Friday, July 31, 2020

kale

अकोले - प्रतिनिधी - तांत्रिक अडचणींमुळे गेल्या तीन वर्षापासून रखडलेले २७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे मोरदरी लघुपाटबंधारे तलावाचे काम लवकरच सुरु करणार असून काही तांत्रिक बाबींच्या पुर्ततेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार  असल्याची ग्वाही लघुसिंचन नाशिक विभागाचे सुपरिटेंडर इंजिनिअर सागर शिंदे यांनी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कार्यकर्ते यांनी शिंदे यांना घेराव घातला तेव्हा हे आश्वासन दिले.             
आमदार पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने लघुसिंचन नाशिक विभागाचे सुपरिडंट इंजिनिअरची शिंदे यांची भेट घेऊन घेराव घातला. अकोले तालुक्यात रखडलेल्या तलावांच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली. यावेळी जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे   सभापती कैलास वाकचौरे, पाटपाण्याचे अभयासक मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विजय थोरात, उपअभियंता मयुर सोनवणे, शाखा अभियंता संजय कलापुरे उपस्थित होते.
आ. पिचड यांनी लघुसिंचन विभागाच्या अधिका-यांच्या कार्यपध्दतीबाबत  नाराजी व्यक्त करित अकोले तालुक्यात लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून मोरदरी या लघुपाटबंधारे तलावाच्या रखडलेल्या कामाला अधिकारीच जबाबदार असुन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी विभागाकडून निधी मंजूर करुन दिला. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली, कामही सुरु झाले पण पायामध्ये डाईक लागल्यानंतर हे काम थांबले. त्यानंतर ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे तातडीने  आवश्यक होत्या त्या होऊ शकल्या नाही अन् हे काम रखडले. परिसरातील शेतकाऱ्या नी या प्रकल्पासाठी स्वतःहून जमिनी दिल्या. सहकार्य केले. प्रकल्पाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नव्हते पण माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ते मोठ्या प्रयत्नानंतर मिळवून दिले. भुसंपादनाची प्रक्रियाही रखडली आहे. त्याला गती देण्याची गरज आहे. सन २०१५ मार्च मध्ये काम सरु झाले होते, तेव्हापासून हे काम बंद आहे. तरी हे काम लवकर सुरु करावे अन्यथा शेतक-यांसह आपण पुढील आंदोलन हे व्यापक करु असा इशारा आ. पिचड यांनी यावेळी दिला. 
यावेळी लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्या यांनी सांगितले की, मोरदरी धरणाचे काम सुरु असताना  पायात डाईक लागल्याने हे काम थांबविण्यात आले. याबाबत आम्ही गांभिर्याने लक्ष दिले. मुख्य अभियंत्यांनी यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. सन २०१६    ला पुणे येथील जीवआलोंजिस्ट यांना डिसेंबर २०१७ ला पाचारण करण्यात आले. त्यांचेही याबाबत मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ५ लाख रुपयेही सी. डी. ओला पाठविण्यात आले. ते आणखी साडेतीन लाख रुपये भरा असे सांगत असून त्याचाही भरणा लवकर करुन ,मुख्य अभियंता यांची प्रत्यक्ष पाहणी झाल्यावर काम सुरु करु अशी ग्वाहीही लघुसिंचनच्या अधिकाऱ्या यांनी या बैठकीत दिली. तर पिंपळदरा वाडीचे लघु तलावाबाबत अंदाजपत्रक करुन सादर करणार आहोत. या तलावाची उंची २० मीटर इतकी  समाविष्ट असल्याच; यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच यास प्रशासकीय मान्यताही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर २०१४ नंतर निकषात बदल झाल्यामुळे एकही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले तर जांभळे ,बदगी या तलावांनाही प्रशासकीय मान्यता घेणार आहे. 
या बैठकीसाठी शेतकरी शांताराम मेंगाळ, वाळीबा मेंगाळ, सिताराम मेंगाळ, किसन ढोन्नर, पुनाजी मेंगाळ, साबीर शेख, गंगाराम मेंगाळ, मंगा मेंगाळ यांच्यासह राजीव कानकाटे, राहुल देशमुख, संपत नाईकवाडी, शंभू नेहे, गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. 
चौकट ः-
आदिवासी उपयोजनेतून लघुसिंचन विभागाला ७० लाख रुपये मिळवून दिले होते पण या निधीतून एकही काम झाले नाही. हा निधी परत गेला. या प्रकरणी आपण विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे आ. पिचड यांनी सांगितले. 
चौकट ः- 
बिताक्यासाठी संयुक्त बैठक
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून बिताका प्रकल्प मार्गी लागला, त्यासाठी आदिवासी उपयोजनेतून वनसमितीला निधी दिला. हा प्रकल्प अपूर्ण असून वनसमितीकडे ६५ लाख रुपये पडून आहे. या कामाला गती देण्यासाठी लघुसिंचन विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग, वनविभाग यांची संयुक्त बैठक आ.वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे.



Attachments area

Tuesday, July 28, 2020

भंडारदरा शंभरी पार करताना दुर्लक्षित

कोरोनाच्या नावाखाली भंडारदरा धरणाची देखभाल थंडावली, भिंतीवर वाढले गवत
http://www.sarkarnama.in/rajya-nagar/maintenance-bhandardara-dam-under-name-corona-cooled-down-grass-growing-wall-59145

ब्लठण लघु पाटबंधारे प्रकल्पाची दुरवस्था

https://www.esakal.com/ahmednagar/balthan-dam-akole-taluka-has-started-leaking-322554?amp

Friday, July 17, 2020

https://youtu.be/9_1_Wm3jn14

म्हणाल तर एक कागदाचा तुकडा पण...


शांताराम काळे
अकोले (अहमदनगर) : म्हणाल तर एक कागदाचा तुकडा... पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली की आयुष्य कस बदलून जातं याचे जीवंत उदाहरण म्हणजे रघु अर्थात रघुनाथ सोनवणे! आठवडी बाजारात भेळ खाताना हाती आलेली वृत्तपत्रातील जाहिरात बघून दिल्ली पादाक्रांत करणारा रघु आज स्वमेहनतीने व अपार कष्टाने देशाच्या राजधानीत राज्य सरकारच्या माहिती विभागात लेखापाल आहे.
घरची परिस्थिती बेताचीच! दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथील बुवासाहेब नवले पतसंस्थेत नोकरी करणारा रघु असाच एका संध्याकाळी आठवडी बाजारात 'हरी ओम भेळी'च्या हातगाडीवर गेला. त्याने भेळ घेतली. पण त्याला काय माहीत होते की ही भेळ त्याला थेट देशाच्या राजधानीत घेवून जाईल. वृत्तपत्राच्या कागदावर भेळ खात असताना रघुच्या नजरेस एक सरकारी जाहिरात पडली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयात नोकर भरतीची ती जाहिरात बघून रघु खूश झाला. 'उजडले भाग्य आता' अशीच काही अवस्था त्याची झाली. त्याने पात्रतेनुसार लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तम यश मिळवत त्याने या कार्यालयात आपले स्थान निश्चित केले. हाच शासकीय नोकरीतील त्याचा प्रवेश ठरला. दिल्ली हे शहर भल्या भल्यांना मानवत नाही. त्याला कारणे ही बरीच आहेत. ठळक कारणांमध्ये येथील विषम हवामान म्हणजे हिवाळ्यात टोकाची थंडी व उन्हाळ्यात टोकाचा उकाडा. बोल- चालीची भाषा हिंदी व देशाच्या राजकारणाची सुत्रच या शहरातून हलतात. या शहरातील लोकांमध्येही राजकारणाचे रंग भिनलेले अशा एकानेक प्रतिकुल परिस्थतीला तोंड देत रघुने आपलं प्रेमळ मन व माणुसकी साबुत ठेवत नोकरीतही यशस्वी प्रवास केला. लिपिक टंक लेखक पदावरून, वरिष्ठ लिपिक व आता थेट याच कार्यालयातील तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात आहेत, असा लेखापाल म्हणून रघु हे जबाबदारी सांभाळत आहेत.
आपल्या कामा व्यतिरीक्त जनसंपर्क विभागात तो कामाला आहे. त्यातील प्रभावी जनसंपर्काचे गुण त्याने आत्मसात केले आहे. म्हणूनच नगरसह महाराष्ट्रातून दिल्लीत कामा निमित्त रघुच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम त्याच्याशी जोडला जातो.

संपादन : अशोक मुरुमकर

Wednesday, July 15, 2020

https://www.esakal.com/ahmednagar/four-year-old-pranjal-who-talks-about-female-feticide-flashed-social-media-321512?amp

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...