Tuesday, July 29, 2025

अकोले तालुका पर्यटन

अकोले तालुका निसर्ग,पर्यावरण,इतिहास,भूगोल,भूशास्र,अशा अनेक दृष्टीने समृध्द आहे.तालुक्यातील चार मध्ययुगीन मंदिरे त्यात भाविकांप्रमाणे अभ्यासकांनाही अशीच भुरळ घालतात. यामध्ये टाहाकारीचे जगदंबा (अंबिका)मंदिर वगळता रतनवाडीचे अमृतेश्वर ,अकोल्याचे सिध्देश्वर आणि हरिश्चंद्र गडावरील हरिश्चंद्रेश्वर ही तीन मंदिरे शिवालये आहेत. तिथल्या शिल्पांचा बारकाईने अभ्यास केल्यास ही शिवाची तांत्रिक मंदिरे असावीत असा अंदाज करता येतो.अकोल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी यासंबंधाने बराच अभ्यास केलेला आहे. या मंदिरांचे अनोखे स्थापत्य,त्यांचे सौंदर्य, त्यांची निर्मिती,मंदिरांची शिखरे,जंघा भागातील सूर सुंदरींची शिल्पे,आतले वितान या सगळ्या गोष्टींबरोबरच मंदिरांचा अधिकृत इतिहास समजून घ्यायचा असेल तर 'उज्ज्वल उद्यासाठी' या त्रैमासिकाचा हा अंक जरूर वाचा. आणखी एक,एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा.अशा सुंदर मंदिर शैलीला अनेक जण 'हेमाडपंती'मंदिरे म्हणतात. ते 100 पक्के चूक आहे. हेमाडपंती म्हणजे 'हेमाद्री' नावाच्या यादवांच्या कारभा-याने बांधलेली.हा हेमाद्री तेराव्या शतकातला. ही मंदिरे दहाव्या-अकराव्या शतकातली. याबाबत याच अंकात आणखी जाणून घ्या.

No comments:

Post a Comment

चिंचोडी ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतानाही चेकवर सह्या करून पैसे काढले

अकोले,ता.२३:ग्रामस्थानी बोलावलेल्या ग्रामसभेकडे पाठ फिरवून ग्रामविकास अधिकारी याने कार्यलयात जाऊन सरपंच यांचे सांगण्यावरून चक्क केल्या जुन्य...