Monday, March 5, 2018
Saturday, March 3, 2018
सुनंदाताईंना मुलगा नसल्याने मुलगा दत्तक घेण्या एवजी खेडयातील मुलींना शिक्षण मिळावे
म
टा . वृत्तसेवा , संगमनेर - इयता पहिली शिक्षण घेऊन शाळेची भीती मनात घर
करून बसलेल्या सुनंदाताई भागवत यांनी पाचशेपेक्षा अधिक मुलींना शिक्षणाचे
कवाडे उघडी करून देत आपल्या जीवनाला व आयुष्याला वेगळा अर्थ निर्माण करून
देत आपला जीवन प्रवास अनाथांची माय म्हणून सर्व जगाला करून दिला नगर
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ या गावात सून म्हणून
आलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या बोरी शिरोली गावच्या
लेकीने आपले संस्कार सासरच्या मातीत रुजवत ओसाड माळरानावर, अंध अपंग , मूक
बधिर ,एड्स ग्रस्त, अनाथ , , शोषित , अबला अश्या शेकडो मुलींचे
आयुष्य "सुंदर , निरामय , साक्षर बनवत संस्काराची जोड देत आपल्या जीवनाला
आकार देतानाच आपल्या वसतिगृहात आलेल्या राज्यातील व राज्याबाहेरील
चिमण्यांच्या पंखाला बळ देऊन त्यांना सबला बनवून त्यांना सक्षम बनवत आपणही
समाजाचे काही तरी देणे लागतो हि संकल्पना त्यांच्या मनात खोलवर रुजवात एक
अभिनव उपक्रम राबवितानाच गावाचा चेहरा मोहराही बदलवून जिराईत शेती भाग
बागायती करून कृषी कन्या म्हणवून जगाच्या पटलावर प्रतिमा उंचविण्याऱ्या
सुनंदाताई भागवत या आजी , आई , मावशी अनाथांची माय , या समाजातील आदर्श
मातेला सलाम ....
सावीत्री
बाई फुलेनी १८४७ साली पुण्यात महीलांसाठी पहीली शाळा काढत स्रीयांना
शिक्षणाची दारे खुली करुन दिली त्या नंतरही महीलांना शिक्षणासाठी झटावे
लागत होते. अहमदनगर जिल्ह्यातल्या पठार भागातील सुनंदाताई भागवत यांनी ही
सावित्री बाईंचा वसा पुढे चालवण्याचा निर्धार करत या भागातील महीलां आणि
मुलीच्या आर्थिक आणि शैक्षणीक प्रगती साठी कार्य सुरु ठेवलय. सुनंदाताईंना
मुलगा नसल्याने मुलगा दत्तक घेण्या एवजी खेडयातील मुलींना शिक्षण मिळावे
या साठी वसतीगृहाची स्थापना करत आता पर्यंत पाचशे च्या वर मुलांना शिक्षण
देत त्यांच्या पायावर उभ केलय. आपली संपत्ती दत्तक मुलगा घेऊन त्याला
देण्यापेक्षा समाजातील गोरगरीब अत्याचारित मुलींच्या शिक्षणासाठी पालन
पोषणासाठी देण्याचा त्यांचा निर्धार असून त्यांनी तसे मृत्युपत्र तयार
करूनही ठेवले आहे . नांदूर खदरमाळ येथे १९७५ साली सुनंदा ताई आल्या
त्यावेळी गावात वीज , पाणी , रस्ते कोणत्याही सुविधा नव्हत्या त्यांनी
गावात पाणी योजना आणण्याचा निर्धार केला व थेट मुंबईला वर्ष बंगल्यावर
मुख्यमंत्री शरद पवार याना भेटल्या २ लाख ७० हजाराची नळयोजना होती मात्र २७
हजार रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे नव्हते मुख्यमंत्री पवार याना "साहेब आम्हाला
भाऊबीजेच्या साडी ऐवजी भाऊबीज भेट म्हणून २७ हजार नळ योजनेसाठी द्या अशी मागणी
केली त्यांच्या एका शब्दावर १०० टक्के अनुदानावर हि नळ योजना मंजूर केली .
२ वर्षाची सीमा म्हतारबा कोठवळ अनाथ मुलगी संगमनेर , , ७ वर्षाची शितल
नामदेव वाळुंज पारनेर ,९ वर्षाची प्रियांका लक्ष्मण पवार , भिगवण , स्नेहल
लक्ष्मण पवार पूजा राहटे (औरंगाबाद)आरती रवी बंडरगल (कर्नाटक )पूजा
डोंगरे (पारनेर )तर नामदेव रामा भागवत यांचे ५ अनाथ मुले , वेड्या
महिलेसोबतच मुलींना पायल व पूजा राजेंद्र तुपे याना सांभाळून त्यांना
शिक्षण दिले तर दारिद्र्याने पीडित ५ कुटुंबाना आपल्या शेतावर रोजगार देऊन
त्यांची मुलेही शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत , , सातारा सांगली ,
औरंगाबाद , पुणे जिल्ह्यातील मुलींसोबतच मध्यप्रदेश , कर्नाटक या
राज्यातूनही काही मुलींना आसरा देऊन त्यांचे पालन पोषण व शिक्षण देऊन
त्यांच्या पायावर त्यांना उभे करण्याचे काम या मातेने केले आहे .
सावीत्री
बाईं फुलेंच्या पुण्यातील शाळा सुरु करण्यच्या तब्बल शंभर वर्षा नंतर पुणे
जिल्ह्यातीलच जुन्नर तालुक्यातील बोरी शिरोली या गावात १९४८साली सुनंदाताईंचा जन्म झाला वडील नोकरी निम्मीत मुबईत असल्याने सुंनंदा ताईंच
लहानपण मुबईतच गेल. त्या नंतर त्यांनी पहीलीला प्रवेशही घेतला मात्र त्या
काळी त्याच्या शेजारी रहाणारी एक मुलगी गायब झाल्याने त्यांच्या बालमनावर
परीनाम झाला आणि आई वडीलांनाही भीती वाटल्याने त्यांच शिक्षण सुटल
सावित्री फूलेंने प्रमाणेच सुनंदा ताईंच
लग्न वयाच्या 12 वर्षी लग्न झाल त्या नतंर त्या संसारात रमल्या त्यांचे पती
संगमनेर जिल्ह्यातील नांदुर खंदरमाळ येथे राहत होते आणि नोकरी निम्मीती
मुबईतही राहत होते त्या नंतर सुनंदाताई सुट्टी
साठी नांदुर खंदरमाळला यायच्या हे गाव तस दुष्काळीच गाव त्या काळी
महीलाच्या डोक्यावर हंडा त्या नेहेमी बघत त्या नतंर त्यांनी १९७५ साली या
गावाला येवुन राहण्याच ठरवत गावातील १५० महीलांना एकत्र करत अहमदनगर
जिल्ह्यातील महीलांनी सुरु केलेली पहीली पाणी पुरवठा योजना सुरु केली होती.
त्या नंतर त्यांनी आपल जीवन गावाच्या कल्याना साठीच वाहुन घेतल.
सन १९८९साली गावातील मुला मुलींना शाळेसाठी लाबं जाव लागत असल्याने गावात
महीलांच्याच्या सहकार्याने पहीली शाळा सुरु केली होती. त्या नंतर ९० साली
मुलींना शिक्षणाची सोय व्हावी या साठी वसतगृह सुर केल त्या साठी त्यांना
आपली एक एकर जमीनीह दान दिली आहे. सरकारचे अनुदान आले तर ठीक नाही आले तर
ठीक त्याची वाट न पाहता आपल्या शेतीतील उत्पन्नातून व आपल्या पतीच्या
पेन्शन मधून त्या वसतिगृह चालवतात . तर राज्यातील अनाथ मुलींना त्या
स्वीकारून त्यांचे पालनपोषण करून शिक्षण देतात त्या आधुनिक काळातील
सावित्रीबाई फुले आहेत असे ग्रामस्थ म्हणतात
कोट-सुंनदाताई भागवत. समाजीक कार्यकर्त्या--
माझी आई राधाबाई बालाजी शेटे ७वी शिकलेली ती मला "पठया "म्हणायची माझ्या
पठ्ठयाला मी श्रीमंताला नाही तर गरिबाला देईल ती गरीबाचा संसार चांगला करील
त्याप्रमाणे मला गिरणी कामगाराला दिले मुंबईला माझे १२ वारशाची असताना
लग्न झाले माझे मन तिथे रमले नाही मग मी सासरी आले नांदूर खांदरमळ मध्ये
येऊन मी गावच्या प्रश्नात लक्ष्य घातले पाणी , वीज रस्ते हे प्रश्न सोडवतं
गावात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केली वसतिगृह सुरु करून अनाथ
मुलींना त्यात प्रवेश दिला . मुलींनी मोबाईल वापरू नये त्यामुळे मुली
बिघडतात असे माझे ठाम मत आहे . त्यामुळेच माझ्या ५०० मुली आजही आई म्हणून
माझे संस्कार अंगिकारतात . मुलगा दत्तक घेण्यापेक्षा या मुलींसाठी
आयुष्याचे शेवटचे दिवस काढायचे माझे सर्व काही या मुलींचे आहे मी असेल नसेल
माझ्या संपत्तीतूनच यापुढेही मुलींचे शिक्षण व पालनपोषण सुरु रावावे
म्हणून मी मृत्यू पत्र तयार करून ठेवले आहे . गावातील पंढरीनाथ सुपेकर ,
यमाजी मोरे भीक मोरे , नामदेव सुपेकर , लक्ष्मण भागवत , इंदिराबाई गर्भे ,
भीमाबाई घुले रंभाबाई भागवत व माझे पती यांनी मला साथ दिल्यामुळे मी हे काम
करू शकले
सुनंदाताईंनी गावातील मुलींना शिक्षण देत असतांनाच यशवंतराव चव्हान मुक्त विदयापीठा अंतर्गत वयाच्या ६४ व्या वर्षीबीए च शिक्षण पुर्ण केलय. सुनंदाताईंनी सुरु केलेल्या वसतीगृहाला शासनाचा तुटपुंज अनुदान मिळत त्या मुळ लोकांच्या मदतीनु वसतीगृहाचा इतर खर्च भागावला जातो सुनंदाताई केवळ
वसतीगृहच चालवत नाही तर त्या आणि त्यांचे ८० वर्षाचे पती याच वस्ती गृहात राहुन
मुलीच्या शिक्षणा साठी लक्ष देतात यात बऱ्याच निराधार मुलीही आहेत. या
संस्थेत शिकलेल्या अऩेक मुली पोलीस तलाठी ग्रामसेवक आणि , शेतकरी , आदर्श गृहिणी , शिक्षक ,
डाँक्टरही
झाल्या
आहेत. आजही या संस्थेत ३५ विद्यार्थीनी शिक्षण घेताय.
कोट - सुनंदा डोंगरे (
विद्यार्थीनी
)---
विद्यार्थीनीआकाशी कलरचा ड्रेस--- माझ्या आईऩे
वडीलांना सुपारी देवुन मारले मला नातेवाईनेही नाकारल त्यानंतर मला सुनंदा
आई भेटली तिने मला लेकीसारखे सांभाळले , मला कापड लत्ता , शिक्षण , माझा
आजार मला आई वडिलांची आठवण येऊ दिली नाही
सुनंदाताईंच्या
या कार्याची दखल घेऊन स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी घेऊन त्यांना जिल्हा
परिषदेवर निवडून देऊन त्या जिल्हापरीषद सदस्याही झाल्या होत्या त्या नंतर
आता
दोन वर्षा पासुन त्या गावातील पहील्या महीला सरपंच म्हणुन काम बघताय.
गावातील मुलींच्या शिक्षणा पुरतच मार्यादीत काम न ठेवता सुनंदा ताईंनी गावातील पाणलोट क्षेत्र विकाचही भरघोस काम केलय. त्य़ाच बरोबरीने सुनंदाताई ह्या उत्तम शेतीही करतात. ताईंच्या
या कार्याची दखल अऩेक संस्था आणि शासन दरबारी दखल ही घेतली गेली असु न
त्याना सावित्रीबाई फुले , कृषी रत्न , वीरांगना , जिजामाता कृषी भूषण महिला ,
अहिल्याबाई होळकर , राणी , लक्ष्मीबाई , शिक्षण तज्ञ् जे . पी . नाईक पुरस्कार पुरस्काराने सन्मानाती ही करण्यात
आले आहे.
Thursday, February 22, 2018
Wednesday, February 21, 2018
जलसंधारणातून कुमशेतची बारमाही शेतीकडे वाटचाल शांताराम काळे
जलसंधारणातून कुमशेतची बारमाही शेतीकडे वाटचाल
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018
शांताराम काळे
नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील
चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. या
धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आज्या पर्वताच्या
पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे. जलसंधारणाच्या विविध कामांतून
गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंक बंद झाला आहे. शिवारात विविध हंगामांत
पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे. पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक
असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध वस्तू तयार करतात. त्या
विक्रीतून संसाराला हातभार लावतात.
नगर
जिल्ह्यात अकोले तालुक्यातील चाळीसगाव डांग भागातील धारेगाव आदिवासींचे
श्रद्धास्थान आहे. या धारेगावच्या प्रांगणात व मुळा नदीचे उगमस्थान
असलेल्या आज्या पर्वताच्या पायथ्याशी कुमशेत हे टुमदार गाव वसले आहे.
जलसंधारणाच्या विविध कामांतून गावातील पिण्याच्या पाण्याचा टॅंक बंद झाला
आहे. शिवारात विविध हंगामांत पिके डोलू लागली आहेत. जोडीला ठिबक सिंचन आहे.
पर्यटकांसाठी अत्यंत मनमोहक असलेल्या या गावातील महिला हस्तकलेतून विविध
वस्तू तयार करतात. त्या विक्रीतून संसाराला हातभार लावतात.
नगर जिल्ह्यात अकोले या तालुका ठिकाणापासून सुमारे ५५ किलोमीटरवर कुमशेत हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव येते. रामायणात वाल्मीक ऋषींचा आश्रम असल्याचा उल्लेख आज्या पर्वतासंबंधी आहे. हा पर्वत तसेच वाकडा, सुपली, करंडा आदी डोंगरांच्या मध्यावर गावठा, पाटीलवाडी, बोरीची वाडी, ठाकरवाडी, मुडाची वाडी व नाडेकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून कुमशेत गाव तयार झाले आहे. गावाच्या एका बाजूस धारेगाव कोकणकडा आहे.
दुष्काळापासून मुक्ती
कुमशेतचे भौगोलिक क्षेत्र सुमारे ३०२७. ५४ हेक्टर आहे. त्यात वनक्षेत्राचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र खडकाळ जमीन असल्याने उन्हाळ्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न जाणवतो. सतत टँकर तर रोजगारासाठी दाही दिशा अशा दुष्काळाच्या झळा सोसणारे गाव आता परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू लागले आहे. पाणीदार गाव म्हणून आपली ओळख निर्माण करू लागले आहे. विशेष म्हणजे गाव दुष्काळमुक्त होण्यामध्ये व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यामध्ये लोकसहभाग व त्यातही महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होतो आहे.
जलसंधारणातून ठिकठिकाणी अडले पाणी
नजीकच्या काळात कुमशेत गावशिवारात कृषी विभागामार्फत सिमेंट काँक्रीटचे सात दगडी बंधारे, लघू पाटबंधारे विभागाकडून पाच तर लोकसहभागातून वनराई बंधारे झाले. त्यातून डोंगरदऱ्यांतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी अडविले. जलयुक्त अभियान कार्यक्रमातून पाणी अडविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनीता भांगरे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. बंधाऱ्यांमध्ये मेअखेरपर्यंत पाणी टिकले. त्याचा फायदा म्हणजे गावाला पिण्यासाठी पाणी मिळालेच, शिवाय उन्हाळी पिकेही शेतकरी घेऊ लागला आहे.
शिवारात डोलू लागली विविध पिके
पाटीलवाडी, ठाकरवाडी, चोंढी उत्तर ओढा आदी काँक्रीट बंधाऱ्याच्या काठावरील भात खाचरात गहू, हरभरा, भुईमूग, देशी वाल, वांगी, मेथी, पालक अशी पिके डोलू लागली आहेत. कमी पाण्यावर येणाऱ्या गव्हाच्या वाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. नैसर्गिक पाण्याचा ओलावा, त्याला बंधाऱ्यातील २५ ते ३० दशलक्ष घनफूट पाण्याची जोड व ठिबक सिंचन यांचा वापर झाला. त्या आधारे कांदा, बटाटा या पारंपरिक पिकांसह आंबा, आवळा, पेरू, बोरे, मेथी अशी विविधताही शिवारात दिसू लागली आहे.
शेतकरी समाधानी
कुमशेत शिवारातील बहुतांश उत्पादने सेंद्रियच म्हणावी लागतील. वेगवेगळ्या हंगामात शेती करणे शक्य झाल्याने रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनीही झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त करून निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. यावर्षी पाऊस अधिक झाल्याने बंधारेदेखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चारसूत्री भात लागवड करून परिसरात मार्गदर्शकाची भूमिकाच गावाने बजावली आहे.
हस्तकला व्यवसायातून संसाराला हातभार
कृषी विभागाने गावातील महिलांना बांबू उद्योग सुरू करून देण्यासाठीही मदत केली आहे. नेहमीच्या कामातून वर्षातून थोडा फुरसतीचा वेळ मिळतो. त्यावेळी ग्रामस्थ हस्तकलेचा व्यवसाय करतात. पावसाची वाट पाहण्याच्या किंवा पीक तयार होण्याच्या काळात ते आपल्याच शेतीस्त्रोतांच्या आधारे वस्तू तयार करण्याकडे वळतात. अशा हंगामी आदिवासी कारागिरांमध्ये सर्वात उल्लेखनीय कारागीर म्हणजे वेताच्या व बांबूच्या टोपल्या आणि तट्टे विणणारे लोक. पूर्वी बांबूपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना अधिक मागणी होती. काही वर्षांपूर्वी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात घरगुती वापर होत असे. मात्र आताच्या जमान्यातही बांबूपासून हारे, टोपल्या, तट्टे, खुराडे, कणगी आदी घटक बनवून देणारी कुमशेत गावातील आदिवासी कुटुंबीय दोन वर्षे बांबूच्या साहाय्याने बुरूडकाम करीत आहेत. टोपल्या, रोवली, सूप, करंडा आदी वस्तूंचे विणकाम करीत त्यांनी या व्यवसायातून आपल्या संसाराला हातभार लावला आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून कृषी विभाग व वन विभागाने गावात कामे केली. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पाण्याची समस्या दूर झाली अाहे. शेतीशिवार हिरवेगार झाल्याने पर्यटकांचा ओढा इथे वाढू लागला आहे. कुमशेत गाव नजीकच्या काळात पर्यटनासाठी नावारूपास येईल.
- सौ. सुनीता भांगरे,
जिल्हा परिषद सदस्य
शिवारात पाणी आहे, पण वीज नाही. ती उपलब्ध झाल्यास शेतीसाठी बंधाऱ्यातून पाणी उचलल्यास येथील शेती आठमाही होईल. त्या दृष्टीने पावले टाकीत आहोत.
- विठल अस्वले
शेतकरी, कुमशेत
सर्वांच्या मदतीतून गाव बदलतेय
कुमशेतच्या सरपंच सोनाबाई विठ्ठल अस्वले म्हणाल्या की, प्रत्येक उन्हाळ्यात गावाला वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागे. पाण्याच्या टँकरवर सतत अवलंबून राहावे लागे. आता उन्हाळ्यात गावात येणारा पिण्याचा पाण्याचा टँकर बंद झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. शेतीलाही पाणी उपलब्ध होऊन रब्बी, उन्हाळी क्षेत्र वाढले आहे. गावातील महिलांचा तनिष्का गट स्थापन केला आहे. त्या आधारे वीस महिलांना एकत्र करून छोटे, मोठे उद्योग करण्याचे काम सुरू अाहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी मिळाला. हा गाळ खडकाळ माळरानावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात टाकला. त्यातून पाच हेक्टर क्षेत्र तयार होऊन त्यात पिके डोलू लागली आहेत. आता या जमिनींची पाणीक्षमताही वाढीस लागली आहे. या बंधाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. येथे वस्ती करतात. आमचे ग्रामस्थ त्यांना चुलीवरची भाकर तसेच अन्य जेवण देतात. पर्यटकांसाठी हुरडा पार्टीचे आयोजनही करण्यात येते. त्यातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे पर्यटनाचे केंद्र म्हणून आमच्या गावाची ओळख झाली आहे. सरकारने पर्यटन विकासातून निधी दिल्यास तसेच रस्ते काँक्रीटचे तयार झाले तर पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल, असेही सरपंच सोनाबाईंनी सांगितले.
- सोनाबाई अस्वले, ९४२३१४९१६८
गावात सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, गॅबियन वनराई बंधारे आदी कामे झाल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गहू, भाजीपाला, उन्हाळ्यात भुईमूग, बाजरी त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा, आवळा आदींचीही लागवड झाली आहे. एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन बांबूपासून वस्तू तयार करून महिला त्यांची विक्री पर्यटक व बाजारात करतात. त्यातून त्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यास मदत होत आहे.
- बाळासाहेब मुसमाडे, ९४२२४३०४५१
उपविभागीय कृषी अधिकारी
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या कुमशेत परिसरावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून, पर्यटकांना मोहवून टाकणारा आहे. येथील ग्रामस्थांनी एकोप्याने राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व प्रगतीची वाटचाल सुरू ठेवावी.
- भागवत डोईफोडे, प्रांत, संगमनेर

Monday, January 1, 2018
– खेळण्या बागडण्याच्या वयातच कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडत दोरीवर
कसरतीचे खेळ करून उपस्थितांची वाहवा मिळवत प्रेक्षकांकडून मिळणार्या
आर्थिक दानावर ती आई-वडील व लहान बहिणीचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गावोगाव
पायपिट करीत दोरीवर कसरत करीत आहे. ना शाळा ना शिक्षण विंचवाचे बिर्हाड
पाठीशी घेऊन छत्तिसगडचे हे कुटुंब टीचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी या
राज्यातून त्या राज्यात गावोगाव भटकंती करत आहे.
छत्तीसगड
राज्यातून पोटासाठी भटकंती करीत टाकळीभानपर्यंत मजल मारलेली 9 वर्षांची
चिमुरडी पुनमकुमारी सुनीलकुमार नट दोरीवर चालण्याची थरारक कसरत करीत
कुटुंबाचा आधार बनली आहे. रस्त्याच्या कडेला वर्दळीच्या ठिकाणी चार बांबू
रोवून तीस फुटाचा दोर बांधून सुमारे 10 फुट उंचीच्या दोरीवरून डोक्यावर
एकावर एक तीन कलश घेऊन कधी अनवाणी, कधी पायात चप्पल घालून, कधी थाळीवरून तर
कधी परात घेऊन चित्तथरारक कसरत करीत ही चिमुकली प्रेक्षकांची वाहवा मिळवत
भटकंती करीत आहे.
आई-वडिलांसह
चिमुकल्या बहिणीच्याही पोटाचा आधार ती ठरत आहे. त्या चिमुरडीच्या
कसरतीच्या खेळावर खूश होऊन प्रेक्षक सढळ हाताने दहा-वीस रुपयाचे दान करीत
तिच्या कसरतीला दाद देत आहेत आणि हे दानच त्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे
साधन बनले आहे. रोज एका गावात खेळ करून दुसर्या गावाचा रस्ता धरला जातो.ना
शाळा ना शिक्षण पोटभरण्याचं साधन केवळ चिमुरडीची दोरीवरची कसरत. चार
बांबू, दोरी, छोटा लाउड स्पिकर, दोन गोधड्या एवढच प्रपंचाच बिर्हाड पाठीवर
घेऊन गावोगाव भटकंती करणार्या या कुटुंबाला अच्छे दिन तरी कधी येणार?
पुनमकुमारीच्या
पित्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले कि आमची मुलगी आमच उपजिवीकेचे साधन
झाले आहे. तिच्या खेळावर आमचे पोट चालु आहे. रोज गावोगाव खेळ करुन चारशे –
पाचशे रुपये मिळतात त्यावरच गुजारा होतो. पुनम आजारी पडली तर माञ आमच्या
पोटाचा प्रश्न निर्माण होतो. शाळेत जाण्यापेक्षा तिच्या या खेळानेच तिच
शिक्षण थानबली. आमच्या पोटाचा आधार असल्याने व गावोगाव फिरत असल्याने शाळा
आंम्हाला माहितच नाही. हा आमचा पिढीजात व्यवसाय आजही सुरुच आहे. वर्षातुन
एखादेवेळी गावाकडे जातो तोही खेळ करीत करीतच.
सुनीलकुमार नट ( पुनमचा पिता)
ममताबाई भांगरे
,rajur --आदिवासी कुटुंबांना
वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून
देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’
या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या
चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे.
कळसुबाई
शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले
आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र
भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर
उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या
अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या
शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत
पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण
जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उतार लक्षात
घेऊन लावलेली विविध प्रकारची झाडे. बांधांवर पसरलेले काकडीचे वेल. सभोवताली
तसेच घराच्या भिंतीवर पोहोचलेले दोडक्याचे वेल. कारल्याचा मांडव. उजव्या
हाताच्या मोकळ्या जागेत अशीच विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, आंबा, अंजीर,
पपई, शेवगा, सीताफळ, फणस, गावठी वांगी, टोमॅटो. एका बाजूला ओळीत केलेली
वाल आणि घेवडय़ाची लागवड ही शांताबाई धांडे यांची परसबाग. या बागेमध्ये
जमिनीचा उतार आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन फळझाडे, वेलवर्गीय भाज्या,
कंदभाज्या, पालेभाज्या यांच्या लागवडी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत
येथे काहीच नव्हते, खडक होता. जनावरे फिरायची. शांताबाई सांगत होत्या पण
त्या छोटय़ाशा परसबागेतून हिंडताना त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा
प्रश्न पडतो. या सर्व भाज्या स्थानिक आहेत. पारंपरिक बियाणांचाच त्यासाठी
वापर केलेला आहे आणि सर्व भाजीपाला, फळांचा मुख्यत: घरीच वापर केला जातो.
फारच उत्पन्न आले तर थोडीफार भाजी बाजारात नेली जाते पण तीही क्वचितच.
गावरान वाणांबरोबरच खत म्हणून गांडूळ खत यांचा वापर होतो. पूर्वी महिना
पंधरा दिवसांतून भाजी घरी आणली जायची. आता मात्र मुबलक प्रमाणात भाजी, फळे
उपलब्ध होतात. शिवरात्रीपर्यंत बाहेरून भाजीपाला आणावा लागणार नाही.
शांताबाईचे पती खंडू धांडे सांगत होते. दोन वर्षांपूर्वी ‘बायफ’च्या
(भारतीय कृषि अनुसंधान) मार्गदर्शनाखाली परसबाग लावायला सुरुवात केली.
सर्वच कुटुंब आता त्या बागेच्या प्रेमातच पडले आहे. या परसबागेचा गवगवा
झाल्यामुळे आता दूरवरून लोक ही परसबाग पाहायला येतात. त्यात काही विदेशी
पर्यटकांचाही समावेश आहे. शांताबाईंचा मुलगा सोमनाथ एम.ए. बी.एड. झालेला
आहे. त्याला विचारले असता, आईचा खूप अभिमान वाटतो असे तो
म्हणाला.आंबेवंगणच्या पुढेच देवगाव नावाचे खेडे आहे. आद्य क्रांतीवीर
राघोजी भांगरे
यांची ही भूमी. रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई
भांगरे यांचे घर आहे. कौलारू घर, पुढे बाजूला घरालगत पडवी. घरापुढे बोगन
वेलीचा ऐसपस मांडव. ऑक्टोबरच्या कडक उन्हाची तिरीपही आत येऊ शकत नव्हती.
प्रसन्न वातावरण. येथेही घराच्या सभोवताली असणाऱ्या इंचन् इंच जागेचा
भाजीपाला, फळ लागवडीसाठी केलेला वापर. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर
गेलेले वेल. बांधावर पसरलेले डांगर, भोपळा यांचे वेल. रताळ, सुरण, हळद,
टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या पाहायला
मिळाल्या. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा,
कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी. जोडीला विविध फळांची झाडे. थोडय़ाफार
पालेभाज्याही होत्या पण आम्हाला रानभाज्याच आवडतात असे ममताबाई सांगत
होत्या. सासू-सासऱ्यांमुळे या रानभाज्यांचे ज्ञान झाले. सासूबाई असताना
रानातून या भाज्या तोडून आणायचो, पण आता घराजवळच त्यांची लागवड केली आहे.
चहा, साखर आणि तेल मीठ सोडले तर बाकी सर्व घरचेच वापरतो. धान्य, कडधान्य,
भाज्या, हळद, मिरची सर्व काही. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत
बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत. गांडूळ खत, शेण खत यांचाच वापर
केला जातो. सेंद्रीय व गांडूळ खतांच्या गोळ्या हा ममताबाईंचा स्वत:चा शोध.
भातालाही त्या गांडूळ खतच वापरत पण ओढय़ालगतच्या शेतालगत टाकलेले खत वाहून
जायचे. विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली. गांडूळ खताचे लहान लहान गोळे
केले, वाळवले. युरिया ब्रिक
युरिया ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर सुरू
केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या शोधाची खूप प्रशंसा झाली. साधे
नसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबाईंच्या घरी
गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे शांताबाई किंवा ममताबाई या दोघीही निरक्षर
आहेत. पण ममताबाईंचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग
पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात. या
दोघींप्रमाणेच मान्हेरेच्या हिराबाई गभाले, जायनावाडीच्या जनाबाई भांगरे,
एकदरे येथील हैबतराव भांगरे यांच्याही परसबागा पाहण्यासारख्याच आहेत. ‘सीड
क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरेंची परसबाग तर दृष्ट
लागण्यासारखीच आहे. ही झाली प्रातिनिधिक उदाहरणे पण कळसुबाई शिखराच्या
आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी खेडय़ांमध्ये अशा अनेक ममताबाई, शांताबाई
पाहावयास मिळतात.
आदिवासी कुटुंबांना वर्षांतील
चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी ही
परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या
संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनी गावरान
वाणांचे जतन परंपरेने केले आहे. पूर्वी त्या घराभोवती डांगर, भोपळा, काकडी
अशा भाज्या लावायच्या. पण त्या कुठेही लावल्या जायच्या. कुपोषणाची समस्या
दूर करायची असेल तर आदिवासींना दर्जेदार, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे.
घराभोवतीच्या दोन-तीन गुंठे जागेत योग्य नियोजन करून परसबाग फुलवली तर
चार-सहा महिने ताजा भाजीपाला रोजच्या आहारासाठी उपलब्ध होऊ शकतो. हे लक्षात
घेऊन ‘बायफ’ने परसबागेचा हा उपक्रम हाती घेतला. यात हंगामी परसबाग आणि
बहुवर्षांयू परसबाग अशा दोन्ही प्रकारच्या परसबागांची लागवड केली जाते.
सुरुवातीला स्थानिक भाजीपाल्यांचे विविध वाण एकत्र करून त्यांचे बियाणे संच
(सीड कीट) तयार करण्यात आले. यामध्ये गावरान भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी,
लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, गावठी काकडी, शेपू, पालक, मेथी,
चाकवत, मुळा, करजकंद यांसारख्या वीस-बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध
बियाणे पुरविण्यात आले. या बियाणांची वैशिष्टय़े म्हणजे हे स्थानिक वाण
असल्याने एकदा पुरवठा केलेल्या बियांपासून तयार केलेल्या भाज्यांचा उपयोग
पुढील हंगामासाठी होतो. हे स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे
आहेच तसेच खाण्यासाठी रुचकरही आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या शेणखत,
गांडूळ खत, कम्पोस्ट खताचा योग्य वापर करून या भाज्या पिकवल्या जातात.
संस्थेच्या मार्गदर्शनामुळे या परसबागा अधिक सुबक व आहारदृष्टय़ा परिणामकारक
ठरत आहेत. एका हंगामात सरासरी ४०० ते ६०० किलोपर्यंत ताजा भाजीपाला
उत्पन्न होतो. वाहून जाणारे पाणी, सांडपाणी याचा काटेकोर वापर यासाठी केला
जातो. बहुवर्षांयू भाजीपाला प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू,
सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता अशी विविध फळझाडे घराच्या भोवती
लावली जातात. मिळणाऱ्या फळांचा, फुलांचा आहारात वापर होतो. यातून
रक्ताक्षय, कुपोषण कमी होण्यासाठी मदत होत आहे. तालुक्यातील ३१ गावांमधील
अडीच हजारपेक्षा जास्त कुटुंबांसाठी ‘बायफ’ ने हा उपक्रम हाती घेतला
असल्याची माहिती ‘बायफ’चे अधिकारी जितीन साठे यांनी दिली. पण आज
त्यापेक्षाही अधिक कुटुंबांकडे ही चळवळ पोहोचली आहे. इथल्या परसबागातून
तयार झालेले बियाणांचे संच राज्याच्या अन्य भागांतही पोहोचले आहेत. बचत
गटाच्या माध्यमातून या वर्षी असे आठ ते दहा हजार बियाणे संच वितरीत करण्यात
आले. आज राज्याच्या विविध भागांतून या योजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ येथे
येत आहेत. प्रत्येक घराभोवती अशी परसबाग उभी राहिली तर कुपोषणाला आळा बसू
शकतो, त्यासाठी घर तेथे परसबाग ही चळवळ राबविण्याची गरज आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!
हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया! पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत 🙏 महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा य...