Tuesday, June 25, 2024

बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे....

बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे..... सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. ,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .

Saturday, June 22, 2024

मी लढलो मी जिंकलो आमदार डॉ .किरण लहामटे

मी लढलो मी जिंकलो आमदार डॉ .किरण लहामटे व्हिजन पर्यटनाचे, अकोल्याच्या विकासाचे ! अकोले,(शांताराम काळे)माझे वडील शाळा मास्तर लव्हाळी ओतूर हे माझे खेडे गाव आदिवासी व दुर्गम पहिल्यापासून शिक्षणाची आवड असल्याने खेड्यात चौथीपर्यंत शिक्षण नंतर राजूर,अकोले,नगर,पुणे येथे शिक्षण घेऊन डॉक्टर झालो आदिवासी भागात रुग्णांचे होणारे हाल पाहून आदिवासी भागातच वैधकीय व्यवसाय राजूर येथे सुरू केला ,व्यवसाय करत असताना सामाजिक कामाची आवड सर्वरोग निदान शिबीर भरवून गरीब रुग्णांची सेवा केली .समाज कारणातून मनसे संघटनेशी संपर्क आला व तालुक्यात मनसे चे काम सुरू केले .२०१४नंतर राजूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीत उभा राहिलो तत्पूर्वी मनसेतून भाजप पक्षात प्रवेश केला होता .विजयी झालो त्यानंतर खऱ्या अर्थाने मी राजकारणात आलो .पुन्हा जिल्हा परिषद सातेवाडी गटातून भाजप पक्षातून विजयी झालो नी माझा चढता आलेख सुरू झाला .मी आमदार होईल का ?याबाबत अनेकांना शंका होती .मात्र माझा मार्ग पिचड पितापुत्रांनी सुकर केला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी शरदचंद्र पवार यांना भेटून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला व मला विधानसभेचे तिकीट मिळाले तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मला पाठिंबा व्यक्त करत लोकवर्गणी काढून मला नोट दिली व मते दिली त्यामुळे मी प्रचंड मताने निवडून आलो चाळीस वर्षाची सत्ता व प्रस्थापित राजकारण संपविले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यात दुर्दव्य असे की कोरोना आल्याने अडीच वर्षे विकास कामे करता आली नाही .विकास कामासाठी संघर्ष करावा लागला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० शिवसेनाआमदार घेऊन शिवसेनेला सोडचिट्ठी दिल्याने राज्यातील आघाडी सरकार पडले व महायुतीचे सरकार आले त्यामुळे आणखीनच अडचण झाली राष्ट्रवादी चे नेते अजितदादा यांना सर्व आमदारांनी विकास निधी मिळत नसल्याची तक्रार केली व राष्ट्रवादी पक्षानेही सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र मी तालुक्याच्या जनता व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कोणता निर्णय घ्यावा असे विचारूनच अजितदादा यांच्यासोबत गेलो त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते मिळाले मुळे तालुक्याचा विकासाचा मार्ग मोकळा झाला ,जिथे तीन चार कोटी मिळायचे तिथे १८००कोटी रुपयांचा निधी तालुक्याला मिळाला ,रस्ते,सभागृह,शाळा,ग्रामपंचायत,अंगणवाडी,प्रत्येक गावात विकासाची कामे पोहचली याचे मला समाधान आहे .तालुक्यातील वाडी वस्ती मध्ये रस्ते वीज पोहचली गेल्या चाळीस वर्षात विकास झाला नाही तो विकास माझ्या माध्यमातून झाला याचे समाधान आहे . लवकरच तालुक्यात औद्योगिक वसाहत व टोलार खिंड ही कामे मार्गी लावू हा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला आहे . तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मायबाप जनता आपणाला निवडून देईल तिरंगी होऊ द्या नाही तर चौरंगी विजय आपलाच असेल असेही ते म्हणाले अकोले तालुक्यात असलेली नैसर्गिक साधन संपत्ती आणि गड किल्ले, डोंगर दऱ्या, धरणे यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात पर्यटन वाढीस मोठा वाव आहे. यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होऊ शकते, यासाठी या पर्यटनस्थळांचा विकास करण्याबरोबरच रस्ते दळणवळणाची साधने पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच पर्यटनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून लवकरच या माझ्या तालुक्यात ही संकल्पना राबविणार असून पर्यटन हा तालुक्याचा आत्मा असल्याचे अकोले विधान सभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे काश्मिर समजल्या जाणाऱ्या या माझ्या अकोले तालुक्याची पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक नवी ओळख आपल्याला निर्मान करायची आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात यास मोठा वाव तर आहेच, पण मुळा- आढळा- प्रवरा खोऱ्यातही ही संधी आहे. ब्रिटीशकालीन भंडारदरा धरणाचा रिंगरोड एक वेगळ्या पद्धतीने तयार करायचा असून या रस्त्यावर असणारे विविध धबधबे व त्याचबरोबर साम्रद येथील रिव्हर्स फॉलसारखे आगळे वेगळे पॉइंट सुशोभित करायचे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी 'सांदन दरी' इथे ही विविध सुविधा पर्यटकांना निर्माण करावयाच्या असून घाटघरचा कोकणकडा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील विविध पक्षी, प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांना ओपन सफारी गाडीची व्यवस्था करणे, भंडारदरा धरणात बोटींगसाठी स्थानिक आदिवासी तरुणांना आधुनिक बोटी खरेदी करून देणे. पर्यटनासाठी स्थानिक रानमेवा असणारे करवंदे, आवळे, हिरडा-बेहडा वर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग उभारण्यासाठी स्थानिक आदिवासींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गड, किल्ले असून यांची म्हणावी इतकी प्रसिद्धी झालेली नाही. साठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्याठिकाणी पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करायच्याआहेत, तसेच अकोले तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीही एक माहिती पर्यटन केंद्र उभारण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरवठा सुरू आहे. अकोले तालुक्यात पर्यटकांचे आकर्शन ठरलेला ड्रीम प्रोजक्ट म्हणजे रंधा फॉल येथे 'काचेचा पुल' मंजुर करण्यात आला होता. त्याला स्थगिती मिळाली होती; परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे ती स्थगिती उठली असून हा प्रकल्प मार्गी लागला असून तो लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. काचेचा पुल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. . या प्रोजेक्टमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिकांनाही रोजगार वाढणार आहे. धरण जलाशयावरचा निळवंडे धरणाच्या वरील राज्यातला सर्वांत मोठा पिंपरकणे पूल रखडला होता. तोही पूर्णत्वास जात असून त्यासाठी आपण केलेले प्रयत्न आलेले यश यामुळे परिसरातील राजूरशी तुटलेला १५ गावांचा संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित होताना राजूरची बाजारपेठ आणखी फुलेल, तसेच हा उड्डाणपूलही पर्यटकांचे आकर्षण ठरणार असुन इथे परिसरात काही पर्यटनवाढीसाठी पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करणार आहेत. अकोले तालुक्यातील प्राचिन मंदिरांचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरवठा सुरू असून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत इतर मंदिरांबरोबरच या मंदिरांचाही विकास करणार आहेत. पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने इथे येतात. त्याठिकाणी त्या मंदिराचा इतिहास आणि पौराणिक महात्म्य सर्वांना समजावे, यासाठी 'आमची मंदिरे हे अभियान लवकरच राबविणार आहे. या मंदिरांना विकासासाठी काही निधी प्राप्त झालाय आणि अजून काही प्राप्त होणार आहे गोदावरी पार्कच्या धर्तीवर अकोले येथे प्रवरा पार्क प्रवरा नदीच्या काठावर निर्माण करण्यासाठी त्याला काही प्रमाणात यश आले आहे. अकोले तालुक्याची काही गोष्टीमुळे ओळख आहे. जसा राजूरचा पेढा, अकोल्याची आवळा कँडी, चाळीस गाव डांगाणाचा भात, रानमेवा, रानभाज्या याचेही मार्केटिंग करण्याचा मानस असून या क्षेत्रात काम करणान्या मंडळींसोबत चर्चा सुरु आहे. तज्ज्ञ लोक यावर सध्या काम करीत आहेत यातून आपण रोजगार निर्मितीचा आपण विचार करतोय. प्रत्यक्षात एक वेगळे मॉडेल आपण लवकरच विकसित करणार आहोत, लवकरच अकोले तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पर्यटनाचे फेज मिळविण्यास प्रयत्न करीत आहे. गेल्या ४० वषाँत जी कामे झाली नाहीत. ते आपण मार्गी लावली आहेत एआयडीसी, उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय, रंध्याचा काचेचा पुल, कोत पूल, तोलारखिंड फोडणे, अकोले बसस्थान अकोले बाजारतळ, पिंपरकने उड्डाणपुल अनेक कामे मार्गी लावलेअसून, आणखीही कामे मार्गी लागत आहेत.

2024 ची आशा-वैभवराव पिचड, मी लढलो मी जिंकलो..

2024 ची आशा-वैभवराव पिचड, मी लढलो मी जिंकलो.... अकोले,(शांताराम काळे) आपल्या राजकीय वाटचालीत वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला माझ्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविता आला , आपल्या राजकीय प्रवासात अकोले तालुक्यात शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सोयी सुविधा, सिंचन योजना, ग्रामविकास योजना, शेती, दूध व्यवसाय औद्योगिक विकास वीज याचा सूक्ष्म अभ्यास करून प्रशासनासोबत काम करता आले. आपल्या समाजकल्याण सभापती पद व आमदारकीच्या कार्यकाळात विकासाचे मॉडेल तयार करून अकोले तालुक्याची विकासकामे मार्गी लावली. अकोले तालुक्यात वाडी-वस्तीवर वीज आश्रमशाळेचे जाळे, गाव तिथे रस्ता करून कोट्यवधी रुपयांची विकासगंगा तालुक्यात आणली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असताना राज्याच्या आदिवासी विकास समितीचे सदस्य झालो त्यामुळे राज्यात दौरे करून आदिवासीच्या शिक्षणाचा प्रश्न हाताळून तसेच आदिवासी विकास योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचल्या की नाही,याचा आढावा घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर केला .आदिवासींच्या शिक्षणाला मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी जिल्हा बँकेच्या संचालकपदी असताना बँकेमार्फत उपसा सिंचन योजनेस कर्ज उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. अकोले तालुक्यातील प्रलंबित वीजजोड, घरकुले, शेततळी, आर्थिक लाभाच्या सामुदायिक व वैयक्तिक योजनांचा पाठपुरावा करून जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला. अगस्ती कारखान्याचे अकोले तालुक्याचे युवा नेतृत्व, माजी आमदार वैभव पिचड यांच्या घरी राजकीय वारसा असल्याने लहानपणापासून समाजकारणाचे बाळकडू मिळाले. आपण कॉलेज जीवनापासूनच समाजकारण व राजकारणाची कास धरून प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापती ते आमदारकी असा माझा प्रवास राहिला आहे. अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. वडील राजकारणात असले, तरी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच आपली वाटचाल सुरू आहे.संचालक पदावर असताना बाहेरून ऊस आणण्यापेक्षा तालुक्यात जास्तीत-जास्त ऊस उत्पादन कसे वाढेल, यावर भर दिला. अमृतसागर दूध संघाचा अध्यक्ष असताना तोट्यात असलेला संघ नफ्यात आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त भाव देऊन दुधाळ जनावरे घेण्यासाठी आर्थिक मदत केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या दूध संस्थांना भरीव मदत करून दूध संकलन वाढविण्यासाठी आपली धडपड सुरू असते. आजही दुधाला दीड रुपया लाभांश देऊन इतर दूध संघांपेक्षा शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव दिला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अमृतसागर दूध संघावर विश्वास वाढला. आपलं कार्यकाळात दुधापासून इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले. या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दुधास प्रतिलिटर दोन रुपयांचा लाभांश विनाकपात देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. दूध संघातील कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनसही जाहीर करण्यात आला. त्यानुसार ११ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम बँकेत वर्ग केले. २०१४लाआमदार झाल्यानंतर युतीचे सरकार स्थापन झाले त्या काळात मी विकास निधी साठी ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,मुस्लिम आरक्षण यासाठी १११आंदोलने मोर्चे केले .तालुक्याच्या विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागला .सत्ता नसल्याने तालुक्याचा विकासही रखडला मी भाजपात का गेलो ? ५वर्षे विरोधी आमदार असताना सरकारने पाहिजे तो निधी दिला नाही.पक्षानेही साथ दिली नाही त्यामुळे मी भाजपात प्रवेश करून तालुक्यात विकास कामासाठी केवळ तीन महिन्यात मोठा निधी आणला ,त्यात कोल्हार घोटी रस्ता सव्वा दोनशे कोटी रुपयांची कामे,निळवंडे जलाशय तसेच पिंपरकने पुलासाठी १५कोटींचा निधी ,उपजिल्हा रुग्णालय पाठपुरावा केला असे असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला मी तो स्वीकारलाही मात्र माझ्या विजयी घोडदौडीत ज्यांनी माझे सोबत काम केले माझ्या माध्यमातून पदे मिळवली प्रतिष्ठा मिळवली त्यांनी माझ्या पराभवानंतर पाठ फिरवली मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांनी माझी आजही साथ सोडली नाही ...गत विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला.या बदलामुळे तालुक्यातील लोकांच्या आशा-अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या मात्र दीड दोन वर्षातच तालुक्यातील लोकांचा भ्रमनिराश झाला.भावनेच्या भरात मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या कडून चूक झाल्याचे आता अनेक जण बोलून दाखवीत आहे.तालुक्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे.2024 साठी लोक पुन्हा अपेक्षेने पाहू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वसामान्य माणसांनी,कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत प्रचार केला.विकासाला मोठी गती मिळेल या अपेक्षेने बदल घडून आणला.निवडणूक प्रचारातील लहान मोठ्या आश्वासणांना लोक भुलले.पण आता वास्तवाची जाणीव झाल्यानंतर चूक झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.गावोगाव ग्रामसभेत लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना अवैध व्यवसायावर हल्ला बोल करावा लागला.स्वतःच्या गावातील पोलीस ठाण्यात कुणीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा अनुभव दस्तुर खुद्द लोक प्रतिनिधींना आला.अकोलेची एम आय डी सी लिंगदेव च्या घाटातच अडकली.तीन वर्षात तालुक्यात साधा बंधारा झाला नाही की वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण झाले नाही. निळवंडेचे उच्च स्तरीय कालवे,निळवंडेच्या उड्डाण पूल,32 गाव पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांची रखडपट्टी सुरूच आहे.कोरोना काळात लोकांचे मोठे हाल झाले.वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले.कोरोना काळात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा सामान्य माणसाला मोठा आर्थिक फटका बसला.तालुक्यात सुरू असणाऱ्या रस्ते आणि इतर कामांच्या दर्जा बाबत माध्यमांत सातत्याने बातम्या येत आहेत.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीच आपल्या गावच्या रस्त्याच्या सुरू असणाऱ्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गतवर्षी वेळेवर कारखान्याने ऊस न नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,प्रशासनाकडून अडवणूक होणार नाही,अर्थिक उन्नती होऊ शकेल असे कोणतेही काम तीन वर्षात झाले नाही.गावातील रस्ते,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालये,सभामंडप यालाच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकास म्हणत ढोल वाजविले जात आहेत. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेत झाला आहे.. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची आठवण होऊ लागली आहे.आजही उच्च स्तरीय कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असून जुलै महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकाल्प अग्रक्रमाने घेऊन अकोले तालुक्यातील जनतेला पाणी देण्याचे ठरविले आहे . सत्तेवर असताना सत्तेच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यासाठी सतत आग्रही भूमिका आपण घेतलीव सत्ता नसताना विकासाच्या प्रश्नांवर,जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका तेव्हड्याच ताकतीने पार पाडली आहे,पार पाडत आहेत .विकास आणि संघर्ष या दोन्ही भूमिका .करावी लागत आहे . विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.राज्यातही विरोधी पक्षांचे सरकार आले तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प माझे वडील पिचड साहेब व मी दोघांनीही काम केले.इतके काम करूनही पराभव झाल्याने .वाईट वाटले .पण या पराभवाने आपण खचलो नाही .एक जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका अडीच वर्षे तालुक्यात सक्षमपणे बजावली.तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी सरकार बरोबर केलेला पत्रव्यवहार असो की प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या लहान मोठ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष असो,यातून जनहिताची चळवळ उभारली .आपला पराभव झाला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले .त्यामुळे कामे झाली नाही . शिवसेना नेते एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी नेते अजितदादा हे भाजपसोबत आले त्यामुळे राज्यात सत्ताबदल होऊन महायुतीचे सरकार आले .तालुक्याचे लोकप्रतिनिधी सरकारसोबत आले .त्यामुळे आपला पराभव झाला असला तरी आपली भूमिका योग्य होती हे तालुक्यालाही व विरोधकांनाही समजली मी जर विकास कामासाठी भाजपात गेलो तर माझ्या मागून आलेले देखील हीच भूमिका बजावत आहे .त्यामुळे मी तालुक्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे ही वस्तू स्थिती समोर आली व टिकाकारांची बोलती बंद झाली .विधानसभेत माझा पराभव असला तरी माझ्या भूमिकेचा हा विजयच आहे .,आता राज्यातील सत्ता बदलानंतर माझ्यावर टीका करणारे लोकप्रतिनिधी यांचीही भूमिका बदलली आहे. 2019 नंतर माझे अनेक जेष्ठ सहकारी आपणाला सोडून सत्ताधारी पक्षात गेले .पण या राजकीय वावटळीतही आपण ठाम पणे उभे आहोत .कार्यकर्त्यांना धीर देत विचलित न होता ताकदीने उभे राहण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले .माझ्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत नाराज असणारी तरुणाई पुन्हा जवळ येऊ लागली आहे . बोलू लागली आहे . मागील अडीच वर्षात विरोधी सत्ता असतांना तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला,राजकारणात एकटे पडलो,पण खचलो नाही.अगस्ती कारखाना निवडणुकीत फटका बसला तरीही न डगमगता अमृतसागर दूध संघात एकहाती सत्ता . अकोले नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा एक हाती विजयश्री खेचून आणली.अनेक विकास सोसायट्या ,ग्रामपंचायत आपल्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या.यापूर्वी आपण कधीही सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हतो पण यावेळी आवर्जून लक्ष घातले.आणि सोसायट्या वर वर्चस्व मिळविले. पुढील जिल्हा बँकेचया निवडणुकीत याचा निश्चितच लाभ होईल .महानंदा च्या संचालक पदावरही आपली बिनविरोध निवड झाली त्यामुळे पुन्हा एकदा राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, रुग्णांना,गरिबांना,आदिवासी बांधवाना मदत केली. विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करीत तत्कालीन सरकारलाही निर्णय घेण्यास भाग पाडले. जे काम विद्यमान आमदाराने करणे गरजेचे असताना ती कामे आपण मार्गी लावली. तालुक्याच्या दृष्टीने जी विकास कामे प्रलंबित आहे,होणे गरजेचे आहे त्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, संबंधित विभागाचे मंत्री,सचिव,जिल्हाधिकारी, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील यात संदेह नाही.. भाजप पक्षनेतृत्वाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करून सन्मान केला. भाजपच्या कारकिर्दीत पहिल्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास संधी मिळली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी येणार होती,मात्र भाजप ची कार्यप्रणाली,विचारधारा समजून घेऊन मला काम करू द्या, असे म्हणत मोठी संधी नाकारली . दिल्ली येथील पक्षाच्या पहिल्याच मिटिंग मध्ये आपल्या कामाची वेगळी छाप पडली हा मला अभिमान आहे . परिचय नाव: वैभव मधुकरराव पिचड गाव: राजूर, ता. अकोले वाढदिवस: २७ एप्रिल शिक्षण: बी. ए. पक्ष भाजप सध्याची पदे अध्यक्ष अमृत सागर दूध संघ ■विश्वस्त, आदिवासी उनती शिक्षण संस्था समिती • सदस्य, आदिवासी विकास प्रकल्प समिती महामंत्री भाजप अनुसूचित जमाती मोर्चा नवी दिल्ली भूषविलेली पदे : वै भव पिचड यांनी आदिवासी उनती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यायांवरील मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. सामान्यांना उच्य शिक्षण मिळवून देण्याचा ध्यास घेतला, शैक्षणिक कामात पारदर्शकता आणली जिला परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती असताना दारिद्यरेषेखालील कुटुंबे, समाजकल्याण विभागाच्या योजनांचा, हरिजन सुधारणा योजना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना, शेतीच्या योजना यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून चौकट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले आदर्श व आयकॉन असून देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्ठा ठेवून आपली सामाजिक व राजकीय वाटचाल असून कितीही संघर्ष करावा लागला तरी त्यांच्यावरील निष्ट ठेवून तालुक्याचा विकास करू असेही वैभव पिचड म्हणाले

Thursday, June 20, 2024

भंडारदाऱ्याचा काजवा महोत्सव रूपाली पारखे यांचा लेख

#भंडारदाऱ्याचा काजवा महोत्सव रूपाली पारखे यांचा लेख लक्ष लक्ष काजवे...नभोमंडळातील तारकादळेच जणू धरतीच्या भेटीला आले आहे...! आपल्या चहुबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरविणा-या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सुरु आहे... आपण निशब्द...कल्पना करा... काय अदभूत देखावा दिसत असेल ना हा..! दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर ,हरिश्चंद्रगड, परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे पाचनई, या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा 'बसेरा' असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी दिसतात! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात. तर त्यांचे कित्येक भाईबंद झाडांभोवती पिंगा घालताहेत. विशिष्ट पद्धतीने त्यांचा चमचमाट सुरु असतो, त्याला एक लय असते. एक ताल असतो. आणि सूरही आहे. पण त्यांची भाषा अवगत नसल्याने हे सारे आपल्याला ऐकू येत नसावे. जणू काही काजवे त्यांच्या सुरात प्रकाश फुलांची उधळण करीत जीवनगाणे गाताहेत. लुकलुकत होणारी काजव्यांची उघडझाप आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातेय. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचं अनुपम वैभव आपण पाहतच राहतो. आणि पाहता-पाहाता भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात स्वत:ला हरवून बसतो. ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाश फुले मुक्त हस्ते उधळीत असल्याचा विचार मनात चमकून जातो. नभांगणातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय... इथे रात्रच चांदणं झालीय... असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्री उद्दीपित झाल्या आहेत. तासन-तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही. त्यामुळेच नुसतेच काजवे पाहणे, हादेखील जीवशास्राच्या अभ्यासकांच्या तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीने एक अविस्मरणीय अनुभव असतो. हे पाहताना मग काळोखाची, हिंस्र स्वापदांची, सरपटणा-या प्राण्यांची मनाला एरवी वाटणारी भीती कुठल्या कुठे पळून गेलेली असते. काजवा म्हणजे एक प्रकाशणारा कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखाच्या दोन जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. या लहान झुरळाइतक्या आकाराच्या किटकाचे शरीर तीन भागात विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणार-या, बागडणा-या या 'अग्निसख्याला' दोन मोठे डोळे असतात. मे महिन्यात त्यांचे जीवनचक्र सुरु होते. सुरुवातीला त्यांची संख्या नगण्य असते. म्हणजे पुढे जून महिन्याच्या मध्यापर्यंत तर त्यांच्या संख्येत भूमिती पद्धतीने वाढ होत प्रचंड मोठी भर पडते. मोसमी पावसाच्या तोंडावर ही संख्या लक्षावधी होते. तेव्हा तर या भागातील या अनोख्या काजवा महोत्सवाचा तर ख-या अर्थाने 'क्लायमॅक्स' होतो! अंडी, अळी, कोश असा जीवनप्रवास करणा-या काजव्याच्या अळीचे दोन आठवड्यांत प्रौढावस्थेत रुपांतर होते. काजवा निशाचर आहे. म्हणूनच तो रजनीसखाही आहे. जगभरात काजव्यांच्या जवळपास दोन हजार जाती आहेत. 'कोलिओऑप्टेरो' नावाच्या भुंग्याच्या कुळात काजव्यांचा समावेश केला जातो. अळीतून प्रौढावस्थेत जातो तेव्हा काजवा स्वयंप्रकाशी बनतो. त्यांची लांबी दोन ते अडीच सेंटीमीटर असते. मंद काळसर किंवा पिवळा तांबूस रंगाच्या या किटकाच्या मादीपेक्षा नराचे पंख जास्त विकसित झालेले असतात. तुलनेने माद्या काहीशा सुस्त असतात. मऊ, मृदुकाय खाद्य काजव्यांना आवडते किंवा चालते. तर बेडूक, कोळी यासह काही पक्ष्यांचे काजवे हे खाद्य आहे. निरनिरळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराचे रंगांचे काजवे दिसून येतात. पिवळा, हिरवा, नारंगी, निळा, तांबडा, पांढरा असे रंग काजवे उधळतात. त्यांच्या प्रकाशाचा रंग ५१० ते ६७० नॅनोमीटर असतो. मे-जून महिन्याचे हे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजनन काळ असल्याचे अभ्यासक सांगतात. आपल्या जोडी दाराला आकर्षित करण्यासाठी हा कीटक चमचम करीत असतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचे जीवनचक्र थांबते. काजव्यांची ही वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वरुपाची वर्दी देतात, असे स्थानिक आदिवासी मानतात. मोसमी पाऊस दाखल झाला की, पुढे तो चांगलाच जोर धरतो, नंतर त्याचे रौद्र तांडव सुरु होते. या रपाट्या पावसामुळे इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते... तशी ही मयसभादेखील संपून जाते. जगभरातल्या जीवशास्राच्या अभ्यासकांपेक्षा या काजव्यांनी निसर्गप्रेमी, लेखक, कवी यांनाच जास्त भुरळ घातल्याचे दिसते. जेम्स रिल या सुप्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकाने 'रात्रीच्या मातीत पेरलेल्या सोनबीया...' असे काजव्यांचे मोठे चपखल शब्दांत वर्णन केलेय. मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर यांनी काजव्याचा मंद प्रकाश उगीच सतावतोय, अशी लाडीक तक्रार एका कवितेत केलीय. 'अंधारच मज हवा, काजवा उगा दाखवतो दिवा' असे ते लिहून जातात. भंडारदरा परिसरातील रमणीय निसर्गातील अनोख्या जलोत्सवापूर्वीचा मनाला मोहिनी घालणारा काजवा महोत्सव आवर्जून पाहावा, एकदा तरी अनुभवावा असाच... Roopali Parkhe Deshingkar...यांच्या blog वरून

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...