Saturday, May 13, 2023

म . टा .  वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल , अशी जोरदार आरोळी ठोकत आदिवासी भागातील वाडी वस्तीवरील शाळेतील पोरं  बांबूच्या व प्लॅस्टीकच्या  टोकरीत काळे करवंन्दे घेऊन पर्यटकांना आर्जवी करीत असताना दिसू लागली आहे तर पर्यटकही मोहित होऊन हि करवंदे घेण्यासाठी आपल्या वातानुकूलित गाड्या  रस्त्याच्या कडेला उभ्या करून या मुलांकडून डोंगरची काळी मैना घेताना दिसत आहे . आदिवासी भागाला निसर्गाचे वरदान लाभल्याने कळसुबाई - हरीशचंद्र गड परिसरात आंबळे , करवंदे , जांभळे , मोहाची फुले , आळवे हि फळे व काही ठिकाणी रानफुलेही चमकू लागल्याने या निसर्गातून परिसरातील  आदिवासी छोट्या मुलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे . तर या मिळालेल्या पैशातून हे विधार्थी शाळेतील सहल व शालेय साहित्य घेण्यासाठी वापर करतात असे सोमा प थवे  हा विधार्थी म्हणाला
आदिवासींचा रानमेवा डोंगरची काळीमैना नावाने ओळख असणार्‍याआंबट गोड चवीचे काळेभोर "करवंद" नावाचे फळ पिकु लागल्याने व शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने चिमुकल्यांना रोजगार मिळवून देवु लागला असुन चिमुकले शालेय विद्यार्थी बाजारपेठेमध्ये विक्री करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
        अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील भंडारदरा परिसरात मुरशेत,पांजरे,रतनवाडी,घाटघर,वा
की,मुतखेल आदी ठिकाणी असणाऱ्या जंगलात करवंदाच्या काटेरी जाळ्या भरपूर प्रमाणात असुन साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस या काटेरी जाळ्यांना आंबटगोड चवीचे काळेभोर गोल आकाराचे फळ पिकण्यास सुरुवात होते.त्यालाच आदिवासी ग्रामीण भागात रानमेवा म्हणुन संबोधले जाते.एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की दररोज पहाटे लवकर उठायचे हातात पाटी एवजी डोक्यावर पाटी (टोपली)घ्यायची व जंगलचा रस्ता धरायचा जंगलातील काटेरी जाळ्यांना पिकलेली करवंदे तोडुन जमा करायची व पिंपळाच्या,वडाच्या झाडांच्या पानांची डोमे (द्रोण)तयार करून त्यामध्ये वाटे तयार करून सकाळी भंडारदरा बाजारपेठेत,बगीचा,पर्यटन निवास महामंडळ परिसर,महामंडळाच्या बसेस मध्ये करवंदे घ्या करंवदे आवाज देत विक्री करत रोजगार मिळवायचा.विशेष बाब म्हणजे विक्री करणारे सर्व 10 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थी असून 50 ते 100 रुपये विक्री करतात.साधारण महिनाभर चालणाऱ्या या व्यवसायातातुन मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग शालेय उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी होत असल्याची माहिती शेंडी गावठा येथील ईयत्ता चौथीत शिकणाऱ्या राहुल बोऱ्हाडे या चिमुकल्याने सांगितले.आदिवासी ग्रामीण भागातील डोंगराच्या काळ्या मैनेला गावात जरी योग्य भाव मिळत नसलातरी शहरी भागात 80ते100 रुपये किलो भाव मिळतो मात्र शहरी भागातील बाजारपेठेत जाण्यासाठी वाहतूक खर्च परवडत नसल्याचे देखील यांनी सांगितले. चौकट - हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
कोट ---सौ . राहीबाई पोपेरे --सेंद्रिय शेती  आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळाला आहे तर करवंन्दे व जंगली फळे आमच्या छोटया मुलांना रोजगार मिळवून देत आहे .  तोंडातून काही काव्यही बाहेर आले हिरव्या पानामंधी करवंद
जिभेवर लाळ घोळवती
उघडा-नागडा आदिवासी
परी संस्कृती सदा जपती

काळ्या मैनेचे हे प्रेम
चाखली हजारोंनी माया
कातळ-कपारितला गोडवा
नांगरताना गायी आभाळमाया

काटयांचे असणे कधी
करवंदाला टोचत नाही
संकटांचे जगणे बाई
सरकारला बोचत नाही

हिरवाईचा शालू बघा कसा
करवंद जपतो आहे
फाटलेली मने विकासाची
आदिवासी शिवतो आहे

उघड्या माळरानावर सदा
जाळी करवंदाची रूपवती
योजनांचा वंचित राजा
सह्याद्री संस्कृती पेरती




Monday, April 24, 2023

कौठवाडीकी यात्रा उत्साहात डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस

 कौठवाडीची यात्रा उत्साहात डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस

अकोले, ता.२४:

 कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. डोक्यावर पेटलेले मडके (कठे) घेतलेले भाविक, मडक्याला छिद्रे पाडून, मडक्यात उकळलेले तेल टाकून नवस फेडणारे व बोलणारे भाविक, हे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी येथे गर्दी केली होती. गावात श्री बिरोबादेवाचे मंदिर आहे. कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी केली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला 'कठा' लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. 

कठा म्हणजे मडक्याची घागर. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यात गोडेतेल टाकून चांगली भिजवतात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरे शुभ्र कापड गुंडाळून, वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात. साकिरवाडी येथून सात  वाजता मानाची काठी येते व बिरोबा की जय अशा घोषात ढोल, ताशांच्या गजरात कठे पेटविले जाऊन यात्रेला सुरूवात होते.


मंदिराभोवती उघड्या अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगाला काटा येतो.  यंदा  ७४ कठे पेटविले होते. भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी दत्ता भोईर यांनी दिली. . त्यांनी यथोचित पूजा करून सामुदायिक आरती केली. साकिरवाडी येथून मानाच्या काठीचे आगमन झाले. पुजाऱ्याच्या अंगात येताच कठे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले.  बिरोबा की जय म्हणत मंदिराभोवती ५,  फेरे मारून भाविकांनी नवस फेडले. काहींनी नवसही केले.

सुरेश भांगरे,सरपंच विठ्ठल भांगरे बाळू घोडे सावळेराम भांगरे सर्व यात्रा कमिटी ग्रामस्थांनी नियोजन केले.    मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या साठी राजूर पोलीस स्टेशन चे सा. पो. नि. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली चोक बंदोबस्त करण्यात आला


Saturday, April 22, 2023

अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा

 अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा आज रविवार, दिनांक २३. ४.२०२३ रोजी आहे. यानिमित्ताने दहा वर्षांपूर्वी ‘सकाळ‘च्या सप्तरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख जरूर वाचा आणि हा थरार एकदा प्रत्यक्ष बघाच.


कठ्याच्या यात्रेतील धगधगता थरार....

- भाऊसाहेब चासकर


आधुनिक जीवनशैलीमुळे आपण आपले नैसर्गिक जीवन आणि प्रसन्न मन त्या संस्कृतीच्या हवाली केले आहे. त्याचे काही बरे-वाईट परिणामही आज आपण भोगतो आहोत. मात्र, सह्याद्रीतील गिरीकंदरांत राहणारा आदिवासी समाज अजूनही त्यांच्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांना चिकटून जीवन जगतो आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या रुढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, वहिवाट इत्यादींशी एकरूप झाल्याचे दिसून येते. जीवनात आनंदी राहण्याचा मंत्रच जणू या लोकसंस्कृतीने, परंपरेने आदिवासींना बहाल केला आहे. दरवर्षी चैत्र, वैशाखाच्या सुमारास हे लोक रिकामे होतात. गावांच्या सामुदायिक जत्रांचा तो हंगाम असतो. आदिवासी समाजाची धार्मिकता आणि श्रद्धा यातून दिसते. याशिवाय आदिवासींच्या सांस्कृतिक वेगळेपणाचे मनोज्ञ दर्शनही यातून घडते. अत्यंत तन्मयतेने आणि उत्साहाने हे लोक यात सहभागी होतात.


कौठवाडी. अकोले तालुक्यातील राजूरजवळचे असेच दुर्गम आदिवासी खेडे. अक्षय्य तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते. कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली. पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू येथे मोठी गर्दी करतात. खरे तर बिरोबा हे धनगर समाजाचे दैवत. परंतु येथे कौठवाडीत हा उत्सव साजरा करतात ते महादेव कोळी समाजाचे भाविक. महाराष्ट्राच्या­ लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्रोत्सव असतो. येथील बिरोबाच्या देवस्थानची आख्यायिकाही मजेशीर आहे.


पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी-पाचघ­रचे धनगर लोकं कधी काळी मेंढ्या चारीत चारीत या भागात आले.एका मुक्कामी त्यांना ती पाटी काही उचलेना. मग परतीच्या वाटेवरील मेंढपाळांनी दोघांना देवाच्या पुजेअर्चेसाठी तेथेच ठेवले. बाकी मंडळी गावी परतली. येथील देवस्थान तेव्हापासूनचे! आद्य पूजा-यांची नावे भोईर. म्हणून आजही पूजेचा मान गावातील भोईरांना मिळतो. पूर्वी येथे छोटेखानी मंदिर होते. गावक-यांनी त्याचा अलिकडेच जीर्णोद्धार केलाय. सध्या येथे सभामंडपासह टुमदार मंदिर उभे आहे. चोहोबाजूने सह्य पर्वताच्या डोंगररांगेनं वेढलेल्या कौठवाडीला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेय.


येथील यात्रेचे वैशिष्टय म्हणजे पेटलेले कठे (घागरी)डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यं­त बिरोबाच्या चौथ-याभोवती फे-या मारत असतात. प्रत्येक फेरीगणिक किलो किलोने तेल भाविक मंडळी ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांतून खाली ओघळते. ज्वालांनी लालबुंद झालेल्या आतील निखा-याने किंवा तप्त तेलाने भाविकांना इजा होत नाही असं समज परंपरेने चालत आलाय. तसे झाल्याचे दिसून आलेले नाही. एरवी निखार्‍याजवळ हात गेला तरी आपल्या हाताला चटका बसतो, या पार्श्वभूमीवर येथील हे दृश्य बघणा-याला काहीसे चक्रावून टाकते. नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबावर श्रद्धा आहे.


'कठा' म्हणजे काय, तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणा-या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात. पेट घेतलेला कठा विझू नये, म्हणून आत कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने छानदार नक्षी काढतात. रान चाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा मस्त सजवतात. सजवलेले कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात. भाविक गण यात तेल ओतत असतात. आदिवासी श्रद्धाळू बिरोबला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात. दर वर्षी यात्रेत ३५-४० कठे असतात. एकाच वेळी ते चेतवले जातात. ज्यांच्या अंगात बिरोबा 'संचारतो' असे भक्तगण कठा डोईवर घेवून मिरवतात.


डोक्यावर पेटलेले कठे... त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला... फेरीगणिक ओतले जाणारे तेल... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद... दैवताच्या नावाचा जयघोष... संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर शिवारभर दुमदुमतो आहे... 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असं लयबद्ध चीत्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो आहे... उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळतेय... मात्र फेऱ्यांमागून फेऱ्या सुरूच आहेत... निशाणाच्या काठीमागून मिरवणूक चाललेली... नऊ-साडेनऊला सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यं­त सुरूच असते... कोठून कोठून आलेले यात्रेकरू हा अनोखा नजारा श्वास रोखून, विस्मयचकित मुद्रेनं पाहातच राहातात. आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना सर्वच थक्क होवून जातात...


आता कठ्यांची मिरवणूक संपलेली असते. आपण माघारी फिरतो. परतीच्या वाटेवरून चालू लागतो. तेव्हादेखील आपल्या डोळ्यांसमोर नाचत रहातात काळोखाच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हलते पलिते...तो वाद्यांचा नाद कानात घुमत राहतो... काहीतरी 'निराळे' पाहायला मिळाल्याची साक्ष आपण स्वतःलाच देत असतो. अशी ही कठ्याची यात्रा एकदा तरी पाहावी...


लेखक प्राथमिक शिक्षक असून, अॅक्टिव टीचर्स फोरमचे(महाराष्ट्र) संयोजक आहेत.

Mobile No. 9422855151

Wednesday, November 16, 2022

बाबा तुम्ही शंभरी पार करा असा शुभेछ्या बाल चमुनी देत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना विविध रंगाची गुलाबपुष्प देऊन दिल्या शुभेछ्या...

अकोले, ता.१६: (शांताराम काळे)बाबा तुम्ही शंभरी पार करा असा शुभेछ्या बाल चमुनी देत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना विविध रंगाची गुलाबपुष्प देऊन दिल्या शुभेछ्या...
माजी मंत्री मधुकरराव पिचड गेली दीड महिन्यापासून आजारी होते ते नुकतेच राजूर येथे आले.ते आल्याचे कळताच अनेक हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी गेले.त्याच वेळी राजूर येथील समर्थ विद्यालय च्या विद्यार्थिनी बाल दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री पिचड यांच्या निवासस्थानी पोहचल्या प्रत्येक विद्यार्थिनी हातात गुलाबपुष्प घेऊन पदस्पर्श करत साहेब लवकर बरे व्हा,शंभरी पार करून तुमच्या शंभरी ला आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळू द्या अशी परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो असा शुभेछ्या दिल्या त्यावेळी श्री पिचड भावूक होत चांगले शिक्षण घ्या मोठ्या व्हा देशाच्या विकासाला हातभार लावा असे आशीर्वाद देत मुलांना चॉकलेट दिले.वैष्णवी वालझाडे, खुशबू तांबोळी, माही पवार,अलनाज मनियार ,अक्षरा लहमगे,
कल्याणी मुतडक, मुनाफ मनियार,समर्थ मुतडक, साई मुतडक, कार्तिक भडांगे अनिकेत मुतडक . शिक्षक सुनीता पापळ,मिरा नरसाळे,अनिल नाईकवाडी,भीमाशंकर तोरमल आदींची उपस्थिती होती फोटो..माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना गुलाबपुष्प देऊन बाल चमूनी दिल्या चांगले आरोग्य व्हावे म्हणून शुभेछ्या...

Sunday, November 6, 2022

गं.भा. कलावंताबाई नथुजी भांगरे यांचे वृद्धपकाळाने निधन

अकोले (शांताराम काळे)
अकोले तालुक्यातील मनोहरपूर येथील जुन्या पिढीतील व्यक्तिमत्त्व गं.भा. कलावंताबाई नथुजी भांगरे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते.
त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पार्टी अकोले तालुकाध्यक्ष श्री.सिताराम भांगरे, काँग्रेस चे नेते रजनीकांत भांगरे, सौ. मंगल मांडेकर यांच्या मातोश्री होत्या.
मनोहरपूर येथील स्मशानभूमीत त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, प्रा.राम शिंदे सर, माजी आमदार वैभवराव पिचड, यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी हभप दीपक महाराज देशमुख, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, अकोले एज्युकेशन चे विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सरचिटणीस सुधाकर देशमुख, अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मॉर्डन चे उपप्राचार्य दीपक जोंधळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बाळासाहेब मुळे,तालुका कार्यवाह भाऊसाहेब नवले,भाजपा संगमनेर तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ अशोक इथापे, तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलीक, भाऊसाहेब वाकचौरे, यशवंत अभाळे, शिवसेना तालुका प्रमुख संजय वाकचौरे, संगमनेर साखर कारखाना संचालक संभाजी वाकचौरे,अगस्ती साखर कारखाना संचालक मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ मनोज मोरे आदी उपस्थित होते.

मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेटअकोले तालुक्यातून तटकरे यांचा निषेध

मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेट

अकोले तालुक्यातून तटकरे यांचा निषेध

अकोले

माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्यामुळेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष करीत असल्याची टीका भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह पिचड समर्थकांनी केली आहे.

मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत वाकचौरे यांचेसह विविध कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला

सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतिने निषेध

सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतिने निशद November 06, 2022

 सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतिने निषेध .

अकोले (प्रतिनिधी ) :-
मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
         राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला.
          भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे तालुकाध्यक्ष नाजीम शेख यांनी सुनील तटकरे यांना फोन लावून सांगितले की, मधुकरराव पिचड साहेब हे साहेबच आहे. ते संपणार नाही,ते अहमदनगर जिल्ह्याचे जादूगार आहेत असे सुनावले. असे सूनावताच आ.तटकरे यांनी ओके म्हणत फोन कट केला.हा फोन सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे.
  भाजपा एन टि सेलचे  सचिन उगले यांनी आ.तटकरे यांना फोन लावला व पिचड साहेब हे नांव घेताच आ.तटकरे यांनी फोन कट केला.ही ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सुनिल तटकरे साहेब आज शिर्डित येऊन बोंबलले पिचड साहेब तालुक्याचे नेते झाले मात्र याच सुनिल तटलरेच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ मध्ये पिचड साहेबांचा फोटो यांनी लावलाय उगाच काहीही स्टंट करायचे.
पिचड समर्थक शंभू नेहे यांनी सोशल मिडिया वर तटकरे यांना सूनवताना सांगितले की, आम्ही अनेक वेळा तटकरे यांना पिचड साहेब यांच्या पाया पडताना पाहिले आहे. संतोष सोडनर, संतोष तिकांडे यांनी ही आपल्या पध्दतीने निषेध नोंदविला आहे.

 भाजपचे नेते रमेश राक्षे यांनी तर टोकाची टीका
सुनील तटकरे यांच्यावर करून त्यांच्या विधानांचा जाहीर निषेध केला. 
रमेश राक्षे यांचा सोशल मीडियावरील मेसेज जशाचा तसा खालील प्रमाणे...
. माझ्या तमाम मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथिल अधिवेशनात तटतटकरे , अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मा.पिचड साहेबांवर जसा  एखादा एखाद्याचा हुकमी पाळीव  कुत्रा जसा भुंकतों ना!.. अगदी तसाच काकाची राखणदारी करणारा, पण त्या राखणदारीच्या बदल्यात त्याला पण खासदारकी अनं पोरीला आमदारकी मिळवणारा.....त्या तिकडचा !!.. कोकणातला तटकरे आदिवासी जनतेचा मसिहा म्हणून ज्यांना अवघा महाराष्ट्रच नव्हे तर नुकत्याच महामाहिम राष्ट्रपती झालेल्या द्रोपदी मुर्म यांनी दिल्लीत बोलावून आदिवासी समाजाच्या कल्याणकारी विविध योजनां सबंधी माहिती घेऊन विचारविनिमय केला अशा आदरणीय पिचड साहेबांच्या बाबत जे जे विधानं केली त्याचा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रथम निषेध करतो... पिचड साहेब तालुक्याचे पण नेते राहिले नाही असं विधान या काकाच्या लाभार्थी झिलकर्याने केले आहे, त्या बुद्धहिन व अक्कल शुन्य तटकरे अरे आज घडीला पिचड साहेब दवाखान्यात आहेत ज्या़ंच्या बद्दल तु विधानं करतो त्या पिचड साहेबांच्या मुळे आज तुमची जी राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे तो तुझ्या त्या काकांचा पक्ष ४० वर्ष तुझ्या काकांच्या खांद्याला खांदा भिडवून पिचड साहेबांनी पण कष्ट उचललेले आहे हे लक्षात नसेल तर काकांनां विचार जरा, वाच्याळ विरा इतिहास हा कधीच पुसता येत नाही आणि राहिला प्रश्न त्यांचे नेतृत्व संपले म्हणण्याचा एकट्या पिचड साहेबांचे राजकारण संपविण्यासाठी पुरे सात पक्ष आणि कोटी कोटीने पैसा पेरावा लागला तरी नाकात दम आणला आणि तोंडी फेस आला आणि पिचड साहेबांचे राजकारण संपण्याच्या बाता , झोडतो अरे ५०/५० चे वर आमदार निवडून आणता येईना आणि ऊरताणुन पिचड साहेबांच्या वर बोलतो जरा आत्मपरीक्षण करा तुमचा गृहमंत्री. १०० कोटीच्या वसुलीत जेलची हवा खातोय त्या कुत्र्याची नवाब मलिकची संपत्ती आज कोर्टाने ईडीला जप्त करण्याची सुचना केली  तो तुमचा छगन दोन जेलात मुक्काम करुन आला आहे अरे तुमचा पार कचरा झाला, तुमच्या इज्जतीचा फालुदा होऊन ती तुमची लोकप्रिय इज्जत महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली असताना तुम्ही काय पिचड साहेबांवर बोलताय जरा धिर धरा हे आता वैभव पर्व सुरू झाले आहे .हळूहळू यांचे वादळात रुपांतर होईल तेव्हां तुमचे हे परीस्थिती नुसार बदलणारे बाजारु  दलाल पाल्या पाचोळ्यागत हवेत तरंगतील फक्त wait and watch हि एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता समज कोकणातील काका भक्त लाभार्थी पंडिता तुझ्या साठी आज एवढं पुरेसं

  या सर्व प्रकारातून भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.आता  जिल्ह्यातील व तालुक्यातील पहिल्या पट्टीचे नेते मंडळी याबाबत काय भूमिका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सुनील तटकरे यांच्या समग्र जीवन प्रवास यावर सुद्धा मधुकरराव पिचड यांचा फोटो आहे.

हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!

 हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!  पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...