Saturday, July 23, 2016

baari ghat apghat

मी माझे काम प्रामाणिक पणे केले असून तांत्रिक बिघाडामुळे गाडी दरीत गेली मात्र प्रवासाचे प्राण वाचले  हे माझ्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब असून आपले कर्तव्य बजावत असताना आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवला पाहिजे यापुढे येणाऱ्या कोणत्याही संकटाला मी सामोरे जाईल असे म्हणतानाच चालक मच्छिन्द्र घोडके यांना अश्रू आवरता आले नाही निमित्त होते राजूर परिसरातील ग्रामस्थ , स्वामी समर्थ शिक्षण संस्था व पत्रकारांच्या वतीने आयोजित केलेल्या मच्छिन्द्र घोडके यांनी प्रवासाचे प्राण वाचविल्याबद्दल करण्यात आलेल्या सत्काराचे तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश महाले यांची जामगाव येथील ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राजूर प्रेस क्लब चे अध्यक्ष शांताराम काळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे ,राजेंद्र जाधव , सुमंत वैद्य , किरण माळवे , युवराज हंगेकर अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे विश्वस्त श्रीनिवास एलमामे होते . प्रास्तविक श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ . मंजुषा काळे यांनी केले . यावेळी ग्रामस्थ , विधार्थी व पत्रकार संघ यांचे वतीने चालक घोडके व प्रकाश महाले यांचा सत्कार शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . आपल्या मनोगतात मच्छिन्द्र घोडके म्हणाले मी अकोले येथून निघताना बस चेक केली मात्र बारी घाट सुरू झाल्यानंतर ब्रेकवर पाय ठेवताच ब्रेक लागले नाही व अचानक मोठा आवाज झाला व गाडी चे स्टेरिंग लॉक  झाले मी बस डावीकडे वळविण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही व बस दरीत सरकली मात्र एका मोठ्या खडकावर ती आदळली नि पुढचे टायर मागच्या टायरखाली आल्याने उटी लागली व सर्व प्रवासी वाचले . कालच्या अपघाताच्या प्रसंगाने मला इथे उभे राहण्यास सामर्थ्य नाही मी माझ्या कुटुंबाचा विचार न करता गाडीत बसलेल्या प्रवासाचा विचार केला मात्र परमेश्वरामुळे व माझ्या स्वामींच्या भक्तीमुळे हा प्रसंग टाळला म्हणतानाच ते भावनिक झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू येताना पाहून उपस्थितना  हि भावना आवरता आले नाही तर उपसरपंच व पत्रकार प्रकाश महाले यांनी आपण सामाजिक भावनेतून उपसरपंच झालो असून फक्त गाव विकासाचे ध्येय ठेवून कार्य करू

No comments:

Post a Comment

" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "

" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड " हरिश्चंद्रगड….. निसर्गाला पडलेलं एक अप्रतिम स्वप्न! अवाढव्य , अजस्...