Sunday, January 10, 2021

संस्काराचे विद्यापीठ....

हळव्या मायेच्या बोलांनी माणसाला जीव लावणारी काही नाती विलक्षणच असतात . भले ही नाती नसूद्यात रक्ताची .. अकोल्यातील चिरेबंदी परिसरात टाकळकर वाड्यात होतं असंच गजबजलेलं नांव अन् एक मायेचं गांव .. टाकळकर मामी नावाचं ! या नावाचं वलय आणि मात काय सांगावी देवा ! 

   प्रमिला पुरुषोत्तम टाकळकर हे झालं लौकीक नाव हो . पण ' टाकळकर मामी ' हीच खरी ओळख या आजींची . वयाच्या ९२ वर्षी नुकताच निरोप घेतला मामींनी . टाकळकर मामांची पत्नी , प्रकाश उर्फ मधू टाकळकरांची आई , टाकळकर वाड्यासह पंचक्रोशीतील मामी ! हळव्या मायेचं उत्साही बोलणारं व्यक्तित्व . आल्यागेल्यांची आस्थेनं  विचारपूस करणारं , चहापाणी - नाश्ता घेतल्याविना दाराबाहेर पडू न देणारं , गोडगोडव्या शब्दांत संवाद करणारं , खणखणीत आवाजातलं , समजुतीनं बोलणारं असं सारं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व म्हणजे टाकळकर मामी ! आपुलकीनं अनेकांचा या घरात सातत्याने वावर असायचा .. 

   मामी म्हणजे शिस्त . मामी म्हणजे वळण . मामी म्हणजे समजून उमजून लळा लावणारं घर . मामी म्हणजे तब्येतीची ख्यालीखुशाली विचारणारं आदराचं ठिकाण . मामी म्हणजे जिव्हाळ्याची सावली . जुन्या वळणाचा जिना पार करुन मामींना आवर्जून भेटायला जाताना घराला दार असेल .. उंबरा असेल .. पण येणाऱ्याच्या पावलांना नव्हता अटकाव आणि अडसर - अडथळा ! इथल्या आतिथ्य सागराला नव्हता कधी किनारा . प्रत्यक्ष भेटीत मामींचं आवर्जून स्मरणभरलं बोलणं असायचं , ' सर , परवा बातमी वाचली . मागचा लेखही वाचला बरं का ! अभिमान वाटतो . ' तर कधी - ' मधू सरच हवेत का .. घाई नाही ना निघण्याची .. म्हटलं बघूयात परस्पर जाताय काय ! ' अशी सारी एकंदर विचारपूस .. 

   कधी चिरेबंदी वाड्याच्या मुख्य कमानीसमोरील पुरातन शिव मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या मामी माणसांची मनाची - आदराची श्रीमंती जमवत संवादी सूर जपणार . तर कधी वाट पाहणारं हे दार  किलकिल्या नजरेनं ममतेचं नातं अधिक दृढ करणार ! 
    कधी मामी हळव्या मनानं म्हणायच्या -
     ' तुम्ही मधूकडं येतात . माझ्याकडे येतात आठवणीनं . फार बरं वाटतं . '  
   ' मामी तुमच्यासाठीच तर यायचं की . टळून टाळून कधी घडेल काय ? ' 
  ' हो ना .. हो ना . आहे तोवर येत जा ! ' 
     मामी दीर्घायु ठरल्या . वय होतं अधिक . पण मन आणि उत्साही बोलणं .. अगत्य अन् आतिथ्य नाही कधीच उणं पडलं इथं .. या आस्था - आपुलकीनं मग आठवतात पाडगावकरांच्या ओळी - 
       ' कुठे कुणाच्या घडल्या भेटी ।
      गीत एक मोहरले ओठी । 
      त्या जुळल्या ह्रदयाची गाथा ।
     सूर अजूनही गाती । 
     देवघरच्या समईमधुनी अजून जळती वाती .. ' 

     वाट पाहणारं हे दार , हा वाडा , हा जिना , चिरेबंदीचा परिसर , शिवालयाचा ओटा आता अधिक अधिक शांत शांत , सुना सुना ... रिता रिता .. हरवलेल्या श्रीमंती क्षणांची , आठवणींची गडदगर्द सावली विरळ - जाळीदार पिंपळ पानासारखा याद देणारा असेल .. 
      ----------------------------------- 🍂🍂

    📚 डॉ . सुनील शिंदे

Saturday, August 22, 2020

धुक्यात हरवली गावे

अकोले, ता.२२: मोठं मोठे धुक्याचे डोंगर त्यामुळे रस्ता दिसेना की गाव दिसेना चोंढे घाटाच्या वरती विस्वलेले गाव धुक्यात हरवली आहे ....भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर गाव ,प्रकल्पग्रस्त म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले हे गाव चार महिने पाऊस ,धुके यांच्या लंप डावात सापडलेले गाव दरवर्षी पाच हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पर्जन्य वृष्टी होणारे व घाटाचा परिसर असल्याने पडलेले घाटघर नाव ,जेमतेम ८०० लोकवस्ती मुख्य व्यवसाय शेती परंतु त्यातील काही जमीन प्रकल्पात गेली असल्याने न्याय हककासाठी ,सरकारच्या विरोधात आंदोलन,न्यायालयात दावे करून भिक नको आम्हाला हवे घामचे दाम  आधी पुनर्वसन मग प्रकल्प म्हणत संघर्ष करत इथिलं ठाकर आदिवासी कांदडी समाजाचे लोक जगत आहेत.माजी आदिवासी विकास मंत्री यांनी प्रकल्पात हे स्वतंत्र गाव बसवले त्यांना सर्व सुविधा ,रस्ते,वीज,पाणी ,आरोग्य केंद्र,आश्रमशाळा,देऊन घरटी माणसाला नोकरी दिली मात्र अजून काही मागण्या अपूर्ण असून मध्यंतरी ग्रामस्थांनी वीज प्रकल्प बंद पाडला त्यामुळे त्यांची शासन दरबारी दख ल घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर केल्या ,दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते पाऊस व धुके या गावात सतत त्यामुळे वृध्द माणसे , जनावरे घरातच राहतात .भातपीक निम्मेच पदरात पडते तर अतिवृष्टी मुळे पीक धुऊन जाण्याचे प्रमाण अधिक,वीज टिकत नाही त्यामुळे पाणी नाही मग झुर्‍याचे पाणी किवा लवाचे पाणी ,प्यावे लागते ,भात मासे आमटी हे त्यांचे मुख्य अन्न चौमुळी कौलाची घरे पारंपारीक पद्धतीने दगडी बांधकाम,लाकूड,वापरून उभारलेली ही घरे पर्यटक ना आकर्षित करतात स्वच्छता टापटीप पना , घरात लाकडी धूनी पेटलेली गॅस वनविभागाने दिला आला तरी चुलीवरची जेवण पसंदी ग्रमस्थ देतात ,निसर्गाने नटलेला हा परिसर चारी बाजूने सह्याद्रीचे डोंगर,त्यावरून पडणारे पांढरेशुभ्र धबधबे, कोकणकड्याच्या परिसरात येणारे धुके,पाऊस व त्याचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक त्यांच्या सेवेसाठी जेवण, चहा,भजी,शेंगा, मका कणीस घेऊन व्यवसाय करणारे  स्थानिकतरुण त्यातून मिळणारा रोजगार मात्र यावर्षी कोरोणा संकटामुळे पर्यटक बंदी त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाही .अतिवृष्टीमुळे शेतीत काहीच नाही त्यामुळे घाटघर गाव अडचणीत सापडले आहे .सरकारने अजून खाव टी दिली नाही ,तर पर्यटन सुरू करावे ही ग्रामस्थांनी केलेली मागणी सरकार काय करेल हे माहीत नाही पण निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे अर्थकारण बिघडले हे मात्र खरे ,पाऊस अमच्यकडे पडतो त्यामुळे भंडारदरा जलाशय भरते त्यातून लाभक्षेत्र आनंदी होते साखर कारखाने,खाजगी कारखाने ,दारूचे कारखाने आनंदी होतात मात्र आमचे रोजचे मरण त्याला कोण रडणार सरकारने आम्हाला कायम स्वरुपी रोजगार द्यावा असे इथिळ आदिवासींचे मत आहे कोट -,धोंडीबा सोंगाळ (माजी सरपंच घाटघर)-,अतिवृष्टी झाली पंचनामे झाले मात्र भरपाई नाही चार महिने धुके ,पाऊस त्यामुळे घरात बसून राहावे लागते त्यात भातपीक येत नाही सरकार भरपाई नाही की खाव टी देत नाही,टीत पर्यटन नाही त्यामुळे रोजगार नाही पुढारी फक्त मत घेण्यासाठी येतात ,पिचड साहेबांनी पुनर्वसन केले मात्र त्यांचे सरकार नाही त्यामुळे सगळे अडचणीचे झाले आहे ,भंडारदरा आमच्या नऊ गावाचा आत्मा आहे ,तो भरताना आमचे मोठे नुकसान होते मात्र पुढारी व लाभक्षेत्र मंडळी धरणावर आनंद व्यक्त करतात मात्र आमचे काय हाल आहेत कधी पाहिले का ?नऊ गावाला एकाही कारखान्याने कोरोना काळात मदत केली नाही ते जाणीव नसलेले लोक आहेत असेही सोंगा ळ म्हणाले सोबत फोटो.

Thursday, August 20, 2020

कौशल्य विकास


केंद्र सरकारकडून सातत्याने कौशल्य विकासाचा नारा लावला जात असतांना युवकांपर्यंत अजूनही पुरेशा प्रमाणात याबाबतची माहिती पोहचलेली नाही. देशाला २०२० पर्यंत १२ कोटी कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘स्कील इंडिया डेव्हलपमेंट मिशन’ ही योजना सुरु आहे. देशात दहावी पासूनच करिअरचा विचार करणारे २३ टक्के, बारावीपासून ३८ टक्के आणि पदवीनंतर याबाबतचा विचार सुरु करणारे ४७ टक्के विद्यार्थी आहेत. फक्त १८ टक्के विद्यार्थीच करिअर विषयक समुपदेशन सुविधेचा लाभ घेतात. आपल्या देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण फक्त २० टक्केच असून चीनमध्ये ४५ टक्के, अमेरिकेत ५६ टक्के, जर्मनीत ७४ टक्के, जपानमध्ये  ८० टक्के आणि दक्षिण कोरियात ९६ टक्के कुशल मनुष्यबळ असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तसेच कौशल्य शिक्षणाचे – व्यवसाय शिक्षणाचे – चीनमध्ये १०० तर जर्मनीमध्ये १६० विद्यापीठे आज अस्तित्वात आहेत.
भारतात आजही ८३ टक्के युवकांना शासकीय नोकरी अनुकूल वाटते. १६ टक्के युवकांना व्यवसाय करावा असे वाटते तर खाजगी क्षेत्राकडे वळणाऱ्यांचे प्रमाण फक्त ६ टक्केच आहे. राज्याच्या सध्याच्या शैक्षणिक धोरणांवर ७४ टक्के विद्यार्थ्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.
आपल्या राज्यात सरकारने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांद्वारे २०२२ पर्यंत ५० कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. विविध क्षेत्रांतील कौशल्य विकासाशी संबंधित ६०० प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध केले आहे. राज्यात एकूण ४१७ शासकीय आणि ४५४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार केला असता जवळजवळ तीन दशकांपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांना तांत्रिक शिक्षण किंवा टेक्निकल असं म्हटलं जायचं. त्याला शालेय शिक्षणामध्ये अतिरिक्त ग्रेड असायची. ज्या विद्यार्थ्यांना आठवीनंतर या तांत्रिक अभ्यासक्रमाचा फायदा करून घ्यायचा आहे ते विद्यार्थी यासाठी आठवड्यातून साधारणत: एकदा दर शुक्रवारी, यासंबंधीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असे. यामध्ये मुळातच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा आयटीआयच्या अभ्यासक्रमांची प्राथमिक माहिती व्हावी व त्यासाठी त्यांची आवड वृध्दिगत व्हावी हा यामागचा हेतू होता. मात्र शासनाने प्रयत्न करूनही म्हणावे तसे यश येत नव्हते. त्यावेळी मुलांमध्ये, पालकांमध्ये याबद्दल अजिबात जागरूकता नव्हती, हे एक महत्त्वाचे कारण त्याच्या अपयशामागे होते असे म्हणता येईल.

Saturday, August 8, 2020

भंडारदरा

https://www.esakal.com/ahmednagar/mula-bhandardara-catchment-rains-again-331265

Friday, July 31, 2020

kale

अकोले - प्रतिनिधी - तांत्रिक अडचणींमुळे गेल्या तीन वर्षापासून रखडलेले २७ दशलक्ष घनफूट क्षमतेचे मोरदरी लघुपाटबंधारे तलावाचे काम लवकरच सुरु करणार असून काही तांत्रिक बाबींच्या पुर्ततेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार  असल्याची ग्वाही लघुसिंचन नाशिक विभागाचे सुपरिटेंडर इंजिनिअर सागर शिंदे यांनी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कार्यकर्ते यांनी शिंदे यांना घेराव घातला तेव्हा हे आश्वासन दिले.             
आमदार पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने लघुसिंचन नाशिक विभागाचे सुपरिडंट इंजिनिअरची शिंदे यांची भेट घेऊन घेराव घातला. अकोले तालुक्यात रखडलेल्या तलावांच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली. यावेळी जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे   सभापती कैलास वाकचौरे, पाटपाण्याचे अभयासक मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विजय थोरात, उपअभियंता मयुर सोनवणे, शाखा अभियंता संजय कलापुरे उपस्थित होते.
आ. पिचड यांनी लघुसिंचन विभागाच्या अधिका-यांच्या कार्यपध्दतीबाबत  नाराजी व्यक्त करित अकोले तालुक्यात लघुसिंचन विभागाच्या माध्यमातून मोरदरी या लघुपाटबंधारे तलावाच्या रखडलेल्या कामाला अधिकारीच जबाबदार असुन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासी विभागाकडून निधी मंजूर करुन दिला. त्यानंतर निविदा प्रक्रिया झाली, कामही सुरु झाले पण पायामध्ये डाईक लागल्यानंतर हे काम थांबले. त्यानंतर ज्या तांत्रिक बाबी पूर्ण करणे तातडीने  आवश्यक होत्या त्या होऊ शकल्या नाही अन् हे काम रखडले. परिसरातील शेतकाऱ्या नी या प्रकल्पासाठी स्वतःहून जमिनी दिल्या. सहकार्य केले. प्रकल्पाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत नव्हते पण माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ते मोठ्या प्रयत्नानंतर मिळवून दिले. भुसंपादनाची प्रक्रियाही रखडली आहे. त्याला गती देण्याची गरज आहे. सन २०१५ मार्च मध्ये काम सरु झाले होते, तेव्हापासून हे काम बंद आहे. तरी हे काम लवकर सुरु करावे अन्यथा शेतक-यांसह आपण पुढील आंदोलन हे व्यापक करु असा इशारा आ. पिचड यांनी यावेळी दिला. 
यावेळी लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्या यांनी सांगितले की, मोरदरी धरणाचे काम सुरु असताना  पायात डाईक लागल्याने हे काम थांबविण्यात आले. याबाबत आम्ही गांभिर्याने लक्ष दिले. मुख्य अभियंत्यांनी यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. सन २०१६    ला पुणे येथील जीवआलोंजिस्ट यांना डिसेंबर २०१७ ला पाचारण करण्यात आले. त्यांचेही याबाबत मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ५ लाख रुपयेही सी. डी. ओला पाठविण्यात आले. ते आणखी साडेतीन लाख रुपये भरा असे सांगत असून त्याचाही भरणा लवकर करुन ,मुख्य अभियंता यांची प्रत्यक्ष पाहणी झाल्यावर काम सुरु करु अशी ग्वाहीही लघुसिंचनच्या अधिकाऱ्या यांनी या बैठकीत दिली. तर पिंपळदरा वाडीचे लघु तलावाबाबत अंदाजपत्रक करुन सादर करणार आहोत. या तलावाची उंची २० मीटर इतकी  समाविष्ट असल्याच; यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच यास प्रशासकीय मान्यताही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर २०१४ नंतर निकषात बदल झाल्यामुळे एकही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले तर जांभळे ,बदगी या तलावांनाही प्रशासकीय मान्यता घेणार आहे. 
या बैठकीसाठी शेतकरी शांताराम मेंगाळ, वाळीबा मेंगाळ, सिताराम मेंगाळ, किसन ढोन्नर, पुनाजी मेंगाळ, साबीर शेख, गंगाराम मेंगाळ, मंगा मेंगाळ यांच्यासह राजीव कानकाटे, राहुल देशमुख, संपत नाईकवाडी, शंभू नेहे, गोरक्ष मालुंजकर, शरद चौधरी, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते. 
चौकट ः-
आदिवासी उपयोजनेतून लघुसिंचन विभागाला ७० लाख रुपये मिळवून दिले होते पण या निधीतून एकही काम झाले नाही. हा निधी परत गेला. या प्रकरणी आपण विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे आ. पिचड यांनी सांगितले. 
चौकट ः- 
बिताक्यासाठी संयुक्त बैठक
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नातून बिताका प्रकल्प मार्गी लागला, त्यासाठी आदिवासी उपयोजनेतून वनसमितीला निधी दिला. हा प्रकल्प अपूर्ण असून वनसमितीकडे ६५ लाख रुपये पडून आहे. या कामाला गती देण्यासाठी लघुसिंचन विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग, वनविभाग यांची संयुक्त बैठक आ.वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे.



Attachments area

Tuesday, July 28, 2020

भंडारदरा शंभरी पार करताना दुर्लक्षित

कोरोनाच्या नावाखाली भंडारदरा धरणाची देखभाल थंडावली, भिंतीवर वाढले गवत
http://www.sarkarnama.in/rajya-nagar/maintenance-bhandardara-dam-under-name-corona-cooled-down-grass-growing-wall-59145

हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!

 हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!  पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...