Monday, November 21, 2016

युवा उद्योजक प्रवीण देशमुख यंक्सही यशो शिखर गाथा

उद्देमेण हि सिध्यनती कार्यानी न तूमनोरथै:!"हि संस्कृत भाषेतील सुक्ती प्रसिध्द आहे .उद्योगाला,प्रयत्नवादाला, पराक्रमाला,आणिझपाटलेल्या ध्येयवादाला अशक्य काय आहे मात्र त्यासाठी जिद्द,चिकाटी या गोष्टीची जोड मिळणे आवश्यक असते ,प्रवीण देशमुख हा कृतिशील वृत्तीचा तरुण उद्योजक असेच कार्य करून सकारात्मक भूमिका बजावून व आपले स्वप्न नेहमी सकाळ संध्याकाळ आपल्या मनचक्षु समोर ठेवून समाजासमोर वनव उद्योजकासमोर  आदर्शवत ठरला आहे ,जुन्नर तालुक्यातील पिंपळ वंडी या गावात जन्म झालेले प्रवीण देशमुख आपली घरची परिस्थिती बेताची  आजोबा गोपीनाथ देशमुख आठवत नाही वडीलविलासराव देशमुख पदवीधर रेल्वेत काही काळ रमले नंतर आपल्या गावी येऊन शेती करू लागले लहानपणीच मातृछत्र हरपले घरची परिस्थिती बेताची म्हणून नवलेवाडी  येथील आपले मामा बाळासाहेब भालेराव व सखाराम भालेराव यांचेकडे राहून १२वि पर्यंतशिक्षण घेतले तर अपघाताने प्रवरानगरला बिफार्मसी केली २००२ला पास आऊट होऊनशिपला कंपनीत मार्केटिंगरिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नोकरीस मात्रलहानपणापासून आपण उद्योजक बनायचे हे बीजारोपण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते ,संगमनेर  व अकोले येथे मेडिकल स्टोअर्स टाकून आपल्या कार्याचा चढता आलेख सुरूच ठेवला नंतर त्यांनी सह्याद्री फूड व ऍग्रो इंडंस्ट्रीज स्थापन करून "ऑकसीमोर"बाटलीबंद पिण्याचे पाणी प्रकल्प सुरू केला ,खेड्याकडे चला या गांधीजींच्या विचारांचा अंगीकार करून अकोले सारख्या आदिवासी भागात कुठलीहीअनुभव व पार्शव भूमी नसताना व सभोवतालचे सर्वच जण तुला हे जमणार का?असे प्रश्न विचारून त्यांना साथ देण्याऐवजी माघारी ओढण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आपल्या उद्दिष्टांपासून तुसभरही न सरकत आपणाला हे  करायचे आहे व  यशस्वी व्हायचेच  आत्मविश्वास बाळगत श्रमाचे गीत गात सचोटी व जिद्दीच्या व प्रचंड आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करीत आज तेयशस्वी उद्योजक म्हणून नव उद्योजकांचे प्रेरणा स्थान बनले आहेत ,अंबानी, बिर्ला, मित्तल,गोयंका यांच्यासारख्याउद्योजकांच्या यशोगाथा नेहमीच प्रकाशझोतात आल्या असून त्यांच्या बद्दल संपूर्ण जगाला माहीती आहे. परंतु असे हजारो तरूण उद्योजक आहेत ज्यांनी कमी वयात अनेकसमस्यांना तोंड देत यशाचे शिखर गाठले असून केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळवीर देखील शाबासकीची थाप  अशाच तरूण उद्योजकांची. त्यांनी मिळवलेल्या यशाची आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेची. प्रवीण देशमुखकाहीतरी नवीन करू पाहतो. पारंपरिक करिअरच्या पुढे जाऊन,झापडबंद पर्यायां पलीकडचा विचारकरून स्वत:च्या मेहनतीने उद्योजकबनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे.प्रवीण देशमुख यांनी अल्पावधीतच सह्याद्री उद्योग समूह यशाच्या शिखरावर पोहचविला आहे. ऑक्सिमोर बाटलीबंद पाण्याचा ब्रान्ड सातत्यपूर्ण दर्जेदार उत्पादन निर्मिती मुळे  बाजारात ग्राहक व विक्रेत्यांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद  यामुळे रोज २५ हजार बॉक्सची म्हणजे सुमारे तीन लाख बाटल्यांची निर्मिती होत आहे या प्रकल्पाच्या यशस्वी वाटचाली बरोबर एक वर्षात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सह्याद्री अग्रो इंडस्ट्रीज आणि प्राव्हेट लिमिटेड ची स्थापना करून “अर्पिता “ब्रान्ड प्रोडक्ट्स माध्यमातून टेस्टी मसाला, पोटाटो चिप्स टोमाटोमस्ती ,नमकीन फल हरी चिवडा ,नमकीन भुजिया शेव , नमकीन लसून शेव ,मसाला बटाटा आदी विविध प्रोडक्ट्सतयार करून त्यांनी राज्यातील मार्केट मध्ये आपले नाव कोरले आहे . सह्याद्री प्याकेजिंग माध्यमातून कच्चा माळ तयारकरण्याचा प्रकल्पही  सुरु करण्याचा त्यांचा मानस असून ज्यूस आणिकोल्ड्रिंक्स चीही निर्मिती  आहेत पुणे , मुंबई , बारामती येथे आपले केंद्र सुरु करून राज्यभर त्यांच्या प्रोडक्ट्चे मार्केटिंग सुरु आहे १४वर्षांपूर्वी आपल्या कार्यकर्तृत्वास दिशा देत आज हा विकासाचा रथ अविरतपणे सुरु आहे डोक्यावर २५ रुपयाचा कर्जाचा बोजा असतानाही न डगमगता नवनवीन योजना आखून ५००० कोटी रुपयांचा टर्न ओहर व १० हजार रोजगार निर्मितीचे त्यांचे स्वप्न आहे दि सिक्रेट च्या माध्यमातून त्यांनी आपले स्वप्न सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवून यशस्वी उद्योजक म्हणून मार्गक्रमण करीत आहे .त्यांची सौभाग्यवती पदवीधर असून त्या या कामात प्रवीण देशमुख याना मदत करतात तसेच एक मुलगा व एक मुलगी असून आपल्या मुलांना घेतील तेव्हडे शिक्षण देण्याचा त्यांचा मांस असून मुलांनी  व्यवसाय सांभाळावा असेही त्यांचे मत आहे .मामाकडे राहत असताना आपणाला घर नाही ही भावना त्यांना नेहमी टोचत होती त्यामुळे नोकरीला लागल्यावर  लगेचच आयसीआय बँकेत साडेचार लाख रुपयांचे कर्ज काढून संगमनेर कॉलेज समोर बंगला बांधला तर आज अकोले येथेही त्यांचे निवास स्थान आहे 20 गुंठे क्षेत्रावर आपल्या व्यवसायाची सुरुवात करून आज 4 एकर क्षेत्रावर त्यांचा उद्योग उभारला जात आहे तर अन्य ठिकाणी जागा घेऊनही ते आपला व्यवसायाचा परीघ वाढवत आहे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे दरवर्षी दिवाळीत ते वेगवेगळ्या ठिकाणी गेट टूगेदर करतात मित्रांना आपले सुख दुःख शेर करतात अनुभव सांगतात प्रवीण यांच्याबद्दल मित्रांना मोठा अभिमान आहे तर कुटुंबही त्यांना मानते लग्न समारंभ ,सणवार याला कुटुंबातील घटक एकत्र येतात ,स्वप्न समोर ठेवून जिद्दीने प्रयत्न केल्यास अशक्य असे काही नाही सकारत्मकता काही काळच टिकते ती सतत टिकून ठेवणे आवश्यक असून आपल्या समोर ध्येय ,उद्धिष्ट ,व स्वप्न असले तर सकारत्मकता टिकते व तुम्हाला यशाच्या शिखरावर आरूढ होता येते  असे प्रवीण देशमुख यांचे मत आहे ,गरिबीचे चटके झेलत ,घरदार नसताना 100 कोटी रुपयांचा उद्योग उभारून प्रवीण देशमुख यांनी गरुड झेप घेत आदिवासी ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून हाताला काम दिले ,तर आपल्या कुटुंबालाही नावलौकिकाच्या कळसावर पोहचविले हे विशेष आज सुमारे 500 कर्मचारी त्यांच्या हाताखाली काम करतात हा आकडा 10 हजारावर न्यायचा आहे तर 100 कोटींचा टर्न ओहर त्यांना 5 हजार कोटींवर न्यायचा आहे हे करताना समाजातील उपेक्षित ,एड्सग्रस्त कुटुंबाना,कुपोषित बालकांना त्यांची मदत होत असतेकोट - प्रविण देशमुख (उद्योजक ) -मित्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द ,प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही .संगणकाच्या युगात वावरतअसतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...