Wednesday, June 8, 2016

(no subject)

राजूर ता८ .:कोतूळ (ता. अकोले) येथे विकलांग मुलीच्या संगोपनासाठी आई करते मोलमजूरी


  कोतूळ, (ता. अकोले, जि. अहमदनगर)  येथील सुमन लक्ष्मण नेवासकर या
घरची गरीबी असल्याने चार घरची मोलमजूरी करुन आपल्या विकलांग मुलीचे
संगोपन करत आहेत. घरात अंथरुणावर असणाऱ्या व वय 25 असलेल्या सोनाली या
विकलांग मुलीच्या संगोपनासाठी आई सुमन धडपड करत असून समाजातून या नेवासकर
कुटूंबाची मदत होणे गरजेचे आहे.

कोतूळ येथे एका छोट्या घरात नेवासकर कुटूंबीय गुजराण करत आहे. वडील
लक्ष्मण नेवासकर हे शिलाई काम करुन जुने कपडे शिवण्याचे काम करतात मात्र
आता जुने कपडेही वापरणारे कमी झाले आहेत त्यामुळे हा धंदाही कमी होत असतो
त्यामुळे आई सुमन यांनी घराला हातभार लावण्यासाठी धुणेभांडी करणे सुरु
केले आहे. घरात विकलांग मुलगी असल्याने तिच्यावर लक्ष ठेऊन हे सर्व काम
या आईला करावे लागत आहे. 25 वर्षाची असलेली सोनाली ही केवळ 15 किलो
वजनाची आहे. तिच्या दवाखान्यासाठी महिन्याला एक हजार रुपये खर्च येत
असल्याने व सोनाली चे सर्व काम करावे लागत आहे मात्र चेहऱ्यावर कोणताही
तणाव न आणता आई काम करत आहे. याकामी मुलगी राधिकाही शिक्षण घेत आईला मदत
करत आहे.

याबाबत आई सुमन म्हणाल्या, मला जोपर्यंत कष्ट करुन मुलीचे संगोपन करता
येईल तोपर्यंत मी करेन मात्र म्हातार पणात या मुलीचे कसे होईल हा
माझ्यापुढे प्रश्न आहे. आमच्या कुटूंबाला शासनाने मदत केली तर त्याचा
मुलीच्या संगोपणासाठी हातभार लागेल यासाठी दारिद्र्य रेषेचे कार्ड मिळाले
तर त्याचा  वापर करुन सेवाभावी संस्थेंमध्ये मुलीच्या मोफत औषधोपचारासाठी
उपयोग होईल.

या कुटूंबाला मदत करण्यासाठी संपर्क नंबर- 7350297568
सेंट्रल बॅंकेतील खाते नंबर शाखा कोतूळ - सुमन लक्ष्मण नेवासकर (खाते
नं.- 2954449876,   ifsc code- CBIN0281858,   MICR CODE- 422016373)सोबतफोटोrju८प४ 
2 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...