Wednesday, November 16, 2016

अतिथी देवो भंवो मानणारे भांगरे कुटुंबीय

अतिथी देवो भंवो जपणारे भांगरे कुटुंबीय "-अकोले तालुक्यातील पश्मिम टोकाला असलेला  आदिवासी समाज व त्यांचे नेतृत्व करणारे भांगरे कुटुंबीय ,आजोबा गोपाळराव भांगरे ,वडील यशवंतराव भांगरे हे आमदार म्हणून नावारूपाला आले व सर्व सामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले मात्र आमदार होण्यापूर्वी पिठाची गिरणी ,चहाची टपरी हा व्यवसाय करतानाच आदिवासी लोकांना शहरात जाऊन खर्च पडू नये म्हणून भातगिरणी सुरु केली मात्र आजही ते तिन्ही व्यवसाय त्यांची तिसरी पिढी सांभाळत आहे ,हे करीत असताना 4 भाऊ त्यांच्यापासून कुटुंबाची व्यापती वाढत गेली आज  ह्यात असलेले 2 चुलते पांडुरंग भांगरे पाटीलबाबा ,व 13 भाऊ ,6 चुलत्या ,4 आत्या ,त्यांची मुले ,नातवंडे ,असा 100 माणसांचे कुटुंब आज कोणतीही कुरबुर व वितुष्ट न होता एकत्र नांदत आहे ,त्यात काही जण नोकरीला ,कुणी शेती व्यवसाय ,कुणी पर्यटन, तर कुणी परदेशात शिक्षण घेत आहे अशोक भांगरे ,दिलीप भांगरे,सुनीता भांगरे,विजय भांगरे हे सर्व जण राज्य, जिल्हा,तालुक्याच्या राजकारणात कार्यरत आहे ,अशोक भांगरे हे जिल्हापरिषद अध्यक्ष ,समाजकल्याण सभापती,जिल्हा सहकारी बँक ,पंचायत समिती सभापती ,सहकारी संस्थांच्या अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे सदस्य ,आत्मा कमिटी सदस्य त्यांच्या पत्नी सौ ,सुनीता भांगरे याही जिल्हापरिषद सदस्य होऊन अनेक कमिटीवर काम करतात तर महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात ,दिलीप भांगरेही पंचायत समिती ,सरपंच ग्रामपंचायत शेंडी  त्यांच्या पाठी असलेले विजय ,संजय,दत्तात्रय,पप्पू,भाचे संदीप ,मुलगी सोनाली हेही भांगरे कुटुंबियांची एक ताकद बनले आहेत एक भाऊ देशाच्या सीमेवर आहे ,तर अशोक भांगरे यांचा मुलगा अमित बारामती कृषी विधापीठातून शेती व्यवस्थापन व पूरक उद्योग या साठी नेदरलँड येथे शिक्षण घेत आहे तो लवकरच एमबीए साठी इंग्लडला जाणार आहे ,तर त्याचे इतर तीन भाऊही शेती उद्योगाला प्राधान्य देत शेतीचे शिक्षण घेत आहे ,त्यामुळे आता तिसरी पिढीही शिक्षणाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देत कुटुंबाची अर्थव्यवस्था कशी सुधारेल याबाबीकडे लक्ष्य देत आहे ,शेतीला जोडधंदा म्हणून ऍग्रो टुरिझम क्षेत्रातही भांगरे कुटुंब उतरले आहे तर हॉटेल व्यवसायात उतरून आदिवासी भागातील  व स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले आहे .आनंदवन रिसॉर्ट,यश रिसॉर्ट,अमितरिसॉर्ट,महाराष्ट्र राज्य प्रयत्न विकास महामंडळ मार्फत चालविलेल्या हॉटेल मध्ये सहभाग तर वाकी येथे शेती पर्यटन माध्यमातून पर्यटक सेवा करण्याचे काम ते करतात , दिवाळी,सणवार,लग्न समारंभ ,व सुख दुःखाला सर्व भांगरे कुटुंबीय एकत्र येतात एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात ,प्रत्येकविषयी आपले पण व्यक्त करतात ,त्यांच्याकडे आलेला पाहून हा त्यांच्यासाठी अतिथी देवो भंवो असतो तो भांगरे कुटुंबीयांचा चहा व जेवण केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही गेली 65 वर्षे राजकारणात अशोक भांगरे यांचे आजोबा गोपाळराव भांगरे (१९५२)वडील यशवंतराव भांगरे(१९६२ते१९८०)आमदार होते तर चुलते राजबापू भांगरे(१९८५)व त्यानंतर सतत १९९०पासून अशोक भांगरे विधानसभेच्या निवडणूक लढवतात व तालुक्यातील जनतेला राजकारणापेक्षा समाजकारणाची दिशा देत ते कार्यरत आहेत निवडणुकांमध्ये प्रचारात भांगरे कुटुंबियांना हारविण्याची  भाषा करणारे विरोधकही भंगारेचा पाहूनचार घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही व भांगरे कुटुंबीय राजकारणातील राग ,द्वेष विसरून माझ्या कुटुंबातील एक घटक आला असे समजून त्यांचे आगत  स्वागत करतात ते पाहून विरोधकांनाही लाजल्यासारखे होते ,आजही हि प्रथा भांगरे कुटुंबीयांकडे सुरु आहे आपल्या कुटुंबाचा विचार करतानाच भागातील आदिवासी कुटुंबासाठी यशवंतराव प्रतिष्टान मार्फत ,आरोग्य शिबीर ,कुपोशी बालकांची काळजी ,महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण करण्याचे काम तर भंडारदरा पर्यटन स्थळ प्रकाशात येत असताना या भागातील तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल याची काळजी ते घेतात तर सरकार दरबारी वजन असल्याने विविध विकास निधी उपलब्ध करून तालुक्याचा विकासात हातभार लावतात ,पूर्वी 100 गायीचं गोठा त्यांच्याकडे होता शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ,तर आरोग्याबाबत साम्रद व कोळतेंभे येथे आयुर्वेदिक औषओडोपंचार व योग साधना असे 10 एकरात केंद्रय काढण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे ,यशवंतराव चव्हाण,शरद पवार,लालकृष्ण अडवाणी ,गोपीनाथ मुंढे,राष्ट्रीय सेवक संघाचे नानासाहेब देशमुख ,बाळासाहेब विखे ,राधाकृष्ण विखे ,तरअजित दादा,तर आजच्या तेजस ठाकरे पर्यंत सर्वजण भांगरे कुटुंबीयांचा पाहूनचार घेऊन गेलेत तर राज्यातील व राज्यभवरील सर्व आयपीएस अधिकाऱ्यांचा भांगरे कुटुंबियांशी जवळकीचा संबंध आहे त्यामुळे सरकार असो आगर नसो भांगरे कुटुंबियांना मंत्रालयात आगर सरकारी कार्यालयात कोणतीही अडचण येत नाही तर चित्रपट श्रुष्टीतील अनेक दिगग्ज त्यांच्या आनंद व यशाला भेट देऊन जातात हे सर्व व्यवसाय उद्योग उभारताना अशोक भांगरे व त्यांच्या कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागला बँकांचे कर्ज वसुली त्यामुळे त्यांचे आरोग्यही बिघडले मात्र घरच्या  लोकांची व पत्नीची  भक्कम  साथ  मिळाल्याने आजही भांगरे कुटुंबीय उद्योग व्यवसायात योग्य ठिकाणी उभे आहेत

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...