Saturday, October 16, 2021

माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड (आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)

माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड 
(आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)
माझ्या आईला प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांचे आशिर्वाद मिळाले, त्या अध्यात्मिक संस्काराचा ठसा माझ्या बालमनावर उमटला आणि त्यातूनच मी घडलो. एखाद्या शिल्पकाराने मूर्ती नव्हे तर एखादी लेणी कोरावी असे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्वार्थाने जाणिवेचे संस्कार माझ्यामध्ये आईनेच साकार केले. याच शिदोरीच्या बळावर माझा सामाजिक व राजकीय प्रवास घडला. लहानपणापासूनच माझ्यावर माझ्या आईचे संस्कार असल्याने माझ्या मनात कुणाच्याही विषयीही द्वेषभावना राहिली नाही, ती नष्ट झाली, मनात दुस­यांविषयी आपुलकी, प्रेम,आस्था, जिव्हाळा तयार झाला. दुस­र्‍यांना मदत करण्याची वृत्ती व भावना माझ्या मनात बळावली.त्यामुळे मी लहानपणापासूनच माझ्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेम दिले. उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले आहे. जनतेला न्याय देण्याची प्रवृत्ती, सामाजिक बांधिलकी, लोकांना न्याय देण्याची भुमिका 80 टक्के समाजकारण व 20 टक्केच राजकारण मी व माझे सर्व कुंटुब करीत आहे. प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती व सतत काम करण्याची सवय मी माझ्या आई-वडीलांकडून घेतली आहे. यातूनच माझ्यातील उपजत असणाऱ्या नेतृत्वगुणाला वाव मिळाला .समाजकारणातूनच राजकारण आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून तसेच अकोले तालुका एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा व गरीब दिनदुबळयांचे अश्रु पुसून समाजकारण व राजकारण करावे ही भावना माझ्या मनामध्ये माझ्या आईने रुजवली. त्यामुळे तिने सांगितलेले नियमांचे मी काटेकोरपणे पालन करत आहे, म्हणून माझी आई समाधानी आहे. मी राजकारणात येण्यापूर्वी अतिशय मुत्सद्देगिरीने समाजहितासाठी माझ्या आईने मला अध्यात्मिक संस्कार व समाजकारणाचे धडे दिले आहे. त्यामुळे मी राजकारणातही त्याच पध्दतीने काम करीत आहे. घरातील प्रासंगिक दु:खद घटनेच्या वेळी आईने मला धिरोदत्त मार्गदर्शन केले. माझे लहान बंधू कै.जितेंद्र पिचड यांचे दु:खद आकस्मिक निधन झाले त्यावेळी माझे धैर्य फार खचले होते, माझ्या अनुपस्थितीत माझे मोठे भाऊ हेमंत व लहान भाऊ जितेंद्र हे सामाजिक व राजकीय काम करत असत. व मला नेहमी आधार देत असत. माझे लहान बंधू जितेंद्र यांचे आकस्मिक निधन झाल्याने तो आधार अचानकपणे निघून गेल्याने मी एकटा पडलो त्यावेळी माझ्या आईने मला धीर दिला. परमेश्वरकृपेने, प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने या दु:खातून मी व माझे सर्व कुंटुब बाहेर पडलो व पुनश्च सामाजिक व राजकीय कामात पुन्हा व्यस्त झालो. त्यावेळी आईने मला सांगितले की, तुझा एक भाऊ गेला असला तरी तुझ्या कामातून, तुझ्या वागण्यातून तू अनेक भाऊ तयार कर, तू भिऊ नकोस प.पू.स्वामी गगणगिरी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठिशी उभे आहेत असा मला माझ्या आईने धीर दिला. त्यामुळेच ख­या अर्थाने सामाजिक जीवनाचा, राजकारणाचा माझा प्रवास सुरु झाला. माझ्या आईचे माझ्या दोन्ही भावांवर व माझ्यावर प्रचंड प्रेम होते व आहे. माझ्या लहान भावाच्या दु:खद निधनामुळे माझ्या आईच्या मनावर देखील फार परिणाम झाला होता, तिला अतिव दु:ख झाले होते त्या दु:खातूनही आईने आपले दु:ख बाजूला सारुन मला धीर देण्याचे काम केले. तिच्या या आधारामुळेच मी आज राजकारणात व समाजकारणात मार्गक्रमन करत आहे. भावाच्या दुखात असताना अनेकांनी मला धीर दिला असला तरी आईचा आधार हा लाखमोलाचा ठरला आहे. 
राज्यात मी राजकीय काम करीत असताना माझा 2019 ला भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश झाला व थोडया दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवली. परंतु त्यात माझा पराभव झाला. त्यामुळे मी अक्षरश: खचून गेलो होतो. मी राजकारणातून निवृत्ती घ्यावी की काय? या मनस्थितीत होतो, हा विचार माझ्या मनात आला. मात्र हे माझ्या आईच्या लक्षात आल्याने तिने मला जवळ बोलावून घेऊन सांगितले की, लोकशाहीमध्ये हार-जीत असतेच त्यामुळे तर तिला लोकशाही म्हणतात. जनमानसावर राज्य फक्त पद असल्यानेच करता येते असे नाही. निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. त्यात ज्या माणसांनी तुझ्या बाजूने कौल दिला त्या सर्वांना न्याय देण्यासाठी समाजहिताची कामे या पुढील काळात सातत्याने करावी लागतील. आपल्या कामाने जनतेमध्ये जावून आपल्या ऊणिवा दूर करण्याचे काम तू कर, तुला यश निश्चितच मिळेल त्यामुळे तू खचून जाऊ नकोस, तू जर खचला तर तुझ्याजवळ व तुझ्या सोबत असलेले कार्यकर्त्यांनी काय करायचं ? त्यांना या संकटात आधार देण्याचे काम तू केले पाहिजे, तुला मिळालेले मते हे दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. त्यामुळे त्यांचा तू विचार कर, आदर कर .आईच्या या सल्ल्याने मी पुन्हा नव्या जोमाने माझ्या कामाला सुरुवात केली.
माझ्या आईने सर्व मुलांना सारखेच प्रेम दिले. वाढदिवस व लग्नसमारंभात लहान व मोठया कौटुंबिक सदस्यांना आनंद देण्याचे काम माझ्या आईने केले आहे. घरातील सणसुद व वाढदिवस या वेळेसही सर्वांना बरोबर घेवून तिने काम केले आहे. भावा-भावांमध्ये समन्वय राखत जा, कुंटुंबातील सणसुद नातेवाईकांच्या समारंभात एकत्र राहून तिथे जाऊन त्यांच्या आनंदात आनंद मानून त्यांना धीर व आनंद देण्याचे काम मला माझ्या आईमुळे करता आले. आमच्या घरातील वाढदिवस व सणासुदीला आमचे तिन्ही चारी कुंटुंब एकत्र येत आम्ही सर्व कौटंुंबिक आदर्श जोपासला आहे. 
सामाजाचा पैसा काटसरीने वापरायचा असतो, एक-एक पैसा जमा करायचा असतो, त्यात काटकसर करुन आपल्या कामाचे कसब दाखवायचे असते. यातूनच मी चांगला धडा घेवून बंद पडायच्या स्थितीत असलेला अमृतसागर दूध संघ या संघाचा मी चेअरमन झालो. हा दूध संघ अल्पवधीतच मी चांगल्या नावारुपाला आणला. आज 8 कोटी पेक्षा जास्त हा संघ मी नफ्यामध्ये आणला आहे. याचे कारण काटकसरीने कसे काम करायचे ही शिकवण मला माझ्या आईने दिली. मला कसलेही व्यसन नाही, काटकसर, चांगल्या पध्दतीची वागणी, वायफळ खर्च करायचे नसतो या सर्व गोष्टीतून मी चांगले शिकलो व माझ्या आई-वडीलांची प्रत्येक शिकवण मला कामी आली. अशाप्रकारे सर्व सहकारी संस्थामध्ये व शैक्षणिक संस्थामध्ये मी चांगले काम करणार आहे. आईने मायाममता तर दिलीच पंरतु सामाजिक जीवनात कसे जगायचे, वागायचे, काटकसर कशी करायची, गरीबांना न्याय देण्याचे काम कसे करायचे ही सगळी भुमिका आईने पार पाडली आहे. वडील राजकारणात काम करत असायचे त्यांना पुरेसा कुंटुंबासाठी वेळ देता येत नव्हता. परंतु आईने ती दोन्ही भुमिका पार पाडली, आम्हा सर्व मुलांना संस्कार दिले आमच्या सुखदुखात, आमच्या पालनपोषणात, आमच्या शैक्षणिक जीवनात तिने चांगली भुमिका पार पाडली आहे. आमचे चार कुंटुब आहेत, त्यांचे हायकमांड माझे आई-वडील आहेत. आईच्या अस्तित्वामुळे आम्ही सर्व एकत्र राहतो, समाज व्यवसनापासून दूर कसा राहिल ही आईची शिकवण आहे. निरव्यसनी समाज ही आईची भुमिका, आईचा शब्द हा प्रमाण मानला जातो, चारही कुंटुंबात देवभक्ती वाढविणे, निरव्यवनी राहणे हे धडे आईकडून आम्हा सर्वांना मिळाले आहे. माझे व भावाचे शिक्षण  भोसला मिलिट्री स्कुल नाशिक येथे झाले आहे. लहान पणापासूनच कष्ट, साहेबांच्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिलो, लहानपणापासूनच अगदी 10 वी मध्ये असल्यापासूनच शेतावर जाणे, साहेबांनी सांगितलेले काम व्यवस्थितपणे करणे. बालपणापासून ते शिक्षण, सामाजिक काम, राजकारणात काम करणाताना अनेक संकटे आले, अनेक प्रश्न उभे राहिले, त्यातूनही मार्गक्रमन करीत आजवर इथेपर्यंतचा प्रवास चालू राहिला यातून मला अनेक चांगले मित्र व कार्यकर्ते मिळाले आहेत. संस्कार

माझी आई ही माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्यासाठी देव सुद्धा आहे. माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले संस्कार देऊन मला घडवले आहे. जर मला काही लागलं तर ओठावर येणार पहिला शब्द म्हणजेच – आई.

तसेच संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी आई असते. माझी आई हि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण ती आपल्या सोबत राहून किती जबाबदारी पार पडत असते.

माझी आई जर का आजारी पडली तर आम्हा सर्वाना संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा असं वाटतच नाही कि, हे आपलं घर आहे. माझी आई नेहमी जी कामे करते ती कामे इतर कोणालाही करून संपत नाही

आई मायेचा सागर

आई हि मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितले होते की" जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली अयोध्या या जन्म भूमीला सर्वश्रेष्ठ मानले आहे.हे सांगताना त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईशी केली आहे.
 मराठीमध्ये प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हि ओळ लिहून आईची महानता वर्णविली आहे.
आईच्या समाजकारणाची दिशा अतिशय योग्य असल्याने तिने दिलेल्या सामाजिक आदेशाची अंमलबजावणी डोळे झाकून जरी केली तरी ते नेहमी समाजहिताचे ठरले. आदर्श सरपंच असताना आईने वसुंधरा पुरस्कार मिळवताना केलेले काम हे फक्त मानवजातीच्या कल्याणाचे आहे. राजूरच्या चौतर्फा लावलेली झाडे उद्या निश्चित वनराईचे स्वरूप प्राप्त करतील नेहमीच समाजहित व मानवजातीचे कल्याण हा सामायिक हेतू ठेवून समाजकारण व राजकारण करण्याचे धडे तिने मला दिले. निश्चितच तिच्या तत्त्वांनी केलेला प्रवास हा मला फलदायी ठरेल यात कुठलीही शंका नाही.

शब्दांकन - मा.आ.वैभवराव मधुकरराव पिचड

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...