Wednesday, July 20, 2022

आपल्या अपंग मुलगी वैशाली हिच्या नावे आदिवासी ठाकर समाजाच्या लक्ष्मण सयाजी उघडे या वृध्द शेतकऱ्याने आपल्या

अकोले, ता.२०: आपल्या अपंग मुलगी वैशाली हिच्या  नावे आदिवासी ठाकर समाजाच्या लक्ष्मण सयाजी उघडे या वृध्द शेतकऱ्याने आपल्या शेतातील सत्तरी ओलंडणाऱ्या धबधब्याचे नाव  वैशाली धबधबा ठेवून लाखो पर्यटकांना आकर्षित केले आहे.भंडारदरा जलाशय पाहिल्यानंतर पर्यटकांची पाऊले वळतात ती  आदिवासी बहुल असलेल्या पांजरे  गावाकडे ...
भंडारदरा कडून घाटघर येथे जाणाऱ्या रस्त्यावर १५० लोकवस्तीचे पांजरे हे गाव आहे.येथील पोलिस पाटील लक्ष्मण सयाजी उघडे वय सत्तर यांनी आपल्या शेतात सत्तर वर्षापूर्वीचा ओढा पक्क्या दगडाने बांधून घेतला आहे.त्यासाठी कोणतीही सरकारी मदत नाही की सावकारी कर्ज घेतले नाही .जंगलातील दगड आणून ती योग्य पद्धतीने लावून तज्ञ इंजिनियर काय काम करेल असे काम करून त्याच्या शेतातून व्हणारा ओढ्याचे रूपांतर धबधब्यात झाले जणू काही नायगारा धबधबा त्यासाठी त्याच्या घरातील सर्व कुटुंबाची त्याला मदत झाली. वैशाली व रोहिणी दोन मुली त्यात वैशाली अपंग मतिमंद मात्र तिच्यावर लक्ष्मण यांचा जीवापाड जीव असल्याने त्याने आपल्या शेतातील ओढा बांधून त्यातून तयार होणाऱ्या धबधब्याला वैशाली फॉल असे नाव देऊन पर्यटकांना आकर्षित केले आहे.नायगारा सारखा निसर्ग निर्मित हा धबधबा अवतीर्ण झाला वन्य जीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे,अमोल आडे यांनी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना कच्चा रस्ता तयार करून दिला असला तरी पक्का रस्ता झाल्यास लाखो पर्यटक ,निसर्गप्रेमी याचा आस्वाद घेत आपला आनंद द्विगुणित करतील
पाऊस थांबल्यावर हा शेतकरी त्याच्यावर गहू ,हरबरा अशी पिके घेऊन आपले कुटुंब चालवतो राज्यातील हा पहिला धबधबा एका आदिवासी शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या प्रेमापोटी धबधब्याला मुलीचे नाव दिले आहे.भंडारदरा पर्यटन मध्ये आता वैशाली धबधब्याची नोंद झाली असून भंडारदरा घाटघर येथे भेट देणारे निसर्ग प्रेमी हमखास या धबधब्याला भेट देतात.
लक्ष्मण उघडे(शेतकरी, पांजरे) माझ्या आजोबा पंजोबाने शेतातील ओढा बांधला मी हा ओढा हळूहळू उंचावत नेला त्यातून धबधबा तयार झाला असून पक्का बांध बांधल्याने त्यातून निर्माण होणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.या धबधब्याला माझे मुलगी वैशाली हीचे नाव मी दिले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात याचा मला आनंद असून हे पाणी जलसंपदा विभागाने अडविले तर या भागातील शेतीला व पिण्यास पाणी उपलब्ध होईल व पाणी टंचाई दूर होईल त्यासाठी सरकारने या प्रकलपाचा विचार करावा.
फोटो.. लक्ष्मण उघडे
वैशाली उघडे,वैशाली धबधबा.. छाया शांताराम काळे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...