अधिक क्षमतेच्या भूकंपाच्या धक्क्यांचाही समावेश होतो.
अशा दुर्घटनामागे निसर्ग निर्मित कारणांबरोबर मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याचे दिसते . सोबत फोटो
No comments:
Post a Comment