Sunday, May 30, 2021

उजाड,ओसाड माळरानावर पाणी उपलब्ध करून हिरवाई करणारे ,',भगीरथ '

अकोले (शांताराम काळे )महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान हे मधुकरराव पिचड यांचे गुरू. त्यांचे विचार पिचड यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाचे ठरले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते अकोल्यात आले. प्रस्थापित मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांच्याविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू पिचड यांना तालुक्यातील मातीने व पाण्याने दिले.पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर संपूर्ण तालुका त्यांनी पायी फिरून पिंजून काढला. ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले. १९८० मध्ये आमदार झाल्यानंतर तालुक्यातील पाणी शेतीला कसे मिळेल, याचे नियोजन केले. भंडारदरा चाक बंद आंदोलन करून तालुक्याच्या वाट्याला पाणी देऊन पाणीदार नेता अशी ओळख मिळवली .आजही ८०वर्षे पूर्ण होऊनही आपल्या कार्य कर्तुत्वाने समाजमनाला गवसणी घालणारा ८१ वर्षात पदार्पण करणारा तरुण नेता कोरोना काळातही सातत्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी धडपड करताना दिसत आहे .ओसाड उजाड माळ रानावर हिरवाईचे मळे फुलविणारे "भगीरथ "आज ८१ व्या  वर्षात पदार्पण करत असताना तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्रिवार मनाचा मुजरा व शुभेच्छा ..... 
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मधुकरराव  पिचड यांनी  पंचायतसमितीचे सभापती म्हणून तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला . त्यावेळी स्वर्गीय दादासाहेब रुपवते , यशवंतराव भांगरे , साठी अमृतभाई मेहता हे दिग्गज तालुक्यात नेतृत्व  करत होते मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विधायक राजकीय महत्वकांक्षा जोडीला कार्यकर्ते , मोठा लोकसंग्रह या बळावर मधुकर पिचड साहेब यांनी  तालुक्यावर स्वतःची  राजकीय पक्कड मजबूत केली. सभापतीपासून सुरु झालेला त्याचा  कार्य कर्तृत्वाचा राजकीय आलेख दिवसेंदिवस  उंचावतच गेला . आमदार , राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री , विरोधीपक्ष नेते ,पक्षाचे अध्यक्ष ,राज्यातील नव्हे तर देशातील आदिवासींचे मसीहा ,नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्मान केली त्यांना व्यापक समाज मान्यता मिळत गेली  . विविध खात्यांचा पदभार सांभाळताना अफाट क्षमतेचे राजकीय नेते असे बिरुद त्यांना लावले गेले . अकोले तालुक्यात निळवंडे  प्रकल्पाच्या उभारणीचा अगस्ती साखर कारखाना , अमृतसागर दूध संघ ,कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ,या संस्थांच्या उभारणीत त्याचे अतुलनीय योगदान आहे . टिटवी , घोटी शिलवंडी , बलठन ,येसार्थव , पिंपळगाव खांड  , अंबित असे छोटे मोठे २४ जलाशय प्रकल्प उभारले त्यामुळे अकोले तालुक्यातील उजाड , ओसाड शिवार समृद्धीने फुलविण्याचे काम या जलदूताने "भगीरथाने" केले आहे .अकोले तालुक्याच्या ओसाड जिरायत शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून  बागायती बनवून शेकडो शेतकऱ्यांना  स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनविण्याचे ऐत्यासिक काम मधुकरराव पिचड साहेबांच्या खात्यावर जमा आहे . पिचड दूरदृष्टीचा नेता

शिक्षण, रोजगार, पाणी, रस्ते अशा प्रश्नांचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. आदिवासी विद्याथ्र्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी नवीन इंग्रजी शाळांऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या आश्रमशाळांमध्येच इंग्रजी शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. आश्रमशाळेचे जाळे संपूर्ण राज्यात विणून पिचड यांनी आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शरद पवार यांनी पिचड यांना आदिवासी विकास मंत्रीपदाची संधी दिली. आदिवासींचा स्वतंत्र अर्थसंकल्पही केला.

बंद आंदोलन करून हक्काचे पाणी मिळविले. सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत

निळवडे धरणाच्या घळभरणीचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांचा ठाम विरोध होता. त्यामुळे हे काम ठप्प झाले होते. या वेळी तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी नको होत्या, त्यांना हेक्टरी आठ लाख ८७ हजार ३०० रुपये दराने रोख स्वरूपात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. हे अनुदान स्वीकारण्यास बहुतेक खातेदारांनी मान्यता दिल्याने पुनर्वसन प्रश्नाची तीव्रता कमी झाली. प्रकल्पग्रस्तांना पाणी परवाने देण्याचेही मान्य करण्यात आले. एक जूनला पिचड यांचा वाढदिवस याच दिवशी निळवंडेच्या घळभरणीच्या कामास प्रारंभ झाला. धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला. अकोल्याच्या इतिहासात नोंद व्हावी, अशीच ही बाब ठरली. या पाण्यामुळे राजूर- पिंपरकणे या रस्त्यांचा काही भाग धरणात बुडणार आहे. आदिवासी भागाचे केंद्र असणाऱ्या राजूर गावाशी असणारा १४ गावांचा संपर्क त्यामुळे तुटणार आहे. हा संपर्क सुरळीत राहावा, यासाठी जलाशयावरून जाणारा उड्डाणपूल पिंपरकणे येथे बांधावा, अशी या गावातील लोकांची, तसेच प्रकल्पग्रस्तांचीही मागणी होती. मधुकरराव पिचड हेही यासाठी आग्रही होते. त्यामुळे सरकारने ३० कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या या पुलास मंजुरी दिली आहे. प्रकल्प खर्चातूनच हा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नांमुळे वाड्या वस्त्यांवर वीज पोचली. 

१३ मध्ये ५२ वाड्यांवर १ कोटी ५२ हजार, २०१३-१४ मध्ये ३० वाडयांना १ कोटी २९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. राजूर येथील वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली  या उपकेंद्रासाठी महसूल विभागाने जागाही हस्तांतरित केली आहे.या वीज केंद्रामुळे तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर सतत वीज मिळत असल्याने आदिवासी खुश आहेत.समशेरपूर, कोतूळ, सांगवी, पाडाळणे या उपकेंद्रांनाही मंजुरी मिळाली . पिचड यांना राष्ट्रवादी पक्षाने राज्याची जबाबदारी दिली होती. ही सर्व जबाबदारी संभाळून त्यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आदिवासींचे शोषण रोखून पारदर्शक पद्धतीने त्यांना विकासाची संधी देण्यासाठी पिचड यांनी निर्णयाचा धडाका सुरू केला. खावटी कर्जाची पद्धत बंद करून आदिवासींना बँकेच्या खात्यातून या कर्जाची रक्कम देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पिचड यांनी घेतला. तसेच, आदिवासी आश्रमशाळांना यापुढे खुल्या बाजारातून शिधा खरेदी करण्याची पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेतला. 'पिचड पॅटर्न' मधुकर पिचड यांनी राज्यात सुरू केल्याची भावना आदिवासी आमदार व्यक्त करत आहेत. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना यापुढे सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातूनच शिधा खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे अपहाराला आळा बसला आहे. १९८० साली जिल्ह्यातील व तालुक्यातील पुढारी मधुकरराव पिचड यांना तिकिट मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होते. मात्र पिचड थेट दिल्लीला पोचले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. गांधींनी मुलाखतीत त्यांना आणिबाणीच्या काळात कुठे होता, असे विचारले, तेव्हा पिचड यांनी विसापूर जेलमध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे तिकिट निश्चित केले. वसंतदादा पाटील यांनी पिचड यांना मंत्रीपदाची संधी दिली. भंडारदरा चाकबंद आंदोलनाच्या वेळी सरकारने त्यांच्यावर खटले भरले. ते खटले काढण्याचे काम वसंतदादा यांच्यामुळेच झाले.स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ओळख आहे .

गेली चार दशके अकोल्याच्या सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , सहकार , शेती जीवनाशी एकरूप झालेले मधुकर पिचड ८१ व्या  वर्षात पदार्पण करत आहे मात्र शरीर थकले असले तरी मानाने ते थकलेले , खचलेले नाही आजारपणाशी ते यशस्वी लढा देत अकोल्याच्या समाज जीवनाशी ते आजही एकरूप आहेत कोव्हीड च्या काळात तालुक्यातील नागरिकांना , रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी ते बसल्या जागेवरून ते प्रयत्न करत आहेत .        

Friday, May 28, 2021

मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे

मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे

"दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥" - संत ज्ञानेश्वर माऊली

आदरणीय मंजुषाताई, आपणास आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा 'संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार' प्रदान करताना संस्थेला अतिशय आनंद होत आहे.

ताई आपण आपली आवश्यक अशी एम.ए., एम.एड. अर्हता प्राप्त करून; आदिवासी भागात शिक्षिका म्हणून सेवा करण्याचे असिघाराव्रत घेतलेत. गत पंचवीस वर्षांपासून आपण 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' संचालित 'समर्थ कन्या प्रशाला' या संस्थेत राजूर येथे सेवारत आहात. त्याचबरोबर आपण त्या संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असून; आपल्या आदिवासी मुली व महिला यात शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहात.

आदिवासी भागातील नापास झालेल्या मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी पुन्हा शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम आपण सुरू केलेत. आदिवासी भागात असे काम करणे हे अतिशय अवघड कार्य होते. या प्रयत्नांतूनच आपण सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनाची, राष्ट्रीय दृष्टी असलेल्या, सेवाभावी, धुरीण कार्यकर्त्यांच्या सकारात्मक सहाय्याने; संस्थात्मक कार्यास सुरुवात केलीत. गाईच्या गोठ्यात बीस विद्यार्थिनींना घेऊन सुरू केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता एक हजार कन्या या विद्यालयाचा लाभ घेत आहेत. हे केवळ आपली सेवावृत्ती, जिद्द आणि चिकाटी यामुळेच शक्य झाले आहे. या शैक्षणिक कार्याबरोबरच आपण हुंडाबंदी, बालविवाह प्रतिबंध, युवती सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, पर्यावरणपूरक कार्यक्रमांतर्गत पाणी बचत कार्यक्रम, लेक वाचवा लेक शिकवा, महिला प्रबोधन व सक्षमीकरण मेळावे, संस्कारवर्ग अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून; सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय प्रश्न सोडवणूक; असे महत्त्वाचे कार्य करीत आहात.

आपण राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, बालविवाह प्रतिबंध यासाठी प्रबोधक व्याख्याने, या गोष्टी करण्यात पुढाकार घेतलात. कोणतीही शिक्षणसंस्था आणि त्यातील आचार्य, प्राचार्य ह्या व्यक्ती केवळ व्यवसाय म्हणून कार्य करीत नसतात; तर 'विश्व मोहरे लावावे' यासाठीचा सेवा व प्रबोधनाचा यज्ञ करीत असतात. या सेवाव्रताचा आपण वस्तुपाठ आहात. समाजाने शासनाने आपल्या या ध्येयनिष्ठ सेवाकार्याची नोंद घेऊन आपल्याला मार्गदर्शक, प्रबोधक आणि उपक्रमशील प्राचार्य म्हणून गौरविले आहे. आपले जलसंधारणाचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे.

याशिवाय आपण राष्ट्रीय वृत्ती जोपासण्यासाठी पालक समुपदेशन, गडकोटकिल्ले स्वच्छता अभियान, इफ्तार पार्टी आयोजनातून सामाजिक समरसता संदेशन, शालाबाह्य विद्याथ्र्यांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे कार्य, वाचन संस्कृती अभिवृद्धी ही वैशिष्ट्यपूर्ण कार्येकरीत आहात. आदिवासी भागात हे कार्य करणे म्हणजे सत्वपरीक्षा होय. आपण ह्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झालातच. इतरांनाही या कार्यात जोडता आहात. माणूस घडविण्यासाठीचे ऋषीकार्य आपण करीत आहात. आपल्या द्या, उपेक्षित आणि वंचितांसाठीच्या कार्यास अभिवादनपूर्वक संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन गौरवितांना, हे सन्मानपत्र प्रदान करीत आहोत. आपल्या पुरस्कार स्वीकृतीने पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे. अभिनंदन आणि आभार

Wednesday, May 19, 2021

राम रुपी वैभव भाऊची सेवा करणारा हनुमंत रुपी रमेश...

राम रुपी वैभव भाऊची सेवा करणारा हनुमंत रुपी रमेश... 
राजकारणात माणसे धरसोड करतात आजचा कार्यकर्ता उद्या दुसरीकडेच पाणी भरताना दिसतो,तसेच व्यवसाय नोकरीत असेच काहीशे चित्र पाहायला मिळते .एकनिष्ठ रामभक्त होणे आजच्या युगात कठीण काम आहे .त्याचे कारण दोघांनी एकमेकांना सांभाळून घेणे आवश्यक असते हे ज्याला जमले तो यशस्वी होतो. मात्र असाच एक रामभक्त हनुमान रमेश पुंड  गेली दोन तप राम रुपी वैभव भाऊ पिचड यांचेकडे चक्रधरांच्या माध्यमातून काम करत आहे .त्याच्या इतका विश्वासू एकनिष्ठ सध्याच्या कलियुगात दुरापास्त आहे. वैभव भाऊ सोबत त्यांचे कौटुंबिक संबंध त्यांनी निर्माण केले आहेत .मित भाषिक रमेश पिचड कुटुंबीयांना जीवापाड जपतो कधी चालक कधी अंगरक्षक तर कधी कुटुंबातील घटक ,अश्या विविध भूमिका बजवणारा हा अवलिया तालुक्यात,राज्यात,देशात वैभव भाऊ पिचड कुठे ही जावो त्यांची साथ कधीच सोडत नाही. नेता कसा असावा मालक कसा असावा भाऊ कसा असावा मित्र कसा असावा तर वैभव भाऊ सारखा असा रमेश पुंड छातीठोकपणे सांगतात .त्यांच्या कामाचे कौतुक कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार सतत करत असतात सत्ता  असो अगर नसो मात्र माझे दैवत वैभव भाऊच असे हनुमान रुपी रमेश नेहमी सांगत असतो .मात्र त्याच्या या योगदानाबद्दल वैभव भाऊही भरभरून बोलतात रमेश माझ्या कुटुंबातील एक घटकच आहे माझ्या सुख दुःखात उन, वांरा,पाऊस,असो बाराही महिने माझ्या सोबतीला तो असतोच  .त्याच्या कामाचे मोल शब्दात व्यक्त करता येणार नाही असे वैभव भाऊ म्हणतात.असा या अवलिया हनुमान रुपी रमेश भाऊ पुंड यांचा आज वाढदिवस त्यांना आजच्या दिवशी तमाम तालुक्यातील जनतेच्या तसेच मित्र,हितचिंतक यांच्यावतीने हार्दिक शुभेछ्या.त्यांनी घेतलेला वसा असाच पुढे चालत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना .टीमचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे व भरभराटीचे जावो.ही ईश्वरचरणी प्रार्थना....

काजवा महोत्सव कोरोना मुळे ....

: नाशिक- नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील भंडारदरा-कळसूबाई या पर्यटनस्थळांवर दर वर्षी मेमध्ये रंगणाऱ्या काजवा महोत्सवाला यंदा लॉकडाउनमुळे वनविभागाने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे राज्यातील या बहुचर्चित काजवा महोत्सवातील ५० लाखांहून अधिकचे अर्थकारणही "लॉक" होणार आहे.
 ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो, तोच वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय, असा विचार मनात चमकून जावा. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय! इथे रात्रच चांदण्याची झालीय, याचा प्रत्यय येथील महोत्सवाच्या निमित्ताने काजव्यांच्या दुनियेत येतो. मात्र, हा निसर्गाविष्कार पर्यटकांना, निसरप्रेमींना यंदा पाहता येणार नाही. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून च्या १५ तारखेपर्यंत काजवा महोत्सव पाहण्यासाठी या परिसरात प्रचंड गर्दी होते.
 मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी वनविभागाने ३१ मे पर्यंत अभयारण्य परिसरात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे भंडारदरा परिसरातील काजव्यांचे लुकलुकणे यंदा अनुभवता येणार नाही.

काजव्यांची अनोखी दुनिया
भंडारदरा घाटघर कळसूबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुलोत्सव आणि मेअखेर आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे, भंडारदरा, चिचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळची झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभुत खेळ चालतो.
यंदा मात्र पर्यटकांना बंदी
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जगभर कोरोनाचा उपद्रव वाढत आहे. हा कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी खबरदारीचा भाग म्हणून प्रशासनाने व वन्यजीव विभागाने मागील काही दिवसांपासून  या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.त्यामुळे येथील जवळपास दीडशे ते दोनशे   गाइड्सचा रोजगार बुडून हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
दोनशे गाइड यांचा रोजगार बुडणार
काजवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या भागात साधारण ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. पर्यटकांकडून शुल्कापोटी सात लाख, दोनशे गाइडना साधारण चार ते पाच लाख, तर दहा ते पंधरा हॉटेलचा साधारण ४० लाखांच्या आसपासचा हॉटेल व्यवसाय होतो. यंदा महोत्सव होणार नसल्याने सगळ्यांचे मिळून ५० ते ६० लाखांच्या आसपास अर्थकारण बुडणार आहे.
काजवा महोत्सवात वन्यजीव विभागांतर्गत ग्रामविकास समिती काजवा महोत्सवात पर्यटकांकडून जे शुल्क आकारते ते साधारण सात लाख रुपये यंदा बुडणार आहेत. पर्यटकांना  कळसूबाई- भंडारदरा अभयारण्यात  वनविभागाकडून ३० मे पर्यंत बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी आमचे कर्मचारी तैनात आहेत.
- अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...