Monday, November 21, 2016

पेमगिरी2

याच पेमगिरी गावापासून जवळच एक भला थोरला वटवृक्ष आहे. भला थोरला म्हणजे किती तर त्यांच्या मूळ खोडाचा पत्ताच लागत नाही. जवळजवळ तीस खोडांचा विस्तार आणि त्याच्या पारंब्या मिळून अंदाजे चार एकर एवढा परिसर या झाडाने व्यापला आहे. त्या झाडाचं वय काही शतके नक्की असणार. या पारंब्यांच्या मधून आपल्याला आतपर्यंत जाता येते. मध्यभागी शेंदूर फासलेले काही दगड, वीरगळ ठेवलेले आहेत. या वडावर गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळेच हा वटवृक्ष अजून उभा आहे. जशी अनेक आंब्यांची आमराई होते तशी ही भल्यामोठय़ा वडाची वटराई इथे पाहायला मिळते. कलकत्त्याच्या शिवपुरी उद्यानातील वडाचे झाड तसेच दक्षिण भारतातील अडय़ार इथला वटवृक्ष हे प्रसिद्ध आहेत. पेमगिरीचा हा भव्य वटवृक्ष तितकाच दर्जेदार आहे. अकोले, भंडारदरा परिसरात भटकंतीसाठी जाताना या सुंदर ठिकाणाला अवश्य भेट द्यावी.

पेमगिरी

इतिहासाच्या पाउलखुणा जपणारा हा आपला प्रदेश! किल्ले, घाटवाटा, मंदिरे, जंगले, समुद्रकिनारे यांनी भरभराटीला आलेला आपला प्रदेश. इथे ऐतिहासिक स्थळांना तोटाच नाही. त्याचसोबत विविध नैसर्गिक, भौगोलिक चमत्कारांनीदेखील महाराष्ट्र संपन्न आहे. ऐतिहासिक ठिकाण आणि निसर्गचमत्कार यांचा सुंदर मिलाफ एकाच ठिकाणी पाहायचा असेल तर संगमनेरजवळ असलेल्या पेमगिरी गावी जायला हवे. पुणे-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या अलीकडे डाव्या हाताला पेमगिरीचा रस्ता जातो. या रस्त्याने अंदाजे २० कि.मी. गेले की आपण पेमगिरी या ऐतिहासिक गावी पोहोचतो. गावाचा पाठीराखा आहे पेमगिरीचा किल्ला. इ.स. १६३३-३४चा काळ. निजामशाही बुडाल्यावर नाणेघाटानजीक असलेल्या जीवधन किल्ल्यावर मूर्तजा नावाचा निजामशाहीचा वारस तुरुंगात

होता. शहाजीराजांनी त्याला तिथून ताब्यात घेतले आणि त्याचसोबत जुन्नर-संगमनेर-नाशिकपासून त्र्यंबकेश्वपर्यंतचा प्रदेशसुद्धा जिंकून घेतला. या सर्व प्रदेशाचा स्वामी म्हणून त्यांनी त्या बाल निजामशहाला आपल्या मांडीवर बसवून राजे त्याचे वजीर बनले. त्याच्या नावाने राज्यकारभार पाहू लागले. दुर्दैवाने इ.स. १६३६मध्ये शहाजहान आणि आदिलशहाच्या संयुक्त फौजांपुढे शहाजीराजांना पराभव स्वीकारावा लागला आणि माहुली इथे झालेल्या तहात त्यांना या मूर्तजा निजामशहाला रणदुल्लाखानाच्या हाती सोपवावे लागले. ह्य सर्व घटनांचा केंद्रिबदू होता हा पेमगिरीचा किल्ला. शहागड असेही याचे एक नाव आहे. ऐतिहासिक पेमगिरी गावात एक जुनी विहीर असून त्यावर शिलालेख आहे. किल्ल्यावर जायला पायऱ्या बांधलेल्या आहेत. तसेच वरती खडकात खोदलेल्या पायऱ्या लागतात. माथ्यावर जायला अर्धा तास खूप झाला. किल्ल्यावर पेमादेवीचे छोटेखानी मंदिर आणि खडकात खोदलेले पाण्याचे एक भले मोठे खांबटाके शिल्लक आहे. गडावरून सभोवतालचा परिसर मोठा रमणीय दिसतो.

अतिथी देवो भंवो भांगरे कुटुंबीय

शेंडी (भंडारदरा )चे भांगरे घराणे म्हणजे तालुक्यातील अनेकांचे हक्काचे घर परिसरातील आदिवासी बरोबरच सर्व साधारण माणसांबरोबरच सामाजिक शैक्षणिक 
राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा हा हक्काचा निवारा. गेली ३ पिढ्यांपासून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या या घराण्याने अतिथी देवो भव 
हा मंत्र मनापासून जपला आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसांपासून उच्च पदास्थानपर्यंत कुणाचेही येथे हसत मुखाने स्वागत होते. घराण्याच्या स्वभावाशी सुसंगत 
असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या स्वभावाला अनुकूल असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या म्हणजे हॉटेल व्यवसायात या घराण्याने आता आपले बस्तान बसविले आहे. 
शेती आणि पशुपालन हा मूळ व्यवसाय असणाऱ्या भांगरे घराण्याची पुढील पिढी परदेशात उच्च शिक्षण घेण्याइतपत प्रगती  झाली आहे. मागील शतकात अनेक 
वर्ष आमदारकी उपभोगणाऱ्या या घराण्याला अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्रात लक्षणीय आमदारकी पुन्हा मिळविता आली नसली तरी तालुक्यातील जनतेच्या 
हृदयातील त्यांचे स्थान आजही आढळ आहे. भांगरे मुळचे तालुक्यातील एकदरा या आदिवाशी खेड्यातले बऱ्याच  वर्षापूर्वी हे घराणे भंडारदरा काठच्या शेंडीला येऊन 
स्थिरावले. दिवंगत गोपाळराव भांगरे हे तालुक्याचे पहिले आमदार त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुतणे कै.यशवंतराव भांगरे अकोल्याचे ३ वेळा आमदार होते. 
आदिवासी समाजातील ज्या घराण्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले त्यात भांगरे घराणे अग्रेसर होते. कै. गोपाळरावाणा  ३ भाऊ त्यातील २ जन शिक्षक होते. शिक्षकी पेशात 
असल्यामुळे कै गोपाळ रावांना १९५२ मध्ये आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे  घराण्याण्यातील पुढची पिढी शिकली. अशोक भांगरे यांचा मुलगा अमित नेदरलंडस येथे कृषी 
व्यवस्थापन शाखेत उच्च शिक्षण घेत आहे. शेती बरोबरच पशु पालन या घराण्याचा मूळ व्यवसाय, काही वर्षापूर्वी शंभर सव्वाशे गायांचा कळप त्यांच्या घरी नांदायचा. 
नवीन पिढीने शेतीतील प्रगती बरोबर व्यवसायाची कास धरली. ६० वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे  उपहार गृह त्यांनी चालविण्यास घेतले होते. तसेच शेंडीला हॉटेलही सुरु केले. 
शेंडी मधील पहिली पीठ गिरणी आणि भात गिरणी त्यांनी सुरु केली. आता भांगरे घराणे हॉटेल व्यासायात चांगले स्थिरावले आहे. भंडारदरा येथे त्यांची वेगवेगळ्या 
दर्जाची ६ हॉटेल्स आहे. तसेच पालघर जिल्ह्यातही पेट्रोलपंप  व हॉटेल आहे.  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सुमारे २५० ते ३०० लोकांना या हॉटेल व्यासायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. २ चुलते 
आणि १३ चुलत भावंडाचे हे कुटुंब. आज यातील काही जन नोकरी करतात. हॉटेल व्यासायाचा विस्तार करण्याबरोबरच भंडारदरा जलाशय परिसरात एक आयुर्वेदिक योग 
उपचार केंद्र सुरु करण्याचा त्यांचा मनोदय आहे. आतिथ्य शीलता हा गुणधर्म ह्या घराण्याने ३ पिढ्यांपासून जपला आहे. घरी आलेल्या पाहुण्याचे नेहमी स्वागत केले जाते. 
सर्वच पक्षांच्या तालुक्यातील छोटया मोठ्या कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी, विवीध अधिकार्यांनी याचा अनुभव घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पासून आजच्या 
पिढीतील तेजस ठाकरेपर्यंत अनेकांचे आदरतिथ्य भांगरे कुटुंबांनी केले आहे. या घराण्याचा आदर तिथ्याचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. कै. यशवंतराव भांगरे 
आमदारकीच्या निवडणुकीला उभे होते. आजच्या सारखी साधने नसल्यामुळे विरोधी कार्यकर्ते सायकलवरून गावगावीप्रचार करत. शेंडी परिसरात विरोधी कार्यकर्त्यांचा 
प्रचार करणारा असाच एक जत्था  यशवंतराव भांगरे यांना भेटला. या विरोधी कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. व रात्री त्यांच्या जेवण्याची सोय स्वतःच्या घरी केली. 
हि परंपरा आजही कायम आहे. यामुळे भंडारदराला येणारे विर्रोधी पक्षांचे लहानमोठे कार्यकर्ते हक्काने भांगरे यांच्या घरी येतात. भंडारदरयात आत्ता आनंदवन, यश,रिसोर्ट 
सारखी भांगरे यांच्या मालकीची हॉटेल्स आहेत. मात्र तेथे उतरणारी विवीध शासकीय अधिकारी, आमदार ,मंत्री, हे बऱ्याच वेळा भांगरे यांच्या घराच्या जेवणाचा आस्वाद 
घेण्यास पसंत करतात. सध्याच्या पिढीतील अशोकराव भांगरे जि.प.चे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे ह्या विद्यमान जिप सदस्य आहे. त्यांचा 
भाऊ दिलीप भांगरे पंचायत समिती सदस्य आहे. या आदिवासी भागातील विविध सामाजिक, संस्कुतिक, शैक्षणिक तसेच कौटुंबिक अडचणी सोडवण्यास सक्रीय पुढे असतो. 
राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे. त्यामुळे ३ पिढ्यांपासून अनेकांना भांगरे यांचे घर हे आपले घर वाटत आहे. अशोक भांगरे यांचे चुलते पांडुरंग बाबा हेच कुटुंबातील सर्व निर्णय घेतात त्यांचे कुटुंबात सुमारे ५०० माणसे जोडली असून.दोन चुलते ,सहा चुलत्या ,तेरा चुलत भावंडे ,२३ चुलत बहिणी या शिवाय आते मामे भावंडे असा हा मोठा गोतावळा . ठिकठिकाणी सध्या विखुरलेले असले तरी दिवाळी सारख्या सणांच्या निमित्ताने हि सर्व भावंडे आवर्जून एकत्र येतात . घराचे गोकुळ बनून जाते. वर्षा दोन वर्षातून तीन चार जणांचे विवाह असतात त्यामुळे भंडारदऱ्याच्या   गार्डन मध्ये साजरा होणारा भांगरे घराण्यातील विवाह सोहळा हा एक प्रकारे सामुदायिक विवाह सोहळाच असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक जमा होतात त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधांना उजाळा मिळतो. नवीन बदलांना सामोरे जात असतांना आधुनिकतेची कास धरतांना या घराण्याने आपल्या सांस्कृतिक प्रथा परंपरा हि आत्मीयतेने जपल्या आहेत. दिवाळी , सण  वार , लग्न समारंभ यावेळी सर्वजण एकत्र येतात तेव्हा त्यांचे घर गोकुळासारखे वाटते . अशोक भांगरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , समाज कल्याण सभापती व ६ वेळा आमदारकीला उभे राहून पराभूत होऊनही आजही हा राग कुणावरही न काढता आपले काही चुकले असेल या भावनेतून आजही समाज प्रवाहात टिकून आहे . राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे त्यामुळे तीन पिढ्यांपासून अनेकांना भांगरे आपल्या घरातील वाटत आहे गावागावात आजही त्यांचा कार्यकर्ता त्यांची वाट पाहत असतो - सोबत फोटो 

युवा उद्योजक प्रवीण देशमुख यंक्सही यशो शिखर गाथा

उद्देमेण हि सिध्यनती कार्यानी न तूमनोरथै:!"हि संस्कृत भाषेतील सुक्ती प्रसिध्द आहे .उद्योगाला,प्रयत्नवादाला, पराक्रमाला,आणिझपाटलेल्या ध्येयवादाला अशक्य काय आहे मात्र त्यासाठी जिद्द,चिकाटी या गोष्टीची जोड मिळणे आवश्यक असते ,प्रवीण देशमुख हा कृतिशील वृत्तीचा तरुण उद्योजक असेच कार्य करून सकारात्मक भूमिका बजावून व आपले स्वप्न नेहमी सकाळ संध्याकाळ आपल्या मनचक्षु समोर ठेवून समाजासमोर वनव उद्योजकासमोर  आदर्शवत ठरला आहे ,जुन्नर तालुक्यातील पिंपळ वंडी या गावात जन्म झालेले प्रवीण देशमुख आपली घरची परिस्थिती बेताची  आजोबा गोपीनाथ देशमुख आठवत नाही वडीलविलासराव देशमुख पदवीधर रेल्वेत काही काळ रमले नंतर आपल्या गावी येऊन शेती करू लागले लहानपणीच मातृछत्र हरपले घरची परिस्थिती बेताची म्हणून नवलेवाडी  येथील आपले मामा बाळासाहेब भालेराव व सखाराम भालेराव यांचेकडे राहून १२वि पर्यंतशिक्षण घेतले तर अपघाताने प्रवरानगरला बिफार्मसी केली २००२ला पास आऊट होऊनशिपला कंपनीत मार्केटिंगरिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीस मात्रलहानपणापासून आपण उद्योजक बनायचे हे बीजारोपण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते ,संगमनेर  व अकोले येथे मेडिकल स्टोअर्स टाकून आपल्या कार्याचा चढता आलेख सुरूच ठेवला नंतर त्यांनी सह्याद्री फूड व ऍग्रो इंडंस्ट्रीज स्थापन करून "ऑकसीमोर"बाटलीबंद पिण्याचे पाणी प्रकल्प सुरू केला ,खेड्याकडे चला या गांधीजींच्या विचारांचा अंगीकार करून अकोले सारख्या आदिवासी भागात कुठलीहीअनुभव व पार्शव भूमी नसताना व सभोवतालचे सर्वच जण तुला हे जमणार का?असे प्रश्न विचारून त्यांना साथ देण्याऐवजी माघारी ओढण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आपल्या उद्दिष्टांपासून तुसभरही न सरकत आपणाला हे  करायचे आहे व  यशस्वी व्हायचेच  आत्मविश्वास बाळगत श्रमाचे गीत गात सचोटी व जिद्दीच्या व प्रचंड आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करीत आज तेयशस्वी उद्योजक म्हणून नव उद्योजकांचे प्रेरणा स्थान बनले आहेत ,अंबानी, बिर्ला, मित्तल,गोयंका यांच्यासारख्याउद्योजकांच्या यशोगाथा नेहमीच प्रकाशझोतात आल्या असून त्यांच्या बद्दल संपूर्ण जगाला माहीती आहे. परंतु असे हजारो तरूण उद्योजक आहेत ज्यांनी कमी वयात अनेकसमस्यांना तोंड देत यशाचे शिखर गाठले असून केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळवीर देखील शाबासकीची थाप  अशाच तरूण उद्योजकांची. त्यांनी मिळवलेल्या यशाची आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेची. प्रवीण देशमुखकाहीतरी नवीन करू पाहतो. पारंपरिक करिअरच्या पुढे जाऊन,झापडबंद पर्यायां पलीकडचा विचारकरून स्वत:च्या मेहनतीने उद्योजकबनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे.प्रवीण देशमुख यांनी अल्पावधीतच सह्याद्री उद्योग समूह यशाच्या शिखरावर पोहचविला आहे. ऑक्सिमोर बाटलीबंद पाण्याचा ब्रान्ड सातत्यपूर्ण दर्जेदार उत्पादन निर्मिती मुळे  बाजारात ग्राहक व विक्रेत्यांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद  यामुळे रोज २५ हजार बॉक्सची म्हणजे सुमारे तीन लाख बाटल्यांची निर्मिती होत आहे या प्रकल्पाच्या यशस्वी वाटचाली बरोबर एक वर्षात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सह्याद्री अग्रो इंडस्ट्रीज आणि प्राव्हेट लिमिटेड ची स्थापना करून “अर्पिता “ब्रान्ड प्रोडक्ट्स माध्यमातून टेस्टी मसाला, पोटाटो चिप्स टोमाटोमस्ती ,नमकीन फल हरी चिवडा ,नमकीन भुजिया शेव , नमकीन लसून शेव ,मसाला बटाटा आदी विविध प्रोडक्ट्सतयार करून त्यांनी राज्यातील मार्केट मध्ये आपले नाव कोरले आहे . सह्याद्री प्याकेजिंग माध्यमातून कच्चा माळ तयारकरण्याचा प्रकल्पही  सुरु करण्याचा त्यांचा मानस असून ज्यूस आणिकोल्ड्रिंक्स चीही निर्मिती  आहेत पुणे , मुंबई , बारामती येथे आपले केंद्र सुरु करून राज्यभर त्यांच्या प्रोडक्ट्चे मार्केटिंग सुरु आहे १४वर्षांपूर्वी आपल्या कार्यकर्तृत्वास दिशा देत आज हा विकासाचा रथ अविरतपणे सुरु आहे डोक्यावर २५ रुपयाचा कर्जाचा बोजा असतानाही न डगमगता नवनवीन योजना आखून ५००० कोटी रुपयांचा टर्न ओहर व १० हजार रोजगार निर्मितीचे त्यांचे स्वप्न आहे दि सिक्रेट च्या माध्यमातून त्यांनी आपले स्वप्न सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवून यशस्वी उद्योजक म्हणून मार्गक्रमण करीत आहे .त्यांची सौभाग्यवती पदवीधर असून त्या या कामात प्रवीण देशमुख याना मदत करतात तसेच एक मुलगा व एक मुलगी असून आपल्या मुलांना घेतील तेव्हडे शिक्षण देण्याचा त्यांचा मांस असून मुलांनी  व्यवसाय सांभाळावा असेही त्यांचे मत आहे .मामाकडे राहत असताना आपणाला घर नाही ही भावना त्यांना नेहमी टोचत होती त्यामुळे नोकरीला लागल्यावर  लगेचच आयसीआय बँकेत साडेचार लाख रुपयांचे कर्ज काढून संगमनेर कॉलेज समोर बंगला बांधला तर आज अकोले येथेही त्यांचे निवास स्थान आहे 20 गुंठे क्षेत्रावर आपल्या व्यवसायाची सुरुवात करून आज 4 एकर क्षेत्रावर त्यांचा उद्योग उभारला जात आहे तर अन्य ठिकाणी जागा घेऊनही ते आपला व्यवसायाचा परीघ वाढवत आहे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे दरवर्षी दिवाळीत ते वेगवेगळ्या ठिकाणी गेट टूगेदर करतात मित्रांना आपले सुख दुःख शेर करतात अनुभव सांगतात प्रवीण यांच्याबद्दल मित्रांना मोठा अभिमान आहे तर कुटुंबही त्यांना मानते लग्न समारंभ ,सणवार याला कुटुंबातील घटक एकत्र येतात ,स्वप्न समोर ठेवून जिद्दीने प्रयत्न केल्यास अशक्य असे काही नाही सकारत्मकता काही काळच टिकते ती सतत टिकून ठेवणे आवश्यक असून आपल्या समोर ध्येय ,उद्धिष्ट ,व स्वप्न असले तर सकारत्मकता टिकते व तुम्हाला यशाच्या शिखरावर आरूढ होता येते  असे प्रवीण देशमुख यांचे मत आहे ,गरिबीचे चटके झेलत ,घरदार नसताना 100 कोटी रुपयांचा उद्योग उभारून प्रवीण देशमुख यांनी गरुड झेप घेत आदिवासी ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून हाताला काम दिले ,तर आपल्या कुटुंबालाही नावलौकिकाच्या कळसावर पोहचविले हे विशेष आज सुमारे 500 कर्मचारी त्यांच्या हाताखाली काम करतात हा आकडा 10 हजारावर न्यायचा आहे तर 100 कोटींचा टर्न ओहर त्यांना 5 हजार कोटींवर न्यायचा आहे हे करताना समाजातील उपेक्षित ,एड्सग्रस्त कुटुंबाना,कुपोषित बालकांना त्यांची मदत होत असतेकोट - प्रविण देशमुख (उद्योजक ) -मित्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द ,प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही .संगणकाच्या युगात वावरतअसतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच

Wednesday, November 16, 2016

बापू

अतिथी देवो भंवो मानणारे भांगरे कुटुंबीय

अतिथी देवो भंवो जपणारे भांगरे कुटुंबीय "-अकोले तालुक्यातील पश्मिम टोकाला असलेला  आदिवासी समाज व त्यांचे नेतृत्व करणारे भांगरे कुटुंबीय ,आजोबा गोपाळराव भांगरे ,वडील यशवंतराव भांगरे हे आमदार म्हणून नावारूपाला आले व सर्व सामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले मात्र आमदार होण्यापूर्वी पिठाची गिरणी ,चहाची टपरी हा व्यवसाय करतानाच आदिवासी लोकांना शहरात जाऊन खर्च पडू नये म्हणून भातगिरणी सुरु केली मात्र आजही ते तिन्ही व्यवसाय त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे ,हे करीत असताना 4 भाऊ त्यांच्यापासून कुटुंबाची व्यापती वाढत गेली आज  ह्यात असलेले 2 चुलते पांडुरंग भांगरे पाटीलबाबा ,व 13 भाऊ ,6 चुलत्या ,4 आत्या ,त्यांची मुले ,नातवंडे ,असा 100 माणसांचे कुटुंब आज कोणतीही कुरबुर व वितुष्ट न होता एकत्र नांदत आहे ,त्यात काही जण नोकरीला ,कुणी शेती व्यवसाय ,कुणी पर्यटन, तर कुणी परदेशात शिक्षण घेत आहे अशोक भांगरे ,दिलीप भांगरे,सुनीता भांगरे,विजय भांगरे हे सर्व जण राज्य, जिल्हा,तालुक्याच्या राजकारणात कार्यरत आहे ,अशोक भांगरे हे जिल्हापरिषद अध्यक्ष ,समाजकल्याण सभापती,जिल्हा सहकारी बँक ,पंचायत समिती सभापती ,सहकारी संस्थांच्या अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सदस्य ,आत्मा कमिटी सदस्य त्यांच्या पत्नी सौ ,सुनीता भांगरे याही जिल्हापरिषद सदस्य होऊन अनेक कमिटीवर काम करतात तर महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात ,दिलीप भांगरेही पंचायत समिती ,सरपंच ग्रामपंचायत शेंडी  त्यांच्या पाठी असलेले विजय ,संजय,दत्तात्रय,पप्पू,भाचे संदीप ,मुलगी सोनाली हेही भांगरे कुटुंबियांची एक ताकद बनले आहेत एक भाऊ देशाच्या सीमेवर आहे ,तर अशोक भांगरे यांचा मुलगा अमित बारामती कृषी विधापीठातून शेती व्यवस्थापन व पूरक उद्योग या साठी नेदरलँड येथे शिक्षण घेत आहे तो लवकरच एमबीए साठी इंग्लडला जाणार आहे ,तर त्याचे इतर तीन भाऊही शेती उद्योगाला प्राधान्य देत शेतीचे शिक्षण घेत आहे ,त्यामुळे आता तिसरी पिढीही शिक्षणाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देत कुटुंबाची अर्थव्यवस्था कशी सुधारेल याबाबीकडे लक्ष्य देत आहे ,शेतीला जोडधंदा म्हणून ऍग्रो टुरिझम क्षेत्रातही भांगरे कुटुंब उतरले आहे तर हॉटेल व्यवसायात उतरून आदिवासी भागातील  व स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे .आनंदवन रिसॉर्ट,यश रिसॉर्ट,अमितरिसॉर्ट,महाराष्ट्र राज्य प्रयत्न विकास महामंडळ मार्फत चालविलेल्या हॉटेल मध्ये सहभाग तर वाकी येथे शेती पर्यटन माध्यमातून पर्यटक सेवा करण्याचे काम ते करतात , दिवाळी,सणवार,लग्न समारंभ ,व सुख दुःखाला सर्व भांगरे कुटुंबीय एकत्र येतात एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात ,प्रत्येकविषयी आपले पण व्यक्त करतात ,त्यांच्याकडे आलेला पाहून हा त्यांच्यासाठी अतिथी देवो भंवो असतो तो भांगरे कुटुंबीयांचा चहा व जेवण केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही गेली 65 वर्षे राजकारणात अशोक भांगरे यांचे आजोबा गोपाळराव भांगरे (१९५२)वडील यशवंतराव भांगरे(१९६२ते१९८०)आमदार होते तर चुलते राजबापू भांगरे(१९८५)व त्यानंतर सतत १९९०पासून अशोक भांगरे विधानसभेच्या निवडणूक लढवतात व तालुक्यातील जनतेला राजकारणापेक्षा समाजकारणाची दिशा देत ते कार्यरत आहेत निवडणुकांमध्ये प्रचारात भांगरे कुटुंबियांना हारविण्याची  भाषा करणारे विरोधकही भंगारेचा पाहूनचार घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही व भांगरे कुटुंबीय राजकारणातील राग ,द्वेष विसरून माझ्या कुटुंबातील एक घटक आला असे समजून त्यांचे आगत  स्वागत करतात ते पाहून विरोधकांनाही लाजल्यासारखे होते ,आजही हि प्रथा भांगरे कुटुंबीयांकडे सुरु आहे आपल्या कुटुंबाचा विचार करतानाच भागातील आदिवासी कुटुंबासाठी यशवंतराव प्रतिष्टान मार्फत ,आरोग्य शिबीर ,कुपोशी बालकांची काळजी ,महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्याचे काम तर भंडारदरा पर्यटन स्थळ प्रकाशात येत असताना या भागातील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल याची काळजी ते घेतात तर सरकार दरबारी वजन असल्याने विविध विकास निधी उपलब्ध करून तालुक्याचा विकासात हातभार लावतात ,पूर्वी 100 गायीचं गोठा त्यांच्याकडे होता शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ,तर आरोग्याबाबत साम्रद व कोळतेंभे येथे आयुर्वेदिक औषओडोपंचार व योग साधना असे 10 एकरात केंद्रय काढण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे ,यशवंतराव चव्हाण,शरद पवार,लालकृष्ण अडवाणी ,गोपीनाथ मुंढे,राष्ट्रीय सेवक संघाचे नानासाहेब देशमुख ,बाळासाहेब विखे ,राधाकृष्ण विखे ,तरअजित दादा,तर आजच्या तेजस ठाकरे पर्यंत सर्वजण भांगरे कुटुंबीयांचा पाहूनचार घेऊन गेलेत तर राज्यातील व राज्यभवरील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांचा भांगरे कुटुंबियांशी जवळकीचा संबंध आहे त्यामुळे सरकार असो आगर नसो भांगरे कुटुंबियांना मंत्रालयात आगर सरकारी कार्यालयात कोणतीही अडचण येत नाही तर चित्रपट श्रुष्टीतील अनेक दिगग्ज त्यांच्या आनंद व यशाला भेट देऊन जातात हे सर्व व्यवसाय उद्योग उभारताना अशोक भांगरे व त्यांच्या कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागला बँकांचे कर्ज वसुली त्यामुळे त्यांचे आरोग्यही बिघडले मात्र घरच्या  लोकांची व पत्नीची  भक्कम  साथ  मिळाल्याने आजही भांगरे कुटुंबीय उद्योग व्यवसायात योग्य ठिकाणी उभे आहेत

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...