Tuesday, May 24, 2016

म . टा. वृत्तसेवा ,अकोले- नवसंजीवनी योजनेअंतर्गत अकोले तालुक्यातील १३१ गावांचा समावेश केला असून त्यापैकि ४२  गावे सवेद्नशील असून ११ निकषप्रमाणेया गावात काम करण्याचे सक्तआदेश शासनाने काढले असून ही कामे परिपूर्ण करण्याची जबाबदारी आधिकारी  वर्गाची असून यात हलगर्जीपणा होता कामा नये असे उद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी आधिकारी बिनवडे यांनी राजुर येथील नव संजीवनी  आढावा  बैठकीत बोलताना काढले . मा . जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली नव संजीवनी योजना ११ पडताळणी निकषानुसार संबधित यंत्रणा ची आढावा व तपासणी करणेबाबत २४ मे २०१६ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती . मात्र राजुर येथे जिल्हाधिकारी आल्यानंतर अचानक शिर्डी येथे तातडीची बैठक असल्याने त्यांना जावे लागले व बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . यावेळी प्रकल्प आधिकारी डों. राजेंद्र देशमुख उपमुख्य  कार्यकारी अधिकारी डों. अशोक कोल्हे , प्रांत संदीप निचीत, तहसिलदार  गटविकास आधिकारी विजय आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डों. गांडाळ जिल्हा कृषि अधिकारी विलास गायकवाड  सहायक प्रकल्प अधिकारी ए . पी . आहेर ,तालुका कृषि अधिकारी बी . बी . तिकांडे, पशू वैधकीय  अधिकारी , महिला व बाल कल्याण विकास अधिकारी एच . जी . खामकर,श्रीमती चव्हाण उपस्थितहोते . प्रास्तविक प्रकल्प अधिकारी डो. राजेंद्र देशमुख यांनी केले . प्रसंगी बोलताना श्री.  बिनवडे म्हणाले समाजातील दुर्बल घटकातील आदिवासींच्या आरोग्यात सुधारणा करणे त्यांना पोषण , पिण्याचे पानी व आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या क्रियाशील आयुष्याची कालमर्यादा वाढविणे हा या नव संजीवनी योजनेचा उद्धेश आहे .टीआर कुपोषणाचा दर घटविणे आहे . यावेळी महाराष्ट्र रोजगार हमी योजना , अशुद्ध पानी , शुद्ध पानी ब्लीचिंग पावडर , धान्यसाठा स्वस्थ धान्य दुकणाबाबत , तसेच एकात्मिक बळविकास सेवा योजना अंतर्गत पोषण आहार बाबत मार्च अखेर किती लाभर्थ्यांना लाभ दिला असे विचारले असतं बळविकास अधिकारी एच . जी .खांकर यांनी ११४१ आकडा सांगितलं त्यात गरोदर , स्तनदा माता यांचे वजन ३९ ते ४० आढळून आले असून त्यामुळे कुपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याद्धी त्यांना पोषण आहार देण्याच्या सूचना केल्या . किशोर वयीनमुलींना पोषण आहार देण्याचे आदेश दिले .बालविवाह प्रतिबंधक समिति स्थापन केली काय व नसेल केली तर तातडीने ती स्थापन करावी असेही ते म्हणाले  कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नाही .  सातेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबाबत आलेल्या  तक्रारीचाव कार्यवाही काय केली याबाबत विचारणा केली असता बी . डी. ओ. विजय आहेर यांनी कारवाई केल्याचे संगितले .  कोहणे , पळसुंदे,घाटघर , फोफ्संडी येथे अतीदुर्गम भाग असल्याने गरोदर माताना १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन लागत नाही या करिता अधिकारी वर्गाने या भागात टॉवर उभारण्यासाठी संबधित यंत्रने कडे पाठपुरावा करावा . तर उप विभागीय आधिकारी संदीप निचीत यांनी अकोले तालुक्यात जल युक्त शिवाराचे काम शून्य असून आराखड्या प्रमाणे कोणतेच काम पूर्ण झाले नाही . त्यामुळे हे काम असमाधान कारक असल्याचे सांगतानाच रोजगार हामी योजने अंतर्गत मागणी नोद्वली नसल्याने अकोले तालुक्यात रोजगारची कामे देता आली नाही . ही गंभीर बाब असल्याचे नमूद केले तर ५० ते ६० गावात विहिरी घेण्याबाबत सूचना दिल्या व जलयुक्त शिवार अंतर्गत तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संबधिताणी प्रयत्न करावेत .असे संगितले आभार सहायक प्रकल्प आधिकारी ए .पी . आहिरेयांनी मानले .  चौकट - नवसंजीवनी बैठकीपूर्वी अचानक पूर्व सूचना न देता कोलटेंभा आंगणवाडी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली  असता आंगणवाडीतील मुलांना साडेदहा वाजून गेले तरी पोषण आहार दिला नव्हता कारण  विचारले तर आंगणवाडी सेविकेला आहार कोणता द्यायचा याबाबत सूचना व शेड्यूल्ड नसल्याने व अनभिज्ञ असल्याने  तिने मुलांना आहार दिला नाही .आधिकारी यांनी तिला तातडीने आहार देण्याचे आदेश दिल्यानंतर तिने तेथून पुढे आहार देण्यासाठी धावपळ केली . मात्र नवसंजीवनी बैठकीत बाल विकास प्रकल्प अधिकारी एच . जी . खामकर यांच्याकडे लेखी खुलासा मागविण्यात आला आहे .या विभागाच्या अनेक तक्रारी असून प्रतींनिधिक स्वरुपात ही तक्रार समोर आल्याने अधिकार्‍यांचे ढाबे दणाणले आहे . सोबत नवसंजीवनी बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी आधिकारी बिनवडे मार्गदर्शन करताना दिसत आहे छाया शांताराम काळे .          




बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...