Wednesday, November 16, 2022

बाबा तुम्ही शंभरी पार करा असा शुभेछ्या बाल चमुनी देत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना विविध रंगाची गुलाबपुष्प देऊन दिल्या शुभेछ्या...

अकोले, ता.१६: (शांताराम काळे)बाबा तुम्ही शंभरी पार करा असा शुभेछ्या बाल चमुनी देत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना विविध रंगाची गुलाबपुष्प देऊन दिल्या शुभेछ्या...
माजी मंत्री मधुकरराव पिचड गेली दीड महिन्यापासून आजारी होते ते नुकतेच राजूर येथे आले.ते आल्याचे कळताच अनेक हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी गेले.त्याच वेळी राजूर येथील समर्थ विद्यालय च्या विद्यार्थिनी बाल दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री पिचड यांच्या निवासस्थानी पोहचल्या प्रत्येक विद्यार्थिनी हातात गुलाबपुष्प घेऊन पदस्पर्श करत साहेब लवकर बरे व्हा,शंभरी पार करून तुमच्या शंभरी ला आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळू द्या अशी परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो असा शुभेछ्या दिल्या त्यावेळी श्री पिचड भावूक होत चांगले शिक्षण घ्या मोठ्या व्हा देशाच्या विकासाला हातभार लावा असे आशीर्वाद देत मुलांना चॉकलेट दिले.वैष्णवी वालझाडे, खुशबू तांबोळी, माही पवार,अलनाज मनियार ,अक्षरा लहमगे,
कल्याणी मुतडक, मुनाफ मनियार,समर्थ मुतडक, साई मुतडक, कार्तिक भडांगे अनिकेत मुतडक . शिक्षक सुनीता पापळ,मिरा नरसाळे,अनिल नाईकवाडी,भीमाशंकर तोरमल आदींची उपस्थिती होती फोटो..माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना गुलाबपुष्प देऊन बाल चमूनी दिल्या चांगले आरोग्य व्हावे म्हणून शुभेछ्या...

Sunday, November 6, 2022

गं.भा. कलावंताबाई नथुजी भांगरे यांचे वृद्धपकाळाने निधन

अकोले (शांताराम काळे)
अकोले तालुक्यातील मनोहरपूर येथील जुन्या पिढीतील व्यक्तिमत्त्व गं.भा. कलावंताबाई नथुजी भांगरे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते.
त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पार्टी अकोले तालुकाध्यक्ष श्री.सिताराम भांगरे, काँग्रेस चे नेते रजनीकांत भांगरे, सौ. मंगल मांडेकर यांच्या मातोश्री होत्या.
मनोहरपूर येथील स्मशानभूमीत त्यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, प्रा.राम शिंदे सर, माजी आमदार वैभवराव पिचड, यांनी शोक व्यक्त केला आहे. यावेळी हभप दीपक महाराज देशमुख, जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे, अकोले एज्युकेशन चे विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सरचिटणीस सुधाकर देशमुख, अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अकोले नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मॉर्डन चे उपप्राचार्य दीपक जोंधळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बाळासाहेब मुळे,तालुका कार्यवाह भाऊसाहेब नवले,भाजपा संगमनेर तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ अशोक इथापे, तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलीक, भाऊसाहेब वाकचौरे, यशवंत अभाळे, शिवसेना तालुका प्रमुख संजय वाकचौरे, संगमनेर साखर कारखाना संचालक संभाजी वाकचौरे,अगस्ती साखर कारखाना संचालक मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ मनोज मोरे आदी उपस्थित होते.

मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेटअकोले तालुक्यातून तटकरे यांचा निषेध

मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेट

अकोले तालुक्यातून तटकरे यांचा निषेध

अकोले

माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्यामुळेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष करीत असल्याची टीका भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह पिचड समर्थकांनी केली आहे.

मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत वाकचौरे यांचेसह विविध कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला

सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतिने निषेध

सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतिने निशद November 06, 2022

 सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचा अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतिने निषेध .

अकोले (प्रतिनिधी ) :-
मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
         राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला.
          भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे तालुकाध्यक्ष नाजीम शेख यांनी सुनील तटकरे यांना फोन लावून सांगितले की, मधुकरराव पिचड साहेब हे साहेबच आहे. ते संपणार नाही,ते अहमदनगर जिल्ह्याचे जादूगार आहेत असे सुनावले. असे सूनावताच आ.तटकरे यांनी ओके म्हणत फोन कट केला.हा फोन सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे.
  भाजपा एन टि सेलचे  सचिन उगले यांनी आ.तटकरे यांना फोन लावला व पिचड साहेब हे नांव घेताच आ.तटकरे यांनी फोन कट केला.ही ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सुनिल तटकरे साहेब आज शिर्डित येऊन बोंबलले पिचड साहेब तालुक्याचे नेते झाले मात्र याच सुनिल तटलरेच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ मध्ये पिचड साहेबांचा फोटो यांनी लावलाय उगाच काहीही स्टंट करायचे.
पिचड समर्थक शंभू नेहे यांनी सोशल मिडिया वर तटकरे यांना सूनवताना सांगितले की, आम्ही अनेक वेळा तटकरे यांना पिचड साहेब यांच्या पाया पडताना पाहिले आहे. संतोष सोडनर, संतोष तिकांडे यांनी ही आपल्या पध्दतीने निषेध नोंदविला आहे.

 भाजपचे नेते रमेश राक्षे यांनी तर टोकाची टीका
सुनील तटकरे यांच्यावर करून त्यांच्या विधानांचा जाहीर निषेध केला. 
रमेश राक्षे यांचा सोशल मीडियावरील मेसेज जशाचा तसा खालील प्रमाणे...
. माझ्या तमाम मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथिल अधिवेशनात तटतटकरे , अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मा.पिचड साहेबांवर जसा  एखादा एखाद्याचा हुकमी पाळीव  कुत्रा जसा भुंकतों ना!.. अगदी तसाच काकाची राखणदारी करणारा, पण त्या राखणदारीच्या बदल्यात त्याला पण खासदारकी अनं पोरीला आमदारकी मिळवणारा.....त्या तिकडचा !!.. कोकणातला तटकरे आदिवासी जनतेचा मसिहा म्हणून ज्यांना अवघा महाराष्ट्रच नव्हे तर नुकत्याच महामाहिम राष्ट्रपती झालेल्या द्रोपदी मुर्म यांनी दिल्लीत बोलावून आदिवासी समाजाच्या कल्याणकारी विविध योजनां सबंधी माहिती घेऊन विचारविनिमय केला अशा आदरणीय पिचड साहेबांच्या बाबत जे जे विधानं केली त्याचा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रथम निषेध करतो... पिचड साहेब तालुक्याचे पण नेते राहिले नाही असं विधान या काकाच्या लाभार्थी झिलकर्याने केले आहे, त्या बुद्धहिन व अक्कल शुन्य तटकरे अरे आज घडीला पिचड साहेब दवाखान्यात आहेत ज्या़ंच्या बद्दल तु विधानं करतो त्या पिचड साहेबांच्या मुळे आज तुमची जी राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे तो तुझ्या त्या काकांचा पक्ष ४० वर्ष तुझ्या काकांच्या खांद्याला खांदा भिडवून पिचड साहेबांनी पण कष्ट उचललेले आहे हे लक्षात नसेल तर काकांनां विचार जरा, वाच्याळ विरा इतिहास हा कधीच पुसता येत नाही आणि राहिला प्रश्न त्यांचे नेतृत्व संपले म्हणण्याचा एकट्या पिचड साहेबांचे राजकारण संपविण्यासाठी पुरे सात पक्ष आणि कोटी कोटीने पैसा पेरावा लागला तरी नाकात दम आणला आणि तोंडी फेस आला आणि पिचड साहेबांचे राजकारण संपण्याच्या बाता , झोडतो अरे ५०/५० चे वर आमदार निवडून आणता येईना आणि ऊरताणुन पिचड साहेबांच्या वर बोलतो जरा आत्मपरीक्षण करा तुमचा गृहमंत्री. १०० कोटीच्या वसुलीत जेलची हवा खातोय त्या कुत्र्याची नवाब मलिकची संपत्ती आज कोर्टाने ईडीला जप्त करण्याची सुचना केली  तो तुमचा छगन दोन जेलात मुक्काम करुन आला आहे अरे तुमचा पार कचरा झाला, तुमच्या इज्जतीचा फालुदा होऊन ती तुमची लोकप्रिय इज्जत महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली असताना तुम्ही काय पिचड साहेबांवर बोलताय जरा धिर धरा हे आता वैभव पर्व सुरू झाले आहे .हळूहळू यांचे वादळात रुपांतर होईल तेव्हां तुमचे हे परीस्थिती नुसार बदलणारे बाजारु  दलाल पाल्या पाचोळ्यागत हवेत तरंगतील फक्त wait and watch हि एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता समज कोकणातील काका भक्त लाभार्थी पंडिता तुझ्या साठी आज एवढं पुरेसं

  या सर्व प्रकारातून भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.आता  जिल्ह्यातील व तालुक्यातील पहिल्या पट्टीचे नेते मंडळी याबाबत काय भूमिका घेतात या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

सुनील तटकरे यांच्या समग्र जीवन प्रवास यावर सुद्धा मधुकरराव पिचड यांचा फोटो आहे.

महाराष्ट्रराजकारणखासदार सुनील तटकरे बनले पिचड समर्थकांच्या टीकेचे धनी!

महाराष्ट्रराजकारण
खासदार सुनील तटकरे बनले पिचड समर्थकांच्या टीकेचे धनी!


अकोले

मधुकरराव पिचड यांचे सोबत पदमसिंह पाटील, मोहिते पाटील यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली मग या घराण्यावर का बोलत नाहीत, त्यांच्यावर बोलल तर अजित दादांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मात्र मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना टार्गेट केले जात आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पण असेच वक्तव्य केले आहे. असे मत भाजपा अकोले तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांनी मधुकरराव पिचड यांच्या विषयी अनुदगार काढले आहे. त्याचा निषेध अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला.

खा. तटकरे यांच्या या वक्त्यव्याचा माजीमंत्री पिचड यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध करीत वैभव पर्व सुरू होत आहे, ही वादळा पूर्वीची शांतता आहे असा सोशल मीडियावर तटकरे यांना इशारा दिला.
भाजपा अल्पसंख्याक आघाडी चे तालुकाध्यक्ष नाजीम शेख यांनी सुनील तटकरे यांना फोन लावून सांगितले की, मधुकरराव पिचड साहेब हे साहेबच आहे. ते संपणार नाही,ते अहमदनगर जिल्ह्याचे जादूगार आहेत असे सुनावले. असे सूनावताच आ.तटकरे यांनी ओके म्हणत फोन कट केला.हा फोन सोशल मीडियावर तुफान व्हायलर होत आहे.
भाजपा एन टि सेलचे सचिन उगले यांनी आ.तटकरे यांना फोन लावला व पिचड साहेब हे नांव घेताच आ.तटकरे यांनी फोन कट केला.ही ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सुनिल तटकरे साहेब आज शिर्डित येऊन बोंबलले पिचड साहेब तालुक्याचे नेते झाले मात्र याच सुनिल तटलरेच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ मध्ये पिचड साहेबांचा फोटो यांनी लावलाय उगाच काहीही स्टंट करायचे.
पिचड समर्थक शंभू नेहे यांनी सोशल मिडिया वर तटकरे यांना सूनवताना सांगितले की, आम्ही अनेक वेळा तटकरे यांना पिचड साहेब यांच्या पाया पडताना पाहिले आहे. संतोष सोडनर, संतोष तिकांडे यांनी ही आपल्या पध्दतीने निषेध नोंदविला आहे.
भाजपचे नेते रमेश राक्षे यांनी तर टोकाची टीकानसुनील तटकरे यांच्यावर करून त्यांच्या विधानांचा जाहीर निषेध केला. रमेश राक्षे यांचा सोशल मीडियावरील मेसेज जशाचा तसा खालील प्रमाणे…. माझ्या तमाम मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथिल अधिवेशनात तटतटकरे , अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मा.पिचड साहेबांवर जसा एखादा एखाद्याचा हुकमी पाळीव कुत्रा जसा भुंकतों ना!.. अगदी तसाच काकाची राखणदारी करणारा, पण त्या राखणदारीच्या बदल्यात त्याला पण खासदारकी अनं पोरीला आमदारकी मिळवणारा…..त्या तिकडचा !!.. कोकणातला तटकरे आदिवासी जनतेचा मसिहा म्हणून ज्यांना अवघा महाराष्ट्रच नव्हे तर नुकत्याच महामाहिम राष्ट्रपती झालेल्या द्रोपदी मुर्म यांनी दिल्लीत बोलावून आदिवासी समाजाच्या कल्याणकारी विविध योजनां सबंधी माहिती घेऊन विचारविनिमय केला अशा आदरणीय पिचड साहेबांच्या बाबत जे जे विधानं केली त्याचा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रथम निषेध करतो… पिचड साहेब तालुक्याचे पण नेते राहिले नाही असं विधान या काकाच्या लाभार्थी झिलकर्याने केले आहे, त्या बुद्धहिन व अक्कल शुन्य तटतटकरे अरे आज घडीला पिचड साहेब दवाखान्यात आहेत ज्या़ंच्या बद्दल तु विधानं करतो त्या पिचड साहेबांच्या मुळे आज तुमची जी राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे तो तुझ्या त्या काकांचा पक्ष ४० वर्ष तुझ्या काकांच्या खांद्याला खांदा भिडवून पिचड साहेबांनी पण कष्ट उचललेले आहे हे लक्षात नसेल तर काकांनां विचार जरा, वाच्याळ विरा इतिहास हा कधीच पुसता येत नाही आणि राहिला प्रश्न त्यांचे नेतृत्व संपले म्हणण्याचा एकट्या पिचड साहेबांचे राजकारण संपविण्यासाठी पुरे सात पक्ष आणि कोटी कोटीने पैसा पेरावा लागला तरी नाकात दम आणला आणि तोंडी फेस आला आणि पिचड साहेबांचे राजकारण संपण्याच्या बाता , झोडतो अरे ५०/५० चे वर आमदार निवडून आणता येईना आणि ऊरताणुन पिचड साहेबांच्या वर बोलतो जरा आत्मपरीक्षण करा तुमचा गृहमंत्री. १०० कोटीच्या वसुलीत जेलची हवा खातोय त्या कुत्र्याची नवाब मलिकची संपत्ती आज कोर्टाने ईडीला जप्त करण्याची सुचना केली तो तुमचा छगन दोन जेलात मुक्काम करुन आला आहे अरे तुमचा पार कचरा झाला, तुमच्या इज्जतीचा फालुदा होऊन ती तुमची लोकप्रिय इज्जत महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली असताना तुम्ही काय पिचड साहेबांवर बोलताय जरा धिर धरा हे आता वैभव पर्व सुरू झाले आहे .हळूहळू यांचे वादळात रुपांतर होईल तेव्हां तुमचे हे परीस्थिती नुसार बदलणारे बाजारु दलाल पाल्या पाचोळ्यागत हवेत तरंगतील फक्त wait and watch हि एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता समज कोकणातील काका भक्त लाभार्थी पंडिता तुझ्या साठी आज एवढं पुरेसं….रमेश राक्षे

Tuesday, October 4, 2022

गायकर, लहामटे,भांगरे यांची खोटी सहानु भूती.. संभुराजे नेहे..

गायकर साहेब आणि भांगरे साहेबांची आज अकोले तालुक्याची शिखर संस्था असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवड झाली .

या निवडीबद्दल पत्रकार मित्रांनी वरील दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली व त्यांनतर पिचड साहेबांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली का अशी विचारणा केली.. खरं तर प्रश्न अनपेक्षित असल्यामुळे भांगरे साहेबांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतु ही सारवासारव करण्याच्या नादात इतके ज्येष्ठ नेते चक्क खोटे बोलतील अशी आजिबात अपेक्षा नव्हती... परंतु समोरून अनपेक्षित पने आलेल्या प्रश्नाला काहीतरी थातूरमातूर उत्तर देणे गरजेचे होते त्यामुळे भांगरे साहेबांनी ते नेहेंच्या संपर्कात असून पिचड साहेबांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत अशी लोनकढी थाप मारली.. होय थापच मारली...

भांगरे साहेबांनी इतर कोणाचे नाव घेतले असते तर मी कदाचित मान्यही केले असते परंतु पिचड साहेबांना मुंबईला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेबरोबर नेहे आडनाव असणारा मी एकमेव व्यक्ती होतो व मला भांगरे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही हे मी आदरणीय पिचड साहेबांचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून अतिशय जबाबदारीने सांगतो.. 

खर तर राजकारणात विचारसरणी वेगळी असली तरी वैयक्तिक आयुष्यात एकमेकाच्या दुःखात सहभागी होण्याची अकोले तालुक्याची राजकीय परंपरा राहिलेली आहे.. भांगरे साहेब कॅमेऱ्यासमोर खोटे बोललेच परंतु कालपासून आम्ही बघतोय की इतरही पिचड साहेबांच्या जीवावर मोठे झालेले अनेक लोक सत्तेच्या तसेच विजयाच्या उन्मादात आज पिचड साहेब आजारी असताना या वाईट काळात साधी त्यांची विचारपू्स करायला देखील तयार नाहीत.. 

असो निवडणुका येतील जातील.. जय पराजयाचा खेळ सुरू राहील... परंतु आज विजयाच्या उन्मादात असणाऱ्या प्रत्येकाने एक लक्षात ठेवावे की इतर कुठे नाही झाला तरी देवाच्या दरबारात सगळ्या प्रश्नांची उत्तर नक्की द्यावी लागणार आहेत.
  🙏शंभु गणपतराव नेहे 🙏

Wednesday, July 20, 2022

आपल्या अपंग मुलगी वैशाली हिच्या नावे आदिवासी ठाकर समाजाच्या लक्ष्मण सयाजी उघडे या वृध्द शेतकऱ्याने आपल्या

अकोले, ता.२०: आपल्या अपंग मुलगी वैशाली हिच्या  नावे आदिवासी ठाकर समाजाच्या लक्ष्मण सयाजी उघडे या वृध्द शेतकऱ्याने आपल्या शेतातील सत्तरी ओलंडणाऱ्या धबधब्याचे नाव  वैशाली धबधबा ठेवून लाखो पर्यटकांना आकर्षित केले आहे.भंडारदरा जलाशय पाहिल्यानंतर पर्यटकांची पाऊले वळतात ती  आदिवासी बहुल असलेल्या पांजरे  गावाकडे ...
भंडारदरा कडून घाटघर येथे जाणाऱ्या रस्त्यावर १५० लोकवस्तीचे पांजरे हे गाव आहे.येथील पोलिस पाटील लक्ष्मण सयाजी उघडे वय सत्तर यांनी आपल्या शेतात सत्तर वर्षापूर्वीचा ओढा पक्क्या दगडाने बांधून घेतला आहे.त्यासाठी कोणतीही सरकारी मदत नाही की सावकारी कर्ज घेतले नाही .जंगलातील दगड आणून ती योग्य पद्धतीने लावून तज्ञ इंजिनियर काय काम करेल असे काम करून त्याच्या शेतातून व्हणारा ओढ्याचे रूपांतर धबधब्यात झाले जणू काही नायगारा धबधबा त्यासाठी त्याच्या घरातील सर्व कुटुंबाची त्याला मदत झाली. वैशाली व रोहिणी दोन मुली त्यात वैशाली अपंग मतिमंद मात्र तिच्यावर लक्ष्मण यांचा जीवापाड जीव असल्याने त्याने आपल्या शेतातील ओढा बांधून त्यातून तयार होणाऱ्या धबधब्याला वैशाली फॉल असे नाव देऊन पर्यटकांना आकर्षित केले आहे.नायगारा सारखा निसर्ग निर्मित हा धबधबा अवतीर्ण झाला वन्य जीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे,अमोल आडे यांनी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना कच्चा रस्ता तयार करून दिला असला तरी पक्का रस्ता झाल्यास लाखो पर्यटक ,निसर्गप्रेमी याचा आस्वाद घेत आपला आनंद द्विगुणित करतील
पाऊस थांबल्यावर हा शेतकरी त्याच्यावर गहू ,हरबरा अशी पिके घेऊन आपले कुटुंब चालवतो राज्यातील हा पहिला धबधबा एका आदिवासी शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या प्रेमापोटी धबधब्याला मुलीचे नाव दिले आहे.भंडारदरा पर्यटन मध्ये आता वैशाली धबधब्याची नोंद झाली असून भंडारदरा घाटघर येथे भेट देणारे निसर्ग प्रेमी हमखास या धबधब्याला भेट देतात.
लक्ष्मण उघडे(शेतकरी, पांजरे) माझ्या आजोबा पंजोबाने शेतातील ओढा बांधला मी हा ओढा हळूहळू उंचावत नेला त्यातून धबधबा तयार झाला असून पक्का बांध बांधल्याने त्यातून निर्माण होणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.या धबधब्याला माझे मुलगी वैशाली हीचे नाव मी दिले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात याचा मला आनंद असून हे पाणी जलसंपदा विभागाने अडविले तर या भागातील शेतीला व पिण्यास पाणी उपलब्ध होईल व पाणी टंचाई दूर होईल त्यासाठी सरकारने या प्रकलपाचा विचार करावा.
फोटो.. लक्ष्मण उघडे
वैशाली उघडे,वैशाली धबधबा.. छाया शांताराम काळे.

Saturday, July 9, 2022

वाकी तुडुंब

अकोले, ता.९: : नगर जिल्हा आणि मराठवाड्यासाठी नगर जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदार ही धरणे महत्त्वपूर्ण आहेत. मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरू आहे. भातखाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतकरी गाळ तुडवणी, आवणीची कामे करताना दिसत आहेत. तर शनिवारी दुपारी एक वाजता वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी सांगितले

बारी, वारूंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने  वाकी जलाशयाचा ११२.६६ दशलक्ष घनफूट साठा झाल्याने ते शंभर टक्के भरले. कृष्णवंती नदीला पूर आला आहे.  यापूर्वी अंबित, पिंपळगाव खांड, , जलाशय भरले आहेत.मुळा कृष्णवंति  नदीला पूर आला आहे.

कोदणी वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. रंधा धबधबा सुरू झाला आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. भंडारदरा जलाशयात अवाक वाढत आहे. वादळी पाऊस झाल्याने उडदावणे येथील बुवांजी गांगड, सखाराम गांगड यांचे घरावरील कौले उडाले. गुहीरे, रंधा परिसरात वादळ व बीएसएनएलचे वायरमुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्याने परिसरातील दहा गावे काही काळ अंधारात होती.

वीज कर्मचारी दत्ता भोईर यांनी नियोजन करून वीज पूर्ववत केली. काल झालेल्या पाऊसमुळे भंडारदरा जलाशयात ३०० दशलक्ष घनफूट आवक झाली आहे

पाऊस..भंडारदरा ९६ मिलिमीटर(७३३)घाटघर ११२(१२५९) रतनवाडी १३९(१२७२)वाकी ७३(५२३)निळवंडे९(३३७) आढळा५(८०) मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Wednesday, June 22, 2022

शेकरू कमी झाले

अकोले, ता.२२:
अकोले कळसुबाई हरिसचंद्रगड अभयारण्य क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत शेकरूंची संख्या कमी झाली आहे.नुकत्याच करण्यात आलेल्या प्रगणनेत ही बाब निदर्शनास आली.
शेकरू हा प्राणी कळसुबाई हरिसचंद्रगड अभयारण्य तसेच लगतच्या भिमाशँकर अभयारण्य परिसरात आढळतो.हरिसचंद्रगड परिसरातील कोथळे देवराई,तोलारखिंड,तसेच अंबित ,पाचनई,कुमशेत येथील वनांमध्ये शेकरूंचे अस्तित्व मोठया प्रमाणात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेकरू झाडावर नवीन घरटी बंधतात.त्या मुळे मे महिन्याच्या अखेरीस तसेच जून च्या पहिल्या आठवड्यात शेकरूंची गणना करतात.झाडावर प्रत्यक्ष दिसलेले शेकरू तसेच त्यांची नवी व जुनी घरटी यांची मोजदाद केली जाते.
कळसुबाई हरिसचंद्रगड अभयारण्यात 30 मे ते 3 जून या कालावधीत भंडारदरा व राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात ही गणना करण्यात आली.
हरिसचंद्रगड परिसरातील कोथळे,अंबित,पाचनई परिसरात 47 शेकरू दिसून आले.या शिवाय झाडांवर शेकरूंची नव्याने बांधलेली 177 तर जुनी 135 घरटी आढळून आली.शिवाय 42 घरटी सोडून दिलेली दिसली.आबा,हिरडा,लोध,उंबर,करप, करंबु,जांभूळ,आवळा,येहळा आदी झडांवर शेकरू तसेच त्यांच्या घरट्याचे अस्तित्व आढळले.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील कोळटेंभे व रतनवाडी परिसरातील जँ जँगलातही 11 शेकरू प्रत्यक्ष दिसले.तसेच वापरात असलेली 19 घरटी दिसून आली.
 प्रत्यक्षात 58 शेकरू दिसले असले तरी नव्याने बंधलेली घरटी पहाता त्यांची संख्या 70 ते 75 असावी असा अंदाज आहे.
गतवर्षी अभयारण्यात 97 शेकरू दिसले होते. तसेच त्यांची 396 घरटी दिसून आली होती.गतवर्षी त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत शेकरूंच्या संख्येत दीड पट वाढ दिसून आली होती.या वर्षी मात्र त्यांच्या संख्येत घट झाली आहे.
शेकरू हा राज्य प्राणी असून त्याचे लाल डोळे तसेच त्याला झुपकेदार शेपटी असते. राज्यात काही ठिकाणच्या जगलातच आढळत असलेल्या या प्राण्यांच्या जतन संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Tuesday, June 21, 2022

९२ शेकरू हरिश्चंद्र गड कलसू बाई अभयारण्यात

अकोले, ता .२१:

 हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वन्यजीव व राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात  सुनिल लिमये साहेब अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)  वनसंस्थळ पश्चिम मुंबई मा.  अनिल अंजनकर वन्यजीव नाशिक  गणेश रणदिवे सा. वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर वन्यजीव वनपरिक्षेत्रात दिनांक ३०/०५/२०२२ ते ३/०६/२०२२ पर्यंत महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु या वन्य प्राण्यांची प्रगणना करण्यात आली प्रगणनेसाठी संरक्षण मजुर, वनरक्षक वनपाल यांनी शेकरु चे घरटे (जुने, नवे) प्रत्यक्ष दिसलेले

 

शेकरु  धानुसार प्रगणना करण्यात आली आहे.

 

 हरिश्चंद्रगड- अभयारण्यात गतवर्षी९७   तर २०२२ ल ७५शेकरू आढळले आहेत. यामुळे शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा  वाढ कमी झाल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगणतीनुसार स्पष्ट झाले आहे. वन्यजीव विभागाच्या माहितीनुसार या अभयारण्यात आतापर्यंत शेकरूंची ३५८  घरटी आढळली आहेत; मात्र, त्यांची संख्या ७५  असून  कोथळे नवीन २२,विहीर २० , लव्हाळी कोतुळ २६ ,पाचनई९ , कुमशेत ३  शेकरू आहेत  ही संख्या घटली   आहे.

 

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवितात. या मुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली असून हे सर्वेक्षण मे चा शेवट व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे अंतिम आकडा हा ७५ आहे, असे वन विभागाचे मत आहे. ही गणना 'जीपीएस' या तंत्राद्वारे केली जाते. यंदा केलेल्या गणनेत शेकरूंचा आकडा वाढू

 

शकतो, अशी आशा स. वनसरंक्षक गणेश रणदिवे  यांनी व्यक्त केली आहे. इतरत्र त्यांचा अधिवास आहे का, याचा अभ्यास करणार असल्याचे वनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ यांनी सांगितले. अकोले तालुक्यात

चौकट

तळकोकणातही शेकरूंचे दर्शन

 

वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते ते १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते. महाराष्ट्रात भीमशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्यांची संख्या वाढली आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक, शेपटी असलेल्या शेकरूंच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात..

कोरोना मुळे दोन वर्षे 

शेकरूंची नोंद करण्याचे काम काही अंशी झाले असून हरिश्चंद्रगड अभयारण्यात वापरातील व वापरात नसलेली ३५८  घरटी आढळली असून एकूण ७५  शेकरू या परिसरात असून कळसूबाई

 

घाटघर परिसरात १७ शेकरू असून तेथेही ४३ घरटी आढळली आहेत. गतवर्षी प्राणी पक्षांसह अभयारण्य क्षेत्रात २८० प्राणी व ४५० पक्षी आढळल्याची माहिती वनाधिकारी पडवळ यांनी दिली. photo akl6p1,2 

 



बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...