Friday, May 31, 2024

माजी मंत्री पिचड

आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ म्हणून ज्यांचा उल्लेख करावा वाटतो ते अकोले तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय मधुकरराव पिचड होय मधुकरराव पिचड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शानदार सोहळ्यात जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करताना जे मानपत्र देण्यात आले त्यामध्ये त्यांना जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ अशी पदवी देण्यात आली. पाणी वीज शेती सहकार शिक्षण, सामाजिक राजकीय धार्मिक या सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणारी मधुकररावजी पिचड हे आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते ठरले आहे. अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्याच्या भूमीचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणण्याचे काम खऱ्या अर्थाने नामदार पिचड साहेबांनी केले. मधुकरराव पिचड यांचे योगदान फक्त आदिवासी समाजासाठी नाहीतर मराठा समाजासाठी व सहकारात शिक्षण क्षेत्रात पण उल्लेखनीय कार्य आहे अकोले तालुक्यामध्ये धरणांची निर्मिती करून खऱ्या अर्थाने जलनायक ठरले आहे. राजुर सारख्या आदिवासी चाळीसगाव डांगानातून एका आदिवासी शिक्षकाचा मुलगा एवढ्या मोठ्या कळसुबाईच्या शिखराची उंची गाठतो आणि म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा घेताना असे वाटते की हा आदिवासी हृदयसम्राट आहे. ही अतिशयोक्ती नाही व प्रशंसाही नाही तर ते एक वास्तव आहे. सभापती असताना अकोले तालुक्यावर आलेले दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली.आमदार असतांना ज्या मुद्द्यांवर ते संघर्ष करीत होते ते धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम जणू त्यांच्या स्वतःच्या हातात आल्याने त्यांचे कर्तृत्व अधिक खुलले. आदिवासी नेतृत्व:- आदिवासींच्या जीवनात बदल करण्याच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी करणाऱ्या योजना आखल्या. आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या ९ टक्के आदिवासींचे स्वतंत्र बजेट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंदू महादेव कोळी जातीचा आदिवासी समाजामध्ये असलेला समावेश सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध केला. आदिवासी भागामध्ये आम्हीच आमचे निर्णय घेणारे असा महत्वपूर्ण पेसा कायदा राज्यात लागू केला महाराष्ट्रभर आदिवासी समाजासाठी आश्रम शाळांची निर्मिती करून शिक्षणाची सुविधा निर्माण केली. आदिवासी समाजासाठी शबरी विकास महामंडळाची निर्मिती केली आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना आदिवासी समाजासाठी देण्यात आल्या. मंत्रिमंडळातील आदिवासी विकास मंत्रालय खऱ्या अर्थाने कार्यान्वित करण्याचे काम पिचड साहेब यांनी केले आहे. आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची अथवा उपसा जलसिंचनाचे कामे असोत. रस्ते असोत की पूल असोत, ह्या सार्वजनिक क्षेत्राचे बदलते विकासात्मक स्वरूप हे नामदार पिचड साहेब यांच्या कार्याचा उंचावणारा आलेख आहे. केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित काम त्यांचे नाही. मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे म्हणून राणे समितीमध्ये महाराष्ट्रभर दौरा करून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी शिफारस या कमिटीच्या माध्यमातून केली. राजकीय कारकीर्द 1972 सभापती अकोले पंचायत समिती 1980 - 85, अकोले मतदारसंघासाठी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य 1985 - 90, अकोलेचे आमदार म्हणून दुसरी टर्म 1990 - 95, अकोलेचे आमदार म्हणून तिसरी टर्म 25 जून 1991 - 3 नोव्हेंबर 1992, आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र) 6 मार्च 1993 - 14 मार्च 1995, आदिवासी विकास मंत्रालय (महाराष्ट्र), दुग्धविकास मंत्रालय , प्रवास विकास मंत्रालय आणि पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून दुसरी टर्म 1995 - 2000, अकोलेचे आमदार म्हणून चौथी टर्म विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र 27 ऑक्टोबर 1999 - 16 जानेवारी 2003, आदिवासी विकास मंत्रालय (महाराष्ट्र) साठी कॅबिनेट मंत्री म्हणून तिसरी टर्म 2000 - 2005 अकोलेचे आमदार म्हणून 5वी टर्म 2009 - 2014, अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून सहावी टर्म 11 जून 2013 - 26 सप्टेंबर 2014, आदिवासी विकास मंत्रालय (महाराष्ट्र), भटक्या जमाती मंत्रालय (महाराष्ट्र) आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून चौथी टर्म ना.मधुकरराव पिचड साहेब जेव्हा वाडी-वस्तीवर येतात तेव्हा आदिवासीच्या झोपडीत बसून चहा पिणारे साहेब, अन अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात कित्येक कार्यकर्त्यांचे नाव त्यांच्या तोंडी पाठ असून त्या गावात गेल्यानंतर पाच पन्नास लोकांना नावाने हाका मारून साहेब बोलतात. बंडखोर स्वभाव:- स्वपक्षाच्या सरकार विरुद्ध त्यांनी भूमिका घेतलेल्या दिसून येतात. त्यामध्ये मीटर हटाव चळवळ असो किंवा भंडारदरा धरणाची पाणी फेरवाटप त्यांनी नव्याने भूमिका घेऊन व्यवस्थितपणे करून घेतलेले आहे. नद्या व धरणे आमच्या भागात आणि पाणी मात्र दुसऱ्यांना या अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम त्यांनीच आवाज उठविला. धनगर समाजाचा एस टी मध्ये समावेश करण्यास विरोध केला. साहेबांची कार्यपद्धती, कामाचा आवाका, बुद्धिचातुर्य, राजकीय धुरंधरपणा, इ.राजकारणाला आवश्यक असलेल्या गुणवत्तेमुळे अकोले तालुक्यातील नवी तर राज्याच्या राजकारणातील मापदंड ठरले... निर्माता :- अकोले तालुक्यामध्ये अनेक धरणांची निर्मिती मधुकरराव पिचड यांनी केली. अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती करून अकोले तालुक्यात उसाचे आगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पिचड साहेबांनी तालुक्यात कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. एखादा विरोधक काही काम घेऊन गेल्यावर पिचड साहेबांनी त्याचे काम केले नाही असे अद्याप कधीही घडलेले नाही. हेच त्यांच्या नेतृत्वाची व स्वभावाची फार मोठे गुणवैशिष्ट्य आहे, तालुक्याच्या प्रचलित भाषेत पिचड साहेबांनी कधीही कोणाचेही "कार्यक्रम" केला नाही, अथवा "बांडी" पाडली नाही उलट आज जो अकोले तालुका राज्यपातळीवर उभा आहे. त्याच्या महत्त्वाच्या पाऊलखुणा म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखाना, प्रवरा नदीच्या पाण्याचे फेरवाटप, विविध सामाजिक व सहकारी संस्था, दळणवळणाच्या सोयी-सुविधा, वाड्या-वस्त्या पर्यंत पोहोचलेल्या आदिवासींसाठीच्या असणाऱ्या आश्रमशाळा, स्वतःचे वेगळे अंदाजपत्रक असलेली आदिवासी उपयोजना सुरू केल्या अकोले तालुक्याचा पाणीदार नेता तालुक्याचे भाग्यविधाते अनेक धरणांचे निर्माते अगस्ती कारखान्याचे संस्थापक अकोला एज्युकेशन संस्था उन्नती सेवा मंडळ या माध्यमातून व अनेक शासकीय आश्रम शाळांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण करणारी आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते मधुकरराव पिचड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा *पद असो वा नसो मधुकरराव पिचड हेच खरे साहेब आहेत* शब्दांकन:- भाऊसाहेब वाकचौरे पाटील जिल्हा संयोजक भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर

Sunday, May 26, 2024

कळसुबाई शिरगणती

अकोले,ता.२६: कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात एक हजार ३ वन्य प्राणी आढळून आले तसेंच विविध प्रकारचे १८५२ पक्षी आढळून आले २३ ते २४ मे या दोन दिवसांच्या कालावधीत ही वन्यप्राणी गणना करण्यात आली भंडारदरा विभागातील कोळटेभे रतनवाडी घाटघर साम्रद शिंगणवडी पांजरे उददावणे येथील जंगलात असणारीस आठ पाणवठ्यावर तसेच राजूर विभागातील शिरपुंजे कुमशेत पाचनई अंबित लाव्हाळीओतूर पळसुंदे व कोथळे येथील 17 पाणवठ्यावर ही वन्य प्राणी गणना करण्यात आली आढळून आलेली वन्यप्राणक संख्या बिबटे 12 रानडुक्कर 74 सांबर 79 भेकर 66 ससा 56 वानर 383 माकड 127 कोल्हे 27 तरस 39 मुंगूस 32 रानमांजर 33 खार 59 घोरपड 1 उदमांजर 1 शेकरू 6 या शिवाय 3 निलगाई आणि 1 रानगवा ही आढळून आले राजूर विभागात विविध जातीचे 743 तर भंडारदरा विभागात 709 पक्षी आढळले : 30 पेक्षा अधिक प्रकारच्या या पक्षांमध्ये सर्वाधिक संख्या बागळ्यांची 376 आढळली त्या खालोखाल 200 कावळेही दिसले 21 घुबड 76 बुलबुल 5 ससाणे 18 सुतार पक्षी 115 लाव्हरी 30 टिटवी 31 भारद्वाज आढळले आकाशात विहार करणाऱ्या 12 घारी दिसल्या तर राघू मात्र 4 च आढळले 19 मोरही दिसले या शीवाय होले, पारवे,रानकोंबडी,पाणकोंबडी, सालुंकी धोबी,कोतवाल,कुंभरकुकडा,वटवाघूळ, रानकोंबडा, चंचूक,धोबी,खंड्या असे विविध पक्षी आढळले असल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले आहे. डी .डी.पडवळ (वन संरक्षक वन्य जीव विभाग )

Wednesday, May 22, 2024

शुभेछ्या

आयुष्याच्या कठीण वळणावार साथ देत कठीण प्रसंगावर मात करत सुखा पर्यंत येण्यात सिंहाचा वाटा तुझा... तूझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निर्मला!

Monday, May 20, 2024

काळ भात देतो सुगधं

अकोले ,ता.२०:(शांताराम काळे)आदिवासी भागात काळी साळ (काळ भात)हि दुर्मिळ तांदळाची जात असून खायला रुचकर व स्वाधीष्ट असलेली साळ आता फारशी दिसत नसली तरी लोक पंचायत हि संस्था तिचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करीत असून शेतकर्यांना बी देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेंत .या तांदळाची गोडी मुबई,पुणे,नाशिक,नगर या शहरी ग्राहकांना लागली आहे.हि काळी साळ इतरत्र मिळत नसल्याने शहरातील ग्राहक खेड्या पाड्यात हिंडताना दिसतात .अकोले तालुक्यातील गुहिरे ,रतनवाडी ,शिगन वाडी ,कुमशेत ,शिरपुंजे ,शेणीत ,केली-कोतूळ ,केळी ओतूर ,अम्बेवांगण ,चिंचोडी या भागात काळ भाताचे उत्पादन घेतले जाते .मात्र या तांदळाची उत्पादकता कमी असल्यानी आदिवाशी शेतकरी या तांदळाचे पिक मोठ्या प्रमाणात घेत नाही त्या एऐवजी सोनम ,इंद्र्यानी ,२४८,गरे,दप्तरी ,या जातीचे लागवड करतात .काळ्या साळीचे उत्पादन दिवसेन दिवस कमी होत आहे .मात्र काही शेतकरी आपल्या पुढील पिढीला या तांदळाच्या जातीचे सवर्धन करण्याचे धडे देत आहेत तर लोक पंचायत हि संस्था शेतकरी व त्यांच्या हिताच्या अनेक योजना व उपक्रम राबवीत आहे.त्यातून आपल्या संस्कृतीची विविधता टिकावी यासाठी तसेच काळ भात नाम शेष होऊ नये यासाठी आदिवासी भागात प्रबोधन शिबिरे घेतली जात आहे.मात्र कृषी खाते व आदिवाशी विकास हि शासनाची खाती याबाबीकडे डोळे झाक करीत आहे ,नुकतेच राजूरचे प्रदर्शन संपन्न झाले यावेळी शेती मालाचेही प्रदर्शन भरविण्यात आले मात्र भाताच्या कुठल्याही जाती दिसल्या नाही .याबाबत कृषी खाते अनभिज्ञ का ?असा सवाल हि निर्माण झाला आहे. काळ भाताचे उत्पादन सेवा निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत बांगर यांनी गेली ३ वर्षपासून हे पिक घेऊन आदिवासी शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहे. हा काळ भात चुलीवर ठेवला तर सर्व परिसरात त्याचा सुगंध दरवळतो तर गाईच्या दुधाबरोबर तो खाल्ला तर मन तृप्त होते असे आदिवासी शेतकरी सांगतात त्यामुळे या भाताला मोठी मागणी आहे.१०० रुपये किलो असा भाव या तांदूळ मिळवतो .आदिवासी भागात या भाताला काळी साळ म्हणतात मात्र शेतकरी हा तांदूळ करण्यास उदासीन आहे .तरी काही शेतकरी उदा.चंद्रकांत बांगर आज हि २२० पोती तांदूळ उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण करतात .पुणे येथे शेती प्रदर्शनात त्यांनी काळ भाताचे वान नेउन आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व केले हे विशेष ...फोटो....चंद्रकांत बांगर आपल्या शेतात भात पीक घेताना शांताराम काळे

कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा काल रविवार, दिनांक 19.5.2024 रोजी संपन्न झाली.यानिमित्ताने हा थरार एकदा प्रत्यक्ष बघाच

कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा काल रविवार, दिनांक 19.5.2024 रोजी संपन्न झाली.यानिमित्ताने हा थरार एकदा प्रत्यक्ष बघाच

कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा काल रविवार, दिनांक 19.5.2024 रोजी संपन्न झाली.यानिमित्ताने हा थरार एकदा प्रत्यक्ष बघाच

अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा काल रविवार, दिनांक 19.5.2024 रोजी संपन्न झाली.यानिमित्ताने हा थरार एकदा प्रत्यक्ष बघाच *कठ्याच्या यात्रेतील धगधगता थरार...!* आधुनिक जीवनशैलीमुळे आपण आपले नैसर्गिक जीवन आणि प्रसन्न मन त्या संस्कृतीच्या हवाली केले आहे. त्याचे काही बरे-वाईट परिणामही आज आपण भोगतो आहोत. मात्र, सह्याद्रीतील गिरीकंदरांत राहणारा आदिवासी समाज अजूनही त्यांच्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांना चिकटून जीवन जगतो आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या रुढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, वहिवाट इत्यादींशी एकरूप झाल्याचे दिसून येते. जीवनात आनंदी राहण्याचा मंत्रच जणू या लोकसंस्कृतीने, परंपरेने आदिवासींना बहाल केला आहे. दरवर्षी चैत्र, वैशाखाच्या सुमारास हे लोक रिकामे होतात. गावांच्या सामुदायिक जत्रांचा तो हंगाम असतो. आदिवासी समाजाची धार्मिकता आणि श्रद्धा यातून दिसते. याशिवाय आदिवासींच्या सांस्कृतिक वेगळेपणाचे मनोज्ञ दर्शनही यातून घडते. अत्यंत तन्मयतेने आणि उत्साहाने हे लोक यात सहभागी होतात. कौठवाडी. अकोले तालुक्यातील राजूरजवळचे असेच दुर्गम आदिवासी खेडे. अक्षय्य तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते. कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली. पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू येथे मोठी गर्दी करतात. खरे तर बिरोबा हे धनगर समाजाचे दैवत. परंतु येथे कौठवाडीत हा उत्सव साजरा करतात ते महादेव कोळी समाजाचे भाविक. महाराष्ट्राच्या­ लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्रोत्सव असतो. येथील बिरोबाच्या देवस्थानची आख्यायिकाही मजेशीर आहे. पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी-पाचघ­रचे धनगर लोकं कधी काळी मेंढ्या चारीत चारीत या भागात आले.एका मुक्कामी त्यांना ती पाटी काही उचलेना. मग परतीच्या वाटेवरील मेंढपाळांनी दोघांना देवाच्या पुजेअर्चेसाठी तेथेच ठेवले. बाकी मंडळी गावी परतली. येथील देवस्थान तेव्हापासूनचे! आद्य पूजा-यांची नावे भोईर. म्हणून आजही पूजेचा मान गावातील भोईरांना मिळतो. पूर्वी येथे छोटेखानी मंदिर होते. गावक-यांनी त्याचा अलिकडेच जीर्णोद्धार केलाय. सध्या येथे सभामंडपासह टुमदार मंदिर उभे आहे. चोहोबाजूने सह्य पर्वताच्या डोंगररांगेनं वेढलेल्या कौठवाडीला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेय. येथील यात्रेचे वैशिष्टय म्हणजे पेटलेले कठे (घागरी)डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यं­त बिरोबाच्या चौथऱ्याभोवती फेऱ्या मारत असतात. प्रत्येक फेरीगणिक किलोकिलोने भाविक मंडळी गोडतेल ओतत असतात. पेटवलेल्या घागरीत गोडतेल ओतण्यामागे भाविकांची श्रद्धा असते. तापलेले हे तेल कठ्यांतून खाली उघड्या अंगावर ओघळते. शिलगलेल्या आगीच्या ज्वालांनी लालबुंद झालेल्या आतील निखाऱ्याने, तापलेल्या तेलाने भाविकांना कोणतीही इजा होत नाही, भाजत नाही, असा समज परंपरेने चालत आलाय. खरं म्हणजे अशी इजा कोणाला झाल्याचे दिसून आलेले नाही. एरवी निखार्‍याजवळ हात गेला तरी आपल्या हाताला चटका बसतो, या पार्श्वभूमीवर येथील हे रोमांचकारी दृश्य बघणाऱ्याला काहीसे चक्रावून टाकते. 'कठा' म्हणजे काय, तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणाऱ्या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात. पेट घेतलेला कठा विझू नये, म्हणून आत कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने छानदार नक्षी काढतात. रानचाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा सुंदर रितीने सजवतात. सजवलेले हे कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात. भाविक गण किटली-बाटलीत आणलेले तेल यात ओतत असतात. आदिवासी श्रद्धाळू बिरोबला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात. नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबावर श्रद्धा आहे. दरवर्षी यात्रेत ३५-४० कठे असतात. एकाच वेळी ते चेतवले जातात. ज्यांच्या अंगात बिरोबा 'संचारतो' असे भक्तगण कठा डोईवर घेवून मिरवतात. डोक्यावर पेटलेले कठे... त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला... फेरीगणिक ओतले जाणारे तेल... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद... दैवताच्या नावाचा जयघोष... संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा गजर शिवारभर दुमदुमतो आहे... 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असा एक लयबद्ध चित्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो आहे... उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळतेय... फेऱ्यांमागून फेऱ्या सुरूच आहेत... निशाणाच्या काठीमागून मिरवणूक चाललेली... नऊ-साडेनऊला सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यं­त सुरूच असते... कोठून कोठून आलेले हजारो भाविक-यात्रेकरू हा नजारा श्वास रोखून, विस्मयचकित मुद्रेनं पाहातच राहतात. आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना थक्क होऊन जातात... आता कठ्यांची मिरवणूक संपलेली असते. आपण माघारी फिरतो. परतीच्या वाटेवरून चालू लागतो. तेव्हादेखील आपल्या डोळ्यांसमोर नाचत असतात काळोखाच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हलते पलिते... मंगल वाद्यांचा नाद अजून कानात घुमत राहतो... काहीतरी 'निराळे' पाहायला मिळाल्याची साक्ष आपण स्वतःलाच देत असतो. अशी ही कठ्याची यात्रा एकदा तरी प्रत्यक्ष बघावी... (लेखक शिक्षक असून, अॅक्टिव टीचर्स फोरमचे(महाराष्ट्र) संयोजक आहेत.) Mobile No. 9422855151

Thursday, May 9, 2024

मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी!

आज आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आयुष्यातील यशस्वी सहजीवनाचा ३२ वर्षाचा प्रवास पूर्ण करत असताना थोडंसं लिहाव वाटलं म्हणून हा शब्दप्रपंच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक व खाजगी आयुष्य व्यतीत करत असताना महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थीदशेत असल्यापासून वाडवडीलांच्या पुण्याईने थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी फार कमी वयातच मला व माझ्या सौभाग्यवतीला लाभली दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ महत्वकांक्षा, दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची असलेली उर्मी व अपार कष्टाची किनार या सर्वांच्याच जोरावर एका शिक्षकांच्या घरात जन्माला येऊन अकोले तालुक्यातील राजुर,गोंदीशी, कातळापूर अशा प्रभावशाली गावांचे शिक्षक पद भूषवताना माझे आठ बहीण भावंडे सांभाळताना गरिबीची रेष ओरखडू न देणारे माझे वडील व हाळी पाटी करून आम्हा बहीण भावंडाना सांभाळणारी आई तिच्या संस्कारात वाढून आम्ही कष्टाने शिक्षण घेतले त्यातच माझे १९९२ रोजी झालेले लग्न व आमच्या कुटुंबात आलेली माझी पत्नी मंजुषा हिने आपले माहेरचे व सासरचे संस्कार जोपासत माझा संसार यशस्वीरीत्या पार पाडला आज आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाली परंतु मला ३२ वर्षे साथ देणारी मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी! मस्त बहरलेलं नातं.ऋषी , स्वप्नील मुळे आणखीच खुललेलं. ३२ वर्ष झाली तरीही नात्यातला टवटवितपणा तोच. महिलांना सुपरमॅनेजर का म्हणतात, ते मंजुषा कडे पाहिलं की कळतं. एक उत्तम गृहिणी , प्राचार्य पद सांभाळताना उत्कृष्ट प्रशासन उपेक्षित घटकातील मुलामुलींना असणारा तिचा आधार व माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी एक सहचारिणी त्यामुळेच मी गेली ३२ वर्षे अनेक संकटाना सामोरे जात संघर्ष करीत टिकून आहे . शिक्षण संस्थेचे काम करताना तिने दिलेले सल्ले मोलाचे ठरले माझं पत्रकारितेचं करिअर हे सातत्यानं चढउताराचं. मात्र कसलीही कुरबुर न करता तिची साथ कायम राहिली. हीच मंजुषा आहे. स्वत:च्या हक्काव्यतिरिक्त आणखी काहीच न मागणारी. अगदी हट्ट करूनही गरजेव्यतिरिक्त काहीच न घेणारी. आज लग्नाला ३२ वर्ष झाली. मात्र तेच प्रेम आहे. दिवसागणिक आणखीच मुरत चाललेलं. श्वासासारखंच तिचं अन् माझं नातं आहे!…. सखे  तुझ्या सोबती ग काटे सुद्धा फुले वाटे अन तुझ्या विरहाने फुले सुद्धा मला बोचे सखे तुझ्या सहवासात मला जगणे मान्य होते अन तुझ्या विरहाने मला मरणे भाग होते  तुझाच शांताराम बापू काळे

वन्यजीवांचीही आबाळ

Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...