Wednesday, May 4, 2016

म. टा . वृत्तसेवा ,अकोले -कोतूळ (ता. अकोले) येथील पत्रकारांनी केला विविध संस्थांवर निवड झालेल्या
संचालकांचा सत्कार

अगस्तीच्या संचालक पदी बाळासाहेब नानासाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या संचालक पदी रोहिदास भोर, बाळासाहेब सावंत आणि भरत देशमाने यांनी
निवड झाल्याने केला सत्कार

कोतूळ (ता. अकोले) : येथील प्रेस क्लब च्या वतीने कोतूळ परिसरातून तालुका
पातळीवर विविध संस्थांवर संचालक म्हणून निवड झालेल्या संचालकांचा सत्कार
करण्यात आला. यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बाळासाहेब
(भाऊसाहेब) नानासाहेब देशमुख (कोतूळ), कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक
पदी निवड झालेले रोहिदास भोर (धामणगाव पाट), बाळासाहेब सावंत (पाडाळणे), भरत
देशमाने (कोतूळ) आदी संचालकांचा कोतूळ प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात
आला.

ग्रामिण भागातील संचालक प्रसिद्धी पासून नेहमी दूर असतात. त्यांना
कार्यप्रेरणा मिळावी म्हणून कोतूळ भागातील पत्रकारांनी एकत्र येत त्यांच्या
सत्काराचे आयोजन करत त्यांना यावेळी शुभेच्छा देत त्यांच्या आगामी काळातील
योजना समजावून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. देवयानी पब्लिक
स्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब देशमुख हे होते.
यावेळी पोलीस पाटील सतिष देशमुख, रावजी धराडे, रामनाथ आरोटे, दादाभाऊ चौधरी,
शंकरराव बेळे, भाऊसाहेब गिते, प्रविण देशमुख, हरिदास पांडे, राजू देठे, नंदू
शिंदे, श्री. मुकिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना रोहिदास भोर म्हणाले, पत्रकारांनी अशा प्रकारे आमचा
सत्कार आयोजित करुन आम्हाला समाजात काम करण्याची प्रेरणा दिली असून कृषी
उत्पन्न बाजार समितीत काम करताना आम्ही शेतकरी हिताचे अधिकाधिक निर्णय घेऊ
त्याच बरोबर कोतूळ येथे कोल्ड स्टोरेज करण्याचा आमचा विचार असून आमदार वैभव
पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक काय करता येईल हे पाहणार असून कोतूळसह
ब्राम्हणवाडाच्या बाजारपेठेसाठीही आमचे विशेष लक्ष राहणार आहे.

अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख म्हणाले, पिंपळगाव खांड धरण झाल्याने
परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करुन
कारखाना चांगल्या पद्धतीने चालवू माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार वैभव पिचड
यांच्या सहकार्याने कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसे होईल
हे पाहू.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत देशमाने, बाळासाहेब सावंत
यांच्यासह बी.के. देशमुख, गुलाब खरात यांचेही भाषण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र उकिरडे यांनी केले. सुत्रसंचालन सुनील गिते
यांनी केले. स्वागत सुनील आरोटे यांनी केले. तर आभार संजय फुलसुंदर यांनी
मानले.सोबत फोटो

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...