Monday, November 20, 2017

शेंडी (भंडारदरा )चे भांगरे घराणे म्हणजे तालुक्यातील अनेकांचे हक्काचे घर परिसरातील आदिवासी बरोबरच सर्व साधारण माणसांबरोबरच सामाजिक शैक्षणिक
राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा हा हक्काचा निवारा. गेली ३ पिढ्यांपासून तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात विशेष ठसा उमटवणाऱ्या या घराण्याने अतिथी देवो भव 
हा मंत्र मनापासून जपला आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणसांपासून उच्च पदास्थानपर्यंत कुणाचेही येथे हसत मुखाने स्वागत होते. हा मंत्र आता तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे येऊ घातला असून अमित अशोक भांगरे या सुशिक्षित व सुसंस्कारित तरुणाने समाजकारणातून उद्योग उभारणी साठी  आगेकूच केली आहे . त्यामुळे  घराण्याण्यातील पुढची पिढी शिकली. अशोक भांगरे यांचा मुलगा अमित नेदरलंडस येथे कृषी
व्यवस्थापन शाखेत उच्च शिक्षण  अभ्यास पूर्ण करून त्याने एमबीए प्रवेश घेतला आहे . तर आपल्या
घराण्याच्या स्वभावाशी सुसंगत 
असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या स्वभावाला अनुकूल असणाऱ्या आतिथ्य शिलतेच्या म्हणजे हॉटेल व्यवसायात या घराण्याने आता आपले बस्तान बसविले आहे.
शेती आणि पशुपालन हा मूळ व्यवसाय असणाऱ्या भांगरे घराण्याची पुढील पिढी परदेशात उच्च शिक्षण घेण्याइतपत प्रगती  झाली आहे. मागील शतकात अनेक
वर्ष आमदारकी उपभोगणाऱ्या या घराण्याला अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्रात लक्षणीय आमदारकी पुन्हा मिळविता आली नसली तरी तालुक्यातील जनतेच्या
हृदयातील त्यांचे स्थान आजही आढळ आहे. भांगरे मुळचे तालुक्यातील एकदरा या आदिवाशी खेड्यातले बऱ्याच  वर्षापूर्वी हे घराणे भंडारदरा काठच्या शेंडीला येऊन
स्थिरावले. दिवंगत गोपाळराव भांगरे हे तालुक्याचे पहिले आमदार त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुतणे कै.यशवंतराव भांगरे अकोल्याचे ३ वेळा आमदार होते.
आदिवासी समाजातील ज्या घराण्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले त्यात भांगरे घराणे अग्रेसर होते. कै. गोपाळरावाणा  ३ भाऊ त्यातील २ जन शिक्षक होते. शिक्षकी पेशात
असल्यामुळे कै गोपाळ रावांना १९५२ मध्ये आमदारकीची संधी मिळाली. शेती बरोबरच पशु पालन या घराण्याचा मूळ व्यवसाय, काही वर्षापूर्वी शंभर सव्वाशे गायांचा कळप त्यांच्या घरी नांदायचा.
नवीन पिढीने शेतीतील प्रगती बरोबर व्यवसायाची कास धरली. ६० वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे  उपहार गृह त्यांनी चालविण्यास घेतले होते. तसेच शेंडीला हॉटेलही सुरु केले.
शेंडी मधील पहिली पीठ गिरणी आणि भात गिरणी त्यांनी सुरु केली. आता भांगरे घराणे हॉटेल व्यासायात चांगले स्थिरावले आहे. भंडारदरा येथे त्यांची वेगवेगळ्या
दर्जाची ६ हॉटेल्स आहे. तसेच पालघर जिल्ह्यातही पेट्रोलपंप  व हॉटेल आहे.  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सुमारे २५० ते ३०० लोकांना या हॉटेल व्यासायातून रोजगार उपलब्ध झाला आहे. २ चुलते
आणि १३ चुलत भावंडाचे हे कुटुंब. आज यातील काही जन नोकरी करतात. हॉटेल व्यासायाचा विस्तार करण्याबरोबरच भंडारदरा जलाशय परिसरात एक आयुर्वेदिक योग
उपचार केंद्र सुरु करण्याचा त्यांचा मनोदय आहे. आतिथ्य शीलता हा गुणधर्म ह्या घराण्याने ३ पिढ्यांपासून जपला आहे. घरी आलेल्या पाहुण्याचे नेहमी स्वागत केले जाते.
सर्वच पक्षांच्या तालुक्यातील छोटया मोठ्या कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी, विवीध अधिकार्यांनी याचा अनुभव घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पासून आजच्या
पिढीतील तेजस ठाकरेपर्यंत अनेकांचे आदरतिथ्य भांगरे कुटुंबांनी केले आहे. या घराण्याचा आदर तिथ्याचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो. कै. यशवंतराव भांगरे 
आमदारकीच्या निवडणुकीला उभे होते. आजच्या सारखी साधने नसल्यामुळे विरोधी कार्यकर्ते सायकलवरून गावगावीप्रचार करत. शेंडी परिसरात विरोधी कार्यकर्त्यांचा 
प्रचार करणारा असाच एक जत्था  यशवंतराव भांगरे यांना भेटला. या विरोधी कार्यकर्त्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. व रात्री त्यांच्या जेवण्याची सोय स्वतःच्या घरी केली. 
हि परंपरा आजही कायम आहे. यामुळे भंडारदराला येणारे विर्रोधी पक्षांचे लहानमोठे कार्यकर्ते हक्काने भांगरे यांच्या घरी येतात. भंडारदरयात आत्ता आनंदवन, यश,रिसोर्ट
सारखी भांगरे यांच्या मालकीची हॉटेल्स आहेत. मात्र तेथे उतरणारी विवीध शासकीय अधिकारी, आमदार ,मंत्री, हे बऱ्याच वेळा भांगरे यांच्या घराच्या जेवणाचा आस्वाद
घेण्यास पसंत करतात. सध्याच्या पिढीतील अशोकराव भांगरे जि.प.चे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी सुनीताताई भांगरे ह्या विद्यमान जिप सदस्य आहे. त्यांचा
भाऊ दिलीप भांगरे पंचायत समिती सदस्य आहे. या आदिवासी भागातील विविध सामाजिक, संस्कुतिक, शैक्षणिक तसेच कौटुंबिक अडचणी सोडवण्यास सक्रीय पुढे असतो.
राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे. त्यामुळे ३ पिढ्यांपासून अनेकांना भांगरे यांचे घर हे आपले घर वाटत आहे. अशोक भांगरे यांचे चुलते पांडुरंग बाबा हेच कुटुंबातील सर्व निर्णय घेतात त्यांचे कुटुंबात सुमारे ५०० माणसे जोडली असून.दोन चुलते ,सहा चुलत्या ,तेरा चुलत भावंडे ,२३ चुलत बहिणी या शिवाय आते मामे भावंडे असा हा मोठा गोतावळा . ठिकठिकाणी सध्या विखुरलेले असले तरी दिवाळी सारख्या सणांच्या निमित्ताने हि सर्व भावंडे आवर्जून एकत्र येतात . घराचे गोकुळ बनून जाते. वर्षा दोन वर्षातून तीन चार जणांचे विवाह असतात त्यामुळे भंडारदऱ्याच्या   गार्डन मध्ये साजरा होणारा भांगरे घराण्यातील विवाह सोहळा हा एक प्रकारे सामुदायिक विवाह सोहळाच असतो. या सोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक जमा होतात त्यामुळे कौटुंबिक नाते संबंधांना उजाळा मिळतो. नवीन बदलांना सामोरे जात असतांना आधुनिकतेची कास धरतांना या घराण्याने आपल्या सांस्कृतिक प्रथा परंपरा हि आत्मीयतेने जपल्या आहेत. दिवाळी , सण  वार , लग्न समारंभ यावेळी सर्वजण एकत्र येतात तेव्हा त्यांचे घर गोकुळासारखे वाटते . अशोक भांगरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , समाज कल्याण सभापती व ६ वेळा आमदारकीला उभे राहून पराभूत होऊनही आजही हा राग कुणावरही न काढता आपले काही चुकले असेल या भावनेतून आजही समाज प्रवाहात टिकून आहे . राजकीय सत्ता असो अथवा नसो जनमानसातील या घराण्याचे स्थान टिकून आहे त्यामुळे तीन पिढ्यांपासून अनेकांना भांगरे आपल्या घरातील वाटत आहे गावागावात आजही त्यांचा कार्यकर्ता त्यांची वाट पाहत असतो - त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत व संस्काराचा वारसा संवर्धन करीत अमित यानेही समाजिक बांधिलकी जपली आहेसमाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी आजच्या आधुनिक युगात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील समीकरणे बदलले आहेत. पुरोगामीची जागा आधुनिकीकरणाने काबीज केली आहे. सामाजिक व राजकीय नेत्यांनी आणि कार्यकत्र्यांनी पूरोगामी विचारांची नाळ सोडून आधूनिकीकरणाशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे समाजकारणा पासून आपले बहुसंख्ये नेते दुरावले आणि राजकारणाशी जोडले गेले परिणामी राजकारण्यांवरिल सामाजिक विश्वास ढळू लागला आहे. हे लक्षात घेवून समाजकारण आणि राजकारण यांचा समन्वय साधून भा.ज.पा. चे जेष्ट नेते अशोक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत समाजमनाच्या -हदयात प्रेमाची इमारत उभा करण्याचे निखळ काम अमित अशोकराव भांगरे हे उमदे युवा नेतृत्व करत आहेत या कार्यशैलीमुळेच आपली समाजकारणात आणि राजकारणात यशाचे एक पाऊल पुढे टाकत दमदार वाटचाल करित आहेत. सोबत फोटो

bhandardara























भंडारदरा परिसराच्या निसर्गात अजून एक भर घालण्यासाठी

म . टा . वृत्तसेवा , अकोले : भंडारदरा परिसराच्या निसर्गात अजून एक भर घालण्यासाठी तसेच सामाजिक भावना जपत येथील आदिवासी तरुण, महिला  व शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती साठी वाल्मिक केंद्रे या युवा  उद्योजकांने   पर्यटकांना हेलिकॅप्टर सफर करून कळसुबाई हरीशचंद्र गड परिसराचा आनंद घेता यावा म्हणून पाऊले उचलली असून या कामाला सुरुवातही झाली आहे . एयर एलोरा एव्हिएशन प्राव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून चिचोंडी शिवारात हेलिपॅड बनविण्याचे काम हि सुरु करण्यात आले आहे . नांदेड , औरंगाबाद व आता भंडारदरा हे ठिकाण निवडून मुंबई येथून येणारे पर्यटक हेलिकॅप्टर मधून येऊन इथली निसर्ग म्हाळुं झाल्यावर शिर्डी येथे दर्शन करून पुन्हा मुंबई येथे जातील असा त्यांचा उद्देश असून भंडारदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना एका दिवसात सर्व स्थळे पाहता येत नाहीत त्यासाठी मुक्कामही करावा लागतो . मात्र विल्मकीक केंद्रे यांची कंपनी हेली टुरिझम माध्यमातून भंडारदरा , रतनगड , सांदणदरी , घाटघर , कळसुबाई ,हरीशचंद्रगड , हि ठिकाणे दाखविणार आहेत त्यासाठी स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मांनस आहे . तर येथील अन्य तरुणांना वडापाव , , भाजी चहा , घरगुती जेवण , बोटिंग , हॉर्स रायडींग , बैलगाडी प्रवास , त्यामाध्यमातून कृषी पर्यटन उभारून त्यांना आर्थिक मदतही करणार आहेत तर आदिवासी भागातील शेतकऱ्यांना भाताच्या विविध जातींचा अभ्यास करून  आदिवासी भागात तयार करून त्यातून अधिक उत्पादन व सेंद्रिय शेतीची चळवळ ते उभी करणार आहेत त्यासाठी स्थानी संस्थांची मदतही ते घेणार आहेत . वाहतूक रस्ते , यामुळे फिल्म इंडस्ट्रीज या भागात इच्छा असूनही येत नाही त्यांना या भागात येण्यासाठी त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधांचे तसेच स्थानिक कामगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन वाल्मिक केंद्रे करणार असल्याचे त्यांनी सांगितले . हेलिकॅप्टर सोबतच ओपन बस , ओपन जिप्सी , छोट्या गाड्या , टांगा , तसेच बुलेट उपलब्ध करून त्यांना गाईडच्या माध्यमातून सर्व परिसर योग्य वेळात पाहता यावा तसेच स्थानिक पोलीस व सुरक्षा दलाची स्थापना करून पर्यटकांना येणाऱ्या अडचणीवर मत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे . तर राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या सहली अधिक प्रमाणात येण्यासाठी मार्केटिंग करून विध्यार्थ्यांना भंडारदरा व परिसरातील आदिवासी लोक संस्कृती , आदिवासी वस्तूंचे प्रदर्शन व सादरीकरण करता यावे म्हणून भव्य दालन उभारणार आहेत . हेवी टुरिझम व पॅराग्लायडिंग ,गिर्यारोहक व ट्रॅकर्स साठी नवनवीन योजना त्यांनी उपलब्ध केल्या आहेत सुरुवातीच्या काळात प्रथम १०० आदिवासींना त्यातून रोजगार उपलब्ध करून वर्षभरात १००० आदिवासींना रोजगार उपलब्ध करूनदेण्याचा त्यांचा मांनस आहे . आदिवासी भागातील कमी उत्पन्न गटातील १०० गरीब जेष्ठ नागरिकांना उदघाटन प्रसंगी मोफत प्रवास असणार आहे तसेच या परिसरातील स्थानिक नागरिकांना अर्धे तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे . अकोले तालुक्यातील अधिकारी पुढारी ग्रामस्थ यांनी पर्यटनासाठी केलेल्या प्रयत्नात आपण निश्चित भर घालणार असून भंडारदरा पर्यटन केंद्र जागतिक दर्जाचे पर्यटन  केंद्र बनविण्याचा आपल्याला आत्मविश्वास आहे , हे करीत असताना हजारो हातानं काम मिळेल , प्रयत्नाला कुठेही बाधा येणार नाही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही पर्यावरणाचे संवर्धन होऊन आदर्श पर्यटन केंद्र होण्यासाठी आपला प्रयत्न असेल असेही केंद्रे म्हणाले . शिर्डी शिंगणापूर , लोणावळा येथील पर्यटक इथे आणून माफक दारात त्यांना सुविधा दिल्यास येथील आदिवासींना रोजगारासाठीस्थलांतर करण्याची आवश्यकता राहणार नाही गेली वर्षभरापासून मी या परिसराचा अभ्यास करीत असून पर्यटन वाढविण्यासाठी रायगडावर रोपवे होत असेल तर कळसुबाई शिखरावर व हरीशचंद्र गडावरही होण्यासाठी केंद्र व राज्य सरकार शी पाठपुरावा करून जो विकास महाबळेशवर चा झाला तोच भंडारदरा परिसराचा होण्यासाठी अनुभवी लोक तद्न्य मार्गदर्शक घेऊन आपण हा प्रकल्प राबवित आहोत . पैसे कमविणे हे माझे ध्येय नसून मी माणसे जोडणारा कार्यकर्ता आहे माणसे जोडून त्यांच्या हाताला काम देणे इथली आदिवासी कला संस्कृतीची जोपासना करून त्यातूनही रोजगार निर्मिती करण्याचा मांन स असून लवकरच या भागातील तरुणांना एकत्र करून त्यांना पर्यटनाचे महत्व पटवून नदेउं न या महा यज्ञात सहभागी होण्याचे आव्हान करणार आहे . सोबत फोटो RJU १९प २,३,४   केंद्रे  वाल्मिक , हेलिपॅड बनविण्याचे काम युध्य पातळीवर सुरु आहे
3 Attachments

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (

म.टा.वृत्तसेवा अकोले - -सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (१६४६मि. )सह लहान मोठे पर्वतशिखरे डोंगर सुळके उरात धडकी निर्माण करणाऱ्या  येथील खोल दऱ्या हरिचंद्र गडाच्या कोकण कडयासह लहान मोठे कडे वैभवशाली इतिहास आणि संस्कृतीची साथ देणारे हरिचंद्र गड, रतन गडासह लहान मोठे डझन दिड डझन गड किल्ले  दंडकारण्यातील वनाचे अजूनही बर्यापैकी टिकून असणारे जंगल त्यातील जैव विविधता यांचा हा प्रदेश तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात तीन ते पाच हजर मि मि पाऊस  पडतो, मुळा , प्रवरा,आढळा , म्हाळुंगी, कृष्णावंती या नद्या याच परिसरात उगम पावतात जिल्ह्याच्या मोठ्या भागाची तहान या नद्या भागवतात. मात्र येथील निसर्गाची भूभागाची हवामानाची ती विविधता एकेकाळी या भागाच्या विकासातील अडसर ठरली तालुक्यातील अनेक लहान मोठी खेडी, दुर्गम होती. चार महिने तालुक्याच्या मोठ्या भागाचा  संपर्क पावसाळ्यात अन्य भागाशी तुटायचा या निसर्गानेच मागासलेपणाचा शिक्का तालुक्याच्या माथी मारला होता.  मात्र हळूहळू हे चित्र बदलत आहे जल, जंगल, जमीन या नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य पद्धतीने वापर होऊ लागल्यामुळे तालुक्याचे चित्र काही वर्षात बदलले आहे.
विकासाच्या वाटेवरील     प्रगतीतील तालुका     अशी तालुकयाची नवी ओळख होऊ लागली आहे. या परिसरात बांधली गेलेली लहान मोठी धरणे   समृद्ध वनसंपदा डोंगर पठारावरून वाहणारा भन्नाट वारा  यांच्या जोडीला स  कष्टाळू माणसाचे अविरत प्रयत्न, संस्था, व्यक्ती यांचे  कमी अधिक योगदान विकास प्रक्रियेत आहे.
१९२६ साली बांधून पूर्ण झालेले ११ टी एम सीचे भंडारदरा धरण हा तालुक्याबरोबर जिल्हातील मोठा सिंचन प्रकल्प, सह्याद्रीच्या डोंगर रांगा  धो धो कोसळणारे पावसाचे पाणी २७० फुट उंचीच्या दगडी भिंतीने आडविले. आडवीलेले हे पाणी  नदीतून पाटात, पाटातून शेतात फिरू लागले. आणि उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचे चित्र बदलले ओसाड माळ रानावर ऊस मळे उभे राहिले  साखर कारखाने निर्माण झाले पहिल्या सहकारी साखर कारखान्या च्या रूपाने सहकाराच्या नवीन  अध्यायाचा श्रीगणेशा झाला  अर्थात दुष्काळी    भागाचे रूप भंडारदरा   धरणा मुळे पालटले असले तरी अकोले तालुक्याला  मात्र आता पर्यंत त्याचा  फायदा झाला नव्हता कारण भंडारदरा धरणाचे कालवे धरणाच्या भिंतीपासून ८५ किलोमीटर वर सुरु होतात . पावसाळ्याबरोबरच आता १२ हि महिने   वाहत जाणारे प्रवरेच्या पाणी पाहात राहणे तालुक्याच्या नशिबी होते मात्र मागील शतकात ७० च्या दशकात अकोले तालुक्यात वीज येऊन पोहचली नदीवरून पाणी उपसा करण्यासाठी उपसासिंचन योजनेना चे तंत्र विकसित होत गेले आणि प्रवरेच्या पाण्याचा हळूहळू वापर  प्रवरा नदीकाठच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी  सुरु केला . मात्र भंडारदरायचा पाण्याचा वर्षानुवर्षे वापर करीत असलेल्या प्रस्थापितांना हे पाहावले नाही . आपल्या हक्काचे पाणी उचलणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी चोर ठरविले गेले . त्यातूनच हक्कच्या पाण्यासाठी मोठी चळवळ अकोले तालुक्यात उभी राहिली १९८८  साली  जनरेट्यामुळे भंडारदरा  धरणाच्या पाण्याचे फेर वाटप करावे लागले तालुक्याला १२ टक्के हक्काचे पाणी मिळाले लहान मोठ्या उपसासिंचन योजना प्रवरा खोऱ्यात उभ्या राहिल्या या पाण्यामुळे इथली शेतीचे स्वरूप पालटले उसा  बरोबरच टोमॅटो आणि अन्य  भाजीपाला पिके शेतकरी घेऊ लागला त्यामुळे प्रवरा खोऱ्याचा अर्थकारणाला गती मिळाली प्रवरा खोऱ्याचा हा भाग शेतीच्या दृष्टीने अतिशय प्रगत समजला जातो प्रवरेच्या पाण्यावर पिकणाऱ्या या उसामुळे अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्मिती झाली विकासाचे एक नवीन केंद्र तालुक्यात उदयाला आले . आज अकोले तालुक्याच्या कृषी अ र्थ  कारणात भंडारदरा व अगस्ती  कारखान्याचा मोठा वाटा आहे .
 तालुक्याच्या उत्तर भागातील देवठाण येथे १०६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणामुळे आढळा खोऱ्यातही मोठी क्रांती झाली असून ८ माही पद्धतीचे राज्यातील हे पहिले धरण आहे . आज आढळा लाभ क्षेत्रातील हिवरगाव , वीरगाव , पिंपळगाव ,डोंगरगाव , गणोरे परिसरातील शेतकरी डाळिंब , कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत . गुणवत्तेमुळे इथली अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब निर्यात होतात तर कांदा पिकामुळे  काही कोटीची उलाढाल होते . नुकतेच बांधून पूर्ण झालेल्या निळवंडे धरणामुळे प्रवरा खोऱयातील भंडारदरा पाण्यापासून वंचित असलेल्या भागास शाश्वत पाणी मिळणार आहे . वेगवेगळ्या उंचीवर डावा  आणि उजवा असे चार कालवे असणारे निळवंडे हे अपवादात्मक धरण या मोठ्या आणि माध्यम प्रकल्पाबरोबरच गेल्या दोन तपाच्या कालावधीत तालुक्यात वाकी , सांगवी , पाडोशी , टिटवी , बलठन ,कोथळे , आंबित , घोटी शिळवंडी , शिरपुंजे , बोरी , पिंपळगाव खांड , येसर ठाव , असे सुमारे डझनभर कमी अधिक क्षमतेचे लघु पाटबंधारे तलाव निर्माण झाले या तलावामुळे त्या त्या परिसरातील शेतीचा विकास झाला पूर्वी पावसाच्या पाण्यावर फक्त बाजरी अथवा भात  पिकाचा विचार असे मात्र या परिसरातील शेतकरी टोमॅटो , कांदा , भाजीपाला सारखी नगदी पिके घेऊ लागला आहे .
मुळा नदीवरील लहान मोठ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साखळी त्यामुळे वाहत्या नदी काठच्या गावांना पाणी मिळू लागले आहे . तालुक्यात पावसाळ्यात ५० टि  एमसी पाणी पावसाळ्यामुळे पडते आजपर्यंत हे पाणी वाहून जात होते मात्र आता  किमान त्यातील १० ते १२ टक्के पाणी तालुक्यातील शेतकऱ्याला मिळू लागले आहे जिल्ह्याची तहान आणि विकासाची भूक भागविणारा इथील पाऊस इथली भूमिपुत्राला सुखाचे क्षण देऊ लागला आहे .
निळवंडे , भंडारदरा , हे बहू उद्देशीय प्रकल्प आहे नदीतून वाहणारे पाणी प्रवरेच्या पाणी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती साठी वापरले जाते भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणारा १२ मेगावॅट क्षमतेचा भ . ज. वि . प्रकल्प , रंधा धबधब्याजवळील ३४ मेगावॅट क्षमतेचा कोदणी जलविधुत प्रकल्प आणि निळवंडे धरणाच्या पायथ्याशी ७ मेगावॅट क्षमतेचा निळवंडे जलविधुत प्रकल्प असे ३ जलविधुत प्रकल्प भंडारदऱ्यातून सुटणाऱ्या पाण्यातून ५० ते ५५ मेगावॅट विजेची निर्मिती करतात विजेचा थेट लाभ तालुक्याला होत नसला तरी राज्याच्या विकासात योगदान देण्याचे काम हे प्रकल्प करीत आहे अशाच प्रकारचा २५० मेगावॅट क्षमतेचा घाटघर जलविधुत प्रकल्प अकोले (जिल्हा  नगर )शहापूर (जिल्हा ठाणे )तालुक्याच्या सीमारेषेवर उभा आहे . देशातील अशा प्रकारचा हा सर्वात मोठा प्रकल्प विजेची मागणी जास्त असताना च्या  काळात (पिकअप अवर )विजेची गरज काही प्रमाणात भागविण्याचे काम हा प्रकल्प करतो . वाहणाऱ्या पाण्याबरोबरच तालुक्याच्या डोंगर पठारावरून वाहणारा भन्नाट  वारा हि आता वीज निर्मिती करू लागला आहे . मुख्यतः तालुक्याच्या उत्तर भागातील विश्रामगड , बित्तम गड , डोंगर रंगावरील पठारावर वाऱ्याच्या प्रचंड झोतात भिडणाऱ्या वीजनिर्मिती करणाऱ्या पवन चक्क्या उभ्या राहिल्या आहेत तिरढे , पाच पट्टा ,पवन ऊर्जा प्रकल्प आणि कोंभाळणे खिरविरे पवन ऊर्जा प्रकल्पातून सुमारे १०० मेगावॅट क्षमतेच्या आसपास वीज निर्मिती होत आहे . या तालुक्याच्या नद्यांचे पाणी आणि वाहणारा वारा  वीज निर्मिती द्वारे राज्याच्या विकासाला हातभार लावत आहे . पावसाळ्यात इथे धो धो कोसळणाऱ्या पाऊसाचे आकर्षण असल्याने नाशिक , मुंबई , पुणे , नगर , औरंगाबाद व राज्याबाहेरील लोकांमध्ये वाढू लागल्याने त्यांचे पाय आपोआप घाटघर , भंडारदरा , हरीशचंद्रगड कडे वळतात  दरवर्षी हजारोच्या संख्येने येणाऱ्या या पर्यटकांमुळे पर्यटन  व्यवसायातून रोजगार निर्मिती वाढली आहे त्यामुळे स्थानिक आदिवासी जनतेला रोजगार उपलब्ध झाला आहे पूर्वी फक्त पावसाळ्यात  पर्यटक  येत असत आता या ना त्या कारणाने वर्षभर येत असतात मग कधी कळसुबाई हरीशचंद्रगड , रतनगड , घाटघर ,विश्रामगड , अलगं  , मलंग  , कुलंग गड सारख्या गड किल्ल्यावर भटकायला ट्रेकिंगला कधी कधी पावसाळ्याच्या उंबरठ्यावर काजवे पाहायला पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबर , ऑक्टोबर मध्ये फुलणाऱ्या रानफुलांच्या भेटीला तर कधी भक्तिभावाने अगस्ती आश्रमाच्या भेटीला  साम्रद गावाजवळ असणारी एकमेव अद्वितीय अशी सांदणदरी आता मोठी अकृष्ण ठरली आहे . पर्यटकांचे जत्त्येच्या जथे या दरीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात पर्यटकांमुळे भंडारदरा सोबतच धरणाकाठचे गावे हरीशचंद्रगड पायथ्याशी असणारे आंबित पाचनई या सारख्या लहान मोठ्या खेड्यात पर्यटनाच्या माध्यमातून अनेकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे भंडारदरा शहरातील तारांकित , यश , आनंद अमित , तारांकित तोडीची हॉटेल उभी राहिली आहेत
तालुक्यातील पर्यटनाचे योग्य मार्केटिंग केल्यास आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटन हा शेती व्यवसाला पूरक जोडधंदा म्हणून रोजगार देणारा व्यवसाय ठरेल . ग्रामीण भागात अर्थकारणाला गती आल्यामुळे तालुक्यात अनेक लहान मोठ्या  पतसंस्था च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती तालुक्यात झाली आहे . विविध बँकाच्या शाखाबरोबरच या पतसंस्थांच्या तालुक्यातील अर्थ कारणात मोठा वाटा आहे . प्रवरा , मुळा , आढळा ,या तिन्ही खोऱयातील तालुक्यातील शेतकरी प्रगतिशील आहेत शेतीचे नवनवीन तंत्र आत्मसात करण्यात येथील शेतकरी आघाडीवर असतो शेती बरोबर शेतकऱ्यांची नवीन पिढी   कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळू लागली आहे आवळ्यावर प्रक्रिया करणारा व्ही पी फूडस असेल किंवा दूध प्रक्रया करून उपपदार्थ करणारा सावंत डेअरी उद्योग असेल अकोले राजूर रस्त्यावर सह्याद्री ओक्सीमोर सह बाटलीबंद पाण्याचे छोटे मोठे प्रकल्प उभे आहेत त्यांच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत खाजगी आणि सहकारी दूध प्रकल्पातुन तालुक्याच्या अर्थकारनातं  मोठा वाटा राहिला आहे . तर तालुक्याच्या पश्चिम भागात पशुपालन हा महत्वाचा शेती पूरक व्यवसाय ठरला आहे प्रगतिशील शेतीमुळे गावोगावी लहान मोठे खते बियाणांचे विक्री केंद्र उभी राहिली आहेत . त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण झाला आहे . शेतीमध्ये होत असणारा रासायनिक खतांचा वापर कीटक नाशके जंतू नासिके या सर्वांचा दुष्परिणाम येथील जाणकारांना जाणवू लागले आहे . त्यातूनच  सेंद्रिय शेतीची चळवळ तालुक्यात हळू हळू आकार घेऊ लागली आहे . यात बायफ या संस्थेचा मोठा वाटा आहे तालुक्यातील उत्तर भागातील खिरविरे , मान्हेरे ,लाडगाव  , परिसरात बायफ मार्फत आदिवासी विकासाचा  मोठा कार्यक्रम राबविला जातो आहे .बायफच्या माध्यमातून कोंभाळणे येथील राहीबाई पोपेरे या आदिवासी महिलेची बियाणे बँक अनेकांच्या आकर्षणाचा कुतूहलाचा विषय ठरला आहे . परिसरातील अनेक गावरान वांनाच्या संवर्धनाच्या प्रसाराचे कार्य राहीबाई करीत आहे बायफच्या माध्यमातून पारंपरिक भात बियांच्या संवर्धनाचा कार्यक्रम राबिविण्यात येत आहे . एकदरे मानेहेरे सह तीन ठिकाणी बायफने बँक स्थापन केल्या असून त्यातून या परिसरातील काळ भात , आंबे मोहर , रायभोग , जिरवेल , हाळी कोळपी , गरी कोळपी , यासारख्या १४ भात वाणाचे शुद्ध स्वरूपातील बियाणे शेतकऱ्यांना नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे बायफच्या परसबाग प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना पौष्टिक फळे भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे . कुपोषण रोखण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे . लोकपंचायत हि संस्था हि मुळा खोऱ्यात  काळ भात संवर्धनाचे तसेच गावरान बियांनाचे संवर्धनचे काम करीत आहे . या संस्थांच्या प्रयत्नामुळे या परिसरात पुन्हा पारंपरिक बियाणे रुजेल अशी चिन्ह दिसत आहे . शाश्वत शेती विकासाच्या या कार्यक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीवनात स्थायी स्वरूपाचे बदल होणार आहे . शेती , दूध धंदा त्याबरोबरच शिक्षणातही आमूलाग्र बदल झाले असून अकोले एज्युकेशन , अभिनव या शैक्षणिक संस्था त्यासाठी पुढे येत आहे मात्र ७५ वर्षे उलटूनही सत्यनिकेतन संस्था कात टाकत नसल्याची खंतही व्यक्त होत आहे .अकोले तालुक्यात शेती विकासाबरोबरच येथील जनतेचा आर्थिक स्थर उंचाविण्यासाठी शासकीय स्थरावर प्रयत्न होत असून जलयुक्त शिवार अभियानातून कायम दुष्काळी भाग असलेल्या कुमशेत , शिरपुंजे , आंबित परिसरात येथील आदिवासी महिला शेतकरी बागायती शेती फुलवू लागल्या आहेत . (शांताराम काळे ) सोबत फोटो भंडारदरा , 
10 Attachments

सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.

लेख
म . टा . वृत्तसेवा , संगमनेर--
सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्रगती झालेली आहे त्यामध्ये सहकारी चळवळीच्या योगदानाचा मोठा वाटा आहे.अ.नगर जिल्ह्याच्या सहकारी चळवळीत अनेक धुरीनांनी  नेतृत्व केले आहे.प्रत्येक तालुक्यात सहकाराच्या क्षेत्रात समर्पण भावनेने काम करणारी एक आदर्शवादी पिढी स्वातंत्र्योत्तर काळात मोठया जोमाने कार्यरत होती.त्या पिढीच्या धुरीनांनी सहकार चळवळीचा माध्यमातून परिवर्तन  आणि प्रगतीला जी दिशा दिली.तीचाच आदर्श आज सहकार चळवळीत कार्य करणारे लहान थोर नेते व कार्यकर्ते यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे.
संगमनेर तालुक्याच्या सहकार चळवळीला देखील खुप मोठा संपन्न वारसा लाभलेला आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य लढयात सर्वस्व झोकून देऊन कार्य करणार्‍या अनेक धुरिनांनी स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराच्या विकासासाठी जे प्रयत्न केले त्याचीच फलभु्रती म्हणजे सहकाराच्या माध्यमातून या तालुक्याचा झालेला नेत्रदिपक असा सर्वांगीण विकास होय . या विकासाच्या चळवळीत अनेक कार्यकर्ते यांनी येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबध्द रितीने व पूर्ण समर्पित भावनेने काम करुन या तालुक्याच्या सहकाराची ओळख रायात आणि राष्ट्रीय पातळीवर वेगळया अर्थाने करुन दिली आहे.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुळातच डाव्या विचार सरणीने प्रेरीत झालेल्या भाऊसाहेबांनी स्व.डॉ.अण्णासाहेब शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी,शेतमजूर,विडी कामगार इ.न्याय हक्कांना वाचा फोडण्यासाठी संघटनात्मक चळवळ उभारली. शेतकरी शेतमजुर व विडी कामगारांच्या युनियनच्या माध्यमातून लोकजागृती करुन या वंचीत घटकाला शासनाच्या पातळीवर न्याय देण्यासाठी लढे दिले.कालांतराने 1952 साली भाऊसाहेबांना हे तिव्रतेने जाणवले कि समाजातील तळागाळातील सर्व घटकांची सर्वांगीण प्रगती करावयाची असेल तर केवळ संघर्षाची भूमिका घेऊन उपयोग नाही तर त्याला सहकाराची जोड द्यावी लागेल.हा विचार मनाशी पक्का झाल्यानंतर दादांनी स्व:त ही सहकारी चळवळीला वाहून घेतले.तो आयुष्याच्या अंतीम श्‍वासापर्यंत
तसे पाहता संगमनेर तालुका हा अवर्षणप्रवण विभागात येणारा आणि दुष्काळ नेहमी पाचवीला पुजलेला असा तालुका. या तालुक्याचा विकास करावयाचा तर नेमका कोणत्या मार्गाने करावा हा मोठा प्रश्‍न होता.दादांनी त्याच्या सहकार्‍यांसमवेत केलेल्या विचार मंथनातून एक दिशादर्शक चित्र निर्माण झाले.1956 साली तालुक्यात सुपरवायझिंग युनियन चे ते अध्यक्ष झाले. त्यांनी पुढाकार घेत तालुक्यात ग्रामपातळीवर अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली.या सुपरवायझिंग युनियनच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामसहकारी संस्थांच्या प्रत्येक सभासदाच्या शेती विकासाचा पंचवार्षिक कालबध्द नियोजनाचा प्रकल्प आराखडा त्यांनी तयार केला.अत्यंत दुरदृष्टीने असा आराखडा तयार करणारे भाऊसाहेब (दादा ) हे त्या काळातील सहकारातील पहिलेच अन् एकमेव नेते असावेत. त्या आराखडा नुसार विकास योजना राबविण्याच्या ठरल्या.यासाठी त्या काळात संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी जवळपास 4 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.रुपया गाडीच्या चाकाप्रमाणे मानला जाणार तो काळ त्या काळात ही 4 कोटी रक्कम म्हणजे कुणाचेही डोळे पांढरे व्हावेत इतकी मोठी रक्कम होती.त्या आराखडयाची अंमलबजावणी त्यावेळी तातडीने होऊ शकली नाही.तरी भविष्यकाळात जेव्हा अनुकुल परिस्थिती निर्माण झाली तेव्हा भाऊसाहेबांनी रेखाटलेले हे विकासाचे चित्र बर्‍याच अंशी साकार होऊन समृध्द होऊ शकले.
1958 साली संगमनेर तालुक्यात स्थापन झालेला शेतकरी सहकारी संघ हा विकासाच्या चळवळीतील मानांकित असा मैलाचा दगड ठरला. भाऊसाहेब शेतकी संघाचे चेअरमन झाले आणि शेतकी संघाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला आधिक गती देण्याचे काम त्यांनी ग्राम आणि तालुका पातळीवर सुरु केले.संगमनेर तालुक्याच्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी व्हावी ही या तालुक्यातील आम जनतेची खुप तीव्र इच्छा होती.परिस्थिती अनुकुल नसतांनाही भाऊसाहेबांची ग्रामीण जनतेच्या या भावनेला मुर्त स्वरुप देण्याचा निर्णय घेतला. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते कारखान्यासाठी भाग भांडवल उभारण्यास प्रारंभ केला.या कामात भाऊसाहेबांना अपेक्षा पेक्षा जास्त यश मिळाले.तालुक्याची एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली तर कारखान्याचे शेअर्स खरेदीसाठी लोकांकडे फारसा पैसा नव्हता.तथापि अगदी सर्व सामान्य शेतकर्‍यांनी अगदी गोठ्यातील जनावरे विकून,घरातील दाग दागिने गहान ठेवून  शेअर्स खरेदीला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.इतका प्रतिसाद की काही दिवसात अपेक्षीत  रकमेचा आकडा पूर्ण झाला. आणि शेअर्स विक्री बंद करावी लागली.साखर कारखान्यासाठी भाग भांडवल रक्कम  उभी झाली परंतू प्रत्यक्ष कारखाना उभा राहण्यामध्ये अनेक अडचणी होत्या.कारखाना परवाना देण्यासाठी अनेक समित्या व कमिशनने भेटी दिल्या.सर्वांनी येथील प्रतीकूल परिस्थीती पाहून कारखाना उभारणीस नकार दिला.तथापि भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यकर्ते ठाम राहिले.
1960 साली भाऊसाहेबांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाली.जिल्हा पातळीवरील या वित्तीय संस्थेतील दादांचा प्रवेश हा संगमनेर तालुक्याचा आणि एकूणच अ.नगर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती व नवी दिशा देणारा ठरला.1960 सालापासून पुढील सलग 48 वर्ष दादा या बँकेच्या संचालक मंडळावर होते.त्यात जवळपास दादांनी 15 वर्ष चेअरमन पद भूषविले.14 जानेवारी 1962 साली महाराष्ट्र रायाचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण हे संगमनेरात आले व त्यांच्या उपस्थिीत दादांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सहकाराला सरकारचे बळ लाभल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला नवी ऊर्जा मिळाली.त्यातच 1965 साली दादा महाराष्ट्र राय बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आले. या शिखर बँकेच्या संचालक मंडळावरही दादा 34 वर्ष होते.त्यांनी राय बँकेची व्हा.चेअरमन व चेअरमन ही पदे भूषविली. 
भाऊसाहेब (दादा ) व त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नाला डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या मुळे केंद्र शासनाच्या पातळीवर यश मिळाले.आणि 1966 साली 800 मे.टन क्षमता असलेला कारखान्याला परवानगी मिळाली.भाग भांडवल रक्कम आधीच जमा असल्याने सह.साखर कारखाना उभारणीस प्रारंभ झाला.आनि अत्यंत वेगाने काम पूर्ण करुन 28 मार्च 1968 रोजी संगमनेर भाग.सह.साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हण यांच्या हस्ते संपन्न केला.यामुळे दादांनी विकास चळवळीचा एक मोठा टप्पा गाठला होता .सहकारी साखर कारखाना.अ.जिल्हा सह.बँक आणि महाराष्ट्र राय सह.बँक अशा तीन महत्वाच्या संस्थांवर भाऊसाहेबांना नेतृत्वाची संधी मिळाल्याने त्यांनी या तालुक्यातील गोर - गरिब जनतेच्या जिवनात मोठी आर्थिक समृद्धी आणण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही.पाणी आडवा व पाणी जिरवा या योजना ,केटिवेअर,नालाबडींग,दगडी बंधारे या माध्यमातून जलसंधारणाचा कार्यक्रम मोठ्या प्रामाणात राबविला.संगमनेर  साखर कारखान्यात विकास कक्षाची स्थापना करुन त्या कक्षामार्फत व जिल्हा आणि राय सहकारी बँक यांच्या आर्थिक पाठबळातून संगमनेर तालुक्यात वैयक्तीक सामूदायीक व सहकारी पातळीवर पाणी पुरवठा करणार्‍या संस्थाचे मोठे जाळे अत्यंत कष्ठ पूर्वक उभारुन दादांनी सिंचन क्षेत्र वाढविले.
तालुक्यात पुरेश्या ऊसाअभावी कारखाना उभाच राहू शकणार नाही असे अनेकांचे मत होते.त्याच तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याने दादांच्या मार्गदर्शनाखाली कठोर शिस्त,कार्यक्षम प्रशासक,पारदर्शक दृष्टीचे नियोजन,काटकसर आणि सहकारी संस्था चालवितांना घेतलेली प्रामाणीक विश्‍वस्ताची भूमिका या गुण समुच्चयामुळे केवळ राय पातळीवर नाही तर देशपातळीवर एक सर्वोत्कृष्ठ आणि आदर्श सहकारी साखर कारखाना असा नावलैकिक निर्माण केला.रायाचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांना सर्वाधीक भाव देण्याची ही परंपरा अखंडपणे  जोपासली.साखर निर्मीतीबरोबरच पूरक उत्पादनेही सुरु केले.तथापि दादा हे सच्चे गांधीवादी नेते असल्याने कोणत्याही परिस्थीत कारखान्यात देशी व विदेशी दारु बनवायची नाही या निर्णयावर दादा ठाम राहिले.तालुक्यात पुरेसा शास्वत ऊस निर्माण करण्यासाठी याप्राने पाणीपुरवठा संस्थांचे जाळे दादांनी  उभारले.त्याचप्रमाणे शेतीमध्ये अनेक उत्पादनासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणाला दादांनी प्राधान्य व बळ दिले. 


जिल्हा व राज्य य बँकेच्या माध्यमातून अर्थपुरवठा करुन शेतीच्या यांत्रिकीकरणाला मोठी गती दिली.संगमनेर तालुका हा मुळातच दुष्काळी असल्याने शेतीला शाश्‍वत जोडधंदा असेल तर शेतकरी वर्गाचा खर्‍या अर्थाने विकास होईल हे ओळखून दादांनी दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली.त्यासाठी संकरीत गाई निर्मीतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला.त्यांनी गावोगावी दुध संस्थांची स्थापना केली.दुध संस्थेबरोबर पतसंस्थेचेही मोठे जाळे निर्माण केले.पतसंस्थेने शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायासाठी कर्ज द्यायचे व शेतकर्‍यांनी दुधाच्या पगारातून त्या कर्जांची परतफेड करायची.यामुळे दुध संस्था व पतसंस्था दोन्हीही भरभराटीला आल्या.संगमनेर तालुक्यात दादांनी दूध संघाची स्थापना करुन शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ निर्माण करुन दिली.केवळ शेतकरी नाही तर,मागासवर्गीय व भूमीहिनांनाही त्यांनी या प्रक्रियेत सामावून घेतले.परिणामी दुघाचे उत्पादन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढले.शेतकर्‍यांसाठी शाश्‍वत असा जोडधंदा निर्माण झाला.तालुक्यात स्वयंरोजगार निर्माण होवून बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला.आज राजहंस दुध संघ हा रायात अग्रेसर असून येथे 20 प्रकारचे दूधाचे उप पदार्थ निर्माण केले जाातात.यावर्षी या संघाला 21 कोटींचा नफा झाला.त्यामुळे दुध उत्पादकांना रेबीट प्रतीलिटर 1.50 पैसे याप्रमाणे देण्यात आले दुध संघाच्या या आर्थिक उलाढालीतून तालुक्याची बाजारपेठ मोठी फुलली आहे.दुध व्यवसायाबरोबरच संगमनेर तालुक्यातील शेतकरी फळबाग व भाजीपाला पिकवण्याच्या बाबतीतही अत्यंत आग्रेसर आहे,डाळींब,कांदा,टोमॅटो यासारख्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असून या पिकांमधून कोटयावधी रुपयांची उलाढाल होत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती व संगमनेर अ‍ॅग्री कल्चर प्रोड्युस ट्रान्सपोर्ट कंपनी या मार्फत शेतकर्‍यांना शेती माल विक्रीची सुविधा सहकारी तत्वावर करुन देण्यात आली आहे.


शेतकर्‍यांच्या घरात खर्‍या अर्थाने सुबत्ता येण्यासाठी शिक्षणा शिवाय पर्याय नाही यासाठी 1965 मध्ये सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेची स्थापना केली.आज या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील दुर्गम भागात मुले व विशेषत मुलींची शिक्षणाची मोठी सोय झाली आहे.पूर्वी शिक्षणापासून वंचित राहणारी मुले मुली शिक्षण प्रवाहात आली.आज 34 विद्यालये 11 कनिष्ठ महाविद्यालय व 3 वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत.उच्च शिक्षणाची संधी तालुक्यात उपलब्ध करुन देण्यासाठी 1983मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास या संस्थेची स्थापना केली.या संस्थेअंतर्गत अमृतवाहिनी इंजि.कॉलेज, तंत्रनिकेतन. एमबीए, फार्मसी,आयटीआय, मॉडेलस्कूल, इंटरनॅशनल स्कूल, यु.कॉलेज,एसएमबीटी दंत महाविद्यालय या संस्था आपल्या गुणवत्तेने रायात अग्रमानांकित ठरल्या आहे.आयएसओ मानाकन पुणे उत्कृष्ट महाविद्यालय असा गौरव झालेले अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजने देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी महाविद्यालयात मानांकन मिळविले आहे. या महाविद्यालयाने सलग तिन वेळेस एनबीएचे सर्व शाखांसाठी मानांकन मिळवून देशात अग्रक्रम मिळविला आहे.विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी अमृतवाहिनी मधून विविध उपक्रम राबविले जातात.उत्कृष्ट निकाल प्लेसमेंटची सुविधा यामुळे हे महाविद्यालये विद्यार्थ्यांची पहिली पसंती राहिली आहे.अमृतवाहिनीचे अनेक माजी विद्यार्थी देश विदेशात विविध ठिकाणी मोठया पदावंर कार्यरत आहेत.अमेरिकेमध्ये अमृतवाहिनीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठा अमृतगृप  स्थापन केला आहे.मधील मानांकन मिळाले आहे.
देशाला आदर्शवत असणार्‍या अमृत उद्योग समूहातील सहकारी साखर कारखाना,दुध संघ,शेतकी संघ, राजहंस अ‍ॅग्रो कंपनी,शॅम्प्रो,गरुड कुकुट्टपालन,संगमनेर अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्यूस कंपनी,अमृतवाहिनी बँक,बाजार समिती या आपल्या लौकिक पूर्ण कामकाज पध्दतीने देशात सहकाराचे मॉडेल ठरले आहेत. अशा विविध शिखर संस्थासह तालुक्यात सेवा सोसायट्या,पतसंस्था व दुधसंस्थांची मोठे जाळे निर्माण झाले.


सहकार हा ग्रामीण विकासाचा राजपथ मानून काम करणार्‍या दादांनी उभा केलेला सहकार हा सहकाराची पंढरी ठरतांना विकासाचे मॉडेल  ही ठरले आहे.याचे कारण दादांच्या आदर्शवत मार्गदर्शनाखाली व रायाचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या दुरदृष्टी  व समृध्द नेतृत्वातून इथला सहकार खर्‍या अर्थाने ग्रामीण विकासाचा महामेरु ठरला आहे.
8 Attachments

Thursday, November 16, 2017

mamta bhangare

ममताबाई भांगरे
  ,rajur  --आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनीही या चळवळीला साथ देताना गावरान वाणांचे परंपरेने जतन केले आहे.
कळसुबाई शिखराचा रम्य परिसर चिंब भिजवणाऱ्या पावसामुळे रान सारं आबादानी झालेले आहे. भात खाचरात डोलणारी भात पिके. निसवत चाललेल्या भात पिकाचा सर्वत्र भरून राहिलेला अनोखा गंध. डोंगर उतारावरून जाणारी नागमोडी सडक. डोंगर उतारावर वसलेली लहान लहान आदिवासी गावे. त्यातीलच एक आंबेवंगण. गावाच्या अलीकडेच रस्त्याच्या कडेला एक पारंपरिक पद्धतीचे कौलारू घर. त्याच्या शेजारीच नवीन पद्धतीच्या घराचे सुरू असलेले बांधकाम. उतार उतरून घरापर्यंत पोहचेपर्यंत विशेष काही जाणवत नाही, पण घराभोवती चक्कर मारताना वेगळेपण जाणवते. घराभोवती असणाऱ्या मोकळ्या जागेवर उपलब्ध जागा आणि उतार लक्षात घेऊन लावलेली विविध प्रकारची झाडे. बांधांवर पसरलेले काकडीचे वेल. सभोवताली तसेच घराच्या भिंतीवर पोहोचलेले दोडक्याचे वेल. कारल्याचा मांडव. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत अशीच विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, आंबा, अंजीर, पपई, शेवगा, सीताफळ, फणस, गावठी वांगी, टोमॅटो. एका बाजूला ओळीत केलेली वाल आणि घेवडय़ाची लागवड ही शांताबाई धांडे यांची परसबाग. या बागेमध्ये जमिनीचा उतार आणि उपलब्ध जागा लक्षात घेऊन फळझाडे, वेलवर्गीय भाज्या, कंदभाज्या, पालेभाज्या यांच्या लागवडी केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत येथे काहीच नव्हते, खडक होता. जनावरे फिरायची. शांताबाई सांगत होत्या पण त्या छोटय़ाशा परसबागेतून हिंडताना त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा प्रश्न पडतो. या सर्व भाज्या स्थानिक आहेत. पारंपरिक बियाणांचाच त्यासाठी वापर केलेला आहे आणि सर्व भाजीपाला, फळांचा मुख्यत: घरीच वापर केला जातो. फारच उत्पन्न आले तर थोडीफार भाजी बाजारात नेली जाते पण तीही क्वचितच. गावरान वाणांबरोबरच खत म्हणून गांडूळ खत यांचा वापर होतो. पूर्वी महिना पंधरा दिवसांतून भाजी घरी आणली जायची. आता मात्र मुबलक प्रमाणात भाजी, फळे उपलब्ध होतात. शिवरात्रीपर्यंत बाहेरून भाजीपाला आणावा लागणार नाही. शांताबाईचे पती खंडू धांडे सांगत होते. दोन वर्षांपूर्वी ‘बायफ’च्या (भारतीय कृषि अनुसंधान) मार्गदर्शनाखाली परसबाग लावायला सुरुवात केली. सर्वच कुटुंब आता त्या बागेच्या प्रेमातच पडले आहे. या परसबागेचा गवगवा झाल्यामुळे आता दूरवरून लोक ही परसबाग पाहायला येतात. त्यात काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. शांताबाईंचा मुलगा सोमनाथ एम.ए. बी.एड. झालेला आहे. त्याला विचारले असता, आईचा खूप अभिमान वाटतो असे तो म्हणाला.आंबेवंगणच्या पुढेच देवगाव नावाचे खेडे आहे. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची ही भूमी. रस्त्याच्या कडेलाच काहीसे टेकाड चढून गेल्यानंतर ममताबाई भांगरे यांचे घर आहे. कौलारू घर, पुढे बाजूला घरालगत पडवी. घरापुढे बोगन वेलीचा ऐसपस मांडव. ऑक्टोबरच्या कडक उन्हाची तिरीपही आत येऊ शकत नव्हती. प्रसन्न वातावरण. येथेही घराच्या सभोवताली असणाऱ्या इंचन् इंच जागेचा भाजीपाला, फळ लागवडीसाठी केलेला वापर. दोडके, भोपळे, कारले यांचे उंचावर गेलेले वेल. बांधावर पसरलेले डांगर, भोपळा यांचे वेल. रताळ, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी, अशा असंख्य भाज्या. एका कोपऱ्यात अनेक रानभाज्या पाहायला मिळाल्या. जाई, करजकंद, बडघा, कवदर, कांदा, पाचुट कांदा, चंदन बटवा, कोहिरी, काळी आळू, मेतं, चिचुडी. जोडीला विविध फळांची झाडे. थोडय़ाफार पालेभाज्याही होत्या पण आम्हाला रानभाज्याच आवडतात असे ममताबाई सांगत होत्या. सासू-सासऱ्यांमुळे या रानभाज्यांचे ज्ञान झाले. सासूबाई असताना रानातून या भाज्या तोडून आणायचो, पण आता घराजवळच त्यांची लागवड केली आहे. चहा, साखर आणि तेल मीठ सोडले तर बाकी सर्व घरचेच वापरतो. धान्य, कडधान्य, भाज्या, हळद, मिरची सर्व काही. रानभाज्यांबरोबरच ममताबाईंच्या या परसबागेत बारा प्रकारचे वाल आणि घेवडय़ाचे वेल आहेत. गांडूळ खत, शेण खत यांचाच वापर केला जातो. सेंद्रीय व गांडूळ खतांच्या गोळ्या हा ममताबाईंचा स्वत:चा शोध. भातालाही त्या गांडूळ खतच वापरत पण ओढय़ालगतच्या शेतालगत टाकलेले खत वाहून जायचे. विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली. गांडूळ खताचे लहान लहान गोळे केले, वाळवले. युरिया ब्रिक
युरिया ब्रिकेटप्रमाणे त्यांचा वापर सुरू केला. अपेक्षित परिणाम मिळाला. त्यांच्या या शोधाची खूप प्रशंसा झाली. साधे नसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबाईंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे शांताबाई किंवा ममताबाई या दोघीही निरक्षर आहेत. पण ममताबाईंचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात. या दोघींप्रमाणेच मान्हेरेच्या हिराबाई गभाले, जायनावाडीच्या जनाबाई भांगरे, एकदरे येथील हैबतराव भांगरे यांच्याही परसबागा पाहण्यासारख्याच आहेत. ‘सीड क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरेंची परसबाग तर दृष्ट लागण्यासारखीच आहे. ही झाली प्रातिनिधिक उदाहरणे पण कळसुबाई शिखराच्या आजूबाजूला असणाऱ्या आदिवासी खेडय़ांमध्ये अशा अनेक ममताबाई, शांताबाई पाहावयास मिळतात.
आदिवासी कुटुंबांना वर्षांतील चार-सहा महिने शुद्ध, सात्त्विक आणि पौष्टिक भाजीपाला मिळवून देणारी ही परसबागेची चळवळ अकोले तालुक्यात जोर धरत आहे. अर्थात यामागे ‘बायफ’ या संस्थेचे विशेष प्रयत्नही आहेत. आदिवासी भागातील स्त्रियांनी गावरान वाणांचे जतन परंपरेने केले आहे. पूर्वी त्या घराभोवती डांगर, भोपळा, काकडी अशा भाज्या लावायच्या. पण त्या कुठेही लावल्या जायच्या. कुपोषणाची समस्या दूर करायची असेल तर आदिवासींना दर्जेदार, पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. घराभोवतीच्या दोन-तीन गुंठे जागेत योग्य नियोजन करून परसबाग फुलवली तर चार-सहा महिने ताजा भाजीपाला रोजच्या आहारासाठी उपलब्ध होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ‘बायफ’ने परसबागेचा हा उपक्रम हाती घेतला. यात हंगामी परसबाग आणि बहुवर्षांयू परसबाग अशा दोन्ही प्रकारच्या परसबागांची लागवड केली जाते. सुरुवातीला स्थानिक भाजीपाल्यांचे विविध वाण एकत्र करून त्यांचे बियाणे संच (सीड कीट) तयार करण्यात आले. यामध्ये गावरान भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, लाल व दुधी भोपळा, घोसाळे, कारली, दोडका, गावठी काकडी, शेपू, पालक, मेथी, चाकवत, मुळा, करजकंद यांसारख्या वीस-बावीस प्रकारच्या भाज्यांचे शुद्ध बियाणे पुरविण्यात आले. या बियाणांची वैशिष्टय़े म्हणजे हे स्थानिक वाण असल्याने एकदा पुरवठा केलेल्या बियांपासून तयार केलेल्या भाज्यांचा उपयोग पुढील हंगामासाठी होतो. हे स्थानिक वाण रोग आणि किडींना प्रतिकार करणारे आहेच तसेच खाण्यासाठी रुचकरही आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या शेणखत, गांडूळ खत, कम्पोस्ट खताचा योग्य वापर करून या भाज्या पिकवल्या जातात. संस्थेच्या मार्गदर्शनामुळे या परसबागा अधिक सुबक व आहारदृष्टय़ा परिणामकारक ठरत आहेत. एका हंगामात सरासरी ४०० ते ६०० किलोपर्यंत ताजा भाजीपाला उत्पन्न होतो. वाहून जाणारे पाणी, सांडपाणी याचा काटेकोर वापर यासाठी केला जातो. बहुवर्षांयू भाजीपाला प्रकारात पपई, शेवगा, हातगा, लिंबू, पेरू, सीताफळ, अंजीर, चिक्कू, आंबा, कढीपत्ता अशी विविध फळझाडे घराच्या भोवती लावली जातात. मिळणाऱ्या फळांचा, फुलांचा आहारात वापर होतो. यातून रक्ताक्षय, कुपोषण कमी होण्यासाठी मदत होत आहे. तालुक्यातील ३१ गावांमधील अडीच हजारपेक्षा जास्त कुटुंबांसाठी ‘बायफ’ ने हा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती ‘बायफ’चे अधिकारी जितीन साठे यांनी दिली. पण आज त्यापेक्षाही अधिक कुटुंबांकडे ही चळवळ पोहोचली आहे.  इथल्या परसबागातून तयार झालेले बियाणांचे संच राज्याच्या अन्य भागांतही पोहोचले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या वर्षी असे आठ ते दहा हजार बियाणे संच वितरीत करण्यात आले. आज राज्याच्या विविध भागांतून या योजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ येथे येत आहेत. प्रत्येक घराभोवती अशी परसबाग उभी राहिली तर कुपोषणाला आळा बसू शकतो, त्यासाठी घर तेथे परसबाग ही चळवळ राबविण्याची गरज आहे.
Attachments area




बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...