Saturday, June 22, 2024

2024 ची आशा-वैभवराव पिचड, मी लढलो मी जिंकलो..

2024 ची आशा-वैभवराव पिचड, मी लढलो मी जिंकलो.... अकोले,(शांताराम काळे) आपल्या राजकीय वाटचालीत वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला माझ्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविता आला , आपल्या राजकीय प्रवासात अकोले तालुक्यात शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सोयी सुविधा, सिंचन योजना, ग्रामविकास योजना, शेती, दूध व्यवसाय औद्योगिक विकास वीज याचा सूक्ष्म अभ्यास करून प्रशासनासोबत काम करता आले. आपल्या समाजकल्याण सभापती पद व आमदारकीच्या कार्यकाळात विकासाचे मॉडेल तयार करून अकोले तालुक्याची विकासकामे मार्गी लावली. अकोले तालुक्यात वाडी-वस्तीवर वीज आश्रमशाळेचे जाळे, गाव तिथे रस्ता करून कोट्यवधी रुपयांची विकासगंगा तालुक्यात आणली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असताना राज्याच्या आदिवासी विकास समितीचे सदस्य झालो त्यामुळे राज्यात दौरे करून आदिवासीच्या शिक्षणाचा प्रश्न हाताळून तसेच आदिवासी विकास योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचल्या की नाही,याचा आढावा घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर केला .आदिवासींच्या शिक्षणाला मदत केली. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, यासाठी जिल्हा बँकेच्या संचालकपदी असताना बँकेमार्फत उपसा सिंचन योजनेस कर्ज उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. अकोले तालुक्यातील प्रलंबित वीजजोड, घरकुले, शेततळी, आर्थिक लाभाच्या सामुदायिक व वैयक्तिक योजनांचा पाठपुरावा करून जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला. अगस्ती कारखान्याचे अकोले तालुक्याचे युवा नेतृत्व, माजी आमदार वैभव पिचड यांच्या घरी राजकीय वारसा असल्याने लहानपणापासून समाजकारणाचे बाळकडू मिळाले. आपण कॉलेज जीवनापासूनच समाजकारण व राजकारणाची कास धरून प्रवास सुरू केला. जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापती ते आमदारकी असा माझा प्रवास राहिला आहे. अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. वडील राजकारणात असले, तरी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावरच आपली वाटचाल सुरू आहे.संचालक पदावर असताना बाहेरून ऊस आणण्यापेक्षा तालुक्यात जास्तीत-जास्त ऊस उत्पादन कसे वाढेल, यावर भर दिला. अमृतसागर दूध संघाचा अध्यक्ष असताना तोट्यात असलेला संघ नफ्यात आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त भाव देऊन दुधाळ जनावरे घेण्यासाठी आर्थिक मदत केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या दूध संस्थांना भरीव मदत करून दूध संकलन वाढविण्यासाठी आपली धडपड सुरू असते. आजही दुधाला दीड रुपया लाभांश देऊन इतर दूध संघांपेक्षा शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव दिला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अमृतसागर दूध संघावर विश्वास वाढला. आपलं कार्यकाळात दुधापासून इतर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन सुरू केले. या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दुधास प्रतिलिटर दोन रुपयांचा लाभांश विनाकपात देण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. दूध संघातील कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनसही जाहीर करण्यात आला. त्यानुसार ११ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम बँकेत वर्ग केले. २०१४लाआमदार झाल्यानंतर युतीचे सरकार स्थापन झाले त्या काळात मी विकास निधी साठी ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,मुस्लिम आरक्षण यासाठी १११आंदोलने मोर्चे केले .तालुक्याच्या विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागला .सत्ता नसल्याने तालुक्याचा विकासही रखडला मी भाजपात का गेलो ? ५वर्षे विरोधी आमदार असताना सरकारने पाहिजे तो निधी दिला नाही.पक्षानेही साथ दिली नाही त्यामुळे मी भाजपात प्रवेश करून तालुक्यात विकास कामासाठी केवळ तीन महिन्यात मोठा निधी आणला ,त्यात कोल्हार घोटी रस्ता सव्वा दोनशे कोटी रुपयांची कामे,निळवंडे जलाशय तसेच पिंपरकने पुलासाठी १५कोटींचा निधी ,उपजिल्हा रुग्णालय पाठपुरावा केला असे असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला मी तो स्वीकारलाही मात्र माझ्या विजयी घोडदौडीत ज्यांनी माझे सोबत काम केले माझ्या माध्यमातून पदे मिळवली प्रतिष्ठा मिळवली त्यांनी माझ्या पराभवानंतर पाठ फिरवली मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांनी माझी आजही साथ सोडली नाही ...गत विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला.या बदलामुळे तालुक्यातील लोकांच्या आशा-अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या मात्र दीड दोन वर्षातच तालुक्यातील लोकांचा भ्रमनिराश झाला.भावनेच्या भरात मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या कडून चूक झाल्याचे आता अनेक जण बोलून दाखवीत आहे.तालुक्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे.2024 साठी लोक पुन्हा अपेक्षेने पाहू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वसामान्य माणसांनी,कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत प्रचार केला.विकासाला मोठी गती मिळेल या अपेक्षेने बदल घडून आणला.निवडणूक प्रचारातील लहान मोठ्या आश्वासणांना लोक भुलले.पण आता वास्तवाची जाणीव झाल्यानंतर चूक झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.गावोगाव ग्रामसभेत लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना अवैध व्यवसायावर हल्ला बोल करावा लागला.स्वतःच्या गावातील पोलीस ठाण्यात कुणीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा अनुभव दस्तुर खुद्द लोक प्रतिनिधींना आला.अकोलेची एम आय डी सी लिंगदेव च्या घाटातच अडकली.तीन वर्षात तालुक्यात साधा बंधारा झाला नाही की वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण झाले नाही. निळवंडेचे उच्च स्तरीय कालवे,निळवंडेच्या उड्डाण पूल,32 गाव पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांची रखडपट्टी सुरूच आहे.कोरोना काळात लोकांचे मोठे हाल झाले.वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले.कोरोना काळात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा सामान्य माणसाला मोठा आर्थिक फटका बसला.तालुक्यात सुरू असणाऱ्या रस्ते आणि इतर कामांच्या दर्जा बाबत माध्यमांत सातत्याने बातम्या येत आहेत.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीच आपल्या गावच्या रस्त्याच्या सुरू असणाऱ्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गतवर्षी वेळेवर कारखान्याने ऊस न नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,प्रशासनाकडून अडवणूक होणार नाही,अर्थिक उन्नती होऊ शकेल असे कोणतेही काम तीन वर्षात झाले नाही.गावातील रस्ते,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालये,सभामंडप यालाच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकास म्हणत ढोल वाजविले जात आहेत. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेत झाला आहे.. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची आठवण होऊ लागली आहे.आजही उच्च स्तरीय कालव्याचे काम अंतिम टप्प्यात असून जुलै महिन्यात हा प्रकल्प सुरू होणार आहे .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकाल्प अग्रक्रमाने घेऊन अकोले तालुक्यातील जनतेला पाणी देण्याचे ठरविले आहे . सत्तेवर असताना सत्तेच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यासाठी सतत आग्रही भूमिका आपण घेतलीव सत्ता नसताना विकासाच्या प्रश्नांवर,जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका तेव्हड्याच ताकतीने पार पाडली आहे,पार पाडत आहेत .विकास आणि संघर्ष या दोन्ही भूमिका .करावी लागत आहे . विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.राज्यातही विरोधी पक्षांचे सरकार आले तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प माझे वडील पिचड साहेब व मी दोघांनीही काम केले.इतके काम करूनही पराभव झाल्याने .वाईट वाटले .पण या पराभवाने आपण खचलो नाही .एक जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका अडीच वर्षे तालुक्यात सक्षमपणे बजावली.तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी सरकार बरोबर केलेला पत्रव्यवहार असो की प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या लहान मोठ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष असो,यातून जनहिताची चळवळ उभारली .आपला पराभव झाला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले .त्यामुळे कामे झाली नाही . शिवसेना नेते एकनाथ शिंदे,राष्ट्रवादी नेते अजितदादा हे भाजपसोबत आले त्यामुळे राज्यात सत्ताबदल होऊन महायुतीचे सरकार आले .तालुक्याचे लोकप्रतिनिधी सरकारसोबत आले .त्यामुळे आपला पराभव झाला असला तरी आपली भूमिका योग्य होती हे तालुक्यालाही व विरोधकांनाही समजली मी जर विकास कामासाठी भाजपात गेलो तर माझ्या मागून आलेले देखील हीच भूमिका बजावत आहे .त्यामुळे मी तालुक्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे ही वस्तू स्थिती समोर आली व टिकाकारांची बोलती बंद झाली .विधानसभेत माझा पराभव असला तरी माझ्या भूमिकेचा हा विजयच आहे .,आता राज्यातील सत्ता बदलानंतर माझ्यावर टीका करणारे लोकप्रतिनिधी यांचीही भूमिका बदलली आहे. 2019 नंतर माझे अनेक जेष्ठ सहकारी आपणाला सोडून सत्ताधारी पक्षात गेले .पण या राजकीय वावटळीतही आपण ठाम पणे उभे आहोत .कार्यकर्त्यांना धीर देत विचलित न होता ताकदीने उभे राहण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले .माझ्या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत नाराज असणारी तरुणाई पुन्हा जवळ येऊ लागली आहे . बोलू लागली आहे . मागील अडीच वर्षात विरोधी सत्ता असतांना तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला,राजकारणात एकटे पडलो,पण खचलो नाही.अगस्ती कारखाना निवडणुकीत फटका बसला तरीही न डगमगता अमृतसागर दूध संघात एकहाती सत्ता . अकोले नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा एक हाती विजयश्री खेचून आणली.अनेक विकास सोसायट्या ,ग्रामपंचायत आपल्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या.यापूर्वी आपण कधीही सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हतो पण यावेळी आवर्जून लक्ष घातले.आणि सोसायट्या वर वर्चस्व मिळविले. पुढील जिल्हा बँकेचया निवडणुकीत याचा निश्चितच लाभ होईल .महानंदा च्या संचालक पदावरही आपली बिनविरोध निवड झाली त्यामुळे पुन्हा एकदा राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, रुग्णांना,गरिबांना,आदिवासी बांधवाना मदत केली. विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करीत तत्कालीन सरकारलाही निर्णय घेण्यास भाग पाडले. जे काम विद्यमान आमदाराने करणे गरजेचे असताना ती कामे आपण मार्गी लावली. तालुक्याच्या दृष्टीने जी विकास कामे प्रलंबित आहे,होणे गरजेचे आहे त्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, संबंधित विभागाचे मंत्री,सचिव,जिल्हाधिकारी, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील यात संदेह नाही.. भाजप पक्षनेतृत्वाने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करून सन्मान केला. भाजपच्या कारकिर्दीत पहिल्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास संधी मिळली राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी येणार होती,मात्र भाजप ची कार्यप्रणाली,विचारधारा समजून घेऊन मला काम करू द्या, असे म्हणत मोठी संधी नाकारली . दिल्ली येथील पक्षाच्या पहिल्याच मिटिंग मध्ये आपल्या कामाची वेगळी छाप पडली हा मला अभिमान आहे . परिचय नाव: वैभव मधुकरराव पिचड गाव: राजूर, ता. अकोले वाढदिवस: २७ एप्रिल शिक्षण: बी. ए. पक्ष भाजप सध्याची पदे अध्यक्ष अमृत सागर दूध संघ ■विश्वस्त, आदिवासी उनती शिक्षण संस्था समिती • सदस्य, आदिवासी विकास प्रकल्प समिती महामंत्री भाजप अनुसूचित जमाती मोर्चा नवी दिल्ली भूषविलेली पदे : वै भव पिचड यांनी आदिवासी उनती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यायांवरील मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. सामान्यांना उच्य शिक्षण मिळवून देण्याचा ध्यास घेतला, शैक्षणिक कामात पारदर्शकता आणली जिला परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सभापती असताना दारिद्यरेषेखालील कुटुंबे, समाजकल्याण विभागाच्या योजनांचा, हरिजन सुधारणा योजना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना, शेतीच्या योजना यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून दिला. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून चौकट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले आदर्श व आयकॉन असून देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्ठा ठेवून आपली सामाजिक व राजकीय वाटचाल असून कितीही संघर्ष करावा लागला तरी त्यांच्यावरील निष्ट ठेवून तालुक्याचा विकास करू असेही वैभव पिचड म्हणाले

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...