https://youtu.be/5MH6qLFxTec
Monday, April 27, 2020
Sunday, April 26, 2020
कठ्याच्या यात्रेतील धगधगता थरार....
कठ्याच्या यात्रेतील धगधगता थरार....
आधुनिक जीवनशैलीमुळे आपण आपले नैसर्गिक जीवन आणि प्रसन्न मन त्या संस्कृतीच्या हवाली केले आहे. त्याचे काही बरे-वाईट परिणामही आज आपण भोगतो आहोत. मात्र, सह्याद्रीतील गिरीकंदरांत राहणारा आदिवासी समाज अजूनही त्यांच्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांना चिकटून आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या रुढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, वहिवाट इत्यादींशी एकरूप झाल्याचे दिसून येते. जीवनात आनंदी राहण्याचा मंत्रच जणू या लोकसंस्कृतीने, परंपरेने आदिवासींना बहाल केला आहे. दरवर्षी चैत्र, वैशाखाच्या सुमारास हे लोक रिकामे होतात. गावांच्या सामुदायिक जत्रांचा तो हंगाम असतो. आदिवासी समाजाची धार्मिकता आणि श्रद्धा यातून दिसते. याशिवाय आदिवासींच्या सांस्कृतिक वेगळेपणाचे मनोज्ञ दर्शनही यातून घडते. अत्यंत तन्मयतेने आणि उत्साहाने हे लोक यात सहभागी होतात.
कौठवाडी. अकोले तालुक्यातील असेच एक दुर्गम आदिवासी खेडे. अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते. कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली. पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू येथे तोबा गर्दी करतात. खरे तर बिरोबा हे धनगर समाजाचे दैवत. पण येथी म्हणजे कौठवाडीत त्याचा उत्सव साजरा करतात ते महादेव कोळी समाजाचे भाविक. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्रोत्सव असतो. येथील बिरोबाच्या देवस्थानची आख्यायिकाही मोठी मजेशीर आहे.
पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी-पाचघरचे धनगर लोकं कधी काळी मेंढ्या चारीत चारीत या भागात आले.एका मुक्कामी त्यांना ती पाटी काही उचलेना. मग परतीच्या वाटेवरील मेंढपाळांनी दोघांना देवाच्या पुजेअर्चेसाठी तेथेच ठेवले. बाकी मंडळी गावी परतली. येथील देवस्थान तेव्हापासूनचे! आद्य पूजा-यांची नावे भोईर. म्हणून आजही पूजेचा मान गावातील भोईरांना मिळतो. पूर्वी येथे छोटेखानी मंदिर होते. गावक-यांनी त्याचा अलिकडेच जीर्णोद्धार केलाय. सध्या येथे सभामंडपासह टुमदार मंदिर उभे आहे. चोहोबाजूने सह्य पर्वताच्या डोंगररांगेनं वेढलेल्या कौठवाडीला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेय.
येथील यात्रेचे वैशिष्टय म्हणजे पेटलेले कठे डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या चौथ-याभोवती फे-या मारत असतात. प्रत्येक फेरीगणिक किलो किलोने तेल भाविक मंडळी ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांतून खाली ओघळते. ज्वालांनी लालबुंद झालेल्या आतील निखा-याने किंवा तप्त तेलाने भाविकांना इजा होत नाही असं समज परंपरेने चालत आलाय. तसे झाल्याचे दिसून आलेले नाही. एरवी निखार्याजवळ हात गेला तरी आपल्या हाताला चटका बसतो, या पार्श्वभूमीवर येथील हे दृश्य बघणा-याला काहीसे चक्रावून टाकते. नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबावर श्रद्धा आहे.
'कठा' म्हणजे काय, तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणा-या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात. पेट घेतलेला कठा विझू नये, म्हणून आत कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने छानदार नक्षी काढतात. रान चाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा मस्त सजवतात. सजवलेले कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात. भाविक गण यात तेल ओतत असतात. आदिवासी श्रद्धाळू बिरोबला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात. दर वर्षी यात्रेत ३५-४० कठे असतात. एकाच वेळी ते चेतवले जातात. ज्यांच्या अंगात बिरोबा 'संचारतो' असे भक्तगण कठा डोईवर घेवून मिरवतात.
डोक्यावर पेटलेले कठे... त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला... फेरीगणिक ओतले जाणारे तेल... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद... दैवताच्या नावाचा जयघोष... संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर शिवारभर दुमदुमतो आहे... 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असं लयबद्ध चीत्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो आहे... उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळतेय... मात्र फे-यांमागून फे-या सुरूच आहेत... निशाणाच्या काठीमागून मिरवणूक चाललेली... नऊ-साडेनऊला सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरूच असते... कोठून कोठून आलेले यात्रेकरू हा अनोखा नजारा श्वास रोखून, विस्मयचकित मुद्रेनं पाहातच राहातात. आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना सर्वच थक्क होवून जातात...
आता कठ्यांची मिरवणूक संपलेली असते. आपण माघारी फिरतो. परतीच्या वाटेवरून चालू लागतो. तेव्हादेखील आपल्या डोळ्यांसमोर नाचत रहातात काळोखाच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हलते पलिते...तो वाद्यांचा नाद कानात घुमत राहतो... काहीतरी 'निराळे' पाहायला मिळाल्याची साक्ष आपण स्वतःलाच देत असतो. अशी ही कठ्याची यात्रा एकदा तरी पाहावी...

Saturday, April 25, 2020
चैत्र पाडवा व एप्रिल व मे महिना म्हटलं की, अकोलेकरांच्या उत्साहाचा महिना.
अकोले
,ता.१३:- चैत्र पाडवा व एप्रिल व मे महिना म्हटलं की, अकोलेकरांच्या
उत्साहाचा महिना.परंतु त्यांच्या उत्साहावर कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले
आहे.त्याचे कारण म्हणजे एप्रिल व मे मध्ये जत्रा व यात्राचा
उत्सव.गावागावात आपल्या श्रद्धेचे स्थान असलेल्या देवांची यात्रा.
बाहेरगावी नोकरी करणारे तर या यात्राची वाट पहात असतात. परंतु आता तर
यात्रेलाच काय तर साधं भेटायला ही येऊ नका अशी वेळ या कोरोनाने आणली आहे.पण
अकोलेकरानी आपल्या भावनांना मुरड घालीत सर्व यात्रा बंद करून कोरोना
रोखण्यात यशस्वी झाले आहेत.
यात्रा म्हटली की,
यात्रांचे बैठकावर बैठका होतात.नियोजन ठरत जाते,यात्रेचे प्रमुख आकर्षण
म्हणजे तमाशा होय.त्याच्या तारखा लवकरच बुकिंग होतात.कुस्त्यांचा हगामा हा
ग्रामीण भागातील आवडीचा भाग,गावोगावच्या पहिलवानाना निमंत्रित केले
जाते.विविध खेळण्याची दुकाने, रहाटगाडे, पाळणे,ब्रेक डान्स अशी अनेक
दुकानदार येतात,हॉटेल,रसाची दुकाने,असतात,त्याचा आस्वाद यात्रेकरू घेत
असतात.पण आता ही मजा पाहायला मिळणार नाही.जत्रा म्हटली की, ते गाव फुल
झालेच म्हणून समजा,कारण जत्रेची मजाच औरच.अकोले तालुक्यात टाहाकरीची
जगदंबेची यात्रा,गणोऱ्याची अंबिका देवीची,मोग्रस ची मूळमातेची
यात्रा,म्हाळादेवीची खंडोबा यात्रा,लिंगदेव ची लिंगेश्वरची यात्रा,पिंपळगाव
निपणीची सटूआईची यात्रा,पिंपळदरीची येडूआईची यात्रा,निंब्रळ ची अंबिका
देवीची यात्रा अशा अनेक छोट्या मोठ्या गावातील यात्रेवर कोरोनाचे सावट
आलेले आहे.या यात्रासाठी गाववाले आपल्या नातेवाईकांना, मित्रांना बोलावीत
असतात.पण आता या यात्रेसाठीच काय साधे भेटायला ही येऊ नका अशी म्हणण्याची
वेळ लोकांवर आलेली आहे. अकोलेकरांची मोठी निराशा झाली आहे.असे असले तरी
पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आपापल्या गावातील यात्रा बंद करून कोरोनाचा
प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाले आहे.त्यामुळेच आज अकोले तालुका
कोरोनाच्या संकटापासून कोसो दूर आहे.मात्र रेवडी गोडीशेव चे कारखाने बंद
पडले आहेत शेकडो मजूर मजुरीविना रडतखडत जीवन व्यथित करत आहे तर गावागावातील
तमाशा कलावन्त,पैलवान केव्हा एकदाचा कोरोना नष्ट होतो याची वाट पाहून आहेत
तर लग्नाळू गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी कोरोना त्यांना अडचणींचा ठरत
आहे काही घाईच्या मंडळीने चार नातेवाईकांच्या साक्षीने उरकून घेतले आहे
Saturday, February 29, 2020
Friday, May 10, 2019
डोंगरची काळी मैना बाजारात ......
अकोले तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावर असणा-या राजूर परिसरातील रंधा माळेगाव जंगलात रानमेव्याचे आगमन झाले असुन डोंगरची काळी मैना या नावाने ओळख असलेली करवंदे राजुरच्या बाजारपेठेत यांच आगमन झाल आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगेचे साम्राज्य पसरलेले आहे. या डोंगररांगेमध्ये डोंगरची काळी मैना (करवंदे) पिकायला आता सुरुवात झाली आहे. तसं म्हटलं तर करवंदाचा सिजन हा एप्रिल व मे महिण्यातच असतो.डोंगराळ भागात पिकणारा हा रानमेवा तसा दुर्मिळच.पण चवीने आंबट गोड पण चवीष्ट असणारे हे फळ बघता क्षणीच कुणालाही हेवा वाटावा असच आहे.डोंगराच्या चढ उताराला सध्या करवदांच्या असंख्य जाळ्या ह्या काळ्याभोर फळांनी भरगच्च लगडलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे.रंगाने काळ्या व डोंगराच्या पायथ्याशी हे फळ आढळत असल्याने या करवंदालाच डोंगरची 'काळी मैना 'या नावानेही ओळखलं जातं.त्यातच शाळेला सुट्ट्या लागल्याने बरेचशी शाळकरी किलबिल कंपनी पाटी घेऊन भल्या सकाळीच अनवाणी पायाने जंगलाची वाट धरताना आता दिसु लागली आहेत.पाटीभर करवंद खुडायची आणि राजुरच्या बाजारपेठेची वाट धरायची असा नित्याचाच कार्यक्रम या चिमुरड्यांचा होऊन बसलाय.पळसाच्या किंवा चांद्याच्या पानाचा डोमा तयार करायचा आणि राजुरच्या बस स्टँडवर एस टी बस भोवती जोरात 'करवंद घ्या.....करवंद ...'अशी साद घालत ही चिमणी पाखरं अगदी ठेक्यात करवंद घेण्याची प्रवाशांना विनंती करताना दिसत आहेत.तर भंडारदरा व हरिश्चंद्रगड पर्यटनासाठी आलेली एखादी गाडी दिसली तर करवंद विकणारी ही किलबिल टोळी त्या गाडीलाच गराडा घालते.त्यावेळी नक्की कोणाची करवंद विकत घ्यावी हा मोठा प्रश्न भंडारदरा,हरिश्चंद्र,रंधा सहलीसाठी आलेल्या निसर्गप्रेमींना पडतो.ज्याची करवंद विकत घेतली जातील त्या मुलाला आभाळ ठेंगणं झालेलं असतं.एक करवंदाचा डोमा साधारणत: पाच ते दहा रुपयापर्यंत विकला जातो.दिवसभरात शंभर ते दिडशे रुपयापर्यंत या मुलांची विक्री होते.तर रंधा,माळेगाव,केळुंगणया गावावरून वयोवृद्ध आजी छोटी-छोटी मुले ही पाच दहा किलोमीटर असणा-या गावांवरून येऊन करवंद विकत आहेत.त्यांना या करवंदाच्या विक्रितुन येणा-या पैशातुन स्वत:च्या शाळेचा खर्च भागवायचा आहे.शाळा उघडल्यावर नविन ड्रेस,वह्या, पुस्तके घेण्याची ईच्छा या लहानग्यांनी बोलुन दाखविली आहे.तर काही चिमुकली ही घरखर्चासाठी आई वडिलांना मदतीचा हात पुढे करत आहे.उन्हातान्हात आदिवासी मुलांची चरितार्थासाठी चाललेली ही पायपीट बरीच काही शिकवणारी असल्याची भावना काहीजन बोलुन दाखवतात तर उडदावणे,पांजरे,घाटघर, शिंगणवाडी या अतिदुर्गम आदिवासी भागातील महीलाही सकाळी सहा वाजल्यापासुन करवंद गोळा करण्यासाठी काटेरी जाळीत घुसुन करवंद खुडत असतात.
घाटघर,शिंगणवाडी,मुरशेत,बारी, रतनवाडी, कोलटेंभे,या परिसरात करवंदाचे साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.या भागामध्ये राहाता,शिर्डी,राहुरी,कोल्हार, संगमनेर,अकोले सारख्या प्रगतशिल गावामधुन काही व्यापारी हे घाटघर परिसरात येऊन मिठाच्या मोबदल्यात किंवा १० ते १५ रु किलो ने कवढी मोल भावाने खरेदी करतात.या रानमेव्याला सध्या फक्त राजुर,अकोले,घोटी तसेच शेंडी (भंडारदरा) अशाच ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध असते. आदीवासी महामंडळ हे आदिवासी भागातुन हिरडा सारख्या मालाची खरेदी करुन योग्य हमी भाव देत असते.या अतिदुर्गम भागामध्ये डोंगरची काळी मैना या नावाने ओळखली जाणारी करवंद जर आदिवासी महामंडळाने खरेदी केली व योग्य हमी भाव दिला तर आदिवासी पट्टयातुन नारायणगाव सारख्या एम.आय.डि.सी.मध्ये रोजगारासाठी जाणारा लोंढा हा थबकला जाऊ शकतो.ग्रामीण आदिवासी बांधव हा करवंदाच्या रुपाने नविन रोजगार तयार करुन आपल्या संसाराला निश्चितच हातभार लावु शकतो.या डोंगरी मैनेचे जर आकर्षक असे पँकिंग तयार करुन ते पुणे व मुंबई सारख्या बाजारपेठेत जर महामंडळाने पाठवली तर निश्चितच ही काळी मैना ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचा मार्ग खुला होईल.
भंडारद-याच्या अभयारण्यात दरवर्षी चैत्र महिण्यात पिकणा-या करवंदाच्या जाळ्या यावर्षी वैशाख महिना सुरु असुन अजुनही म्हणावी तशी पिकलेली आढळुन येत नाही.उशीरा करवंद पिकत असल्याकारणाने निसर्गाचे कालचक्र तर बदलले नाही ना ? अशी शंका उपलब्ध होऊ लागली आहे.यंदा करवंदं उशीरा पिकत असल्या कारणाने काही आदिवासी बांधव उशिरा पाऊस सुरु होणाची ही लक्षणं असल्याचे काही आदिवासी बांधव सांगत आहेत.
यावर्षी काही अज्ञान व्यक्ती मुद्दाम होऊन डोंगरांना आग लावीत असुन या आगिच्या भक्षस्थानी या करवंदाच्या जाळ्या सापडत असुन त्याचे अस्तित्व संपत चालेले आहे.याशिवाय नविन झाडेही लावली जात नसल्याकारणाने रंधा, माळेगाव,भंडारदरा गावाच्या आसपास सापडणा-या करवंदाच्या जाळ्याही सापडणे अवघड झाले.वनविभागाने या झांडाचे संगोपन करणेगरजेचे झाले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!
हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया! पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत 🙏 महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा य...