Thursday, May 9, 2024

मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी!

आज आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आयुष्यातील यशस्वी सहजीवनाचा ३२ वर्षाचा प्रवास पूर्ण करत असताना थोडंसं लिहाव वाटलं म्हणून हा शब्दप्रपंच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक व खाजगी आयुष्य व्यतीत करत असताना महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थीदशेत असल्यापासून वाडवडीलांच्या पुण्याईने थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी फार कमी वयातच मला व माझ्या सौभाग्यवतीला लाभली दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ महत्वकांक्षा, दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची असलेली उर्मी व अपार कष्टाची किनार या सर्वांच्याच जोरावर एका शिक्षकांच्या घरात जन्माला येऊन अकोले तालुक्यातील राजुर,गोंदीशी, कातळापूर अशा प्रभावशाली गावांचे शिक्षक पद भूषवताना माझे आठ बहीण भावंडे सांभाळताना गरिबीची रेष ओरखडू न देणारे माझे वडील व हाळी पाटी करून आम्हा बहीण भावंडाना सांभाळणारी आई तिच्या संस्कारात वाढून आम्ही कष्टाने शिक्षण घेतले त्यातच माझे १९९२ रोजी झालेले लग्न व आमच्या कुटुंबात आलेली माझी पत्नी मंजुषा हिने आपले माहेरचे व सासरचे संस्कार जोपासत माझा संसार यशस्वीरीत्या पार पाडला आज आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाली परंतु मला ३२ वर्षे साथ देणारी मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी! मस्त बहरलेलं नातं.ऋषी , स्वप्नील मुळे आणखीच खुललेलं. ३२ वर्ष झाली तरीही नात्यातला टवटवितपणा तोच. महिलांना सुपरमॅनेजर का म्हणतात, ते मंजुषा कडे पाहिलं की कळतं. एक उत्तम गृहिणी , प्राचार्य पद सांभाळताना उत्कृष्ट प्रशासन उपेक्षित घटकातील मुलामुलींना असणारा तिचा आधार व माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी एक सहचारिणी त्यामुळेच मी गेली ३२ वर्षे अनेक संकटाना सामोरे जात संघर्ष करीत टिकून आहे . शिक्षण संस्थेचे काम करताना तिने दिलेले सल्ले मोलाचे ठरले माझं पत्रकारितेचं करिअर हे सातत्यानं चढउताराचं. मात्र कसलीही कुरबुर न करता तिची साथ कायम राहिली. हीच मंजुषा आहे. स्वत:च्या हक्काव्यतिरिक्त आणखी काहीच न मागणारी. अगदी हट्ट करूनही गरजेव्यतिरिक्त काहीच न घेणारी. आज लग्नाला ३२ वर्ष झाली. मात्र तेच प्रेम आहे. दिवसागणिक आणखीच मुरत चाललेलं. श्वासासारखंच तिचं अन् माझं नातं आहे!…. सखे  तुझ्या सोबती ग काटे सुद्धा फुले वाटे अन तुझ्या विरहाने फुले सुद्धा मला बोचे सखे तुझ्या सहवासात मला जगणे मान्य होते अन तुझ्या विरहाने मला मरणे भाग होते  तुझाच शांताराम बापू काळे

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...