Tuesday, May 5, 2020

सारिका जाधव यांचे अस्वस्थ करणारे अनुभव

अकोले तालुक्यातील नर्स सारिका जाधव यांचे अस्वस्थ करणारे अनुभव ; अकोल्याचे  जाधव दांपत्य कर्तव्य पालनात व्यस्त 

नर्स सौ.सारिका जाधव 


अकोले  ( प्रकाश आरोटे ) अकोले तालुक्यातील  ( जि.नगर ) कळंब येथील सौ.सारिका सखाराम जाधव व तिचे पती सखाराम बबन जाधव हे दांपत्य आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवावर उदार होऊन आपले कर्त्यव्य पार पाडीत आहेत.ही अकोले तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. 
       
                     सखाराम जाधव हे 'आर्मी'मध्ये असून सध्या त्यांची पोस्टिंग पंजाबला आहे.'आर्मी मेडिकल कोर'मध्ये ते लॅब टेक्निशियन म्हणून चंदीगड येथे आपले कर्तव्य बजावत आहेत आणि त्यांची पत्नी सौ.सारिका जाधव या मुंबईमध्ये नर्स म्हणून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये कोव्हिड- 19 साठी सेवा करीत आहेत. दि.23 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले.पुढे दि. 30 मार्च पासून कामवाली बाईस कामावर येण्यास सोसायटीने नाकारले तसेच सासू सासरे वृद्ध असल्याने ते देखील गावी निघून गेले अशा परिस्थितीत सुहानी व शिवांश या दोन्ही मुलांना घरात कोंडून तर रात्रपाळी असल्यावर मुले शेजारी ठेवून त्या कामावर जात असत.मुंबईत कोरोनाची इतकी प्रचंड साथ असताना दोन लहान बाळांची आई काळजावर दगड ठेवून देश सेवा करत आहे.     
                    कर्तव्य श्रेष्ठ असल्याने मुलांचे हाल होऊ नये म्हणून सध्या ही दोन्ही मुले त्या गावाकडे ठेवून आल्या असून आता सारिका जाधव या एकट्याच म्हाडा वसाहत कांजूरमार्ग,मुंबई येथे राहून आपले  कर्तव्य पार पाडित आहेत.त्या कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमध्ये १९५ पैकी १४५  पॉझीटीव्ह कोरोना रुग्ण असून 100 च्यावर कोरोंटाईल केलेले रुग्ण ऍडमिट आहेत.गेल्या आठवड्यात 30 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले याचे समाधान त्यांना आहे.अर्धा तास पीपीई किट घालून काम करणे अवघड असताना दररोज आठ तास ड्युटी करूनही त्यांना थकवा माहित नाही.अशाही परिस्थितीत न डगमगता व खचून न जाता सारिका जाधव या आपल्या पती सारखीच देशसेवा करीत आहेत याचा त्यांना अभिमान वाटतो.
                     लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने सखाराम जाधव यांनाही घरी येणे शक्य झाले नाही.
आई-वडील वृद्ध,मुले जवळ नाहीत अशा अवघड परिस्थितीत काम करताना त्यांची चिंता लपून राहत नाही.मात्र पोलीस,आरोग्य,आशा वर्कर,आर्मी, प्रशासन कर्मचारी यांच्या कर्तुत्वाला सलाम करताना सखाराम जाधव व कोरोना रुग्ण हाताळणाऱ्या सारिका जाधव या नर्सला मनापासून सॅल्युट ! 
                     मी ही कोव्हिड 19 मध्ये काम करताना म्हाडा वसाहती मधील रहिवासी,हॉस्पिटलमधील स्टाफ त्यांची काळजी घेत आहे.त्यांना हवी ती मदत करीत आहे.यामुळे आपण करीत असलेल्या रुग्णसेवेच्या माध्यमातून देशसेवा करीत असल्याचा अभिमान वाटतो व त्यांचे प्रेम पाहून काम करण्यास उत्साह वाढतो,अशी प्रतिक्रिया सारिका जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...