Saturday, April 25, 2020

चैत्र पाडवा व एप्रिल व मे महिना म्हटलं की, अकोलेकरांच्या उत्साहाचा महिना.





अकोले ,ता.१३:- चैत्र पाडवा व एप्रिल व मे महिना म्हटलं की, अकोलेकरांच्या उत्साहाचा महिना.परंतु त्यांच्या उत्साहावर कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले आहे.त्याचे कारण म्हणजे एप्रिल व मे मध्ये जत्रा व यात्राचा उत्सव.गावागावात आपल्या श्रद्धेचे स्थान असलेल्या देवांची यात्रा. बाहेरगावी नोकरी करणारे तर या यात्राची वाट पहात असतात. परंतु आता तर यात्रेलाच काय तर साधं भेटायला ही येऊ नका अशी वेळ या कोरोनाने आणली आहे.पण अकोलेकरानी आपल्या भावनांना मुरड घालीत सर्व यात्रा बंद करून कोरोना रोखण्यात यशस्वी झाले आहेत.
यात्रा म्हटली की, यात्रांचे बैठकावर बैठका होतात.नियोजन ठरत जाते,यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे तमाशा होय.त्याच्या  तारखा लवकरच बुकिंग होतात.कुस्त्यांचा हगामा हा ग्रामीण भागातील आवडीचा भाग,गावोगावच्या पहिलवानाना निमंत्रित केले जाते.विविध खेळण्याची दुकाने, रहाटगाडे, पाळणे,ब्रेक डान्स अशी अनेक दुकानदार येतात,हॉटेल,रसाची दुकाने,असतात,त्याचा आस्वाद यात्रेकरू घेत असतात.पण आता ही मजा पाहायला मिळणार नाही.जत्रा म्हटली की, ते गाव फुल झालेच म्हणून समजा,कारण जत्रेची मजाच औरच.अकोले तालुक्यात टाहाकरीची  जगदंबेची यात्रा,गणोऱ्याची अंबिका देवीची,मोग्रस ची मूळमातेची यात्रा,म्हाळादेवीची खंडोबा यात्रा,लिंगदेव ची लिंगेश्वरची यात्रा,पिंपळगाव निपणीची सटूआईची यात्रा,पिंपळदरीची येडूआईची यात्रा,निंब्रळ ची अंबिका देवीची यात्रा अशा अनेक छोट्या मोठ्या  गावातील यात्रेवर कोरोनाचे सावट आलेले आहे.या यात्रासाठी गाववाले आपल्या नातेवाईकांना, मित्रांना बोलावीत असतात.पण आता या यात्रेसाठीच काय साधे भेटायला ही येऊ नका अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आलेली आहे.  अकोलेकरांची मोठी निराशा झाली आहे.असे असले तरी पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आपापल्या   गावातील यात्रा बंद करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाले आहे.त्यामुळेच आज अकोले तालुका कोरोनाच्या संकटापासून कोसो दूर आहे.मात्र रेवडी गोडीशेव चे कारखाने बंद पडले आहेत शेकडो मजूर मजुरीविना रडतखडत जीवन व्यथित करत आहे तर गावागावातील तमाशा कलावन्त,पैलवान केव्हा एकदाचा कोरोना नष्ट होतो याची वाट पाहून आहेत तर लग्नाळू गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी कोरोना त्यांना अडचणींचा ठरत आहे काही घाईच्या मंडळीने चार नातेवाईकांच्या साक्षीने उरकून घेतले आहे 

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...