Sunday, May 7, 2017

यापुढे दरवर्षी किमान 51 विवाह आयोजित करण्यात येतील. त्यामुळे आदिवासी भागातून यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलंमुलींचे स्वतंत्र लग्न न लावता ते सामुदायिक विवाह सोहळ्यातच लावण्यासाठी गावोगावचे धुरिणांनी पुढाकार घ्यावा,

म.टा.वृत्तसेवा, अकोले, -
गावोगावी होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहाचे पद्धतीने  भंडारदरा धरणाच्या बगिचात दरवर्षी एका ठरावीक तारखेला  कोणत्याही प्रकारच्या मानपानाशिवाय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यापुढे दरवर्षी किमान 51 विवाह  आयोजित करण्यात येतील. त्यामुळे आदिवासी भागातून यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलंमुलींचे स्वतंत्र लग्न न लावता ते सामुदायिक विवाह सोहळ्यातच लावण्यासाठी गावोगावचे धुरिणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदिवासींचे मार्गदर्शक व भाजपचे नेते अशोकराव भांगरे यांनी केले. 
   जलसंपदा विभागाच्या भंडारदरा धरणाच्या  हिरव्यागार बगिचात शुक्रवारी (5 मे) दुपारी तीन  वाजता पहिल्या आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी सुमारे पाच हजारांहून अधिक जनसमुदाय या पहिल्या आदिवासी सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित होते. आज पार पडलेल्या विवाह सोहळ्यात दिघे - वातडे, लहामटे - बांबळे, गोलवड- उभे, बांडे - झडे, खाडे - लोटे, घोडे - खेतले, भागडे - सगभोर, देशमुख - भवारी हे अकोले तालुक्यातील आदिवासी समाजातील वधुवर आज थाटामाटात विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे वरवधू पक्षाकडून केवळ 500 रूपये खर्च घेऊन त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. अकोले तालुका आदिवासी मित्र मंडळ व अकोले तालुका पश्चिम विभाग वारकरी संप्रदाय अकोले या संस्थांनी हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
   या विवाह सोहळ्यात वधूवरांचे जन्म दाखले पाहूनच विवाह करण्यास मान्यता दिली असल्याने आदिवासी भागातून बालविवाह रोखण्याचा हेतूही या चळवळीतून साध्य होणार आहे. लग्न झाल्यावर कोणीही वरात काढायची नाही , असे आवाहन केले आहे. लग्न सोहळ्यातील वधूवरांनां शासनाकडून विवाह अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल. विवाहात मानपान व आहेर थांबवून लग्नासाठी वधूवरांना ड्रेस, पुरोहित, मंडप, वाद्यवृंद, लाऊडस्पीकर, बेंजोपार्टी व आवश्यक खर्च मोफत उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी विठ्ठल बापु खाडे, आंनदा खाडे, हिरामण सोनवणे, पांडुरंग ईदे, बाबुराव अस्वले, तुकाराम भोरु गभाले, हभप देवराम महाराज ईदे, आंनदराव मधे, मंगळा पटेकर, राजेंद्र मधे, कुडंलिक खाडे, पुनाजी सगभोर, देवराम भांगरे, सुरेश गभाले, सुरेश घाटकर, मधु भांगरे, लक्ष्मण उघडे, युवराज उघडे, यशंवंत बांडे, चंदर बांडे, शंकर झडे, शंकर घारे, सोमा नावजी मधे, लक्ष्मण भांगरे, सारोक्ते गुरुजी, दशरथ झडे, मुरलीधर मधे यांनी सामुदायिक विवाह सोहळा मोहिमेत विशेष परिश्रम घेतले, असे या संदर्भात माहिती देताना अशोकराव भांगरे यांनी सांगितले. या सामुदायिक विवाह सोहळा मोहिमेत अकोले तालुका आदिवासी मित्र मंडळ व तालुक्यातील पश्चिम विभागातील वारकरी समाज संप्रदायातील धुरिणांनी आदिवासी बांधवांना आपल्या नियोजित वधूवरांचे विवाह सामुदायिक विवाह सोहळ्यात घडवून आणण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी आदिवासी गांवातून प्रचार व प्रसार मोहीम राबविण्यात आली. सोहळ्यासाठी प्रतिवर्षी देणगीदार संख्या वाढत जाईल व आदिवासी भागातील लग्नाच्या जिवघेण्या रुढी व परंपरा बदलण्यासाठी या सामाजिक चळवळीतील कार्यकर्त यशस्वी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोट - आजपर्यंत मताच्या राजकारणात राजकीय पक्षांचे पुढारी आणि नेत्यांनी चुकिच्या प्रथा निर्माण केल्या आहेत. या निरपयोगी प्रथा, परंपरा मोडून समाजाला उचित दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग दाखवण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षातील पुढारी आणि नेत्यांची आहे. यासाठी राजकीय लोभ बाजूला ठेवून  अशा सामुदायिक विवाह सोहळ्यात मानपानाशिवाय लग्न लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
- अॅड. वसंतराव मनकर, भाजप जेष्ठ नेते.चौकट--हिरव्या गर्द झाडीत विवाह लागत असताना झाडावर कावळे,चिमण्या,वटवाघूळ यांनीही झाडावर किलबिलाट करीत या विवाह समारंभाला उपस्थितीत दाखवली तर पारंपरिक वाद्य व आदिवासी नृत्य सादर करीत आदिवासींनी जल्लोष केला सोबत फोटो 

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...