Friday, May 31, 2024

माजी मंत्री पिचड

आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ म्हणून ज्यांचा उल्लेख करावा वाटतो ते अकोले तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय मधुकरराव पिचड होय मधुकरराव पिचड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शानदार सोहळ्यात जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करताना जे मानपत्र देण्यात आले त्यामध्ये त्यांना जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ अशी पदवी देण्यात आली. पाणी वीज शेती सहकार शिक्षण, सामाजिक राजकीय धार्मिक या सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणारी मधुकररावजी पिचड हे आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते ठरले आहे. अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्याच्या भूमीचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणण्याचे काम खऱ्या अर्थाने नामदार पिचड साहेबांनी केले. मधुकरराव पिचड यांचे योगदान फक्त आदिवासी समाजासाठी नाहीतर मराठा समाजासाठी व सहकारात शिक्षण क्षेत्रात पण उल्लेखनीय कार्य आहे अकोले तालुक्यामध्ये धरणांची निर्मिती करून खऱ्या अर्थाने जलनायक ठरले आहे. राजुर सारख्या आदिवासी चाळीसगाव डांगानातून एका आदिवासी शिक्षकाचा मुलगा एवढ्या मोठ्या कळसुबाईच्या शिखराची उंची गाठतो आणि म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा घेताना असे वाटते की हा आदिवासी हृदयसम्राट आहे. ही अतिशयोक्ती नाही व प्रशंसाही नाही तर ते एक वास्तव आहे. सभापती असताना अकोले तालुक्यावर आलेले दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली.आमदार असतांना ज्या मुद्द्यांवर ते संघर्ष करीत होते ते धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम जणू त्यांच्या स्वतःच्या हातात आल्याने त्यांचे कर्तृत्व अधिक खुलले. आदिवासी नेतृत्व:- आदिवासींच्या जीवनात बदल करण्याच्या दृष्टीने त्यांना स्वावलंबी करणाऱ्या योजना आखल्या. आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या ९ टक्के आदिवासींचे स्वतंत्र बजेट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंदू महादेव कोळी जातीचा आदिवासी समाजामध्ये असलेला समावेश सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध केला. आदिवासी भागामध्ये आम्हीच आमचे निर्णय घेणारे असा महत्वपूर्ण पेसा कायदा राज्यात लागू केला महाराष्ट्रभर आदिवासी समाजासाठी आश्रम शाळांची निर्मिती करून शिक्षणाची सुविधा निर्माण केली. आदिवासी समाजासाठी शबरी विकास महामंडळाची निर्मिती केली आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना आदिवासी समाजासाठी देण्यात आल्या. मंत्रिमंडळातील आदिवासी विकास मंत्रालय खऱ्या अर्थाने कार्यान्वित करण्याचे काम पिचड साहेब यांनी केले आहे. आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची अथवा उपसा जलसिंचनाचे कामे असोत. रस्ते असोत की पूल असोत, ह्या सार्वजनिक क्षेत्राचे बदलते विकासात्मक स्वरूप हे नामदार पिचड साहेब यांच्या कार्याचा उंचावणारा आलेख आहे. केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित काम त्यांचे नाही. मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे म्हणून राणे समितीमध्ये महाराष्ट्रभर दौरा करून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी शिफारस या कमिटीच्या माध्यमातून केली. राजकीय कारकीर्द 1972 सभापती अकोले पंचायत समिती 1980 - 85, अकोले मतदारसंघासाठी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य 1985 - 90, अकोलेचे आमदार म्हणून दुसरी टर्म 1990 - 95, अकोलेचे आमदार म्हणून तिसरी टर्म 25 जून 1991 - 3 नोव्हेंबर 1992, आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र) 6 मार्च 1993 - 14 मार्च 1995, आदिवासी विकास मंत्रालय (महाराष्ट्र), दुग्धविकास मंत्रालय , प्रवास विकास मंत्रालय आणि पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून दुसरी टर्म 1995 - 2000, अकोलेचे आमदार म्हणून चौथी टर्म विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र 27 ऑक्टोबर 1999 - 16 जानेवारी 2003, आदिवासी विकास मंत्रालय (महाराष्ट्र) साठी कॅबिनेट मंत्री म्हणून तिसरी टर्म 2000 - 2005 अकोलेचे आमदार म्हणून 5वी टर्म 2009 - 2014, अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून सहावी टर्म 11 जून 2013 - 26 सप्टेंबर 2014, आदिवासी विकास मंत्रालय (महाराष्ट्र), भटक्या जमाती मंत्रालय (महाराष्ट्र) आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून चौथी टर्म ना.मधुकरराव पिचड साहेब जेव्हा वाडी-वस्तीवर येतात तेव्हा आदिवासीच्या झोपडीत बसून चहा पिणारे साहेब, अन अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात कित्येक कार्यकर्त्यांचे नाव त्यांच्या तोंडी पाठ असून त्या गावात गेल्यानंतर पाच पन्नास लोकांना नावाने हाका मारून साहेब बोलतात. बंडखोर स्वभाव:- स्वपक्षाच्या सरकार विरुद्ध त्यांनी भूमिका घेतलेल्या दिसून येतात. त्यामध्ये मीटर हटाव चळवळ असो किंवा भंडारदरा धरणाची पाणी फेरवाटप त्यांनी नव्याने भूमिका घेऊन व्यवस्थितपणे करून घेतलेले आहे. नद्या व धरणे आमच्या भागात आणि पाणी मात्र दुसऱ्यांना या अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम त्यांनीच आवाज उठविला. धनगर समाजाचा एस टी मध्ये समावेश करण्यास विरोध केला. साहेबांची कार्यपद्धती, कामाचा आवाका, बुद्धिचातुर्य, राजकीय धुरंधरपणा, इ.राजकारणाला आवश्यक असलेल्या गुणवत्तेमुळे अकोले तालुक्यातील नवी तर राज्याच्या राजकारणातील मापदंड ठरले... निर्माता :- अकोले तालुक्यामध्ये अनेक धरणांची निर्मिती मधुकरराव पिचड यांनी केली. अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती करून अकोले तालुक्यात उसाचे आगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पिचड साहेबांनी तालुक्यात कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. एखादा विरोधक काही काम घेऊन गेल्यावर पिचड साहेबांनी त्याचे काम केले नाही असे अद्याप कधीही घडलेले नाही. हेच त्यांच्या नेतृत्वाची व स्वभावाची फार मोठे गुणवैशिष्ट्य आहे, तालुक्याच्या प्रचलित भाषेत पिचड साहेबांनी कधीही कोणाचेही "कार्यक्रम" केला नाही, अथवा "बांडी" पाडली नाही उलट आज जो अकोले तालुका राज्यपातळीवर उभा आहे. त्याच्या महत्त्वाच्या पाऊलखुणा म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखाना, प्रवरा नदीच्या पाण्याचे फेरवाटप, विविध सामाजिक व सहकारी संस्था, दळणवळणाच्या सोयी-सुविधा, वाड्या-वस्त्या पर्यंत पोहोचलेल्या आदिवासींसाठीच्या असणाऱ्या आश्रमशाळा, स्वतःचे वेगळे अंदाजपत्रक असलेली आदिवासी उपयोजना सुरू केल्या अकोले तालुक्याचा पाणीदार नेता तालुक्याचे भाग्यविधाते अनेक धरणांचे निर्माते अगस्ती कारखान्याचे संस्थापक अकोला एज्युकेशन संस्था उन्नती सेवा मंडळ या माध्यमातून व अनेक शासकीय आश्रम शाळांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण करणारी आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते मधुकरराव पिचड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा *पद असो वा नसो मधुकरराव पिचड हेच खरे साहेब आहेत* शब्दांकन:- भाऊसाहेब वाकचौरे पाटील जिल्हा संयोजक भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...