Saturday, July 9, 2022

वाकी तुडुंब

अकोले, ता.९: : नगर जिल्हा आणि मराठवाड्यासाठी नगर जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदार ही धरणे महत्त्वपूर्ण आहेत. मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरू आहे. भातखाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतकरी गाळ तुडवणी, आवणीची कामे करताना दिसत आहेत. तर शनिवारी दुपारी एक वाजता वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी सांगितले

बारी, वारूंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने  वाकी जलाशयाचा ११२.६६ दशलक्ष घनफूट साठा झाल्याने ते शंभर टक्के भरले. कृष्णवंती नदीला पूर आला आहे.  यापूर्वी अंबित, पिंपळगाव खांड, , जलाशय भरले आहेत.मुळा कृष्णवंति  नदीला पूर आला आहे.

कोदणी वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. रंधा धबधबा सुरू झाला आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. भंडारदरा जलाशयात अवाक वाढत आहे. वादळी पाऊस झाल्याने उडदावणे येथील बुवांजी गांगड, सखाराम गांगड यांचे घरावरील कौले उडाले. गुहीरे, रंधा परिसरात वादळ व बीएसएनएलचे वायरमुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्याने परिसरातील दहा गावे काही काळ अंधारात होती.

वीज कर्मचारी दत्ता भोईर यांनी नियोजन करून वीज पूर्ववत केली. काल झालेल्या पाऊसमुळे भंडारदरा जलाशयात ३०० दशलक्ष घनफूट आवक झाली आहे

पाऊस..भंडारदरा ९६ मिलिमीटर(७३३)घाटघर ११२(१२५९) रतनवाडी १३९(१२७२)वाकी ७३(५२३)निळवंडे९(३३७) आढळा५(८०) मिलिमीटर पाऊस झाला आहे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...